Skip to main content

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 02/10/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

वाचने 150746
प्रतिक्रिया 648

प्रतिक्रिया

इथे 'बुलेटची क्वालिटी' हा विषय वारंवार निघत आहे. पण बुलेटची खरी USP आहे तिचा लो एन्ड टॉर्क. बाकी देशी आणि वेदेशी गाड्या ४००-५०० सीसी मध्ये ४०-४५ बीएच्पी आरामात देतात. पण आपली बुलेट (होय!! आपली) मात्र २० (३५०सीसी) आणि २७ बीएच्पी (५०० सीसी) वरच समाधान मानते. पण पीक बीएच्पी जरी कमी असला तरी rpm vs torque हा ग्राफ जर पाहिला तर जगातल्या कोणत्याही गाडीला बुलेट आरामात मागे टाकेल. कारण आहे बुलेटच्या डीसायनर्सने जाणून बुजून जास्त ठेवलेला त्याचा इंजीन सिलींडरचा बोर लेन्थ. इथले अनुभवी बुलेट रायडर्स सांगू शकतील की वळणदार घाट रस्ता असो, खराब दगड धोंड्यांचा खच खळगेवाला (सच पास टाय्प) रस्ता असो, ओढे नाले पार करायचे असो, दिवसभर २००० rpm नी क्रुज करायचे असो, पाठीमागे ३०-४० किलो चे सामान लादून जगाच्या अंता पर्यंत प्रवास करायचा असो तेंव्हा हाच लो एन्ड टॉर्क कामी येतो जो बाकी गाड्यांमधे नाही. मला वाटत ह्या आनंदाच्या बदल्यात थोडी reliability compromise करावी लागते. पण म्हणतात ना "You can't have your cake and eat it"

In reply to by जिन्क्स

बरोबरे!!! आजचा सुविचार :- बुलेट कडून अपेक्षिलेल्या परफेक्शनच्या 50% परफेक्शन स्वतः मध्ये आणावयाचा प्रयत्न करा, एखादे नोबेल नक्की मिळून जाईल ;)

In reply to by जिन्क्स

नवीन ईंजीन्स भरपुर रिलाय्बल आहेत. जुन्या ईंजीनाचे सीझ होणे प्रकार जवळपास बंद झालेत. पण टॉर्क अफाट! विथ पिलियन आणि लगेजसोबत घाटावाटातुन फिरायला मस्त. धाप न लागता गाडी पळत राहते.

जिन्क्स भाउ बुलेटचे फॅन तर आहोतच... सर्वा गुण दोषासकाट बुलेटला स्वीकारले आहे ... जसे एखाद्या ठिकणी मिसळ चांगली मिळते म्हणुण इतर सर्व गैरसोईकडे दुर्लक्ष करून मिसळ खायला जातोच ना.. तसेच आहे हे.. अर्थात बुलेटच्या क्वालिटी प्रमणेच.. चांगली मिसळ ही बरेचदा गैरसोयीच्या (जसे अस्वच्छ, चिन्चोळ्य बोळात, बसायला पुरेशी जागा नसलेली,, इत्यादी इत्यादी.. ) जागी का असते हे न उलगडणारे कोडे आहे...

In reply to by अमर विश्वास

:) सहमत बुलेट + मिसळ + अमर विश्वास (आम्ही सुशी फॅन) हे एकाच प्रतिसादात आल्यामुळे असहमती दर्शवून कसं चालेल.

सायलेन्सर बदलावा म्हणतो. गोल्डस्टार विथ ग्लासवूल. खरं तर बदलायच्या मनःस्थितीत नव्हतो, पण स्टॉक सायलेन्सरमधून आता बारीकसा चाळणीसारखा आवाज येऊ लागला आहे. एखादे बॅफल लूज झाले असावे. म्हणून आता बदलून बघावा म्हणतो.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

बदलणार होते, त्यांनाही गोल्डस्टार विथ ग्लासवुल हवा होता. एक्झॅक्ट ते सांगु शकतील. माझं ईंदोर (छोटी ढोलकी) किंवा ग्लासवुल शॉर्ट बॉटल मध्ये कन्फ्युजन चाललंय.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

AEW गोल्डस्टार विथ ग्लासवूल बसवेन बहुतेक मी. उद्या ब्लॅक प्युमा घेऊन हंपीला जातोय. तेव्हा तिकडून आलो की या ब्लॅकबुलच्या सायलेन्सरचं बघतो.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

http://torquexhausts.com/royal-enfield-goldstar-glasswool-silencer.html माझं ह्याच कंपनीचा शॉर्ट बॉटल की ईंदोर ह्याम्ध्ये फाय्नलाझेशन व्हायचंय. बाकी राईडला शुभेछा! फोटु टाकाल!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

torquexhausts म्हणजेच AEW . कोंढव्यात कंपनी आहे ही. एकाने थंडरबर्डवर लावले आहे आणि समाधानी आहे. थंडरबर्डच्या डिझाईन एलिमेंट्सना गोल्डस्टार सूट होतो (असं मला वाटतं). आणि हो, हंपीला राईड नाही, ड्राइव्ह आहे. महिन्याच्या आतच दुसरी. ;-)

In reply to by भटकंती अनलिमिटेड

काल दोन्ही सायलेन्सर पाहिले/ऐकले. AEW क्लासिक गोल्डस्टार ग्लासवूल आणि AEW गोल्डस्टार वाइल्डबोअर. आता दोन्हीचा आवाज आवडला असल्याने द्वंद्व सुरु झाले आहे. कदाचित क्लासिक ग्लासवूल जिंकेल कारण आवाज कमी आहे. वाइल्डबोअर थोडा लाऊड वाटला.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

आशु ईंजिनीअरींगवाले? येस, वाइल्डबोआर फार लाउड आहे, त्यामुळे तो आधीच चाळणीतुन वगळला होता.

हल्ली अधुन मधुन पुर्ण गाडी ब्रेक लावला तर व्हायब्रेट होते. चाक वगैरे काही जॅम नाहिये, २ दा चेक केलेय, पण हे व्हाय्ब्रेशन नेमका कुठुन येतोय कळत नाही. स्पीड कमी होतांना हे व्हायब्रेशन जाणवतात. फ्रंट फुटरेस्टपासुन हे सुरु होतात अन पुर्ण गाडी व्हाय्ब्रेट होते. नेमकं काय बिघडलंय समजत नाहिये. कारण शोरुमला नेली तर हमखास व्हायब्रेट होत नाही!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

व्हायब्रेशनचा प्रकार नक्की समजला नाही. काही आवाज येतो का? किंवा घासल्यासारखं वाटतं का? किंवा एकदम थरथराट होतोय का? किंवा गाडीचे मागचे चाकच वॉबल होतेय?

In reply to by भटकंती अनलिमिटेड

घासल जाउन थरथराट होतोय, स्पीड कमी होतांनाच. स्पीड वाढवली किंवा कमी न करता चालवली तर काही जा़णवत नाही. पण कमी केली की फुटरेस्टपासुन थरथर जाणवते अन २ ३ सेकंदात नॉर्मल. गीअर शीफ्टींग किंवा क्लच पॅड मध्ये काही प्रॉब्लेम असावा का?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

गियर शिफ्टिंगचा किंवा क्लचचा प्रॉब्लेम वाटत नाही तसा हा. स्पीड कमी करताना कुठल्या पद्धतीने करत आहात? म्हणजे एका वेळी गियर डाऊन, क्लच सावकाश रिलीज (इंजिन ब्रेकिंग) आणि शेवटी ब्रेक्स अशी पद्धत वापरता का? एका ठराविक आरपीएम रेंजला व्हायब्रेशन जाणवतात की फक्त स्पीड कमी होतानाच? व्हायब्रेशन जेव्हा येते तेव्हा RPM, गाडीचा स्पीड, कुठला गिअर हे नोट करुन ठेवल्यास सर्व्हिस सेंटरला प्रॉब्लेम रिप्रोड्यूस करायला सोप्पे होईल. एकदा बाहेरच्या मेकॅनिकला दाखवून बघा.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

हे सगळं नीट नोट करुन ठेवतो. इंजीन ब्रेकींग वापरत नाही. ब्रेक्स वापरुन स्पीड कमी करतो, आणि गीअर डाऊनशीफ्ट करतो.

वैद्यबुवा हा low RPM vibration चा प्रकार वाटतोय. engine mountings चेक करा. पण त्याआधी स्पीड कमी केल्यावर इंजिनच्या आवाजात काही फरक पडतोय का ते चेक करा.. chattering sound येत असेल तर नक्की इंजिनचाच प्रॉब्लेम आहे.

In reply to by अमर विश्वास

साधारण १५०० आरपीएम असतांना जाणवताहेत हे व्हायब्रेश्न्स. आज बघितले. पण रॅण्डम आहेत.

AEWगोल्डस्टार ग्लासवूल लावण्यात आलेला आहे. कुठलाही लाऊड आवाज न करता ओल्डस्कूल थंपचा अनुभव घेतो आहे. पॉवर डिलिव्हरी अधिक स्मूथ झाल्यासारखं वाटत आहे. सोबतच आधी लावलेले आरडी हँडलबार थोडे अजून रायडरच्या दिशेला घेतल्याने आता गाडीवर अधिक कंट्रोल आल्यासारखा वाटतोय. आता गर्दीतून मॅन्युवर करायला फार सोप्पे वाटतेय.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

जावा, येझ्दी या बाईक्सचा एक काळ होता. नंतर राजदूतने त्यांचं मार्केट खाल्लं. पण अजूनही त्या गाड्या पाहिल्या की कुठं तरी काळजाचा ठोका चुकतो राव. आजच्या जेन-वायच्या पोट्ट्यांना खरेच या गाड्या किती अपील होतील कुणास ठाऊक. टाईमलेस क्लासिक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ साधून महिंद्राला काही जादू करता येईल काय? आजपावेतो तरी त्यांच्या टू व्हीलर डिव्हिजनला हवे तसे रुपडे लाभले नाहीये. कदाचित जावा आणि बीएसए हे दोन ब्रॅंड विकत घेऊन महिंद्रा ते करु शकेल. आनंंद महिंद्रा आणि त्यांच्या थिंकटॅंकने काहीतरी भारी प्लॅन नक्की आखला असावा. (अवांतर: यासाठी एक नवाच धागा हवाय)

In reply to by भटकंती अनलिमिटेड

जावा किंवा येझदी या त्या काळात उपलब्ध असलेल्या बऱ्या गाड्या( दणकट) होत्या इतकंच. दोन्ही गाड्या भरपूर चालवल्या आहेत आणि त्यात असणाऱ्या अगदी मूलभूत कमतरता या त्यांच्या नाशाला कारणीभूत होत्या. उदा. पेट्रोल कॉक उघड राहिला तर कार्ब्युरेटर फ्लड होणे. बॅटरी स्वतःहून चार्ज न होणे. त्या साठी एक चार्जरचा स्विच विकत आणून बसवावा लागत असे. नीट किक मारली नाही तर उलटी किक येऊन आपला पाय दुखावणे. गियर लिव्हर तीन इंच वर उचलल्यावर गियर पडत असे. फाँल्स न्यूट्रल पडणे. ब्रेक करकचून दाबावा लागत असे. वळण्याचा गोल ( टर्निंग रेडियस) फार मोठा असल्याने छोट्या रस्त्यात पुढे मागे करून वळवावी लागत असे. आणि एवढे करून ऍव्हरेज २५ मिळत असे. जपानी गाड्या आल्या तेंव्हा लोकांना समजून आले कि तंत्रज्ञान आपल्याला काय सुखसोयी पुरवू शकते. नुसती गेंड्यासारखा आकार आणि ताकद असून उपयोगी नाही तर चित्त्यासारखी चपळता आणि पटकन वळण्याची, थांबण्याची क्षमता या वाहतुकीत जास्त उपयुक्त गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना केवळ रम्य आठवणी पायी त्या गाड्या आज आठवत आहेत. परंतु इंड सुझुकी आणि हिरो होंडा आल्यावर त्यांच्यातील कमतरता फार प्रकर्षाने पुढे आल्या. असो.

रॉयल एन्फ़िल्डचे डेसर्ट स्टॉर्म आणि थंडरबर्ड हे मॉडेल्स मॅट फिनिश मधे पण येतात. मॅट फिनिश दिसतो छान पण मेंटेन करायला अवघड असतो का? मॅट वाले कोणी आहेत का इथे?

In reply to by जिन्क्स

मॅट मेनटेन करायला थोडा अवघड आहे असे बर्‍याच फोरमवर वाचले आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही. ग्लॉस फिनिश आपले कारनौबा वॅक्स वापरुन चकाचक करायला १५ मिनिटे पुरेशी होतात. (आपला व्यनि आणि हा प्रतिसाद एकदमच पाहिल्याने इथे उत्तर दिले).

In reply to by जिन्क्स

इतकं काही अवघड नाहीये मॅट फिनिश मेंटेन करायला. मी वापरतोय थंडरबर्ड मॅट ब्लॅक गेले वर्षभर. रोज धुवायला माणूस आहे पण सुट्टीच्या दिवशी स्वतः नीट निगुतीनं स्वच्छ धुवून पुसून घेतो. 3M चे पॉलिश मिळते ऑल इन वन, ते महिन्याभरातुन एकदा लावून गाडी लख्ख चकचकीत करतो.

आस्थेटिक जॉब (पेंट) केल्यास पासिंगचे लचांड होते का ? त्याची काय प्रक्रिया असते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मुख्य रंग तोच ठेवल्यास काहीच करावे लागत नाही. बाकी स्टिकरिंग किंवा ब्युटिशिअनच्या भाषेत थोडे हायलाईट्स काढणं चालून जाते. पण मुख्य रंगच बदलायचा असेल तर मात्र गाडीचा रंग आरसी बुकावर बदलून घ्यावा लागतो.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

कंपनी ब्लॅकचा मॅट ब्लॅक केल्यास कसे हो दादा ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मग काहीच करावं लागणार नाही. असंही पोलिसमामाला ब्लॅकशी मतलब. आता माझ्याकडं सॅटिन व्हाईट, पर्ल व्हाईट आणि एमराल्ड व्हाईट, आयव्हरी व्हाईट यापैकी कुठलाही असला तरी त्याला काय घंटा समजणार?

रॉयल एन्फिल्ड ७५०सीसी पॅरलल ट्विन सिलिंडर बहुतेक थोड्या वेळातच EICMAमध्ये लॉंच करणार आहेत.

स्टैण्डर्ड ३५० चेस्टनट आणि हिमालय या दोघात जरा कनफुस झालोय. अर्थात दोनही जरा वेगळ्या प्रकारात मोडतात, परन्तु ज्यांच्याकडे हिमालया आहे किंवा जाणकार जरा प्रकाश टाकतील का्य?

In reply to by सतिश पाटील

स्टैण्डर्ड ३५० चेस्टनट मधे बरेच फीचर्स कमी आहेत. ५०० सीसी कार्ब मॉडेल घ्या . किंवा क्लासिक एफ.इ. घ्या . हिमालयनची टेस्ट राईड घ्या मगच ठरवा

हिमालयन आहे माझ्या कडे आता पर्यंत ३५००KM चालवली. नाशिक ते दमण नाशिक ते महाबळेश्वर नाशिक ते कसारा अश्या काही Rides केल्या, एक हँडलबारची समस्या सोडली तर काही मोठी अडचण नाही उदभवली. प्रति किलोमीटर सरासरी हा वेगळा आहे दोन्ही मॉडेल चा. आपणस काय माहिती हवी आहे सांग मी जेवढं जमेल तेव्हढा विशद करायचा प्रयन्त करेन. हिमालयन मधेय व्हायब्रेशनची समस्या कमी आहे हे मात्र नक्की सांगू इचछीतो.

In reply to by Hulk the devil

अगदी लहानपणापासून आपल्याकडे बुलेट असावी अशी खुप इच्छा आहे, त्यासाठीच क्लासिक ३५० ठरवली, पण हिमालया पहिली आणि कनफूजन सुरु झाले. हिमालायावर बसल्यावर रॉयल एन्फिल्डवर बसल्यासारखा फिल येतो का? वजन दोघांचेही सारखेच आहे, मग दगड धोंद्यात चालवताना तेवढी सोपी आहे का? विचारू नए तरी पण प्रति किमी सरासरी किती आहे? टॉप स्पीड किती? हँडलबारची का्य समस्या आहे?

In reply to by भटकंती अनलिमिटेड

हिमालायावर बसल्यावर रॉयल एन्फिल्डवर बसल्यासारखा फिल येतो का? -->> नक्कीच रॉयल एन्फिल्डवर बसल्यासारखा फिल येतो, अधिक सांगायचं झाले तर नवीन सीट खूपच आरामदायक आहे. एका बैठकीत तुम्ही ३००किलोमीटर सहज करू शकता पृष्टभागस काही त्रास ना होता. वजन दोघांचेही सारखेच आहे, मग दगड धोंद्यात चालवताना तेवढी सोपी आहे का? -->> वजना मध्ये ५किलो चा फरक आहे खूप जास्त नाही. हो सोपी आहे कारण गाडी ची उंची आणि हॅन्डल बार ची फिटींग योग्य प्रकार करण्यात आली आहे, ग्राउंड कलेअरन्स पण इतर ऑफरोड़ेर पेक्षा चांगला आहे. विचारू नए तरी पण प्रति किमी सरासरी किती आहे? -->>गावात ३० ते ३२ आपल्या गियर बदलण्याच्या पद्धती वर आहे. महामार्ग वर ३५ते ३६ देते आरामशीर. (वैयक्तिक विचारल तर सांगेन ३५० किंवा हिमालयन किंवा कुठली पण बुलेट घेताना प्रति किमी सरासरी विचार करू नये) टॉप स्पीड किती? -->> मी १४१ टॉप स्पीड गाठला आहे. हँडलबारची का्य समस्या आहे? -->> युनिव्हर्सल समस्या नव्हती, फक्त मला जी गाडी मिळाली तिचा हॅन्डल बार जाम व्हायचा आणि गाडी एक बाजूला ओढली जायची. ग्रीसन्ग आणि बॉल बेररिंग बदलून समस्याच समाधान झाले. मी वैयक्तिक रित्या हिमालयन सांगेन पण एकदा चालवून बघा आणि लूक्स चा विषय सोडून द्या. काही म्हणतील खराब दिसते पण माझा अनुभव वरून सांगतो १० पैकी ८ लोक गाडी बघतच राहतात.

In reply to by कपिलमुनी

तस म्हंटलं तर हो उंच आहे बघताना वाटेत पण जेव्हा बसल्यावर नाही वाटत उंच. मी 6feet आहे पण आमच्या ग्रुप मधले इतर सर्व जण ५.४ किंवा ५.७ आहेत त्यांना सुद्धा सोपी वाटली चालवताना. उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!

In reply to by Hulk the devil

तस म्हंटलं तर हो उंच आहे. बघताना वाटेत पण बसल्यावर नाही वाटत. मी 6feet आहे पण आमच्या ग्रुप मधले इतर सर्व जण ५.४ किंवा ५.७ आहेत त्यांना सुद्धा सोपी वाटली चालवताना. उंची मध्ये फरक आहे दिसण्यातला आणि बसण्यातला...!!

ट्युबलेस टायर आणि एबीएस ही एकमेव गोष्ट आहे जी मला हिमालयनपासून दूर ठेवते आहे. नाहीतर एव्हाना घेतली असती.

थंडरबर्ड घेऊन ६ महिने झाले नुकतेच. सुरवातीला दिवसात पहिल्यांदा गाडी चालू करताना बराच वेळ किक मारावी लागायची. तेव्हा विचार केला थंडीचे दिवस आणि इंजिन नवीन असल्या कारणानी होत असावं. कधी कधी स्पीड कमी करताना / एक गियर डाउन जाताना गाडी बंद पडायची त्यामुळे नंतर घरीच RPM सेटिंग केलं (इंजिन ऑन केल्यावर 1k RPM ). आता गाडी बंद पडायचा प्रॉब्लेम सुटला आहे आणि २-३ किक मध्ये स्टार्ट पण होते पण हे सेटिंग केल्यानंतर गियर चेंज करताना खूपच आवाज येतोय. अगदी की शेजारच्या गाडीवाल्याला पण कळावं हा बाबू गियर बदलतोय.

नवीन थंडरबर्डसाठी अभिनंदन खरे तर RPM सेटिंग आणि गिअर चेंज यांचा तसा संबंध नाही एकाच शक्यता वाटते ... High RPM सेटिंग मुळे इंजिनचे तापमान वाढते. त्यामुळे गिअर ऑइल ची व्हिस्कॉसिटी बदलू शकते .... पण ह्याची शक्यता फारच कमी आहे गिअर बदलताना आवाज येण्याचे अजुन एक कारण क्लच लागुन राहणे / पुर्ण डिसेंगेज ना होणे ... ते एकदा चेक करा ...

क्लासिक ३५० चेस्टनट बुक करण्यासाठी गेलो होतो परंतु, std ३५० बुलेटकड़े प्रयत्न करुन्सुद्धा कानाडोळा करू शकलो नाही. शेवटी न राहवून std ३५० बुलेटच बुक केली. त्या गाडीचा रेट्रो लुक फार आवडला. पण काही सुविधा कमी आहेत त्यात. विक्रेत्याशी बोललो तर त्याने काही सल्ले दिलेत. मागचा टायर ३.२५ -१९ आहे. ( क्लासिक्चा १८ इंच टायर आहे ) १९ इंच जरी टायर असला तरी त्या भरभक्कम बुलेट्ला फारच किडमिडा वाटतो. ३.२५ -१९ ऐवजी ३.५०-१९ टायर लावता येतो रिम बदलण्याची गरज नाही. सेल्फ स्टार्ट नाही. ही गोष्ट मला शहरात चालवताना गरजेची वाटते. ५ ते ६ हजार जास्तीचे घेउन शोरुम्वाले लावून देतील म्हणाले. वारंटी शाबूत राहिल. डिस्क ब्रेक नाही १० हजार जास्त घेउन शोरुम्वाले लावून देतील म्हणाले. वारंटीवर फरक नाही पडणारं जाणकार लोकांच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत.

In reply to by सतिश पाटील

std ३५० बुलेट घेउन डिस्क , सेल्फ स्टार्ट बाहेरून लावून घेउ नका ! कधीही स्मूथ चालत नाही. त्यापेक्षा std ५०० घ्या ( रेट्रो लूक आणि हवे असलेले फीचर्स त्यात आहेत) किंवा क्लासिक ३५० घ्या. तुम्ही सांगितलेला प्रयोग फसल्याची मित्रांची उदाहरणे आहेत.

सतीशजी ... नव्या बुलेट बद्दल अभिनंदन ... आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो .. सेल्फ स्टार्ट माझ्या माहितीप्रमाणे स्टॅंडर्ड ३५० ची बॅटरी ५AH ची असते. त्यामुळे त्यावर सेल्फ स्टार्ट चालणे अवघड वाटते. (क्लासिक व इतर मॉडेल्स मध्ये १४AH असते) तेंव्हा हे चेक करावे ... तसेच जर बॅटरी बदलणार असाल तर आल्टरनेटर बद्दल माहिती घ्यावी जेणेकरून १४ हं ची बॅटरी चार्ज होण्यात अडचण होणार नाही ) मागचा टायर मागचा टायर जाड टाकायला फारसा प्रॉब्लेम नाही . रोडग्रिप सुधारेल पण गाडी थोडी जड वाटेल व ऍव्हरेज थोडे कमी होईल .. अर्थात बुलेटला दोन गोष्टी नवीन नाहीत डिस्क ब्रेक डिस्क ब्रेक हा फक्त पुढच्या चाकाला बसवणार हे गृहीत धरतो .. काही प्रॉब्लेम नाही ऑल द बेस्ट

In reply to by अमर विश्वास

धन्यवाद अमरजी म्हणजेच स्लेफ़ स्टार्ट लावताना ब्याट्री अणि अल्टरनेटर पण बदलावा लागेल अणि टायर बदलल्याने जो एवरेज कमी होइल तो क्लासिक ३५० पेक्षा कमी नसेल कारण त्याचा टायर खुपच पसरट आहे. हो आणि डिस्क ब्रेक फ़क्त पुढच्या चाकाला.

In reply to by सतिश पाटील

माझे मत विचारलं तर कोणत्याही मोटर सायकलला असे मूळ ढाच्यात बदल करण्यापेक्षा कंपनीकडूनच बदल असलेली मोटर सायकल विकत घ्यावी कारण डिस्क ब्रेक बदलण्यासाठी चाकाची रिम पण बदलावी लागेल. ५ mAH ऐवजी १४ mAH म्हणजे तिप्पट प्रवाह आहे त्यासाठी आल्टरनेटर बदलणे म्हणजे सगळ्या वायरिंग वर ताण येतो( ५ mAH मॉडेल च्या तांब्याच्या तारांची जाडी तितकी कमी असणार) आणि वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाले तर गाडीला आग लागण्याचा धोका असतो. कारण सेल्फ स्टार्टरला सर्वात जास्त विद्युत प्रवाह लागतो. एवढी कटकट करून वर्षभरात त्याचे रुटूखुटू सुरु झाले तर कंपनी (साहजिकच) हात वर करेल. यात त्या शोरुम वाल्याला "घबाड" मिळेल म्हणून तो उत्साहात करून देतो म्हणणारच. पण हे सर्व नंतर लावून घेण्यात तुमचे फारतर ७-८ हजार वाचतील असे वाटते. पुन्हा एकदा नीट विचार करा. या सर्व सोयी नसलेली गाडी हि स्वस्तात उपलब्ध असते कारण या सोयीनं खर्च लागतो म्हणून कंपनी स्वस्तातील एक मॉडेल आणि चढत्या भाजणीने अधिक सुविधा असलेली मॉडेल विकतात. हा सर्व विचार कंपनी मधील विशषज्ञ इंजिनियर लोकांनी अगोदरच "पूर्ण पणे" केलेला असतो. बाकी बुलेट हा "दिल से" लिया गया निर्णय आहे म्हणून अधिक बोलत नाही. पण सुरक्षिततेबद्दल तडजोड/चालढकल नको असेच वाटते

एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे std चा हेडलाईट 35 W / 35 W, HALOGEN चा आहे आणि classic चा 60 W / 55 W, Halogen आहे म्हणजे रात्री क्लासिक मध्ये तुम्हाला हेडलाईटचा प्रकाश जास्त स्वच्छ आणि भरून मिळेल हा एक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे.

सतीशजी .. बुलेट हा "दिलसे " मामला असल्यामुळे आधी लिहिले नव्हते .. पण डॉक्टरसाहेब म्हणतात त्याचा जरूर विचार करावा ... अजुन एक "दिलसे" बात ... बुलेट ही लोणच्यासारखी असते .. लोणचे कसे छान मुरल्यावर त्याला खरी चव येते ... बुलेटचेही तसेच.. नविन बुलेट काहीनाकाही प्रॉब्लेम देत रहाते .. छोटे छोटे annoying प्रॉब्लेम ... एकदा दोन सेर्विसिन्ग झाली .. चांगल्या मेकॅनिकचा हात दोन - तीन वेळा फिरला कि मामला सेट होतो ... मग खरी "सफर" सुरु होते ... लगे राहो ...

In reply to by वेल्लाभट

नै नै, बुलेट ही लव्ह म्यारेज करून आनलेल्या बायकोगत असते. पर्यायच नसतो कौतुक करत बसन्याशिवाय. ;)

In reply to by सतिश गावडे

आणि एक साम्य म्हणजे वस्तुस्थिति पाहायची असेल तर... लव्हवाले समदुःखी सोबत बारमध्ये बोलतात ते बुलेटवाले समदुःखी सोबत ग्यारजमध्ये बोलतात ते . अगदी सेम हो..... ;)

In reply to by सतिश गावडे

आणि एक साम्य म्हणजे वस्तुस्थिति पाहायची असेल तर... लव्हवाले समदुःखी सोबत बारमध्ये बोलतात ते बुलेटवाले समदुःखी सोबत ग्यारजमध्ये बोलतात ते . अगदी सेम हो..... ;)

In reply to by अभ्या..

हे एकदम खरं. डोक्याने विचार केला तर बुलेट कोणीच घेणार नाही. https://www.bikewale.com/comparebikes/royalenfield-classic-vs-bajaj-dom…

कपिलमुनी, अमरविश्वास, डॉक्टर खरेसाहेब धन्यवाद. मुळ ढाच्यात बदल करू नये हे पटले. ३५० क्लासिक नक्की.

१ मे ला भाच्याने त्याच्या बॉसची आणलेली थंडरबर्ड चालवली. काय ताकद त्या गाडीची. थोडंसं अक्सिलेटर पिरगळल तरी गाडी पळत होती. भाच्याला बोललो होतो की इथूनच ५ मिनिटात राउंड मारून येतो, पण आलो डायरेक्ट अर्ध्या तासाने. इंजिनाची धडधड आणि हृदयाचे ठोके यांची त्या अर्ध्या तासात जुगलबंदी चालू होती. एकदम स्वर्गीय अनुभव, सॉलिड मजा आली. आधी नुसता पाहून आणि गाडीचा आवाज ऐकून तिच्या प्रेमात होतो आणि आता चालवल्यावर तर तिच्या आकंठ प्रेमात बुडलोय

खरा तर थोडा आवांतर प्रश्न आहे पण मदत करा. माझ्या रॉयल एन्फ़िल्ड. डेसर्ट स्टॉर्म चा न्यू इंडिया चा इन्शुरन्स ५ मे ला संपला. चुकून रिन्यू करायचा राहून गेला. न्यू इंडिया च्या कस्टमर केअर ला फोन केला तर ते म्हणतात गाडीचे चेकअप करावे लागेल, ऑफिस ला गाडी घेऊन या. एका मित्रांनी सांगितलं कि पेट्रोल पंप वर icici लोंबार्ड वाले गाडी चेक करून फोटो कडून पाच मिनटात इन्शुरन्स देतात. तोपर्यंत आज icici लोंबार्ड मधून फोन आला त्यांनी ऑनलाईन इन्शुरन्स बद्दल सांगितलं त्यांच्या मते ऑनलाईन इन्शुरन्स साठी गाडी चेकिंग ची गरज नाही. शेवटचा पर्याय कसा आहे, खरचं ऑनलाईन इन्शुरन्स साठी गाडी चेकिंग ची गरज नाही का? इन्शुरन्स क्लेम करताना हे नंतर काही प्रश्न उपस्तित करून क्लेम रिजेक्ट करणार का? माझी २०१६ सालाची गाडी सुस्तिथित आहे आणि मला फक्त पोलिसाना दाखवण्यासाठी इन्शुरन्स नको आहे. कृपया मदत करा ऑनलाईन इन्शुरन्स घेणं योग्य का...

In reply to by पी. के.

ऑन लाईन केलात तर नो क्लेम बोनस मिळणार नाही. यासाठी आपण आपली गाडी एक महिन्याच्या आत आपल्या विमा कार्यालयात घेऊन जा. तेथे ते फक्त अपघात झाला नाही एवढी तपासणी करतात. आणि आपला हप्ता घेतला जाईल.