Skip to main content

(शीर्षक सुचले नाही )

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 03/11/2016 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले आहे, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवत सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5539
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by आतिवास

धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

In reply to by आतिवास

धन्यवाद ...मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचली हि कविता... मला कळलं कि बऱ्याच गोष्टी मिसळल्या आहेत.. एखादा शब्द त्याला पुरेसा आहे का माहित नाही

छान. लिहित राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

अपयश लख्ख सोनेरी पडद्याआड लपले नाही उतवरवता ते कागदावर मज, शीर्षक सुचले नाही! आणि.... त्यांच्याच पटावर सरळ माझी चाल आदेशाबरहुकूम राजास दिली ढाल तरीही कळेना कारण हरण्याचे आता! या माझ्याच विस्मृतीत गेलेल्या ओळी पुन्हा मनात डोकावून गेल्या! :) धन्यवाद! पुन्हा.... "मैने दिलसे कहा, ढूंढ लाना खुशी...." असं बरचस मनात घोळत राहिल! पुलेशु! Sandy

In reply to by चांदणे संदीप

धन्यवाद...Sandy आणि खरंच खूप छान ओळी लिहिल्या आहेस तू (औपचारिकता ना ठेवता) आणि ही कविता वाचून तुला काही तरी सुचला याचा आनंद आहे !!