✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Tue, 10/11/2016 - 08:50  ·  लेख
लेख
"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुस‍र्‍यांदा जिंकली. २००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला. डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा. आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला, "She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter." म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ? "होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता." "त्यामानाने अमेरिकन स्त्रीया जरा बावळटच आहेत नाही का रे भाऊ?" "तसं नव्हे रे, आपल्या भारतीय स्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या फाल्तूगीरी चालवून घेणार नाहीत.इमिग्रेशनमुळे निरनीराळ्या संस्काराच्या स्त्रीया इकडे आहेत.त्यामुळे इकडच्या स्त्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या आता निवडणूकीत त्याला धडा शिकावतील.७२ टक्के स्त्रीया अगोदरच डॉनाल्डच्या विरोधात गेल्या आहेत असं ऐकतो." श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
20209 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

खी खी खी, आता बुलेट येईल

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/13/2016 - 10:08 नवीन
खी खी खी, आता बुलेट येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

कुट?

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 10/17/2016 - 13:56 नवीन
आम्रिकेत? नाका वो. मानवाय्चं नाय येवढ चक्क्चकित रोड बुलेटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ट्रंपने आयकर बुडविला आहे, तो

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/13/2016 - 14:31 नवीन
ट्रंपने आयकर बुडविला आहे, तो महिलांबद्दल वाईट बोलतो इ. गोष्टींना माझ्या दृष्टीने महत्त्व नाही. भारतासाठी जो/जी चांगला/चांगली आहे (किंवा कमी वाईट आहे) तो/ती निवडून यावा/वी. एकंदरीत हिलरीच्या तुलनेत ट्रंप भारतासाठी जास्त चांगला (किंवा कमी वाईट वाटतो). म्हणून तोच निवडून यावा.
  • Log in or register to post comments

हिलरीच्या तुलनेत ट्रंप

चिनार
गुरुवार, 10/13/2016 - 14:35 नवीन
हिलरीच्या तुलनेत ट्रंप भारतासाठी जास्त चांगला (किंवा कमी वाईट वाटतो).
ह्यावर जरा प्रकाश टाकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हिलरी बाकी कशीही असली तरी

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/13/2016 - 15:20 नवीन
हिलरी बाकी कशीही असली तरी तिचे सौदी अरेबिया प्रेम भारतासाठी चांगले नाही. सौदी अरेबियाने क्लिंटन फाऊंडेशनला बरीच मदत केल्याचे बाहेर आले होते. त्याबदल्यात सौदीला फायटर जेट देण्याचा सौदा पार पाडला गेला. काही दिवसांपूर्वीच ९/११ साठी सौदीकडून नुकसानभरपाई मागण्याच्या मागणीला ओबामाने नकाराधिकार वापरून थोपवून धरले होते. एकंदरीत हिलरी व डेमोक्रॅटीक पक्षाचे सौदी प्रेम उघड दिसत आहे. सौदी अरबिया आज जगात इस्लामीकरणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवित आहे. इस्लाम प्रसार, धर्मांतर व दहशतवाद्यांना मदत यासाठी सौदी भारतासह अनेक देशात निधी पुरवित असतो. त्यामुळे हिलरी निवडून आली तर सौदीला पाठबळ मिळेल व पर्यायाने ते भारतासाठी त्रासदायक ठरेल. ट्रंप मूर्ख असला तरी धाकट्या बुशप्रमाणे कट्टर इस्लामविरोधी वाटतो. बिल क्लिंटनच्या तुलनेत धाकटा बुश भारतासाठी चांगला ठरला होता. तसेच ट्रंप हिलरीच्या तुलनेत भारतासाठी चांगला ठरेल. या दोघांची बाकी तुलना इतर काही धाग्यांवर झालेलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

गुरुजी, चूभूद्याघ्या

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/13/2016 - 18:43 नवीन
पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा निर्णय हा काँग्रेसने मान्य करावा लागतो, बरोबर? तिथे सध्या रिपब्लिकन पक्ष बहुमतात आहे. मग हिलरी जर निवडून आली तरी तिला सौदीधार्जिणी धोरणं अवलंबता येणं इतकंही सहज शक्य होता येणार नाही. हे माझं मत बरोबर का चूक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/13/2016 - 19:55 नवीन
पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान साहेबांनी म्हणजेच मोदिजींनी सौदी सोबत खूप सौहार्द्र्पूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत आधी होते त्याच्यापेक्षा असे वाटते अन वाचल्याचे स्मरते. कुठेतरी (तुम्हीच लिहिलेले का ते आठवत नाही) सौदीला मैत्रीचा हात देणे म्हणजे पाकिस्तानला एकटे पाडायची उत्कृष्ट खेळी असल्याचेही वाचल्याचे स्मरते. मग हिलरी जर आली सत्तेत (असे होऊ नये ही मनःपूर्वक इच्छा) तर त्याने भारत सौदी संबंधांवर काय फरक पडेल म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/13/2016 - 21:38 नवीन
पण सध्याच्या आपल्या पंतप्रधान साहेबांनी म्हणजेच मोदिजींनी सौदी सोबत खूप सौहार्द्र्पूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत आधी होते त्याच्यापेक्षा असे वाटते अन वाचल्याचे स्मरते. कुठेतरी (तुम्हीच लिहिलेले का ते आठवत नाही) सौदीला मैत्रीचा हात देणे म्हणजे पाकिस्तानला एकटे पाडायची उत्कृष्ट खेळी असल्याचेही वाचल्याचे स्मरते. हे मुत्सद्दी काम वर वर दिसते आहे त्यापेक्षा जास्त खोलवर व जास्त चांगल्या प्रकारे झाले आहे / होत आहे. आणि ते भारताच्या फायद्याचेच आहे. एप्रिल २०१६ मध्ये सौदी अरेबियाच्या भेटीच्या वेळी सौदी अरेबियाने मोदींना (highest civilian honour) सर्वोच्च मुलकी सन्मान दिला आहे. http://www.narendramodi.in/pm-modi-conferred-saudi-arabia-s-highest-civilian-honour-the-king-abdulaziz-sash-439952 संयुक्त अरब अमिरातही भारताचे आताइतके वजन कधीच नव्हते. या दोन्ही राष्ट्रांकडून पाकिस्तानने "इस्लामिक अजेंडा" व " इस्लामिक अण्वस्त्रे" हे मुद्दे पुढे करून बरेच बिलियन्समध्ये डॉलर्स लाटले आहेत. त्या बदल्यात त्या राष्ट्रांना केवळ पाकिस्तानकडून अरेरावी, त्यांच्या भूमीचा गुन्हेगारी कारणांसाठी वापर व उलट मदतीच्या बाबतीत ठेंगाच मिळाला आहे. इस्लामी राष्ट्रांत सामरिकरित्या समर्थाच्या पुढे नांगी टाकायची प्रथा फार पूर्वीपासून आहे. शहाचा पर्शिया, सद्दामचा इराक, नासर-सादात-मुबारकचा इजिप्त, इत्यादींचा त्यांच्या प्रत्येकाच्या उत्कर्षकाळातला मुस्लिम जगतातला दबदबा आठवत असेलच. खाडी राष्ट्रे कितीही श्रीमंत असली तरी 'जुजुबी सामरीक ताकद व कमी लोकसंख्या' ह्या त्यांच्या पडत्या बाजू आहेत. त्यामुळे तुलनेने जास्त लोकसंख्येचा व अण्वस्त्रसज्ज सेना असलेल्या "इस्लामी" पाकिस्तानचा "ब्रदरहूड" त्यांना नाईलाजाने का होईना त्याना जवळचा वाटणारच. त्यामुळे त्या देशांकडून पाकिस्तानकडे अनेक बिलियन डॉलर्सचा अधिकृत व अनधिकृत ओघ अनेक दशके चालू होता व आताही काही प्रमाणात चालू आहे. परंतु, केवळ भारत नव्हे तर जगातील इतर देशांतल्या उघड/गुप्त अतिरेकी कारवायांत पाकिस्तानचा कमीजास्त हात असतो हे आता दिवसेदिवस जास्त जास्त उघड होत आहे. या अवस्थेत खाडी देशांना पाकिस्तानला "ब्रदर" म्हणून मागे घालणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या इस्लामिक छबीला आणि आपल्या सिंहासनाला धोका न पोचता पाकिस्तानपासून दोन हात दूर राहता आले तर त्यांना ते हवेच आहे. त्यातच, इतके दिवस 'इस्लामी सैन्य' बलवान करण्यासाठी बिलियन्समधे डॉलर्स घेऊनही, शिया इराणचा पाठींबा असलेल्या येमेनमधल्या बंडखोरांवर हल्ला करण्यासाठी तयार केलेल्या सुन्नी खाडी देशांच्या संयुक्त सैन्यात सहभाग घेण्यास पाकिस्तानने २०१५ च्या सुरुवातीस स्पष्ट नकार दिला. ही घटना उंटाची पाठ मोडणारी शेवटची काडी ठरली आहे. पाकिस्तानकडून त्यांच्या देशांतर्गत होणारी ढवळाढवळ ही त्यांच्याकरिता "बोलता येत नाही, पण सहनही होत नाही" असा मुका मार होता/आहे. त्यामुळे, वर वर स्पष्टपणे दाखवणे तितकेसे सोईचे नसले तरी खाडी राष्ट्रांतील सत्ताधार्‍यांना अमेरिका-भारत अ‍ॅक्सिसकडे झुकणे गेल्या काही दिवसांपासून सोईचे वाटत आहे. यापैकी अमेरिकेवर अवलंबून असणे ही त्या देशांच्या राजकीय सत्ताधार्‍यांना आपापली सिंहासने मजबूत ठेवण्यासाठी गेली अनेक दशके आवश्यक असलेली गोष्ट आहे हे काही गुपित नाही. तसेच, त्यांना भारताची सुधारणारी राजकिय-आर्थिक व समतोल छबी, पाकिस्तानच्या बिघडणार्‍या छ्बीपेक्षा जास्त सुरक्षित व विश्वासू वाटू लागली तर आश्चर्य नाही. धर्म हे सिंहासन मजबूत करायला सर्वात उत्तम साधन असते (जगाच्या सुरुवातीपासूनचे सर्व ठिकाणांचे, सगळेच राजे 'देवाचे अवतार होते' किंवा 'देवाज्ञेने झालेले राजे' होते हा काही योगायोग नाही !). तरीही, सार्वकालीक जागतिक सत्य हेच आहे की, कोणत्याही सत्ताधार्‍याला सिंहासन हे धर्मापेक्षा नेहमीच जास्त महत्वाचे असते... जर बुडाखाली सिंहासन नसले तर धर्म काय भाकरीबरोबर मोडून खायच्या उपयोगाचा आहे काय ?! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही ठरवा

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/14/2016 - 08:47 नवीन
एकंदरीत हिलरीच्या तुलनेत ट्रंप भारतासाठी जास्त चांगला (किंवा कमी वाईट वाटतो). म्हणून तोच निवडून यावा. श्रीगुरूजी, माझ्या वाचनात आलेलं ट्रम्पचं भारताबद्दलचं मत. फक्त एक झलक. Donald Trump: I hate Indians, Muslims, will throw H-1B visa workers into detention camps Rajan: But it seems you don’t like Indians too much. Why’s that? Trump: Listen, it’s nothing really. You got to be practical. Most Indians are fat and ugly. Look at yourself. You look like the last time you worked out was when you crawled on all fours as a baby. Indian women are fat and ugly. I bet your wife and mother is ugly. Ask Rosie O’Donnell what it means to be a fat slob and stuff her mouth with cheeseburgers and fries the whole day. Ask Lying Ted’s wife why she can’t make herself pretty enough. I tell you, if there’s one thing I cannot stand is ugly people. They make me angry. Look at Melania (Trump). You don’t need to read that Greek mythology shit. You see divine beauty right in front of your eyes. Make you feel happy. वाचा ही लिंक https://www.americanbazaaronline.com/2016/04/01/donald-trump-hate-indians-muslims-will-throw-h-1b-visa-workers-detention-camps-43454/ Exclusive interview with GOP presidential frontrunner, at Trump Towers in New York. By Sujeet Rajan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अहो काका, मानो या ना मानो

यशोधरा
Fri, 10/14/2016 - 08:51 नवीन
अहो काका, मानो या ना मानो बरेच गोरे असा विचार करत असतात फक्त बोलून दाखवत नाहीत. तो येडा बोलतो इतकाच फरक. अर्थात, राष्ट्राध्यक्षाने जरा तारतम्याने बोलायला हवं म्हणा. अवांतर विचारः आणि भारतीय स्वतः अजूनही काळा - गोरा, जाड- बारीक ह्या भूलभुलैय्यमध्ये स्वतःच इतके आडकलेत की त्यांनी ट्रंपला ह्याबाबतीत काही म्हणणं म्हणजे हिपोक्रसीचा कळस. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

एप्रिल फूल

कपिलमुनी
Fri, 10/14/2016 - 09:20 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी लिंक वाचलीच नाही.

यशोधरा
Fri, 10/14/2016 - 09:22 नवीन
मी लिंक वाचलीच नाही. ट्रंपबद्दल इतके कोण वाचणार! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एप्रिल फूल

कपिलमुनी
Fri, 10/14/2016 - 09:21 नवीन
काय काका !! १ एप्रिल चा पेपर दाखवता आहे ? चु* समजता का काय? खाली स्पष्ट लिहीला आहे One more thing: most of you would have realized this interview with Mr. Donald Trump is a piece of pure fiction. For those who didn’t get it: Happy Fool’s Day )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

you nailed it ....

गामा पैलवान
Fri, 10/14/2016 - 12:58 नवीन
कपिलमुनी, नेमका निशाणा साधलात बघा. त्याखालची एक प्रतिक्रिया वाचून बघा :
Peter Wright : This article will actually be believed by some people. This is incitement to racial hatred against white people. There is a risk that some of your Indian compatriots will start quoting sections to justify their anti Western prejudices. And yes it needs to be said that there are more than a few Indians who are clearly racists.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

तारतम्य

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/15/2016 - 08:33 नवीन
राष्ट्राध्यक्षाने जरा तारतम्याने बोलायला हवं म्हणा. एकदम सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

April Fool

कपिलमुनी
Sat, 10/15/2016 - 11:21 नवीन
एप्रिल फूलबद्दल पण लिहा ना ! तुम्ही ट्रम्पच्या नावावर काहीही खपवताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

ट्रम्पच्या नावावर

श्रीकृष्ण सामंत
Mon, 10/17/2016 - 07:42 नवीन
मुनीजी, खाली,रमेश आठवल्यानी दिलेली ही लिंक वाचा आणि कॉमेन्ट्स ब्लॉक मधल्या कॉमेन्ट्स वाचायला विसरू नका बरं का! खूप आहेत http://timesofindia.indiatimes.com/united-states-elections-2016-us-elect...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

तुम्ही दिलेली लिंक

कपिलमुनी
Mon, 10/17/2016 - 08:39 नवीन
तुम्ही दिलेली लिंक चुकीची होती. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

एप्रिल फूल

कपिलमुनी
Fri, 10/14/2016 - 09:19 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

एप्रिल फूल

कपिलमुनी
Fri, 10/14/2016 - 09:20 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

हिलरीवरचे बेछूट आरोप

गामा पैलवान
गुरुवार, 10/13/2016 - 16:18 नवीन
श्रीकृष्ण सामंत,
मला वाटतं आपले हे बे-छूट आरोप आहेत.
मग हिलरीवर एफबीआय ची कसली केस चालली आहे? १५ सप्टेंबरच्या आसपास त्यांनी चौकशीची व्याप्ती वाढवायचा निर्णयही घेतला आहे. हे कशाचं लक्षण आहे? २.
अमेरिकेची सुरक्षता इतकी फाल्तू नाही.आणि अमेरिकन नागरिक,मग तो कुणीही नागरिक असो,देशाला गहाण ठेवणार नाही.प्रेसिडेंटच्या पदावरचा तर नाहीच नाही.इथे सूर्याजीपिसाळ अजूनतरी जन्माला आलेले नाहीत.
१९९१ साली बीसीसीआय बँक बुडाली तेव्हा सिनेटच्या २८ आणि प्रतिनिधीगृहाच्या १०८ सदस्यांना लाच देऊन गप्प केलं गेलं होतं. या बँकेने अमेरिकी नियम झक्कत पायदळी तुडवून व्यवहार केलेच ना? १९७६ साली अमेरिका व्हियेतनाम युद्ध कशामुळे हरली? सायगावच्या अमेरिकी दूतावासाच्या छतावरून हेलिकॉप्टरमार्गे शेवटचा सैनिक निघाला. ही महासत्तेच्या सैन्याची माघार घ्यायची पद्धत झाली का? कोणीतरी कुठेतरी कसलीशी फंदफितुरी केली म्हणूनंच अशी वेळ आली ना? १९४३ साली दुसरं महायुद्ध ऐन भरात असतांना डॅडी बुशचा बाप प्रेस्कट बुश अमेरिकेचा शत्रू नाझी जर्मनीशी व्यापार करीत असे. त्या आरोपावरून त्याला अटकही करण्यात आली होती. कोण सूर्याजी पिसाळ आहे ते कळतं यातून. मला वाटतं इतकी उदाहरणं पुरेशी आहेत. जरा शोधाशोध केली तर पुष्कळ सापडतील. पण शोधायची इच्छा हवी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गा. पै. काकांनी आधीच स्पष्ट

महासंग्राम
गुरुवार, 10/13/2016 - 16:44 नवीन
गा. पै. काकांनी आधीच स्पष्ट केलंय कि ते अमेरिकेचे नागरिक आहेत. तेव्हा समजून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पैलवान, सामंत काका बिल

राजाभाऊ
गुरुवार, 10/13/2016 - 19:23 नवीन
पैलवान, सामंत काका बिल क्लिंटनपासुन मतदान करतायत, तरीहि क्लिंटन दांपत्यांबाबत त्याच्या मनात ओलावा आहे. उगाच तुम्हि डोकेफोड करु नका... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हें बरीक खरें

गामा पैलवान
गुरुवार, 10/13/2016 - 20:39 नवीन
राजाभाऊ, कसं बरोबर बोललात बघा. विशीतल्या नवथर युवकाने असं काही लिहिलं तर आपण समजू शकतो. पण इतके पावसाळे पाहिलेली वयोवृद्ध व्यक्ती जेव्हा हिलरीस दुर्गा वगैरे म्हणू लागते, तेव्हा वेगळीच शंका येते. मग हिलरीपेक्षा सेरा पेलिन काय वाईट आहे, असाही प्रश्न पडतो. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाऊ

दुर्गा

कपिलमुनी
Fri, 10/14/2016 - 09:16 नवीन
दुर्गा म्हणण्यामागची कारणे संदर्भासहीत स्पष्ट करा -- ८ गुण
  • Log in or register to post comments

१} बहुधा ट्रंप्म ने चुकुन

मदनबाण
Fri, 10/14/2016 - 12:05 नवीन
१} बहुधा ट्रंप्म ने चुकुन पछाडलेला चित्रपट पाहिला असावा आणि सारखा ओरड फिरत असावा... सूड घेइन मी दुर्गे.. सूड.. हा हा हा.. तुला व्हाईट हाऊस मध्ये शिरु देणार नाही मी.. सूड घेईन मी दुर्गे सूसूसूसूसूड. उरलेली ७ कारणे बाकीच्यांनी आपापल्या कल्पना शक्तीने ध्यावीत ! ;) जाता जाता :- एप्रिल फूल ? छ्या काहीतरीच मुनी ! दुर्गेचा कोप होईल हो अशाने ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरे :- Boycotting our goods will damage ties, China’s state media warns India
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

तसं नाय ते..

चिनार
Fri, 10/14/2016 - 13:12 नवीन
तसं नाय ते.. कोठेही शाखा नसलेल्या दुर्गा कॉफीची एक शाखा न्यूयॉर्कला सुरु झाली (घ्या घ्या..मोदींच्या परदेश दौऱ्यांचे फलित विचारता ना नेहमी..हे घ्या आता !!). तिथली कॉफी पिताना, त्या कपात ट्रम्पला हिलरींचा चेहरा दिसला..म्ह्णून झाली ती दुर्गा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खरे कारण असे आहे

नाखु
Fri, 10/14/2016 - 14:20 नवीन
असे आमचा बोंबील्वाडीचा वार्ताहर कळवितो (अगदी आतल्या गोठ्यातून). ट्रम्पला कोंबडी खायची ईच्छा झाली ती ही भारतीय उपहारगृहात्,गेला झोकात दिली आर्डर (कटाक्षाने कोंबडाच द्या खायला म्हणून सांगीतलेकी पठ्ठ्याने) आणि वेटरला बिल ठेवताना ऐकले एक मुर्गा आणि पाव-रोटी ५ नंबर टेबल. झालं ट्रंपला वाटल वेटर आपल्यालाच काहीतरी म्हणाला आणि अपभ्रंशाने मुर्गा चा दुर्गा केला. वेटर पडला बंगाली, ज्याम चिडला "टुम गोरा लोग मुर्गा को दुर्गा बोलते है तुम्हारा अभ्भी खिमा करेगा हम बाबु म्हणून सुरा परजत मागे लागला" तसही गोर्यांना अर्धेच ऐकायची सवय असल्याने मुर्गा विसरला आणि दुर्गा हेच लक्ष्यात ठेऊन तेच दूषण समजून हिलरीम्ना दिले. अता खरा अर्थ कळल्यावर स्वतः मुर्ग्यासारखा पळतोय इकडे तिकडे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

(No subject)

महासंग्राम
Fri, 10/14/2016 - 15:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पाल चुकचुकते

रमेश आठवले
Sat, 10/15/2016 - 04:22 नवीन
गेली जवळ जवळ आठ वर्षे एक अश्वेतवर्णीय पुरुष पहिल्यांदाच अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आता हिलरी क्लिंटन या अध्यक्ष होण्याची दाट शक्यता असल्याने एक महिला अमेरिकीची पहिल्यांदाच अध्यक्षा होईल असे दिसते आहे. या दोन्ही गोष्टी चांगला पायंडा पाडत आहेत. तरीही हिलरी यांच्या बाबत एका भारतीयांच्या दृष्टिकोनातून संशयाची पाल चुकचुकते. त्याचे कारण - हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. या बाई नवीन अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अगदी नजीकच्या गोटात वावरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे . https://en.wikipedia.org/wiki/Huma_अबेदीं भारताच्या हित लक्षात घेऊन येत्या निवडणुकीत मतदार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक या बाबत विचार करतील असे वाटते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणीबाणीची परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकतेआणि अणू युद्ध पेटू शकते . कारगिलचे उदाहरण घेतले तर पाकिस्तान अणुशस्त्र वापरायला तयार झाला आहे अशी बातमी समजताच बिल क्लिंटन यांनी नवाझ शरीफ यांना तातडीने वाशिंग्टनला बोलावून घेतले आणि दबाव आणून अनर्थ टाळला. या दोन देशात आणीबाणीची परिस्थिती पुन्हा उभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तत्कालीन अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका पुन्हा महत्वाची ठरेल. आत्ता पर्यंतच्या ऐतिहासिक अनुभवा वरून मुस्लिम धर्मीय हुमा पाकिस्तानच्या खबऱ्या म्हणून कटोकटीच्या वेळी काम करणार नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय ?
  • Log in or register to post comments

ट्रम्प उवाच

रमेश आठवले
Sun, 10/16/2016 - 19:58 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/united-states-elections-2016-us-elections-news-results-polls/Donald-Trump-pledges-even-better-ties-with-New-Delhi-says-big-fan-of-India-and-Hindus/articleshow/54878649.cms
  • Log in or register to post comments

बघा पूर्वाश्रमीचे भारतीय

वटवट
Mon, 10/17/2016 - 11:16 नवीन
बघा पूर्वाश्रमीचे भारतीय अमेरिकेचे नागरिक होताच अमेरिकेबद्दल कित्ती कित्ती आग्रही होतात, देशाभिमानी होतात... (हा उपहास नाही) च्यायला आणि आमच्यातलया बर्याच जणांचं अजून टेस्टिंग टेस्टिंगच चालूये...
  • Log in or register to post comments

तिसरा वादविवाद हिलरीच वरचढ ! !

जयन्त बा शिम्पि
गुरुवार, 10/20/2016 - 20:12 नवीन
हिलरी काय भन्नाट आकडे फेकीत होती, ते पहाण्यासारखे होते. त्याविरुद्ध ट्रम्प कडे नुसते ' गोलमाल ' बरळणे होते. त्याने एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिले नाही. प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी, हिलरी कशी खराब आहे, बराक ओबामा यांच्यासहीत, हिलरी ने अमेरिकेची कशी वाट लावली आहे, हेच सांगण्यावर त्याचा भर होता. हिलरी चे मत " बॉर्डर ओपन ठेवणे " याचा अर्थ , कोणालाही सरसकट अमेरिकेत प्रवेश मिळणार असा होतच नाही. हिलरी क्लिंटन बोलत असतांना, मधुन मधुन , ती कसे खोटे सांगत आहे असे बोलण्याची ती संवय जुनीच आहे. तीनेवेळा तर त्याला पाण्याचा घोट घ्यावा लागला, या उलट हिलरी चा आत्मविश्वास, त्याच्या फालतू बोलण्यावर सुचक हंसणे, डिबेटच्या मर्यादा सांभाळणे, अमेरिकेपुढे असलेले नेमके प्रश्न म्हणजे मध्यमवर्गीयांचे वेतन वाढविणे, कर्जात वाढ न करणे,शिक्षणाच्या खर्चाबाबत सवलती देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे,उत्पन्न वाढविण्यासाठी बड्या कंपन्यांना व उद्योगपतींना जादा कर लावणे, महिला व लहान मुलांसाठी कल्याणकारी योजना राबविणे इ.इ.याबाबत तीचे म्हणणे , मतदारांना आकर्षित करणारे होते. ट्रम्पच्या लंपट्पणाबद्दल्,त्याचे नाकारणे हास्यास्पद वाटले. हिलरी वर , बिल क्लिंटनच्या भानगडीचा वार , ट्रम्प कडून फारसा जोरात झालाच नाही. मॉडरेटर सुद्धा हिलरी पेक्षा , ट्रम्पला जास्त बोलण्याची संधी देत होता असे जाणवत होते. थोड्क्यात तिसर्‍या वादविवादात सुद्धा , हिलरीनेच बाजी मारल्याचे दिसून आले.
  • Log in or register to post comments

झाल्या तीनही डिबेट्स..

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 20:18 नवीन
झाल्या तीनही डिबेट्स.. काय वाटतंय? कोण निवडुन येईल? इथले वातावरण पहाता मला हिलरीच येईल असं वाटतंय. ट्रंपची स्त्रियांना वागणुक ह्या मुद्द्यावर फारच नाचक्की झाली आहे. खरं तर हिलरीचं हसु पाहुन अंगावर काटा येतो, पण स्त्रीयांविषयक मुद्द्यांवर तरी लॉजिकल बोलते. गन कंट्रोल बद्दलही. पण ती भारताच्या दृष्टीने योग्य नसेल तर कसे व्हायचे?
  • Log in or register to post comments

हिलरी निवडून येण्याबाबत शंकाच नाही.

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/21/2016 - 06:36 नवीन
हिलरी जर एक मताने पडणार असेल तर माझं शेवटचं मत तिला जिंकून देईल एव्हडी मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

काय हे काका? अमेरिकन अध्यक्श

राजाभाऊ
Fri, 10/21/2016 - 20:17 नवीन
काय हे काका? अमेरिकन अध्यक्श इलेक्टोरल वोट्सने निवडला जातो हे तुम्हाला माहित नाहि का? आणि तुम्हि कांग्रेसमन असण्याची शक्यता जवळजवळ नाहिच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

वाक्याचा आशय!

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/22/2016 - 07:24 नवीन
काय हे काका? अमेरिकन अध्यक्श इलेक्टोरल वोट्सने निवडला जातो हे तुम्हाला माहित नाहि का? राजाभाऊ, अहो,मला माहित आहे.आजचा माझा लेख वाचावा. हिलरी जर एक मताने पडणार असेल तर माझं शेवटचं मत तिला जिंकून देईल एव्हडी मला खात्री आहे. राजाभाऊ, वरील माझ्या वाक्याचा आशय कळला असता तरी माझ्या म्हणण्याचं सार्थक झालं असतं.असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाऊ

सामंत काका, पोलिटिक्स में

संदीप डांगे
Fri, 10/21/2016 - 10:26 नवीन
सामंत काका, पोलिटिक्स में इमोशन?
  • Log in or register to post comments

इमोशन

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/22/2016 - 07:37 नवीन
सामंत काका, पोलिटिक्स में इमोशन? संदीपजी, त्याचं असं आहे,पॉलिटिक्स हा पण एक गेम आहे.आता गेम म्हटल्यानंतर चूरस येणार,चूरस आल्यानंतर हार-जीत असणारच,आणि हार-जीतमधे इमोशन येणार नाही का? गेम जरका इमोशन शिवाय पाहिला तर मजाच जातेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हिलरी मेली आहे

गामा पैलवान
Fri, 10/21/2016 - 12:21 नवीन
लोकहो, ११ सप्टेंबरच्या एका कार्यक्रमात हिलरी कोसळली आणि कायमची गचकली. सध्या दाखवतात ती तोतयी आहे. तोतयीचे दात आणि नाकाचा शेंडा साफ खऱ्या हिलरीपेक्षा वेगळा आहे. तिचं नाव तेरेसा बार्नवेल असून ती हिलरीची तोतयी बनून भरपूर पैसे कमावते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

एकता कपूरची सिरीयल आहे का?

संदीप डांगे
Fri, 10/21/2016 - 12:42 नवीन
एकता कपूरची सिरीयल आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

११ सप्टेंबरच्या एका

श्रीगुरुजी
Fri, 10/21/2016 - 15:16 नवीन
११ सप्टेंबरच्या एका कार्यक्रमात हिलरी कोसळली आणि कायमची गचकली. सध्या दाखवतात ती तोतयी आहे. तोतयीचे दात आणि नाकाचा शेंडा साफ खऱ्या हिलरीपेक्षा वेगळा आहे. तिचं नाव तेरेसा बार्नवेल असून ती हिलरीची तोतयी बनून भरपूर पैसे कमावते.
ही ब्रेकिंग न्यूज सनातन प्रभातच्या अंकात आलेली दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

:))

प्रसाद_१९८२
Fri, 10/21/2016 - 16:37 नवीन
:D :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काहीही.. तिचा फोटो पाहिलात का

पिलीयन रायडर
Fri, 10/21/2016 - 18:10 नवीन
काहीही.. तिचा फोटो पाहिलात का? अर्ध्या क्षणात कळतं की ही बाई हिलरी नाही. म्हणजे मुळात मला तर ती हिलरी कधीच वाटली नाही. टोटली वेगळ्या दोन बायका आहेत ह्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तोतयी

रमेश आठवले
Wed, 10/26/2016 - 20:03 नवीन
Irving Wallace यांच्या The second lady या कादंबरीत रशियाची गुप्तहेर संस्था तत्कालीन अमेरिकन अध्यक्षांच्या पत्नीचे अपहरण करून तिच्या जागी तीची हुबेहूब प्रतिकृती असलेली त्यांची गुप्तहेर आणते. अमेरिकेच्या अध्यक्षाला सुद्धा ती प्रतिकृती असल्याचे कळत नाही असे वर्णन कादंबरीत आहे. http://www.goodreads.com/book/show/585539.The_Second_Lady
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पुर्वी मिपावर कुणीतरी लिहिलं

मराठी कथालेखक
Fri, 10/21/2016 - 18:40 नवीन
पुर्वी मिपावर कुणीतरी लिहिलं होतं की हिलरी आणि बिल यांनी मिळून अनेक लोकांचे खून करवलेत. त्याबद्दल कुणी अधिक माहिती देईल का ?
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद आणि त्याखालचे

रुपी
Sat, 10/22/2016 - 01:29 नवीन
हा प्रतिसाद आणि त्याखालचे आणखी काही पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

हिलरीचा ताजा बळी

गामा पैलवान
Sat, 10/22/2016 - 02:11 नवीन
मराठी कथालेखक, हिलरीचा ताजा बळी डॉक्टर संदीप शेरलेकर. बहुधा मराठमोळा आहे. :राग: :वैफल्य: :चीड: आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

आत्महत्येचे डिटेल्स या बातमीत

विशाखा पाटील
Sat, 10/22/2016 - 11:40 नवीन
आत्महत्येचे डिटेल्स या बातमीत आहेत- http://www.fredericknewspost.com/news/crime_and_justice/cops_and_crime/frederick-police-investigating-death-of-doctor-accused-in-kickback-scheme/article_cd45da36-c86b-5fbb-b43d-1a81c4990cec.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

फार भयंकर ..अशी व्यक्ती

मराठी कथालेखक
गुरुवार, 10/27/2016 - 15:24 नवीन
फार भयंकर ..अशी व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होणार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा