साहित्य :तिन वाटि : ओले खोबरे उचलेले
दोन वाटि : साखर
एक छोटी वाटि :दुध पावडर
एक छोटी वाटी : काजू पावडर
दुध : दोन तिन चमचे
वेलदोडा पुड,केशर,पिस्ता काप
कृती :खवलेले खोबरे आणि साखर व काजू पावडर मिक्सर भांड्यात तिन चमचे दुध घालुन फिरवून एकजीव करुन घेणे.हे मिश्रण मायक्रोव्हेव भांड्यात घालून दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे.दोन मिनिटानंतर मिश्रण एकदा हलवावे.परत दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे. आता या मिश्रणास बुडबुडे यायला लागतील.
दोन मिनिटानंतर भांड बाहेर काढून त्यात दुधपावडर व वेलदोडा पुड घालावी.मिश्रण निट एकत्र करुन परत अर्धा मिनिटासाठि आत ठेवावे.आता जरासे घट्ट होईल.
आता हे मिश्रण दहा मिनिट तसेच कोमट होउ द्यावे. एक ताटलीला तूप लाउन हे मिश्रण त्यात थापून घ्यावे.वरुन पिस्ता काप, केशर लावावे आणि सुरीने लगेच बर्फी कापावी.
पूर्ण गार झाल्यावर छान बर्फि तयार होते. आता अलगद उचलून चव पहावी लगेच तोंडात विरघळते.
*या बर्फित काजू ऐवजी बदाम, पिस्ता पुडहि घालता येते. नक्की करुन पहा.
दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा !!
वाचने
15476
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
फोटो असे भव्यदिव्य का
भव्य दिव्य (हा हा हा हा )
In reply to फोटो असे भव्यदिव्य का by इशा१२३
माझ्याकडे मावे आहे.
धन्यवाद!
फोटो दिसत नाहीयेत.
Zakas,kharach zatpat pan
काय सुंदर ग!!!! लगेच उचलुन
+१ जब्बरदस्त!
In reply to काय सुंदर ग!!!! लगेच उचलुन by पिलीयन रायडर
मस्तच ग. आणि मावे मुळे थोडी
अग बाई किती उरक तुला पोहे काय
सुरेख! अनाहितामध्ये विचारणारच
वडि छान होते अगदी!मउ खुटखुटित
In reply to सुरेख! अनाहितामध्ये विचारणारच by रेवती
ओक्के.
In reply to वडि छान होते अगदी!मउ खुटखुटित by इशा१२३
फार सुंदर!
आहा,मस्तं!
जोरात सुरु आहे फराळ.तुच
दुष्ट कुठली!
मस्त! पहिला फोटो भारीच :)
मस्तं करून बघेन
खुप मस्त! ईशाताई आता जोरात बर
सुंदर ग
धन्यवाद सगळ्यांना!
मस्त
मस्त
आहाहा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaखुप छान
Wah
आत्ताच ही बर्फी केली. जशी मी
करुन सांगितल्यास इथे म्हणून