✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

द कॅमब्रियन पट्रोल

क
कैलासवासी सोन्याबापु यांनी
Sun, 10/23/2016 - 21:18  ·  लेख
लेख
जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ? ह्याला उत्तर म्हणजे ते ठरवायला आजकाल आयोजित केले जाणारे संयुक्त अभ्यास, तसे पाहता आपापले मित्रदेश पकडून आजकाल प्रत्येकच देश संयुक्त अभ्यास करतो, मग परत जागतिक नामांकनांची पंचाईत होऊ शकते. अश्यावेळी कामी येतात ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले अन भयानक जास्त खडतर संयुक्त अभ्यास, वायुसेना क्षेत्रात ते रेड फ्लॅग संयुक्त अभ्यास असतात, नेवी मध्ये आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्यु, ही नावे बरीच नावाजलेली आहेत. ह्यातील रेड फ्लॅग अलास्का, संयुक्त संस्थाने अमेरिका इथे आयोजित होतात तर फ्लीट रिव्यु ला फिरते असते आयोजकपद. आर्मी करता असल्या अभ्यासाचा मुकुटमणी शोभावा असा एक अभ्यास असतो, इंग्लंड आर्मीने आयोजित केलेला हा कार्यक्रम, भयानक खडतर तर असतोच शिवाय तो एका सैनिकाची क्षमता, संघशक्ती, निर्णयक्षमता, फायरिंग मध्ये कौशल्य, ते फर्स्ट एड मधली कला सगळे काही तपासतो. अश्या ह्या कार्यक्रमाचे नाव आहे “द कॅंब्रियन पॅट्रोल” आता ह्या कार्यक्रमाबद्दल साद्यंत सांगायचे झाले, तर रॉयल ब्रिटीश आर्मी ह्या इंग्लिश सैन्याच्या भूदलशाखेतल्या टेरीटोरियल आर्मी मधल्या वेल्श सैनिकांनी ४० वर्षांपूर्वी सुरु केलेली एक परंपरा म्हणजे कॅमब्रियन पॅट्रोल. ह्याची रूपरेषा अतिशय साधी असते. एकूण ५५ किलोमीटरचा रूट, तो सहभागी झालेल्या देशाच्या सैन्य तुकडीने फुल कीट लोड घेऊन (अंदाजे २२ किलो माणशी) ४८ तासात कापायचा. ह्या प्रवासा दरम्यान त्यांना युद्धकैदी प्रबंधन (पिओडब्ल्यू मॅनेजमेंट), काउंटर इंसर्जन्सी ऑपरेशन, मेडिकल एव्हक्युएशन, सर्च अ‍ॅड रेस्क्यु, रेकी इत्यादी नेमून दिलेली कामे सुद्धा करावी(च) लागतात, रस्त्यात जर कुठे सामुग्री विसरली तर त्या विसरलेल्या सामुग्रीच्या बरोबरीने दगड सामानात भरून वजन कायम राखावे लागते, पण त्याने तुमच्या संघाचे मार्क कमी होतात. हा सगळा खेळ खेळला जातो तो उत्तर वेल्स, इंग्लंड मधल्या कॅंब्रियन डोंगरांत अन वेल्श दलदली भागात. म्हणूनच ह्या अभ्यासाचे नाव असते कॅंब्रियन पॅट्रोल. आजच ह्या अभ्यासाबद्दल का लिहावे वाटले ? तर आज ह्या अभ्यासात सहभागी झालेल्या भारतीय थलसेनेच्या ८व्या गोरखा रेजिमेंटच्या बटालीयन क्रमांक २ ने (२/८ गोरखा रायफल्सने) सुवर्णपदक प्राप्त केले आहे, भारत सहभागी व्हायला लागल्यापासून हे भारताचे बहुतेक तिसरे पदक असून सुवर्णपदक प्राप्त करणे म्हणजे संबंधित संघाने पूर्ण अभ्यासात ७५% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणे होय, ह्या अगोदर डोगरा रेजिमेंट ने २०१४ मध्ये अन २०११ मध्ये ह्याच अभ्यासात सुवर्णपदक मिळवून भारताची मान गर्वाने ताठ करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. चला आज आपण सगळे मिळून ह्या विश्वातल्या सर्वात कठीण युद्धाभ्यासात सर्वात अव्वल आलेल्या आपल्या सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करूयात. जय हिंद

काही क्षणचित्रे

Camb1

(करावी लागणारी कारवाई)

camb2

(गतविजेते डोगरा जवान)

camb3

(ह्यावर्षीचे सुवर्णपदक विजेते गोरखा २/८ चे जवान)

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
13322 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

अत्यंत अभिमानास्पद क्षण!

एस
Sun, 10/23/2016 - 21:25 नवीन
अत्यंत अभिमानास्पद क्षण! भारतीय जवानांना सलाम! आणि याची ओळख करून दिल्याबद्दल बापूसाहेब, तुम्हांला शतश: धन्यवाद!
  • Log in or register to post comments

+१११११ सलाम __/\__

मोदक
Sun, 10/23/2016 - 23:08 नवीन
+१११११ सलाम __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

प्रचेतस
Mon, 10/24/2016 - 08:37 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१

तुषार काळभोर
Mon, 10/24/2016 - 09:47 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+२

टुकुल
Mon, 10/24/2016 - 11:48 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+३

पिलीयन रायडर
Mon, 10/24/2016 - 20:42 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

वाहवा!

चांदणे संदीप
Sun, 10/23/2016 - 21:45 नवीन
डोगरा रेजिमेंटला जोरदार सॅल्यूट!!__/\__ Sandy
  • Log in or register to post comments

ह्या वर्षी २/८ (२ बटा ८)

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/23/2016 - 21:50 नवीन
ह्या वर्षी २/८ (२ बटा ८) गुरखा जिंकली सँडी भाय, डोग्रा २०१४ चे विनर आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

माय मिस्टेक!

चांदणे संदीप
Sun, 10/23/2016 - 22:09 नवीन
२/८ गुरखांनाही तेवढाच कडक सॅल्यूट! खरे तर भारतीय सैनिकांशी संबधित कोणती गौरवास्पद बातमी आली तर ती माझ्यासारख्या सामान्य वाचकासाठी कुठल्या एका पलटण/रेजिमेंटची कामगिरी न राहाता ओव्हरॉल इंडियन मिलीटरीचीच बहादुरी असल्यासारखी वाटते! __/\__ !! गरूड का हूँ बोल प्यारे !! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/23/2016 - 21:59 नवीन


सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८ च्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन !

ही बातमी वाचल्यावर याबद्दल काही लिहावे असे वाटत होते. थोडा उशीर झाला हेच बरे झाले. कारण, त्यामुळे ही अभिमानास्पद बातमी भारतिय संरक्षक दलाचा सदस्य असलेल्या मिपाकराच्या हस्ते इथे वाचायला मिळाली. हे जास्त सुयोग्यच झाले !

पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !

  • Log in or register to post comments

अर्रर्रर्र! मी वाचताच अधीर

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/23/2016 - 22:04 नवीन
अर्रर्रर्र! मी वाचताच अधीर होऊन लिहिले, तुम्ही systematic लिहिले असते काका, असो. आमच्या घिसाडघाईने कौतुक केल्याबद्दल आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लिहिले आहे. वर

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/23/2016 - 22:15 नवीन
मस्तं लिहिले आहे. वर लिहिल्याप्रमाणे तुम्ही लिहिणेच जास्त योग्य होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

त्याचे संस्करण केल्याबद्दल

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/23/2016 - 22:18 नवीन
त्याचे संस्करण केल्याबद्दल संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक्काकाकांशी १०० टक्के सहमत.

अभ्या..
Sun, 10/23/2016 - 23:49 नवीन
एक्काकाकांशी १०० टक्के सहमत. जगात भारी आपली आर्मी. नुसते म्हणायचे नाही तर प्रुव्ह करतात वारंवार. एकदम भारी वाटले वाचून. बादवे बापूसाब, ते पाकी दलिंदर नसतेत का असल्या ठिकाणी? नुसती काड्या करणारी आर्मी दिसते ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

२०१५ चे विनर आहेत पाकिस्तान

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 08:22 नवीन
२०१५ चे विनर आहेत पाकिस्तान आर्मी अभ्याव, ते होतात ऍक्सिडेंट कधीकधी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ज्जे ब्बात!

बोका-ए-आझम
Sun, 10/23/2016 - 22:14 नवीन
फ्लीट रिव्ह्यूबद्दल माहित होतं, पण कँब्रियन पॅट्रोलबद्दल माहिती नव्हती. त्याबद्दल धन्यवाद बापू! मिलिटरी स्पोर्टसमध्येही आपली कामगिरी वाखाणण्यासारखी आहे असं ऐकलंय. त्याबद्दल कधीतरी लिहा अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments

आपल्या सैनिकांचं अभिनंदन हे लिहायचं राहिलं.

बोका-ए-आझम
Sun, 10/23/2016 - 22:16 नवीन
आपले सैनिक तयारीच्या बाबतीत जगाला नमवू शकतात हे सिद्ध झालेलं आहे. _/\_
  • Log in or register to post comments

+१००

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/23/2016 - 23:48 नवीन
+१०० यात हे पण पाहण्यासारखे आहे की अश्या स्पर्धेत भाग घेणार्‍या अनेक विकसित देशांकडे प्रशिक्षणासाठी असलेल्या अनेक सोयी सवलती भारतिय सैन्याकडे नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांची कामगिरी अधिकच खुलून दिसते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

म्हणुनच कदाचीत...

अर्धवटराव
गुरुवार, 10/27/2016 - 21:16 नवीन
विकसित देशांकडे प्रशिक्षणासाठी असलेल्या अनेक सोयी सवलती भारतिय सैन्याकडे नाहीत.
आपली आर्मी जास्त कणखर बनायला हे ही एक अप्रत्यक्ष कारण असावे काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

केवळ शारिरीक श्रमांच्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/27/2016 - 21:28 नवीन
केवळ शारिरीक श्रमांच्या किंवा मनोबलच्या बाबतीत हे काहीसे खरे ठरू शकेल (पण, तेही खात्रीने सांगता येणार नाही. कारण शारिरीक श्रम किंवा मनोबल सर्वच गोष्टींचा उपाय असू शकत नाही). आधुनिक सुविधा नसणे ही विकसित देशांबरोबरच्या आंतरराष्ट्रिय स्तरावरच्या अभ्यासात किंवा स्पर्धांत नक्कीच मोठी अडचण असते. तयारी करताना खेळाची उत्तम साधने व सुविधा नसताना ऑलिंपिक्समध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंना जसे कठीण पडते तसेच काहीसे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

भारतीय सेनादलाचे अभिनंदन.

अन्या दातार
Sun, 10/23/2016 - 22:34 नवीन
भारतीय सेनादलाचे अभिनंदन. क्षणचित्रे अजून जरा डिट्टेलवार देता येतील का?
  • Log in or register to post comments

इथे त्या बक्षिस समारंभाचा

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/24/2016 - 01:56 नवीन
इथे त्या बक्षिस समारंभाचा व्हिडिओ व सविस्तर बातमी पाहता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

यु ट्युब वर पाकीस्तानी आर्मीने गोल्ड मिळवले असा व्हीडीओ आहे

नेत्रेश
Mon, 10/24/2016 - 02:35 नवीन
  • Log in or register to post comments

हेच

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/27/2016 - 12:53 नवीन
हेच म्हणायला आलो होतो. गेल्यावर्षी सिल्व्हर मेडल होते. डॉन या पाकी वृत्तपत्रानुसार २०१६ चे गोल्ड पण पाकलाच मिलाले आहे. जालावर रिझल्टस उपलब्ध नाहीत ना हिस्टॉरिकल डेट उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

गोरख्यांचे सुवर्णपदक

गामा पैलवान
गुरुवार, 10/27/2016 - 19:34 नवीन
इथे गुरखा बटालियन ला सुवर्णपदक मिळाल्याचे दाखवले आहे : https://www.youtube.com/watch?v=SlxiLogRgeQ गंमत म्हणजे वरील चलचित्रात गस्त ५० मैल म्हणजे ८० किमी असल्याचा उल्लेख आहे. तर पाकिस्तानी आवृत्तीत ५० किमीचा उल्लेख आहे. खरंखोटं देव जाणे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

The Cambrian Patrol is not a

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/27/2016 - 20:28 नवीन
The Cambrian Patrol is not a competition. Gold (75 percent), silver (65-74 percent) and bronze (55-64 percent) medals are awarded based on the number of points earned on completion of the gruelling course. Certificates are awarded to teams that finish with lower than 55 percent of the points. कँब्रियन पॅट्रोल ही स्पर्धा नसून सैन्याची पात्रता ठवणारा वार्षीक सराव-अभ्यास (exercise) असतो. या सराव-अभ्यासात ७५% गुण मिळविलेल्या संघाला गोल्ड मेडल दिले जाते. एकापेक्षा जास्त संघांना गोल्ड मेडल मिळू शकते किंवा कोणालाच ७५% गुण न मिळाल्यास त्या वर्षी गोल्ड मेडल दिले जात नाही. हा अतिशय खडतर अभ्यास यशस्वीपणे संपवू शकणे ही सुद्धा अभिमानाची गोष्ट समजली जाते. जगभरच्या सैन्यातल्या उत्तम सैनिकांचे गट भाग घेत असूनही दरवर्षी जवळ जवळ २०% गट हा अभ्यास पूर्ण करू शकत नाहीत. या अभ्यासातली आतापर्यंतची भारताची पदकसंख्या अशी आहे : २०१६ : सुवर्णपदक (२/८ गोरखा रायफल्स) २०१५ : रौप्य पदक (३/४ गोरखा रायफल्स) २०१४ : सुवर्णपदक (८ गढवाल रायफल्स) २०११ : सुवर्णपदक (४/९ गोरखा रायफल्स)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

वेगळे विश्व

चित्रगुप्त
Mon, 10/24/2016 - 04:45 नवीन
अगदी वेगळेच विश्व आहे हे सर्व. त्यासाठी ट्रेनिंग वगैरेही जबरदस्त असणार, त्याबद्दलही लिहावे, ही विनंती.
  • Log in or register to post comments

अभिमान वाटला.\\

प्राची अश्विनी
Mon, 10/24/2016 - 08:47 नवीन
अभिमान वाटला.\\
  • Log in or register to post comments

मनापासून

नाखु
Mon, 10/24/2016 - 08:50 नवीन
अभिनंदन.आणि इतक्या कमी सुवीधांच्या व सैन्याबद्दल गैरसमज पसरविणार्या माध्य्माचा(एकांगी बातम्या देऊन) पार्शव्भुमीवर हे यश अगदी वेगळे आणि जास्ती कौतुकास्पद आहे. सलाम त्रिवार सलाम
  • Log in or register to post comments

अभिमान वाटला.\\

प्राची अश्विनी
Mon, 10/24/2016 - 08:51 नवीन
अभिमान वाटला.\\
  • Log in or register to post comments

अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे

महासंग्राम
Mon, 10/24/2016 - 09:19 नवीन
अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे बाप्पुसा हि. सुवर्णपदक विजेत्या गोरखा २/८ च्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या ओळखीचे कोणी गोरखा जवान असतील तर त्यांना आमचा सलाम नक्कीच सांगा.. थँक्स फॉर सर्विंग नेशन !!!
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन

मनिमौ
Mon, 10/24/2016 - 09:29 नवीन
गुरखा 2/८ रेजिमेंट चे आणी लेख लिहुन ईथे आम्हाला या सरावाची माहिती दिल्याबद्दल बापु तुमचे पण आभार
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण.

आतिवास
Mon, 10/24/2016 - 10:00 नवीन
माहितीपूर्ण. प्रत्यक्ष युद्धाची स्थिती याहून कैक पटींनी खडतर असणार याबाबत शंका नाही.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अप्पा जोगळेकर
Mon, 10/24/2016 - 11:44 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

वाह. काय काटक आणि निधडे लोक

मृत्युन्जय
Mon, 10/24/2016 - 11:53 नवीन
वाह. काय काटक आणि निधडे लोक असतील हे. भारतीय सैन्याला सलाम आणि विजेत्या टीमचे भरभक्कम अभिनंदन. ही बातमी एका सैनिकाकडुन समजावी हे सुद्धा आनंददायक. बाप्पु व्यवस्थित समजावुन सांगितले आहे तुम्ही. एक्का काकांनी उत्कृष्टरीत्या लिहिले असते यात शंकाच नाही पण तुम्ही कुठेच कमी पडलेला नाहित समजावुन सांगताना. अभिनंदन आणी अभिवादन
  • Log in or register to post comments

मनःपुर्वक अभिनंदन.. गर्वाने

पुंबा
Mon, 10/24/2016 - 12:09 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन.. गर्वाने मान ताठ आणि छाती फुलून येण्याचे असंख्य क्षण या शेरदिल जवानांमुळे आपल्या निरस आयुष्यात येत असतात. त्यांना मानाचा मुजरा आणि आपल्यालासुद्धा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!! आणि थँक्स फॉर

प्रीत-मोहर
Mon, 10/24/2016 - 12:17 नवीन
अभिनंदन!!! आणि थँक्स फॉर सर्विंग थे नेशन. आमचे अभिनंदन त्यांच्यापर्यंत पोचवता आले तर पोचवाल का बापुसाहेब?
  • Log in or register to post comments

अभिमान

नि३सोलपुरकर
Mon, 10/24/2016 - 17:25 नवीन
अभिमान वाटला __/\___.
  • Log in or register to post comments

बाब्बो...लय भारी

टवाळ कार्टा
Mon, 10/24/2016 - 17:59 नवीन
बाब्बो...लय भारी
  • Log in or register to post comments

बाब्बो...लय भारी

टवाळ कार्टा
Mon, 10/24/2016 - 17:59 नवीन
बाब्बो...लय भारी
  • Log in or register to post comments

साधी रूपरेषा ?

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 19:28 नवीन
सोन्याबापु, साधी रूपरेषा म्हणजे नक्की काय? हा सराव साधाच असेल तर याला इतकं महत्त्व का? सियाचेनसारख्या महाभयानक ठिकाणी गस्त घालणाऱ्या आपल्या तुकड्यांना तुलनेने सोप्या ठिकाणी सराव करून काय सिद्ध करायचं आहे? उगीच प्रश्न पडलेत. यांतून भारतीय सैन्याचा तेजोभंग करायचा माझा अजिबात हेतू नाही. फक्त कम्ब्रियन गस्त हे भारतीय सैन्याच्या कर्तृत्वमापनाचं मानक होऊ शकतं का असा प्रश्न उपस्थित करायचा आहे. आ.न., -गा.पै. ता.क. : गस्तीचा मार्ग ८० किमी चा आहे (स्रोत:विकी)
  • Log in or register to post comments

"रूपरेषा साधी" ह्यावरच तुम्ही

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 20:39 नवीन
"रूपरेषा साधी" ह्यावरच तुम्ही अडकले असाल तर तुम्ही पुढे अन नीट वाचले नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. तरीही प्रश्न अनुत्तरीत राहू नयेत म्हणून हा प्रतिसाद प्रपंच १. साधी रूपरेषा हा प्रयोग अतिशय वेगळ्या प्रकारे वापरला आहे, म्हणजे गमतीनेच जर कोणी "साधंच काम आहे फक्त माऊंट एवरेस्ट चढायचंय" म्हणले तर त्यात जितके साधे अपेक्षित असेल इतकेच ते साधे आहे हे नोंदवतो, अशी अपेक्षा आहे की तुमच्या पहिल्या अन दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर यात मिळाले असावे. पुढे चालूयात, सियाचीन वर गस्त घालणारी फौज, त्यांची परिस्थिती वेगळी अन बाकी ड्युटीवर असणारी वेगळी, सियाचीनची तुलना त्याच्याशी किंवा कॅमब्रियन पॅट्रोल सोबत करणे कधीच संयुक्तिक ठरू शकत नाही, तसेच पूर्ण 12 लाख खडी फौज एकाचवेळी सियाचीन वर नसते हा ही मुद्दा आहे, थोड्या खाली खालच्या बॉर्डरवर असलेल्या सैन्याला ही exercise गरजेच्या असतात, युद्धाभ्यास करायला आपल्याकडेही इतर देशीय फौजा येतात, आर्मी बहुतांशी ट्रेडिशन्स वर चालते, कॅमब्रियन अभ्यास ही अशीच एक उदात्त परंपरा आहे, तश्या परंपरा बनवून चालवणे हे ही कठीण असते, मुळात मेटल लागते त्याला आयोजन ते सहभाग नोंदवायला, 67 वर्षांच्या अस्तित्वात स्वतंत्र भारताच्या फौजेने सुद्धा अश्या परंपरा सुरु करून यशस्वी रित्या चालवल्या आहेत, उदाहरणार्थ , इंडो अमेरिकन युद्धाभ्यास जे दरवर्षी होतात, भारत रशिया संयुक्त अभ्यास असलेला इंद्र सराव, अशी काही त्याची उदाहरणे आहेत, अश्याच इंग्लिश ट्रेडिशन पैकी एक म्हणजे कॅमब्रियन पॅट्रोल, आता तो तुम्हाला महत्वाचा वाटो अथवा न वाटो, जगभरातल्या लोकशाही देशांच्या फौजांत तो सराव महत्वाचा मानतात त्याला काय करता येईल असे वाटत नाही, धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अवांतर, कॅमब्रियन पॅट्रोलचा

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 20:42 नवीन
अवांतर, कॅमब्रियन पॅट्रोलचा आराखडा बदलत्या काळानुसार बदलता असतो, ८० किमी आधीच्या काळी होता,सद्ध्या त्याचे अंतर कमी असून त्याच्यात अंतर्भूत केलेल्या इतर चाचण्या जास्त असाव्यात, ४० वर्षांपूर्वीचे कॅमब्रियन सराव काही मी पाहिलेले नाहीत हे आगाऊच नोंदवतो
  • Log in or register to post comments

जबरी

चाणक्य
Mon, 10/24/2016 - 22:01 नवीन
कडक सॅल्यूट आपल्या आर्मीला. बापू, धन्यवाद ईथे बातमी दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

कस आणि मान्यता

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 22:23 नवीन
सोन्याबापु,
आता तो तुम्हाला महत्वाचा वाटो अथवा न वाटो, जगभरातल्या लोकशाही देशांच्या फौजांत तो सराव महत्वाचा मानतात त्याला काय करता येईल असे वाटत नाही,
प्रत्यक्षात कस असणं आणि त्यास मान्यता मिळणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी ब्रिटीश स्पर्धांच्या विरोधात नाही. पण मला भारतीय सैन्यासाठी भारतीय मानके बनवलेली बघायला आवडतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

बरं एकंदरीत तुम्हाला लिम्बु

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 22:26 नवीन
बरं एकंदरीत तुम्हाला लिम्बु चमचा स्पर्धेत स्वतःच भाग घेऊन स्वतःच पहिले येऊन स्वतःच स्वतःला बक्षीस देऊन स्वतःच स्वतःसाठी टाळ्या वाजवून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे असं एकंदरीत मजेशीर चित्र उभे राहिले, असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आहेच मुळी मजेशीर चित्रं

गामा पैलवान
Tue, 10/25/2016 - 01:53 नवीन
सोन्याबापु, अगदी बरोबर बोललात पहा. आहेच मुळी मजेशीर चित्रं. तसंही पाहता वसाहतवादी चौकटीतनं बाहेर पडायला मजेशीर प्रक्रिया अवलंबणं म्हणजे सोन्याहून पिवळं, नाहीका? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

सहमत

llपुण्याचे पेशवेll
Fri, 10/28/2016 - 10:55 नवीन
अगदी बरोबर बोललात पहा. आहेच मुळी मजेशीर चित्रं. तसंही पाहता वसाहतवादी चौकटीतनं बाहेर पडायला मजेशीर प्रक्रिया अवलंबणं म्हणजे सोन्याहून पिवळं, नाहीका? शतशः सहमत. सैन्यच नव्हे अन्य अनेक ठीकाणीही आपण वसाहतवादी चौकटी नाहक पाळत असतो. असो एखादी स्वाभिमानी पिढी येईल आणि बदलाला सुरवात होइल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मस्त

मराठमोळा
गुरुवार, 10/27/2016 - 04:21 नवीन
कोणत्याही जवानांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भारतीय सेनेचे विशेष स्थान पाहून आनंद झाला. त्यांचे अभिनंदन आणि माहिती दिल्याबद्दल सोन्याबापुंचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जय जवान.

अर्धवटराव
गुरुवार, 10/27/2016 - 21:34 नवीन
आहेतच मुळी आपले जवान तसे :) अभिमान वाटतो या पठ्ठ्यांचा. काहि प्रश्न १) मागे एका धाग्यात तुम्ही कमांडो ट्रेनींगचा परामर्श घेतल होता. त्या ट्रेनींगचा उपयोग नॉर्थ-ईस्ट आणि काश्मीरमधे वारंवर होतो असंही म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या पेट्रोलींग कॉम्पीटीशनचा फीडबॅक आर्मीच्या ट्रेनींग, स्ट्रॅटजी वगैरेसाठी उपयोगी पडतो का? २) आर्मी आलटुन-पालटुन प्रत्येक रेजीमेंटला अशा कॉम्पीटीशनसाठी पाठवते काय? जेणेकरुन सर्वच युनीट्स येकदम जोरदार व्हावेत? ३) पार्टीसिपेट करणारी सैन्यतुकडी खास त्या कामाकरता घडवली असते कि रँडमली सिलेक्ट करतात जवान्स ?? हि मानकं आपल्या आर्मीच्या क्षमतेला ओव्हरऑल कसे अफेक्ट करतात ? मस्ट बी इंट्रेस्टींग.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा