पुराणातल्या वांग्याचे भरीत

कच्चा माल
------------------------------------
ही पाककृती मला आपल्या मिपावरचे मित्र मृत्युंजय यांनी सुचवली आहे.
झणझणीत आणि एकदम खमंग अशी ही पाकृ आहे.
पुराणांना पाहून नेहमी नाक मुरडणारे विजुभाऊ आणि निळ्याभाऊ हेदेखील आवडीने खातील.
मृत्युंजयाचे मनापासून आभार...

साहित्यः
एक भलंमोठं महाभारताचं वांगं
२-३ निवडक कौरव-पांडव (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ व्यास- वैशंपायन- जनमेजय वगैरे (कोरड्या उपेक्षेने खरपूस भाजून घ्यावेत)
एक मध्यम कर्ण (सोलून)
एक आख्खा कृष्ण (लीलांसकट)
१ नवा येडपट आयडी (खास इन्ग्रेडियंन्ट!!)
काड्या - आपापल्या वृत्तीनुसार (आणि संपादकांच्या टॉलरन्सनुसार!!)

कृती:
प्रथम महाभारताच्या वांग्याला फाटे फोडून आणि त्यावर असत्याचे आणि अवास्तवतेचे वार करून कुशंकेच्या चुलीत चांगले भाजून घ्यावे.
कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)
कौरव पांडवांना व्यवस्थित मॅश करून घ्यावे
खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत
हा मॅश आणि ठेचा त्या सालं काढलेल्या कर्णावर दाबून बसवावा.
एका कढईत असहिष्णु श्रद्धेचे तेल चांगले कडकडीत तापवून त्यात महाभागवताची मस्त फोडणी करावी.
त्यात वरील सर्व मिक्श्चर घालून ढवळावे
वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे
टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहे
आस्वाद घेऊन पिडांकाकांना धन्यवाद द्यावेत!!
smiley

नोटः मूळ मिपावरच्या कृतीत शल्य, अश्वत्थ्यामा वगैरे घालत नाहीत. पण जर आवडत (आणि पचत) असेल तर अवश्य घालावेत.
नाणं: सदर पाककृती ही महाभारतकालीन वांग्याची असल्याने फोटो देता येत नाहीत. तरी मागू नयेत.

प्रतिक्रिया

smileysmileysmiley

केवळ गतप्राण !!

कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)
smileysmiley
अरे काही दया-माया !!

कौरव पांडवांना व्यवस्थित मॅश करून घ्यावे >>>>

अगगगग्ग्ग्ग्ग !! पिडाकाका मस्त पैंकी , दुर्योधन, दुशासन, भीम, अर्जुन व ईतर मंडळी ला एकेक करून, मोठ्या भांड्यात , हाताने शिजलेल्या बटाट्याला करतात, तसे मॅश करीत आहेत असे चित्र दिसले smiley

वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे
टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहे >>>
smileysmiley

खल्लास, खायच कशाबरोबर ? रामायणाची चपाती, की ऋग्वेदाचा भात आणि चवीला मनुस्मृती घ्यायची की उपनिषद smiley

आस्वाद घेऊन पिडांकाकांना धन्यवाद द्यावेत!! >>.

धन्याचे वाद्स ओ काका

सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )

अगदी अगदी!!
सुहास एकदम सहमत १००%.

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

>>वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे>>

१००% सहमत smiley

छानचं जमलयं smiley

***************************************************************
People Who Love To Eat Are Always The Best People - Julia Child
***************************************************************
http://delectable-delicious.blogspot.com/

+१.
एक सुचना : शक्यतो वांग्यातील शकुनीचा काटा न काढता भाजावे अन्यथा भरीताच्या ऐवजी श्रीखंड होण्याची शक्यता आहे.

॥ स्नेहेषु बलानि ॥

स्वाती डांबिश यांची दुसरी हुच्च पाकृ आवडली!!

उत्खनन प्रेमींसाठी पहिली येथे

हँ - तुमां मॉडर्नऽ लोकांचे फटिंगाचे फ्यूजन हे...

दूषण आणिक खर ते रामायणातल्या कांडण्यातून म्हाभार्ताच्या भर्तात कित्याक घातले रे डांबिसां!

आमगेल्या पारंपरिक म्हाभार्ती भर्तात शल्ये घालतात, दूषणे न्हत.

तू आमगेलोच हळदोळो डांबीस म्हणून इल्लेशे खाऊन पळयले. बरे झणझणले. तरी फुडल्या फावटे परंपरा सांबाळून राव.

मेलो !!!! smiley

....बबलु

कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)

इथे कृतीत थोडी शंका आहे. बाहेरचं कवच म्हणजे साल का कवचाच्या आत जो पापुद्रा असतो ती साल?

बाकी पाकृ अगदी आवडली. पण इतरही काही शंका आहेत. यात किती कुपोषण होते? डोक्याला पुरेसा व्यायाम होतो का मंडई होते?

अदिती
Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध
-- स्वाक्षरी सल्लागार कार्यकर्ते यांच्याकडून प्रीअप्रूव्ह्ड

आम्हाला तुमच्या श्रद्धेच्या तेलाची अ‍ॅलर्जी आहे.. तेल न घालता ही पाककृती करता येईल का? तेला ऐवजी आम्ही निष्ठुरतेचं बटर वापरलं तर चालेलं का? का विवेकबुद्धीच्या ओव्हनमध्ये बेक केलं तर चांगलं लागेल? smiley

आणि हो, त्या कुशंकेच्या चुलीपेक्षा हलकटपणाच्या गॅसवर भाजून घेतलं तर चवीत फरक पडेल का?

पुराणतल्या वांग्याच्या भरताचा प्रेमी. smiley

(अवांतरः हहपुवा!)

-Nile

झणझणीत आणि एकदम खमंग!!
अजून असे यावे.

-निनाद

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त...!http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-754.gif बस नाम ही काफि है। smiley

उत्तम, आधी प्रात्यक्षिक आणि नंतर थेअरी असे पहिल्यांदाच पाहिले,

http://harshad-gaaanikha.blogspot.com/

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

पीडांकाकांनी दिलेल्या या लज्जतदार पाककृतीमुळे तोंपासु.

फक्त काही सूचना
*झणझणीतपणा हवा असेल तर दुर्योधन, दु:शासन असे कौरव वापरावेत.
*पदार्थ पुरवठ्याला येण्यासाठी मोठ्या आकाराचा भीम वापरावा.
*शल्य जास्त वेळ वापरल्यास किंचित कडसर लागतो.
*काहीजण जातीयतेचा रंग वापरतात. त्यामुळे पदार्थ भडक दिसतो.

सावंतवाडीकडे निव्वळ कर्ण वापरुन तडका देण्याची पद्धत आहे. देसाईवाडीची पद्धत साधारणतः अशीच आहे. ओक गल्लीने एकटा भीम वापरला आहे. कर्वेनगर स्टाईलमध्ये प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजून घेतातच, शिवाय आणखीही काही घटक पदार्थांचे मिश्रण करतात. हरदासपूर पद्धत थोडी गुळमट मसालेदार असते.
अर्थात ज्यांना सरळसोट पाककृती हवी असते ते पारंपरिक व्यास महानगर पद्धतीचाच अवलंब करतात.

हे पाकृ चं विडंबन किंवा विडंबनाची पाकृ जे काय आहे ते फर्मास जमलंय! शिवाय सजावटीसाठी कोकणी खवचटपणा सढळहस्ते वापरल्यामुळे पाकृ चविष्ट होणार याची ग्यारंटी!

आता इथे महाभारत शोधणे आले!

o ज्योति कामत o

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||

ह्येच म्हणतो....... smiley

____________________________________________________

I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

smileysmileysmiley

मस्तच आहे! यावरून एक आवडीचे गाणे आठवले... बाकी कर्ण हा महाभारतकालीन सूर्यपुत्र होता म्हणून अंमळ डांबीस असावा असे आमचे व्यक्तीगत मत आहे. smiley

खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत

एक (मिपाच्या वतीने) डिसक्लेमर : ह्या नावाचे जर आयडी असले, तयार झाले तर त्यांना केवळ प्रतिक्रीयेद्वारे प्रतिकात्मकच ठेचून घ्या, खरे नको, smiley

>>>>एक भलंमोठं महाभारताचं वांगं
२-३ निवडक कौरव-पांडव (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ व्यास- वैशंपायन- जनमेजय वगैरे (कोरड्या उपेक्षेने खरपूस भाजून घ्यावेत)
एक मध्यम कर्ण (सोलून)
एक आख्खा कृष्ण (लीलांसकट)
१ नवा येडपट आयडी (खास इन्ग्रेडियंन्ट!!)
काड्या - आपापल्या वृत्तीनुसार (आणि संपादकांच्या टॉलरन्सनुसार!!)

एवढं साहित्य म्हणजे चवीला 'ब्येक्कार' असणार ह्याची फुल्ल ग्यारंटी. कसेही करा. smiley

बाकी पिवळ्या डांबिस तै....

कालच केले होते हे महाभारतकालीन भरीत. अर्थात, थोडा बदल केला तो म्हणजे येडपट आयडी ऐवजी ठाकूरची फोडणी दिली. आणि मरायला टेकलेला अमिताभ घातला होता. असो.

चव वेगळी आणि चांगली झाली होती. गब्बरच्या डायलॉगचे प्रमाण जरा वाढविले तर चालेल (माझ्या वैयक्तिक आवडीनुसार) असे जाणवले. (बसंतीला 'नुसताच' नाचायला सांगणारा 'अबला- अबलात्कारी' गब्बर खलनायक कसा असं? )

काही ठिकाणी भरीतात सोनवणींचा अश्वत्थामा वापरतात, ते भरीतही करून पाहिले पाहिजे.
जे मी नेहमी करतो ते म्हणजे, खरपुस भाजलेल्या वांग्याच्या गरात बारीक चिरुन विज्ञान, सोकॉल्ड वैज्ञानिक, दुर्बिणी, गुर्जी, एक अर्धवट नीलपक्षी घालून श्रद्धा अंधश्रद्देची फोडणी द्यायची. ते जास्त आवडते. पण अर्थात, इतर चवीही चाखायला आवडतात.

________________________________________________________________
अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि,
सदा मे समत्वं न मुक्तिर्नबंधः चिदानंदरुप शिवोSहं शिवोSहं

सर्वात पहिल्यांदा हे सांगतो की "माझा या विषयात अभ्यास नाही"
त्यामुळे प्यारेशी सहमत ! smiley

मदनबाण.....
जलतरंग :- रंजना प्रधान {मी आत्ता पर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर जलतरंग वादन }

अरे रे तै नाही काका आहेत!!!

बाकी पिवळ्या डांबिस तै....
प्यारे १, काका आहेत ते...
बाकी सुलेशबाबू, फर्मास हो पाकृ...
स्वाती

सर्वप्रथम काकांना शि.सा.न.

@प्यारे१: काका आणि तै असं कॉम्बिनेशन नैय्ये काई; ते मास्तर अन् ताई असं आहे. तुमच्यासारख्या जाणत्या माणसान आसं लिवायचं काय प्रयोजन? smiley

.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...

काका आणि तै असं कॉम्बिनेशन नैय्ये काई; ते मास्तर अन् ताई असं आहे.
हेच मनात आलं अगदी,
स्वाती

हे पहा, आज मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की मुद्दा आहे नी मुद्द्याभोवतीचेच मुद्दे आपण मांडण्याचा मुद्दा प्रामुख्यानं पुढं आणण्याचाच मुद्दा अपेक्षित आहे.... थोडक्यात भरकटवू नका चर्चा. smiley

-प्यारेश वागळे (आय बी यन्न रास्कला-आपलं -आपलंच मत. smiley )

________________________________________________________________
अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि,
सदा मे समत्वं न मुक्तिर्नबंधः चिदानंदरुप शिवोSहं शिवोSहं

उभा महाराष्ट्र तुमच लिखाण बसून वाचतोय smiley

(पण तुम्ही परत बसायला लागलात अशी शंका येत आहे)

-बसायला नेहमीच तयार असणारा-

.......................................................................
मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही...

काका मला भरीत नुसतेपण खायला जाम आवडते.

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

भन्नाट भरताची पाकृ एकदम परफेक्ट!
ताटात वाढताना मात्र स्वतःच्या अफाट (आणि अचाट) वाचनाच्या जाहिरातीचे गार्निशिंग करायला विसरू नये. smiley

ठ्यॉ.................. smiley

smileysmiley
चविष्ट पाककृती

पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|

पु.ल.. नी वंग चित्रे मध्ये एक खुमासदार पाकृ दिली आहे त्याची आठवण झाली.
हे भरित वाचून संपलो.

- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.

फर्माSSSSSSSSSस डाम्बिस दा ! बाकी कुठल्या पाकृ मुळे नाही तरी हे भरीत खाऊन नक्कीच ( हसून हसून )अजीर्ण होणार ब्वा !

॥ स्नेहेषु बलानि ॥

__/\__

पिडांकाका दंडवत हो.

बाकी,

खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत

च्या ऐवजी
'खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत. ह्यात बरेचसे लोक शल्य देखील घालतात, पण मला इथे मिळाला नाही म्हणून मी वैशंपायन वापरला' असे वाक्य करा बघू.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

क ह र!

'खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत. ह्यात बरेचसे लोक शल्य देखील घालतात, पण मला इथे मिळाला नाही म्हणून मी वैशंपायन वापरला' असे वाक्य करा बघू.

या सूचनेस पर्याय नाही!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand

.

We are who we are!

क ... ह.. र

--मनोबा
"The last Christian died on the cross".

__________//////////\\\\\\\\\\__________

बिपिन कार्यकर्ते

पिंडाकाका फटु दिले असते तर एकुण पदार्थाचा अंदाज आला असता.
कृतीवरुन तरी किमान १००-१५० वेळा लाळ गळेल असा अंदाज आहे. smiley

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

डांबिसराव फॉर्मात.

"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे

थोडं झणझणीत व्हायला वर हिडिंबेचा कीस टाकला तर चालेल का ?

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे! smiley

या सुडक्याला कुणितरी दंडकारण्यात सोडून या रे हिडिंबेचा कीस आणायला.... smiley

बाकी आता इथे 'खराखुरा यडपट आय डी' शोधणे आले.
हल्ली शिळेच आय डी नव्याचे येड पांघरुन येतात!

========================
"देवा, मला पाव."
"देवा, मला बटरपण!"
-माउ

हेहेहेहे "की" नक्की दीर्घच आहे कि र्‍हस्व smileysmiley

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

र्‍हस्व की दीर्घ ते ज्याने त्याने ठरवावं.

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे! smiley

आम्ही महाभारत खात नसल्याने हीच पाकृ रामायण घालून कशी करता येइल ??

==============================

कपिलमुनी उवाच :

बापरे......ही पाकक्रुती आजच कळली. smiley

पण पिडांकाका, साहित्य कोणत्या वाण्याकडे मिळेल तेही प्लीज सांगा ना.... ते आणले की भरीत करून लगेच फडशा पाडण्यात येईल. smiley

=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=

" I'm not a HANDSOME guy, but I can give my HAND-TO-SOME one who needs help. Beauty is in heart, not in face." ----- Dr. A. P. J. Abdul Kalam.

___/\___

एकदम झणझणीत पाककृती सांगितलीये पिडांकाकांनी... काही पदार्थ 'इण्डियन स्टोअरमधे' शोधायला लागतील पण या विकांताला नक्की करून बघणार.

*रटाळ, टुकार विडंबनांच्या गर्दीत अगदी जोरदार विडंबन*

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

*रटाळ, टुकार विडंबनांच्या गर्दीत अगदी जोरदार विडंबन*

जुनी खोडं कंपूतली आहेत म्हणून त्यांनी केलेल्या कुठल्याही विडंबनाला चान चान म्हणायच आणि नविन लोकांनी केलेल्य विडंबनांना मात्र नाकं मुरडायची.

नविन लोकांनी भारंभार विडंबनं टाकली असतील पण याचा अर्थ असा नाही की रटाळ, टुकार आहेत. तीदेखील लोकप्रिय आहेत.
उगा नुसती टुकार कंपूबाजी करण्यात काहीच अर्थ नाही.

मी कुठल्याही चांगल्या लेखनाला (ते विडंबन असो की स्वतंत्र रचना) चांगले आणि रटाळ लेखनाला रटाळच म्हणेन. त्यात कोण्या कंपूचा किंवा त्या लेखक आयडीचासुद्धा काही संबंध नाही.

तुम्हीच कंपूचा विषय काढलात म्हणून सांगते की इतरांच्या तुलनेत मी इथे बरीच नवीन आहे आणि कदाचित पिडांकाका मला ओळखतही नसतील. मी मात्र त्यांच्या लेखनामुळे त्यांच्या 'पिवळा डांबिस' या आयडीला ओळखते. माझ्या सारख्या नवीन व्यक्तीला तुम्ही त्यांच्या कंपूत(?) सामिल केलं त्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
त्यातही जर हे वर लिहिलेलं विडंबन मला रटाळ वाटलं असतं तर मी इथे येवून प्रतिसाद देण्याचे कष्टही घेतले नसते.

माझ्याकरता हा विषय इथेच संपला आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

@ती देखील लोकप्रिय आहेत.
उगा नुसती टुकार कंपूबाजी करण्यात काहीच अर्थ नाही. >>> ज्जे बात....!
कंपूबाजी मुर्दाबाद... smiley

पिशाच्चसेना झिंदाबाद

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्त...!http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-754.gif बस नाम ही काफि है। smiley

कुंतीची फोडणी काय विसरले म्हणे?

परदेशात फोडण्या वैग्रे करायला बंदी असते म्हणे. शेजार-पाजारचे खटले भरतात आणि मुख्य म्हणजे घर विकायला काढले तर मसाल्यांच्या वासाने भरलेले घर विकले जात नाही असे मिपावरती वाचल्याचे स्मरते.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

_____/\_______ !!!!!!

आद्य आचार्य पिडांकाकाची ही पाककृती सिद्ध होताना राजापुरी पंचा नेसून हातभार लावला जाईलऽ! विशेषत: पाकसिद्धी होताना जाळ लावण्याचे काम हिरीरीने केले जाईल smiley

-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।

वापर केलेला दिसत नाही. (का सकाळी सकाळी माझी कॉफी कमी पडते आहे ?..)

हे म्हणजे मसाला किंवा मिठ विसरल्या सारखं वाटतं आहे. असल्या पाकृ मधे खरा ष्टार येडपट आयडीच असतो असं आपलं मत बनलं आहे.

पाकृ मस्त आहे पण एकदा "तांबडा-पांढरा समानतेचा" रस्सा पण येऊ दे. सोबतीला कॉकटेल आहेच!

-(फक्त हादडणारा) एक

मी पुण्यातला वांग्याचे भरीत असे वाचले. आणि खालील मजकूर वेगळाच.इदेयाची कल्पना भारी.

एका कढईत असहिष्णु श्रद्धेचे तेल चांगले कडकडीत तापवून त्यात महाभागवताची मस्त फोडणी करावी.
त्यात वरील सर्व मिक्श्चर घालून ढवळावे
वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे
टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहे

खी: खी: खी:

तशी पाकृ सोपी वाटते आहे. ह्या वीकांताला नक्की करून पाहीन smiley

थोडक्यात चुकलं.
या पाकृ चं पण वरती चांगलं भरीत (विथ कंपू मसाले) होऊ घातलं होतं. आम्ही एका आयडी (तोच तो पाकृ मधे उल्लेख केलेला) वरती विसंबून पण राहिलो. ताज्या भरतासाठी लंचची ऑर्डर कॅन्सल केली.

पण तेल तापायच्या आधीच गॅस बंद केला. जाउ दे. जाऊन ग्रोनोला बार खावा.

-भुकेलेला एक

भारीच मसालेदार आहे पाकृ.

भारी !!!!!

देवा सादर दंडवत. ___/\___

पाकृतीत द्रौपदीचा मसाला टाकल्यास पाकृ अजुन खमंग होइल. smiley ही पाकृ द्रौपदीच्या थाळीतचे पेश करावी नाहितर पचत नाही म्हणतात. smiley

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

लाय्य्य भारी..

मज्जा आली..

___________________________________________________

___/\___

||अरूणाचल शिव||

ही सर्व पाककृती त्या बल्लवाचार्य भीमाकडूनच करुन घ्या आणि शेवटी द्या त्याला ढकलून कढईमधे!!!

स्वाक्षरी: लता आणि आशा यांचा आवाज, हा माझ्या जगण्याचा श्वास आहे.

या वरुन एक पीजे आठवला.
रामाचे रामफळ..सीतेचे सीताफळ तर
भरताचे काय?
भरताचे.....वांगे

लेख आवडला...