लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी
उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी
लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा
धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा
शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी
टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी
होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी
तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी
बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी
रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी
रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा
शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा
चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा
वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा
काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे
मानवाच्या संगतीने, देवसुद्धा वाट पाहे
जे भुकेले भोवताली, पोरके असती किती
वाटुया आनंद त्यांना, एवढी तुम्हा विनंती
- शार्दुल हातोळकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
19028
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप छान कविता.... शेवटच्या
छान कविता. आवडली.
अप्रतिम.
एकदम मस्त....
धन्यवाद मंडळी !!
धन्यवाद! आपणास व आपल्या
In reply to धन्यवाद मंडळी !! by शार्दुल_हातोळकर
व्वा!! खूप छान! सर्व