Skip to main content

झटपट काजू-खोबरे बर्फी (मायक्रोव्हेव स्पेशल)

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 27/10/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
बर्फि साहित्य :तिन वाटि : ओले खोबरे उचलेले दोन वाटि : साखर एक छोटी वाटि :दुध पावडर एक छोटी वाटी : काजू पावडर दुध : दोन तिन चमचे वेलदोडा पुड,केशर,पिस्ता काप सा कृती :खवलेले खोबरे आणि साखर व काजू पावडर मिक्सर भांड्यात तिन चमचे दुध घालुन फिरवून एकजीव करुन घेणे.हे मिश्रण मायक्रोव्हेव भांड्यात घालून दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे.दोन मिनिटानंतर मिश्रण एकदा हलवावे.परत दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे. आता या मिश्रणास बुडबुडे यायला लागतील. दोन मिनिटानंतर भांड बाहेर काढून त्यात दुधपावडर व वेलदोडा पुड घालावी.मिश्रण निट एकत्र करुन परत अर्धा मिनिटासाठि आत ठेवावे.आता जरासे घट्ट होईल. बर्फि आता हे मिश्रण दहा मिनिट तसेच कोमट होउ द्यावे. एक ताटलीला तूप लाउन हे मिश्रण त्यात थापून घ्यावे.वरुन पिस्ता काप, केशर लावावे आणि सुरीने लगेच बर्फी कापावी. ब पूर्ण गार झाल्यावर छान बर्फि तयार होते. आता अलगद उचलून चव पहावी लगेच तोंडात विरघळते. ब२ *या बर्फित काजू ऐवजी बदाम, पिस्ता पुडहि घालता येते. नक्की करुन पहा. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा !!

वाचने 15494
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

त्यात कन्वेन्शन ओवन नाही. फक्त मायक्रोवेव्ह आहे. मागची चार वर्षे फक्त रात्रीची उरलेली भाजी गरम करण्यापुरता उपयोग होतोय. मावेच्या अजून छान छान पाकृ टाकत राहा. :) अवांतरः बर्फी झक्कास आहे ;)

मस्तच ग. आणि मावे मुळे थोडी सोप्पीच झाल्ये ही पाकृ. दिवाळीच्या नेवेद्यासाठी करून बघण्यात येईल. लहानपणी अशी बर्फी केली कि आई ती डब्यात भरून डबा लपवून ठेवत असे कारण नाहीतर मी आणि माझा धाकटा भाऊ ती त्याच दिवशी संपवू कि काय अशी तिला भीती असे. मग तो डबा शोधून काढण्याची आमची मोहीम सुरु होई. त्या आठवणी जाग्या झाल्या.

अग बाई किती उरक तुला पोहे काय, शन्कर पाळे काय न आता हे --^-- तुला मिपा फराळ सम्रादणी पुरस्कार द्यावा अशी मिपा ला विंनती ;) ;)

सुरेख! अनाहितामध्ये विचारणारच होते ते आता इथे विचारते की ही वडी खुटखुटीत होते की मऊ? माझी आई मस्त खुटखुटीत नारळाच्या वड्या करते व माझ्या मात्र चिक्कीवर जातात. असे का होत असावे?

In reply to by रेवती

वडि छान होते अगदी!मउ खुटखुटित पण ओलसर नाही. तुझ्या साखरेचा पाक होतोय का त्यामुळे चिक्किटाइप होत असतील. अशा करुन बघ,मि नेहेमी करते. मिक्सरमधून फिरवल्याने मिश्रण चांगल एकजीव होत आणि शिजतहि.

आत्ताच ही बर्फी केली. जशी मी स्वप्नात पाहिली होती तशीच झाली. मला आज पहिल्यांदा नारळाची वडी जमली. चिक्कीवर गेली नाही. एक आगाऊपणा अंगाशी आला तोही सांगते. आमच्यायेथील साखर गोडीला जरा कमी असते त्यामुळे तीन वाट्या नारळाला दोन वाट्या कमी पडली म्हणून अर्धी वाटी वाढवल्यावरच थांबणे जरुरी होते पण आणखी दोन चमचे वर घातली त्याने जास्त गोड झाल्यात. पुढीलवेळी ही चूक सुधारणार आहे. मायक्रो बर्फी असल्याने कमी एफर्टसमध्ये झाल्या. तू सांगितल्यानुसार मिश्रण तयार झाल्यावर कोमट होईस्तोवर थांबावे म्हणून थांबले पण थंडी जास्त असल्याने सात आठ मिनिटात थापल्या पाहिजेत हे विसरले. नंतर जरासे गरम करून काम भागले. पिस्ते कापण्याऐवजी जाडसर कुटले पण कापण्याने शोभा वाढते. असो. एक वेळखाऊ पाकृ सोप्यारितीने शिकवल्याबद्दल आभार. यू आर ग्रेट!

करुन सांगितल्यास इथे म्हणून धन्यवाद! बाकी ग्रेटबिट काहि नाहि.मलाही या पद्धतीनेच छान जमतात म्हणून झटपट उरका.