या मोसमात मुबलक प्रमाणात ही भाजी बाजारात दिसते. याची चिंचगुळाची भाजी, दह्यातले भरीत होतेच, पण भजी म्हणजे अहाहा!!!!
साहित्यः
दोन पारोशी, तीन वाट्या बेसन, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा ओवा, दोन चमचे तिखट, मीठ, तेल तळणीसाठी.
कृती:
पारोशी धुवून त्याच्या गोल चकत्या करून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. मीठाची चव आली पाहिजे पाण्याला. आता या पाण्यात चकत्या बुडवून ठेवा. एका खोलगट भांड्यात बेसन, रवा, तिखट, मीठ एकत्र करा. ओवा अगदी थोडा भरड करून घ्या. पिठात मिसळा.पाणी घाला. पिठाची चव बघून लागेल तसे तिखट, मीठ वाढवा. आता चकत्या चाळणीवर काढा. पाणी निघून जाऊ द्या. कढईत तेल तापत ठेवा. चकत्या पिठात बुडवून तळून घ्या. रव्यामुळे कुरकुरीत होतात भजी, सोडा किंवा तेल घालायची गरज नाही.
मस्त कुरकुरीत भजी तयार आहेत!!
आता वाट का पाहताय? करा सुरूवात!! पण जरा जपून, नाहीतर कांदाभजीसारखी खायला जाल आणि तोंड भाजेल!!
ही काही नविन पाकृ नव्हे....फक्त आठवण...केली नसाल तर लगेच करा!!
वाचने
13056
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान, पण फार जुनी आणि साधी
ही घ्या.
In reply to छान, पण फार जुनी आणि साधी by विजय पिंपळापुरे
आवडती
ही काही नविन पाकृ नव्हे....फक्त आठवण...केली नसाल तर लगेच करा!!
घोसाळ्यची भजी!!!!
अरे देवा! असे फोटू टाकल्याने
मला भाजी जास्त आवडते
मला भाजी जास्त आवडते
य्या हू.. काय योगायोग पण!
वा मस्तच!
चूक !
आधी कळेचना काय चुकले?
In reply to चूक ! by डॉ सुहास म्हात्रे
नेहमी खाते, एकदम चविष्ट
आयला म्हणले घोसाळी म्हणजे काय
बराबर बापु
In reply to आयला म्हणले घोसाळी म्हणजे काय by कैलासवासी सोन्याबापु
हो हे नाव मला माहित नव्हते!
अप्रतिम.
एक नंबर.. भजी तशीही आवडतात :)
.
मस्त दिसतायत भजी.... ! आता
खास
गणपतीमध्ये वर्षानुवर्ष घरी
तोंडाला पाणी सुटलं....
न आवडणारे कमी असावेत!