धोनी - ऐसी न कोई होनी
सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ .... " असे हमखास टाळ्या खेचणारे संवाद नायकाच्या मुखी बिलकुल नाहीत , असे असूनसुद्धा धोनी हा चित्रपट संपल्यावर रसिकांना हा चित्रपट एक आनंद देऊन जातो हेच याच चित्रपटाचे खरे यश आहे.
चरित्रपट असल्यामुळे नायक - खलनायक द्वंद्व वा प्रेमाचा त्रिकोण या सर्वांना थारा नाही. एम. एस . धोनी ची भूमिका सुशांत सिंग राजपूतने साकारली आहे. अनुपम खेर हे पित्याच्या भूमिकेत , भूमिका चावला बहिणीच्या भूमिकेत , दिशा पटनी पूर्व प्रेयसीच्या भूमिकेत आणि कियारा अडवाणी हि सौ धोनीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन 'बेबी ' फेम नीरज पांडे यांनी केले आहे तर उल्लेखनीय गोष्ट म्हणजे किरण मोरे यांनी या चित्रपटातून स्वतःचीच भूमिका साकारली आहे. रवींद्र मंकणी हे सुद्धा एका छोट्याश्या भूमिकेत आहेत.
चित्रपटाची सुरुवात २ एप्रिल २०११ च्या ऐतिहासिक खेळीच्या पार्श्वभूमीवर सुरु होते नि हळू हळू भूतकाळ उलगडत जातो (भाग मिल्खा भाग type,परंतु त्यासाठी अनावश्यक फोडणी दिलेली नाही). चित्रपट ३५ वर्षे मागे जात , ७ जुलै १९८१ ला थांबतो .इवलुश्या माहीच्या जन्माने उलगडत जातो , आपल्या लाडक्या महिचा जीवनपट ! शालेय जीवनातील अनेक आठवणी या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. धोनीचे शालेय जीवनातील कोच बॅनर्जी यांना धोनी कसा गवसला हा प्रसंग पाहण्यासारखा आहे , एखादया शाळेचा कोच कश्या तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी झटत असतात हे उत्कृष्ट रित्या राजेश शर्मा यांनी साकारले आहे. कोच बॅनर्जी व मेकोन अधिकारी दोवाल यांच्या तोंडचे संवाद दाद देण्यासारखे आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर - बिहार के प्लेयर नॅशनल में क्यू नही खेलते ? या प्रश्नावरील उत्तर मार्मिक आहे. तर कोच साहेब पालकांना समजावतांना म्हणतात कि परीक्षेला दोन महिने बाकी आहेत यावर त्यांना उत्तर मिळते, हो ! दोनच महिने बाकी आहेत !. “हर सक्सेसफूल आदमी के पीछे औरत का हात होता है” असे ऐकून असालच ! पण हर सक्सेसफूल माणसाच्या पाठीमागे अनेकदा त्याच्या निस्वार्थी मित्रांचा हात असतो. रॉयल स्टॅग च्या जाहिरातीतून दिसलेले धोनीचे मित्र व त्यांच्या दोस्तीच्या कथा सुद्धा या चित्रपटात उत्तम रित्या सादर करण्यात आल्या आहेत. BAS स्पॉन्सरशीप असो का ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट असे अनेक प्रसंग सच्च्या दोस्तांची झलक दर्शवतात.
रेल्वेत TTE ची नोकरी धोनी करत होता हे सर्वांना माहित असेलच ! पण काही हितशत्रूंमुळे त्याला हि नोकरी सोडावी लागते व तेथूनच धोनी सर्व लक्ष्य क्रिकेटवर केंद्रित करतो. रणजी सामन्यात युवराज शी झालेली नजरानजर म्हणा वा सोबतीला असणारे अनेक खेळाडू राष्ट्रीय संघात खेळूनही आपले नशीब का खुलत नाही या सर्व प्रसंगातील विविध छटा सुशांत राजपूतने चांगल्या रित्या निभावल्या आहेत. धोनीची टीशर्टच्या बाह्या वर करण्याची लकब वा विंनिंग शॉट मारल्यावर बॅट फिरवण्याची लकब त्याने अचूकरीत्या साधली आहे. मुलीच्या सांगण्यावरून विमानात सचिनची स्वाक्षरी घेण्याचा प्रसंग असो वा हॉटेलात ओळखपत्र मागण्याचा प्रसंग दिग्दर्शकाने फार छान रित्या साकारले आहेत. कर्णधार पदी असतांना वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याचा निर्णय असो वा धोनीचे पुतळे जाळण्याचा , कोणत्याही प्रसंगातून अतिशयोक्ती वाटत नाही.
धोनीने स्वतः या चित्रपटासाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. या चित्रपटासाठी धोनीने दिग्दर्शकाला एक सल्ला दिला होता असे ऐकिवात आहे कि " मला चित्रपटात स्टार म्हणून नको तर एक खेळाडू म्हणून दाखव ! नि हा सल्ला दिग्दर्शकाने तंतोतंत पाळला आहे.
या चित्रपटात अनेक यादगार सामन्यांचे वास्तविक प्रसंग दाखवण्यात आलेत. २००७ चा वर्ल्ड कप , पाकिस्तान दौरा , मुशर्रफांचा हेअर कट बद्दलचा सल्ला इ . यादी मोठी आहे . आधुनिक तंत्राच्या साह्याय्याने धोनीच्या जागी सुशांतला दाखवण्याची किमया लीलया साधली आहे. चित्रपटाची लांबी थोडी मोठी आहे पण तरीही कुठे संथ होत नाही.
चरित्रपट कसा असावा तर असा ! वास्तवतेशी जराही तडजोड न करता पात्राच्या काळी -पांढरी बाजू उत्तमरीत्या या चित्रपटात रंगवण्यात आल्या आहेत. सध्या एक दोन वर्षांत आलेल्या उथळ चरित्रपटांपेक्षा हा चित्रपट फारच उजवा आहे. ह्या चित्रपटाची कल्पना धोनीच्या व्यवस्थापकाची होती. एका लहानग्याला मार्दर्शन करतांना पाहून व्यवस्थपकाला चित्रपटाची कल्पना सुचली नि अथक मेहनतीनंतर ती प्रत्यक्षात आली.
का पाहावा - सुशांतच्या उत्तम अभिनय नि पाँडेचे उत्तम दिग्दर्शन. धोनीच्या चरित्रपटासाठी केलेले उत्तम संशोधन यांस दाद म्हणून. real लाइफ, reel लाइफ मध्ये कसे दाखवावे याचा हा चित्रपट उत्तम परिपाठ आहे.
विशेष नोंद - दिशा पटनी !!!! looks bright future for her !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चित्रपटाची ओळख आवडली. पुढील
चित्रपट पाहिला. छान झाला आहे.
थांबा ओ आमच्या तेंडुलकरचा
धोनी नि तेंडुलकर शी तुलना होऊ
धोनी चांगला फलंदाज हाहाहाहा..
धोनी चांगला फलंदाज हाहाहाहा..
साहेब, कशाला तुलना करताय?
आपका हुकूम सर-आँखोंपर सायबा :
बाकी काही नाही विशेष नोंद आवडली
शीर्षक कोडी घालत नाही पण
सिनेमाचा पहिला भाग उत्तम जमला
रच्याकने धोनी हा भारताचा
अंहं
धोनी __/\__
धोनी - ऐसी न कोई होनी
छान..
सुंदर.
धोनीच्या भावाचा उल्लेख नाहीये
सहमत
धोनी हा मैदानावर म्हणा व
दोनदा बघितला
आभार.
आणखीन
चित्रपट आवडला...
चित्रपट पाहिला. पूर्वार्ध