Skip to main content

घोसाळ्याची (पारोश्यांची) भजी

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 18/10/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
या मोसमात मुबलक प्रमाणात ही भाजी बाजारात दिसते. याची चिंचगुळाची भाजी, दह्यातले भरीत होतेच, पण भजी म्हणजे अहाहा!!!! bhaji साहित्यः दोन पारोशी, तीन वाट्या बेसन, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा ओवा, दोन चमचे तिखट, मीठ, तेल तळणीसाठी. bhaji कृती: पारोशी धुवून त्याच्या गोल चकत्या करून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. मीठाची चव आली पाहिजे पाण्याला. आता या पाण्यात चकत्या बुडवून ठेवा. एका खोलगट भांड्यात बेसन, रवा, तिखट, मीठ एकत्र करा. ओवा अगदी थोडा भरड करून घ्या. पिठात मिसळा.पाणी घाला. पिठाची चव बघून लागेल तसे तिखट, मीठ वाढवा. आता चकत्या चाळणीवर काढा. पाणी निघून जाऊ द्या. कढईत तेल तापत ठेवा. चकत्या पिठात बुडवून तळून घ्या. रव्यामुळे कुरकुरीत होतात भजी, सोडा किंवा तेल घालायची गरज नाही. bhaji मस्त कुरकुरीत भजी तयार आहेत!! bhaji आता वाट का पाहताय? करा सुरूवात!! पण जरा जपून, नाहीतर कांदाभजीसारखी खायला जाल आणि तोंड भाजेल!! ही काही नविन पाकृ नव्हे....फक्त आठवण...केली नसाल तर लगेच करा!!

वाचने 13056
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

भजी, ह्या भारतवारीत खायलाच हवीत, :) आजोळी घोसाळी,तोंडलीच्या वेलाचा मांडव होता. दिवाळीच्या सुटीत हमखास घोसाळ्याच्या भज्यांचा प्रोग्राम असायचा त्याची आठवण आणि भज्यांची चव दोन्ही ताजे झाले. स्वाती

हे मी आधीच लिहिलय!! फोडी करून वाफवून घेऊन त्यावर तूपाची मिरच्या, जिरे आणि हिंग अशी फोडणी द्या आणि मीठ, साखर, दही घाला. झाले भरीत!!

उम्मम्मम्म!!! स्लर्प स्लर्प स्लर्प!!! अवर्णनीय प्रमाणात आवडतात मला.... घोसाळ्याची भजी > बटाटा भजी > सिंह्गड ष्टाईल खेकडा भजी > पालक भजी > गोल भजी

अरे देवा! असे फोटू टाकल्याने पाकृ करण्याची सक्ती होते. घोसाळी मिळतील असे वाटत नाही पण दुसर्‍या प्रकारातली भजी करायला हरकत नाही.

य्या हू.. काय योगायोग पण! थंडीचे दिवस हे , अन् घोसाळ्याची ही भजी थंडीचे दिवस हे , अन् घोसाळ्याची ही भजी अत्ताच खाल्ली केलेली घरी, अशीच ताजी ताजी! काय जबरा लागतायत! सांजेला भाजी आणाया ग्येलू आनी बायकूनी बगितल्या बगितल्या घेतली... आनी क्येली अत्ताच गरम

चूक ! भजी म्हणजे अहाहा!!!! नाsssही (रागावलेली स्मायली) घोसाळ्याची भजी म्हणजे अहाहा!!!! अहाहा!!!! अहाहा!!!!

आयला म्हणले घोसाळी म्हणजे काय भाजी असेल बुआ? हे तर आमच्याकडले गिलके! मंदार भालेराव साहेब, सचुभाऊ, डांगे अण्णा, बोक्याभाऊ, ह्यांनाही बहुदा हा व्होकेबलरी प्रॉब्लेम आला असावा असे वाटते! =)) गिलक्याचे भजे म्हणजे एकदम हिट आयटम आमच्याकडला, पण घरगुती हॉटेल मध्ये नाही :) अनन्याजी तुमचे आभार नॉस्टॅल्जीया बद्दल :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी दोनेकदा गिलके नाहीत, घोसाळी आहेत, आस ऐकुन परत गेलेलो ;)

गिलक्यांची भाजी, भिजवलेली मुगाची डाळ घालून मस्त लागते. भजी तर त्याहून मस्त. सहज घरच्या (मोठ्या) कुंडीतही गिलक्यांचा वेल घरच्या घरी लावता येतो. ताजी ताजी गिलकी आणि ताजी ताजी भजी लै भारी लागतात.

मस्त दिसतायत भजी.... ! आता करून खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही. अगं कोकणात 'पारोशी' तर घाटावर घोसाळ्यांना 'गिलकी' म्हणतात.

सणासुदीच्या दिवसातली भजी! कांदा चालत नाही मग गिलकी घालुन करणार, पण खाणार!!