✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 10/28/2016 - 11:44  ·  लेख
लेख
प्रिय मिपाकरांनो, होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो. पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत. सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य. १. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल. २. राहण्याची सोय केल्या जाईल. ३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल. ४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल. ५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल. ६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे. पालकांच्या मृत्यु पश्चात पाल्यांना शेतमजूर म्हणून प्राधान्य. शक्यतो कुटुंबा सकट शेत-मजूर मिळाल्यास फार उत्तम. कळावे, आपला लोभ आहेच. आपलाच, (गरीब शेतकरी) मुवि
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
चौकशी
मदत

प्रतिक्रिया द्या
28930 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/31/2016 - 15:35 नवीन
मिपावर चांगले धागे असो वा नसो आपण नेहमीच उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन आदर्शाचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे, ते आम्ही अजिबात विसरलो नाही. =)) बाकी, आमच्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुवि तुम्ही कायमच आम्हाला आपले स्वतःचे समजले आहेत म्हणून बोलतोय

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/30/2016 - 10:55 नवीन
असे मिपावर धागे काढून शेती करता येणार नाही/शक्य नाही, त्याशिवाय आपल्यातले कोकणी बाले सगळे चाकरमानी आहेत, बाकी एकंदरीत प्रतिसाद पहाल तर माझे म्हणणे पटेल कदाचित तुम्हाला, शेती करतोय किंवा शेतकरी झालो असे म्हणून नुसते भागणार नाही काका, शेतकरी झालो हे कळायला आपल्यालाच ठरवावे लागते, इथे धागा काढून मजूर मिळण्याची शक्यता ह्यापेक्षा जास्त तुम्ही तुमची शेती जिथे आहे त्या संबंधित तालुक्यातील आठवडी बाजार किंवा मजूर अड्डयाला गेलात तर जास्त कळण्याची शक्यता आहे, तरी विचार करावा ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments

*काही स्वानुभव आहेत शेतीचे,

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/30/2016 - 10:55 नवीन
*काही स्वानुभव आहेत शेतीचे, मजूर नियुक्तीचे वाटल्यास व्यनि कराल तिकडे साद्यांत सांगतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अभिनंदन

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 10/31/2016 - 11:29 नवीन
मूवी ठिकाण सांगा .प्रतेक्ष भेटून काही सुचवू शकेन.अगदी थोडा का होईना पण शेतकरी म्हणून अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

सध्या...

मुक्त विहारि
Mon, 10/31/2016 - 22:47 नवीन
खेरशेत नावाच्या गावात (चिपळूण आणि संगमेश्वरच्या मध्ये) प्रयोग म्हणून, एक एकर शेती ६ महिन्यांसाठी घेतली आहे. २-३ महिन्यात तिथे रुळलो की, नक्की या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा