✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अपुले प्रधानमंत्री मोदी

स — सोहम कामत, Fri, 11/11/2016 - 23:56
('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य) देशाचे प्रेम उसळले.. पाचशेचे नोटच गळले.. हजारला कीड लागली.. भ्रष्टांची गल्लत फसली.. मोदींचा निर्णय एकला.... भुरट्यांना केले कंगाल.. बॅंकांची भलती उलाढाल.. उधळून तो काळा पैसा शेठ मावळले.... अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.. हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी.. झालीया सार्या नेत्यांची मासकी.. जातच नाही गळ्यातून व्हिसकी.. काळी ती नोट निघाली नासकी.. नि:वस्त्र झाले.. भ्रष्ट पळाले.. मंत्र्यांनी सार्या.. टिकास्त्र फेकले.. भाजपचे प्रधानमंत्री स्तुतीने न्हाले.. अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.. हो.. पांढरा रंग हा.. होतसे या नेत्यांचा.. झालिया बोंबाबोंब.. ऐन या रातीला.. शेठांचा पैसा काळा.. बसलाया त्याला आळा.. जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले.. अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.

प्रतिक्रिया द्या
14294 वाचन

💬 प्रतिसाद (34)

कवितेसारखे वाटतेय काहीतरी...

खटपट्या
Sat, 11/12/2016 - 08:30 नवीन
कवितेसारखे वाटतेय काहीतरी...
  • Log in or register to post comments

हम्म.. वट ती शेठांची झालीया

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 08:36 नवीन
हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी.. झालीया सार्या नेत्यांची मासकी.. जातच नाही गळ्यातून व्हिसकी.. काळी ती नोट निघाली नासकी..
अप्रतिम !!!
जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले.. अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.
सुंदर !!!
  • Log in or register to post comments

वाह अतिसुंदर कविता !!!

अभिजीत अवलिया
Sat, 11/12/2016 - 08:38 नवीन
वाह अतिसुंदर कविता !!! कोणता रस म्हणायचा हा?
  • Log in or register to post comments

भयाणरस?

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 08:41 नवीन
भयाणरस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

करुणरस

स्वामी संकेतानंद
Sat, 11/12/2016 - 08:41 नवीन
करुणरस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

ह्या भयाणरसाने / करुणरसाने

अभिजीत अवलिया
Sat, 11/12/2016 - 09:09 नवीन
ह्या भयाणरसाने / करुणरसाने सजलेल्या ताजमहालला माझी एक वीट कविता करताना कवीने मला नाही 'आठवले' म्ह्णूनच हो दुर्दैवी मिपाकर कवितेचे यमकच बिघडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

लिल्या आठवला मला. आजकाल कुठे

किसन शिंदे
Sat, 11/12/2016 - 10:18 नवीन
लिल्याची एक बीचारे अण्णा आठवली मला. आजकाल कुठे असतो कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments

कवितेच्या रसांमध्ये

बोका-ए-आझम
Sat, 11/12/2016 - 10:38 नवीन
कोडाईकनाल, भूछत्री, गरम पाण्याचे कुंड इत्यादी नसल्याचा णिशेध!
  • Log in or register to post comments

इंडियन आर्मीला हिंदुत्व

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 11/12/2016 - 11:03 नवीन
इंडियन आर्मीला हिंदुत्व वगैरेशी जोडणारी दिव्य रचना पण ह्यांच्याच कळफलकातून स्रावली होती न हो मंडळी?
  • Log in or register to post comments

कोणत्या कवितेत कोणती जोड..

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 14:08 नवीन
सोन्याबापूंना प्रामाणिक विनंती.. असे की माझ्या इतर कवितांवर काही आक्षेप असेल तर तो त्या कवितेच्या वेळी बोलावा. त्याचा संदर्भ इतर कवितांत लावून कवितांचा आस्वाद गढूळ करू नये.. आपणास आवडली नसेल तर कृपया माझ्या इतर चुका येथे दाखवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सहमत आहे...

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 14:27 नवीन
इतक्या सुंदर कवितेचा आस्वाद घ्यायचा सोडून तिचा इतर कवितांशी संबंध जोडून कवितेची चव डागाळणार्‍या सोन्याबापूंचा त्रिवार आणि तिव्र निशेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोहम कामत

बापू असं नाव लावणा-या कोणाचाही निषेध करणं जीवावर येतं

माम्लेदारचा पन्खा
Sat, 11/12/2016 - 15:27 नवीन
आधीच एक बापू धावाधाव करुनही मिळेनासे झालेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाही तर काय?

नाखु
Sat, 11/12/2016 - 16:03 नवीन
लोक लाईन लावायला लागलेत तरी मिळेनात ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

एक बापू आत आहेत. कोणत्या

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 17:13 नवीन
एक बापू आत आहेत. कोणत्या बापूंबद्दल बोलत आहेत तुम्ही मापंजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

कामत साहेब आपण जे काही लिहितो

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 11/12/2016 - 17:53 नवीन
कामत साहेब आपण जे काही लिहितो त्याला आपण अन फक्त आपण जबाबदार असतो ह्याचे भान ठेवा जरासे. ही तुमची तीच दिव्य कविता ह्या कविते (?) वर शेवटची कॉमेंट माझीच आहे, तुम्ही त्याला काहीही प्रतिसाद दिलेला नाहीयेत. परत मलाच शिकवताय की जिथले तिथे बोला ?? आधी जे काही वैचारिक रित्या गरिबीरेषेच्या खाली लिहिलंय त्याची जबाबदारी घेऊन, जिथे लिहिलंय तिथे स्पष्टीकरण द्यायचे धारिष्ट्य दाखवा, मग मी इथे तुम्हाला ह्या कवितेबद्दल (परत ?)प्रतिक्रिया सुद्धा देतो अन प्रामाणिक प्रश्न सुद्धा विचारतो, कसे??.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोहम कामत

बापु... "दारिद्र्य" रेषेखाली

पिलीयन रायडर
Sat, 11/12/2016 - 17:57 नवीन
बापु... "दारिद्र्य" रेषेखाली जास्त चपखल वाटेल ना हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

वैचारीक दारीद्र्य रेषा =))

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 18:00 नवीन
वैचारीक दारीद्र्य रेषा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी दुरुस्त उभा राहतो (i stand

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 11/12/2016 - 18:07 नवीन
मी दुरुस्त उभा राहतो (i stand corrected) दारिद्र्य रेषेखाली असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मान्य आहे पण..

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 18:41 नवीन
तुमची अस्वस्थ प्रतिक्रिया मान्य आहे आणि हेही मान्य करतो की त्या कवितेत हिंदू धर्माबद्दल भावूक होवून लिहीले आहे आणि त्याबद्दल क्षमस्व.. मी हिंदू असल्याने थोडा भावूक झालो होतो तेंव्हा माहित नव्हते की वाचक इतर नजरेने सुद्धा वाचतात. परंतु फक्त एका कवितेच्या चुकीमुळे कवीला चुकीचे ठरवणे चुकीचे आहे. तुम्हाला कवितेतील काही कळत नसेल तर कृपया प्रतिक्रिया देवू नये. मी आपणास शिकवित नाही तर समजावतो आहे.. त्या कवितांची चुक इतरत्र काढून कृपया गोंधळ वाढवू नये. आपल्यामुळे इतरांना कवितेचा आनंद घेणे कठीण होते. काही चुकीचे बोललो असल्यास क्षमस्व..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

रा रा रा... धागाकर्ते..!

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 18:46 नवीन
रा रा रा... धागाकर्ते..! बापुसाहेब हिंदूही नाहीत आणि भावूक तर अज्याबात नाहीत. ते फक्त सैनिक आहेत. एवढं ज्याला कळत नसेल त्याने इतरांच्या कळण्या-न-कळण्याच्या, समजावण्याच्या फंदात पडू नये. हे मी आपल्याला शिकवित नाही, समजवत नाही, काहीच करत नाही. मला मिसळपावच्या मालकांनी प्रतिक्रिया द्यायचा हक्क दिलाय तो बजावतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोहम कामत

मान्य आहे पण इतर कवितांचा

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 18:57 नवीन
मान्य आहे पण इतर कवितांचा संदर्भ येथे लावण्याची आवश्यकताच नाही आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बुळूक बुळूक बुळूक...!

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/12/2016 - 16:21 नवीन
बुळूक बुळूक बुळूक...! वावराला सोन्याची झुळूक! . . . डबडं घेऊन पळत पळत जौन बसल्यासारखं वाट्टय... वर पासून खालपरेंत वाचताना! =))
  • Log in or register to post comments

"बुवा" इज ब्याक !!!

सतिश गावडे
Sat, 11/12/2016 - 17:13 नवीन
"बुवा" इज ब्याक !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अकलेचे झाड? देशाचे हाड? अहो

राजेश घासकडवी
Sat, 11/12/2016 - 17:22 नवीन
अकलेचे झाड? देशाचे हाड? अहो माननीय पंतप्रधानांना तुम्ही अशा उपमा का दिल्या आहेत? अकलेचं झाड वाचल्यावर अकलेचा कांदा हा शब्दप्रयोग डोळ्यासमोर आला. आणि देशाचं हाड म्हटल्यावर 'तुमच्या देशाला काही हाड-बिड नाही का?' असं काहीतरी वाटलं. किंवा देशच त्यांना 'हाsssड' म्हणतोय असं वाटलं. जरा चांगले शब्द वापरा की हो.
  • Log in or register to post comments

विडंबन काव्य आहे..

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 18:49 नवीन
अहो विडंबन काव्य आहे ते.. वाचकांना थोडेसे विनोदी वाटायला पाहिजे ना पंतप्रधानांना आम्हीही मान देतोच की.. परंतु चुकीचे शब्द म्हणण्यापेक्षा मान ठेवून विडंबन केलेले शब्द असे म्हणणे कसे वाटेल? :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तुमचे किती अडकले ?

निओ१
Sat, 11/12/2016 - 17:31 नवीन
तुमचे किती अडकले ?
  • Log in or register to post comments

१५-२० हजार आहेत घरी ५००-१०००

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 18:51 नवीन
१५-२० हजार आहेत घरी ५००-१००० चे.. नोटा बदलून देता का? :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

'जगण्याचे भान हे' हे कोणते

संदीप डांगे
Sat, 11/12/2016 - 18:08 नवीन
'जगण्याचे भान हे' हे कोणते गाणे आहे?
  • Log in or register to post comments

अग बाई अरेच्च्या भाग २

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 18:50 नवीन
अग बाई अरेच्च्या भाग २ मधील गाणे आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एकतर त्यांनी तीन आठवड्यांत

खेडूत
Sat, 11/12/2016 - 18:12 नवीन
एकतर त्यांनी तीन आठवड्यांत तेरा कविता टाकल्या त्याचं कै कवतुक नै!
  • Log in or register to post comments

चोर कवी!

निओ१
Sat, 11/12/2016 - 18:52 नवीन
चोर कवी!
  • Log in or register to post comments

चोर कवी?

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 19:00 नवीन
चोर कवी? मला समजले नाही तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

चोर कवी?

सोहम कामत
Sat, 11/12/2016 - 19:01 नवीन
चोर कवी? मला समजले नाही तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१

तीन आठवड्यांत तेरा कविता

सचु कुळकर्णी
Sat, 11/12/2016 - 18:54 नवीन
ह्यालाच तीन तेरा होणे असे म्हणत असावेत. बराय बावा र्हायलेल्या १२ कवितांच्या वाटेला नाय गेलो. खोकलाया १२ दिशा ;) ह्याच निमित्ताने गडबडीतच का होईना बुवा तांब्या स्वारी डबड घेउन आले हे हि नसे थोडके ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा