✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

स
संजय क्षीरसागर यांनी
Fri, 10/28/2016 - 01:01  ·  लेख
लेख
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की. तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
82832 वाचन

💬 प्रतिसाद (252)

प्रतिक्रिया

ओके

अप्पा जोगळेकर
Fri, 10/28/2016 - 01:48 नवीन
ओके
  • Log in or register to post comments

ळॉळ

रामपुरी
Fri, 10/28/2016 - 02:28 नवीन
ळॉळ रोफ्ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अप्पा...

चौकटराजा
Fri, 10/28/2016 - 09:02 नवीन
अप्पा ह ओके कशाला आहे ? ह्या वरील विवेचनाला की पी डी एफ ला ... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

पांडूऊऊऊऊऊऊ... ये रे ये!

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/28/2016 - 08:22 नवीन
पांडूऊऊऊऊऊऊ... ये रे ये! तुझे सर आले. Image removed.
  • Log in or register to post comments

पांडु का ब्रे येत नै?

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/29/2016 - 12:21 नवीन
पांडु का ब्रे येत नै? Image removed. त्याच्या लाडक्या सरांचा लेख असुनंही? (ह्ही ही! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तो

चौकटराजा
Sat, 10/29/2016 - 18:07 नवीन
तो पी डी एफ वाचण्यात गुतला असेल .... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@तो पी डी एफ वाचण्यात गुतला

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/29/2016 - 19:24 नवीन
@तो पी डी एफ वाचण्यात गुतला असेल ››› Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बुवा ..

चौकटराजा
Sun, 10/30/2016 - 15:42 नवीन
मन हे काम रिंगी रंगले गुंतुनी कोठे कधी ही रंग माझी वेगळी विडंबना साठी कच्चा माल खास तुमच्या प्रतिभेसाठी ....आणि कस्सं हो जमतं तुम्हाला आम्हाला तुमच्या फ्यान मधे घ्या नं ..या अभिप्राया साठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

किर्रान कॅर्र केलें!!

सूड
Fri, 10/28/2016 - 19:17 नवीन
किर्रान कॅर्र केलें!!
  • Log in or register to post comments

बरंचसं !

साती
Fri, 10/28/2016 - 19:29 नवीन
पीडीएफ वाचली नाही. पण सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो. (बाकी तुमचा आय डी तुम्हाला परत कधी मिळाला. सुस्वागतम!)
  • Log in or register to post comments

१)"त्यांनी त्यावर शोधलेला

कंजूस
Fri, 10/28/2016 - 22:57 नवीन
१)"त्यांनी त्यावर शोधलेला उपाय"- कशावर? कोणत्या समस्येवर? २)"आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो." - लैंगिक क्रिया ही एक प्राणिमात्रांची नैसर्गिक क्रिया आहे हे प्रत्यक्षात सतत साध्य करावे लागते. त्यात मोक्ष,पुरुषार्थ इत्यादि बोजड शब्द भरून काहीच उपयोग होत नाही.
  • Log in or register to post comments

काहीतरी गडबड वाटते. प्युबिस

साहना
Fri, 10/28/2016 - 23:29 नवीन
काहीतरी गडबड वाटते. प्युबिस रींग हे प्रकाश वरेकर ह्यांचा शोध आहे ? पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा थोडी वाह्यात वाटते, बंगाली बाबा वगैरेंची जाहिरात किंवा, "डॉक्टर अशोक, सर्व गुप्तरोगांचा खात्रीशीर इलाज, पल्लवी सिनेमा च्या मागे" छाप. पौगंडा अवस्थेतल्या मुलांनी चुकीची पुस्तके वाचली तर त्यांच्या मनावर परिणाम गंभीर होऊ शकतात.
  • Log in or register to post comments

भंपकआहे

सुबोध खरे
Fri, 10/28/2016 - 23:43 नवीन
भंपकआहे सावकाश प्रतिसाद देतो. alternative medicine wrapped in pseudoscience.
  • Log in or register to post comments

ऑ अचं जालं तल

बॅटमॅन
Fri, 10/28/2016 - 23:47 नवीन
ऑ अचं जालं तल (डॉ. महिंदर वत्सा यांचा फॅन) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

=)))))

अजया
Sat, 10/29/2016 - 11:28 नवीन
डाॅ.वत्सा फॅन +१!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हेच्चं म्हणतो बे. +१०००००

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/29/2016 - 20:35 नवीन
हेच्चं म्हणतो बे. +१००००० काय लोकं नमुने असतात एक एक प्रश्ण विचारणारे की बास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ब्याटु लगा मला एकदम वत्साने

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/30/2016 - 11:07 नवीन
ब्याटु लगा मला एकदम वत्साने पुणे मिरर मध्ये केलेली एका प्रश्नकर्त्याची घाऊक बेइज्जती आठवली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काहीतरी लई भारी सायंटिफिक फंडा

चित्रगुप्त
Sat, 10/29/2016 - 00:13 नवीन
अगदी पयल्यांदा धागा वाचला, तेंव्हा वाटलं होतं की हा काहीतरी "शादी के पहले या बाद" .... बचपन की गलती से पछतानेवाले ....खोयी हुई ताकत वापस पाने का अक्सीर शर्तिया इलाज...आजही मिले: प्रो. पी. बिरलेकर जनाब, कूडाघर के पास, गली नंबर ७ .....असा प्रकार असेल, मग गुगळे आकृत्या बघितल्या त्यावरून हा काहीतरी लई भारी सायंटिफिक फंडा, शिवाय "अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ " यावरून उच्च अध्यात्मिक वगैरे .... सारांश, आपल्या अकलनापलिकडला हा प्रकार असावा असे वाटून गप्पगार झालो. (पीडीएफ उघडून वाचले नाही अद्याप) आता डॉक्टरसाहेबांच्या प्रतिसादाची वाट बघणे आले.
  • Log in or register to post comments

अरे हे काय आहे?

संदीप डांगे
Sat, 10/29/2016 - 00:41 नवीन
अरे हे काय आहे? संक्षी, नॉट एक्स्पेक्टेड फ्रॉम यो! पीडीएफ म्हणजे तद्दन जाहिरात आहे ही, तेही चुकीचे मार्गदर्शन करून अनभिज्ञ वाचकांना भूल पाडून नाहक पैसे खर्च करायला लावू शकणारी, संपादक, एक विनंती: त्वरित हटवावे किंवा डिस्क्लेमर टाकावे,
  • Log in or register to post comments

ही चक्क जाहीरात आहे. हे

पिलीयन रायडर
Sat, 10/29/2016 - 01:03 नवीन
ही चक्क जाहीरात आहे. हे धोरणात बसत असेल असे वाटत नाही. पीडिएफ पाहिली, अगदीच भोंदुगिरी आहे. खरे काका लिहीतील तेव्हा काय ते नीट कळेलच.
  • Log in or register to post comments

या डॉक्टरांच्याच पी डी एफ

सुबोध खरे
Sat, 10/29/2016 - 09:39 नवीन
या डॉक्टरांच्याच पी डी एफ मधील उतारे हे डॉक्टर ऍलोपॅथिक डॉक्टर नसून जगातील अत्युत्तम हीलर आणि जगप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट आहेत. मुंबई विद्यापीठाचे पदवीधर आणि पुण्याचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. हि पदवी कुठली याबाबत माहिती नाही. यांच्या तथाकथित पदव्या PhD आणि D Sc या वैकल्पिक वैद्यकशास्त्र ALTERNATIVE MEDICINE यात आहेत असा यांचा दावा आहे. कोणत्या विद्यापीठाच्या ते माहित नाही. Approved Fellow in Sex Education - The International Council of Sex Education and Parenthood of American University हे विद्यापीठ कोणते ते माहित नाही. National Institute of Sex Educators, Counsellors and Therapists. (NIRSECT) अशी कोणतीही संस्था गुगल वर सापडत नाही. Indian Academy of Juvenile and Adolescent Gynaecology and Obsterics. अशी संस्था अस्तित्वातया हे का याबद्दल मला शंका आहे. गुगल वर हि सापडत नाही. . Member of The Acupuncture Foundation of Sri Lanka. Fellow of Medicina Alternativa Healer Supreme Rekie Supreme हे महाशय "मुलगाच व्हावा" यासंबंधी शिक्षण देतात. हा सरळ सरळ गुन्हा आहे. यावर पोलिसात गुन्हा दाखल करता येईल काय या बद्दल मी माहिती मिळवेन. सुरुवातीच्या परिच्छेदातच यात वर्णन केलेले आहे "साधन ५०वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनासाठी मी निवडले आहे. १९७६ पासून एकही असफल व्यक्ती नाही." म्हणजे संशोधन माझे नाही आणि मी ते करीत आहे असाच अर्थ निघतो. शाब्दिक कोलांट्या किती आणि कशा आहेत ते पाहून घ्या. एकंदर मुदलातच खोट आहे. मग व्याज काय मिळणार? हे म्हणजे "मगनलाल" चिकीसारखीच "मदनलाल" चिकी होती किंवा कॅडबरी ज एक्लेयर ऐवजी चौधरी ज एक्लेयर त्याच रंगात त्याच वेष्टनात दिल्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

जबरी पंचनामा.

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/29/2016 - 09:54 नवीन
जबरी पंचनामा. अता बघू काय काय उत्तरे मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी वेरेकरांना ओळखत सुद्धा नाही

संजय क्षीरसागर
Sat, 10/29/2016 - 10:29 नवीन
त्यामुळे ही जाहिरात नाही. शिवाय मी प्युबिस रिंग इतरत्र ऑनलाईन मिळते हे सांगितले आहे. त्यामुळे लेखाचा संबंध फक्त वेरेकरांच्या अनुभवाशी आहे. वर सातीनं प्रतिसादात म्हटलंय : सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो. स्त्री-पुरुष संबंधातल्या ताणतणावाच्या माझ्या वैयक्तिक कारणमिमांसेशी हे विचार जुळतात आणि ते निर्विवाद आहेत. मी स्वतः कोणत्याही विवाहबाह्य संबंधापेक्षा सांप्रत वैवाहिक जीवन आनंदाचं व्हावं या मताचा आहे. माझ्या अनुभवानं पारस्पारिक अनुबंध, समय शून्यता आणि गिल्ट फ्री माइंड या तीन गोष्टी स्त्री-पुरुष संबंधाच्या तृप्तीसाठी आवश्यक आहेत. तरीही फिजिकल डायमेंशनवर वेरेकरांचं संशोधन उपयोगी आहे हे देखिल तितकंच खरं. पीडिएफ मधे त्यांनी नमूद केलेल्या शारीरिक गोष्टी पूर्णतः वास्तविक आणि बायॉलॉजिकल सायन्सनी प्रामाणित आहेत. सदस्यांना उपयोगी व्हावी म्हणून ही पोस्ट आहे. मला पिडीएफमधे वर्णन केलेला कोणताही प्रश्न नव्हता तरीही मी दुसर्‍या साईटवरुन रिंग मागवली आणि तो उत्तम डिवाइस आहे हे नक्की. इट इज द मोस्ट युजफुल डिवाइस फॉर मॅन टू रिटेन फॉर लाँगर टाइम. वेरेकरांची पदवी काय वगैरे प्रश्न माझ्या दृष्टीनं गौण आहेत पण निष्कर्श योग्य आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

आणखी एकः

संजय क्षीरसागर
Sat, 10/29/2016 - 10:45 नवीन
कोणत्याही सदस्यानं वेरेकरांचा सल्ला घ्यावा किंवा त्यांचाकडून रिंग मागवावी हा लेखाचा हेतू नाही. शिवाय वंध्यत्त्व आणि अपेक्षित अपत्यप्राप्ती याबाबत मी त्यांना कोणत्याही प्रकारे पुरस्कृत करत नाही किंबहुना दुसरा मुद्दा संपूर्ण निषेधार्ह आहे. हा लेख प्रणयतृप्तीतली टाइम लॅग आणि त्यावर केलेली उपाय योजना या विषयावर आहे. वेरेकरांनी रिंगचा शोध लावलेला नाही. तो डिवाइस प्रचलित होताच पण पिडिएफमधे त्याचा शास्त्रीय उहापोह केला आहे आणि तितपच या लेखाचा पिडिएफशी संबंध आहे. जर विधायक चर्चा व्हायची असेल तर वेरेकरांना वगळून टाइम लॅग आणि डिवाइस यावर फोकस झाल्यास बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्यांनी नमूद केलेल्या शारीरिक

सुबोध खरे
Sat, 10/29/2016 - 10:58 नवीन
त्यांनी नमूद केलेल्या शारीरिक गोष्टी पूर्णतः वास्तविक आणि बायॉलॉजिकल सायन्सनी प्रामाणित आहेत हे कुणी प्रमाणित केलय?फक्त स्त्रीची आणि पुरुषाची शरीररचना बरोबर लिहिली आहे बाकी बऱ्याच गोष्टी अतिरंजित आहेत. इतकेच लिहीतो. त्यांच्या पी डी एफचे कॉपी पेस्ट होत नसल्याने प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद करण्यासाठी टंकन करणे कटकटीचे आहे. एक विनंती -- कुणी मला त्या पीडीएफचे मराठीतही कॉपी पेस्ट करता येईल असे "व्यनी"त पाठवले तर मी मुद्देसूद खंडन करु शकेन सुरुवातच इतकी भंपक आहे कि अजून काही लिहावे असे अजिबात वाटत नाही. "शादी के पहले या बाद" .... बचपन की गलती से पछतानेवाले ....खोयी हुई ताकत वापस पाने का अक्सीर शर्तिया इलाज. या तर्हेचाच हा माणूस आहे याची संपूर्ण खात्री आहे. स्त्रीला "सुखी" ठेवले नाही तर ती "दुसऱ्या" पुरुषाकडे जाईल किंवा तुमच्या कौटुंबिक जीवनाची वाताहत होईल अशा तर्हेचे अतिरंजित किस्से रंगवून सांगण्यात या लोकांचा हातखंडा असतो. तेंव्हा फक्त "त्यांच्याच कडे" मिळणाऱ्या प्यूबिस रिंग बद्दल काही लिहावे असे वाटत नाही. हि प्युबीस रिंग सगळीकडे उपलब्ध आहे तेंव्हा या महाशयांच्या हा दावाही फोल आहे. प्यूबिस रिंग चा वापर काही रुग्णांमध्ये नक्की फायदेशीर असतो ज्यांच्या लिंगातील नीलामधील रक्त थांबवणाऱ्या झडपा( valves) निकामी झालेले असतात . अशा रुग्णांच्या लिंगात रक्त साठून राहू शकत नाही तर सारखे उलटे पाझरत जाते त्यामुळे लिंगाला आवश्यक अशी ताठरता येत नाही आणि त्यामुळे संभोग शक्य होत नाही. पण असे रुग्ण फार तर १-२ टक्के असतील ( कदाचित कमीच). बहुसंख्य ९० % + लिंगशैथिल्याची कारणे मानसिक असतात. यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या इतर पाथी च्या व्यावसायिकांनी पसरवलेल्या गैरसमजांची शिकार झालेले बहुसंख्य असतात. वाजीकरण( घोडयासारखी शक्ती), ७२ "हुर"ना भोगण्याची शक्ती, हिमालयातील अत्यंत दुर्मिळ जडीबुटी इ ऐकल्या वाचल्यामुळे माणसांच्या मनात आपण "पूर्ण पुरुष" आहोत का याबद्दल हे लोक शंका निर्माण करतात. त्यामुळे हि माणसे अशा लोकांचे पट्कन सावज बनतात. प्यूबिस रिंग मुळे सतत लिंगोत्थान priapism. https://en.wikipedia.org/wiki/Priapism होऊ शकते. असे झाले तर त्याला जबाबदार कोण आहे?
  • Log in or register to post comments

माझा मुद्दा इतकाच आहे :

संजय क्षीरसागर
Sat, 10/29/2016 - 11:15 नवीन
दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे लैंगिक इच्छेचे शमन होण्यास लागणारा काळ हा पुरुषात आणि स्त्रीत वेगवेगळा असतो... ( त्यांच्या पिडिएफमधून) शिवाय तुम्ही म्हणता ती Priapism ची शक्यता निदान त्या लिंकमधे तरी प्युबिस रिंगशी रिलेट केलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आणि ते एक्स्ट्रीम उदाहरण दिसते

संजय क्षीरसागर
Sat, 10/29/2016 - 11:20 नवीन
कारण त्या पोस्टमधे म्हटलंय : Medical advice should be sought immediately for cases of erection beyond four hours मी स्वतः प्युबिस रिंग वापरुन पाहिली आहे. तो सिंपल रिमूवबल डिवाइस आहे. त्यात `चार तास' वगैरे शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपण PRIAPISM च्या किती केसेस

सुबोध खरे
Sat, 10/29/2016 - 13:26 नवीन
आपण PRIAPISM च्या किती केसेस पाहिल्या आहेत. त्याची व्याख्या Priapism is a medical condition in which the erect penis does not return to its flaccid state, despite the absence of both physical and psychological stimulation, within four hours. अशी आहे. यात कोणतीही "रिंग न वापरता" सुद्धा असा त्रास होऊ शकतो. मी "इतके दिवस रेल्वे रूळ पार करतो आहे मला काही झालेले नाही" हे म्हणण्यासारखे आहे. आपल्याला याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या गरजेपेक्षा दोन साईझ कमी( घट्ट) रिंग वापरून पहा किती त्रास होतो ते. Because ischemic priapism causes the blood to remain in the penis for unusually long periods of time, the blood becomes deprived of oxygen and can cause damage to the penile tissue itself. Should the penile tissue become damaged, it can further result in erectile dysfunction or disfigurement of the penis.[11] In extreme cases, if the penis suffers from severe vascular disease, the priapism can result in penile gangrene.[https://en.wikipedia.org/wiki/Priapism)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

विथ ड्यू रिस्पेक्ट

संजय क्षीरसागर
Sat, 10/29/2016 - 22:23 नवीन
रिंग वापरुन पाहिली तर लक्षात येईल की Priapism ची शक्यताच नाही. ती इतकी सुरेख डिजाईन केलीये की वन्स यू वेअर, जाणवत सुद्धा नाही. शिवाय जाणकारांनी अर्धा तास इतका सेफ पिरियड दिला आहे. मी मागवलेल्या रिंगला बीडस आहेत त्यामुळे क्लिटोरल स्टिम्युलेशन उत्तम होतं शिवाय ती अत्यंत उच्च दर्जाच्या सिलीकॉनपासून बनवल्यामुळे कमालीची सॉफ्ट आहे. जितक्या सहजतेनं कंडोम वापरला जातो तितक्याच सहजतेनं रिंग वापरली जाते. थोडक्यात, कंडोममुळे Priapism ची शक्यता जितकी दूरान्वये आहे तीतकीच रिंगच्या बाबतीत आहे. तुम्ही म्हटलंय यात कोणतीही "रिंग न वापरता" सुद्धा असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रिंगशी Priapism ची शक्यता जोडणं हे एका साध्याश्या पण वैवाहिक सुखात कमालीचा बदल घडवू शकणार्‍या आनंदाला मुकणं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

४० वर्षे होतात....

गामा पैलवान
Sat, 10/29/2016 - 11:28 नवीन
१९७६ पासून आजतागायत ४० वर्षे होतात ना? मग ५० वर्षांचं संशोधन कसं काय ते? आपली एक शंका. -गा.पै.
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो

संजय क्षीरसागर
Sat, 10/29/2016 - 11:50 नवीन
वेरेकरांना वगळून, कामतृप्तीतला बेसिक टाईम लॅग आणि हा साधा, सोपा, रिमूवबल आणि सेफ डिवाइस यावर चर्चा झाल्यास विधायक होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

संक्षी, खुलाशाबद्दल धन्यवाद. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान
Sun, 10/30/2016 - 00:47 नवीन
‌
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नेमकी काय चर्चा करावी हा

संदीप डांगे
Sat, 10/29/2016 - 15:10 नवीन
नेमकी काय चर्चा करावी हा प्रश्न पडलाय... :(
  • Log in or register to post comments

रतिक्रिडेत उपयोगी पडणारे उपकरण

चित्रगुप्त
Sat, 10/29/2016 - 16:30 नवीन
वेरेकरांना वगळून, कामतृप्तीतला बेसिक टाईम लॅग आणि हा साधा, सोपा, रिमूवबल आणि सेफ डिवाइस यावर चर्चा झाल्यास विधायक होईल.
असे जर आहे, तर मुळात 'सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ' असे दिशाभूल करणारे, उगाचच विद्वत्तेचा आव आणून लिहिल्यासारखे, गरज नसता इंग्रजी शब्द वापरून बनवलेले शीर्षक (क्रिकेटच्या चेंडूच्या जाहिरातीला "सॉल्विंग द इंडीया-पाकिस्तान जिगसॉ" असे म्हणण्यासारखे) देण्याऐवजी सरळ सरळ 'शिश्नाची ताठरता टिकवण्याचे उपकरण' असे दिले असते, तर जास्त प्रामाणिक आणि नेमके ठरले असते. धागाकर्त्याने दिलेल्या प्रतिसादातही जिथेतिथे "इट इज द मोस्ट युजफुल डिवाइस फॉर मॅन टू रिटेन फॉर लाँगर टाइम"...."गिल्ट फ्री माइंड" ...."फिजिकल डायमेंशन"...."सिंपल रिमूवबल डिवाइस".... "बेसिक टाईम लॅग" ... अश्या इंग्रजी शब्दांची पेरणी करण्यातले प्रयोजन समजले नाही. मिपातील लेखातून मराठी भाषेची अभिवृद्धी व्हावी, हे उत्तम. त्यासाठी थोडा वेळ मराठीतले चपखल शब्द शोधण्यात घालवावा लागला, तरी काय हरकत आहे? एवीतेवी हा लेख रतिक्रिडेत उपयोगी पडणार्‍या एका उपकरणासंबंधी आहे, तर अशी उपकरणे विकणार्‍या विक्रय केंद्रात उपलब्ध असणार्‍या अनेक प्रकारच्या अन्य उपकरणांची पण माहिती द्यावी, जेणेकरून हा लेख गरजवंतांना जास्त उपयोगी ठरेल. Image removed.
  • Log in or register to post comments

'कडक' प्रतिसाद! =))

संदीप डांगे
Sat, 10/29/2016 - 16:34 नवीन
'कडक' प्रतिसाद! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

+१

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/29/2016 - 17:27 नवीन
+१ =)) ह्या ह्या ह्या.. जबरी हाणल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

जयन्त बा शिम्पि
Sat, 10/29/2016 - 17:08 नवीन
जाणकारांनी ही लिंक सुद्धा पहावी आणि आपले मत येथे मांडावे. http://www.auanet.org/common/pdf/education/clinical-guidance/Priapism.pdf
  • Log in or register to post comments

२७१ पानांचा ग्रंथ आहे

सुबोध खरे
Sat, 10/29/2016 - 19:09 नवीन
२७१ पानांचा ग्रंथ आहे त्यापैकी पहिली २९ पाने विषयाची सविस्तर माहिती आहे आणि बाकी त्याची विदा आहे. धन्यवाद, या निमित्ताने या विषयाची उजळणी झाली. पण हा विषय या धाग्याशी विसंगत आहे तेंव्हा अधिक काही लिहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि

ग्रंथाचे ओवीबद्ध निरूपण

चित्रगुप्त
Sat, 10/29/2016 - 19:04 नवीन
मित्रांनो, सदर धाग्यात रिकमंडिललेला ग्रंथ उघडल्या उघडल्या आमच्या कळफलकावर साक्षात सरस्वती डान्सू लागली, आणि आमचे पाठीवर समर्थ आपल्या भव्य दाढीतून मंदस्मित करत हात ठेऊन स्टँडिले आहेत, असा भास जाहला. तस्मात आमचे हातून आता या अद्वितीय ग्रंथावर ओविबद्ध टीका लिहिणे घडून येणार, यदर्थी संशय नाही. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय सांगितले जी येथ श्रवण केलित्याचे फळ काय आहे ग्रंथा नाम ताठबोध उपकरणाची जाहिरात अंगिकारिता स्तंभन ओसरेचिना आधी वंदू वेरलेकरां मग नमू संक्षि-सरां नेमेचि पाजिती मिपाकरां गुप्त-ज्ञानामृत (क्रमशः)
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/29/2016 - 19:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

_/\_

संदीप डांगे
Sat, 10/29/2016 - 19:56 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अश्लील अश्लील अश्लील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/29/2016 - 20:25 नवीन
>>>>>> ग्रंथा नाम ताठबोध ताठबोध हा शब्द अश्लील वाटतो. :/ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

ताठ मानेने कसे जगावे

चित्रगुप्त
Sat, 10/29/2016 - 23:20 नवीन
ताठबोध हा शब्द अश्लील वाटतो.
सदर ग्रंथ हा मनुष्याला ताठ मानेने कसे जगावे, हे शिकविणारा आहे. त्यात अश्लील ते काय ? क्याSSS भी सोचते सरजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे बापरे ...

चौकटराजा
Sun, 10/30/2016 - 15:23 नवीन
क्रमशः ? ... म्हणजे अठरा अध्याय आहेत की काय ....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

ग्रंथा नाम ताठबोध

Nitin Palkar
Tue, 11/01/2016 - 20:46 नवीन
चित्रगुप्त आपण धन्य अहात! दासबोधाचे वाचन अद्याप घडले नाही. मंगू अण्णांचा उदासबोध मात्र वाचला. आता तुमच्या ताठ बोधाचे (सार्थ आणि सटीप) प्रकाशन केव्हा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

वेल कम. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/29/2016 - 20:23 नवीन
संक्षीसेठ, स्वागत. खुप दिवस झाले होते, मिपावर स्री पुरुष संबंधाचं हल्ली कोणी विश्लेषन करत नव्हतं, खुप रुक्षपणा येत होतं वाचन लेखन करतांना ;) बाकी, पीडीएफ फाईल काही चाळली नाही, पण आपण म्हणता तेव्हा काही तथ्य असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे (संक्षी फ्यान)
  • Log in or register to post comments

वेल-कम

चित्रगुप्त
Sat, 10/29/2016 - 20:28 नवीन
मिपावर स्री पुरुष संबंधाचं हल्ली कोणी विश्लेषन करत नव्हतं, खुप रुक्षपणा येत होतं वाचन लेखन करतांना
असेच म्हणतो, "बहार आने से पहले खिजां चली आई" असे होत होते मिपाचे. चला आता मज्जा येणार आणि प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिभेला नवे पंख फुटणार.
  • Log in or register to post comments

आता रिंगा शोधणे आले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/30/2016 - 17:46 नवीन
=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आता i will give you a ring

आदूबाळ
Sat, 10/29/2016 - 20:45 नवीन
आता i will give you a ring असं कोणी म्हणालं तर दचकायला होईल.
  • Log in or register to post comments

आयायायायय....मेलो ठार मेलो.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/29/2016 - 20:55 नवीन
आयायायायय....मेलो ठार मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा