"हो ना गं आई....."
अंधाराची भीती मज वाटे
तरी मी ते कुणा न सांगे
तुला ही मी ते सांगत नाही
कदर तुझी करीतो मी आई
माहित आहे तुला सर्व काही
हो ना गं आई........
गर्दीमधे मला नको सोडून जाऊं
घराकडे आई कसा मी परत येऊं
दूर दूर मला नको असा पाठवूं
सांग कसा मी तुला मग आठवूं
एव्हडा व्रात्य असेन का मी
हो का गं आई.........
बाबा देती कधी उंच उंच हिंदोळे झुल्यावरी
गं आई
नयन माझे तुला शोधिती वाटे तू त्या थांबविशी
गं आई
नाही सांगत मी त्यांना परि मी मनात गोंधळून जाई
गं आई
चर्या माझी दिसत नाही परि मनोमनी हबकतो मी
गं आई
ठाऊक आहे तुला सर्व काही
हो ना गं आई......
नेत्र माझे मूक होती जिव्हा माझी निःशब्द होई
नसती कसल्या वेदना नाही राहिल्या भावना
ठाऊक आहे तुला सर्व काही
हो ना गं आई......
एव्हडा व्रात्य असेन का मी
हो का गं आई.........
श्रीकृष्ण सामंत
वाचने
2776
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर,
सुंदर, सत्विक भावानुवाद!
तात्या.
+१
In reply to सुंदर, by विसोबा खेचर
हेच म्हणतो !
छान अनुवाद आहे !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
+२
In reply to +१ by दशानन
मस्त
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
+३
In reply to +२ by अवलिया
सहज आणी सुंदर !!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
+४ जियो सांमत काका
In reply to +३ by अनिल हटेला
एकदम हळुवार भावानुवाद
मस्त झकास
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
श्रीकृष्णजी, बहुत बढीया! जीयो!
संजय अभ्यंकर
https://smabhyan.blogspot.com/
छान आहे हा
:)
छान आहे हा भावानुवाद.
अरे... इसारलंय... मालवणीतसुन बोलुचा चल्लाहा ना माजा...!
भाऊनू, झ्याक!
मस्त जमलाय
मस्त जमलाय भवानुवाद
मस्त जमलाय
मस्त जमलाय भवानुवाद
१+
In reply to मस्त जमलाय by शंकरराव
सहमत. :)
खुप छान
खुप छान
छान जमलाय
छान जमलाय भावानुवाद...
"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
आभार
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com