Skip to main content

असा ही एक भावानुवाद "हो ना गं आई"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 06/02/2009 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हो ना गं आई....." अंधाराची भीती मज वाटे तरी मी ते कुणा न सांगे तुला ही मी ते सांगत नाही कदर तुझी करीतो मी आई माहित आहे तुला सर्व काही हो ना गं आई........ गर्दीमधे मला नको सोडून जाऊं घराकडे आई कसा मी परत येऊं दूर दूर मला नको असा पाठवूं सांग कसा मी तुला मग आठवूं एव्हडा व्रात्य असेन का मी हो का गं आई......... बाबा देती कधी उंच उंच हिंदोळे झुल्यावरी गं आई नयन माझे तुला शोधिती वाटे तू त्या थांबविशी गं आई नाही सांगत मी त्यांना परि मी मनात गोंधळून जाई गं आई चर्या माझी दिसत नाही परि मनोमनी हबकतो मी गं आई ठाऊक आहे तुला सर्व काही हो ना गं आई...... नेत्र माझे मूक होती जिव्हा माझी निःशब्द होई नसती कसल्या वेदना नाही राहिल्या भावना ठाऊक आहे तुला सर्व काही हो ना गं आई...... एव्हडा व्रात्य असेन का मी हो का गं आई......... श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2764
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by विसोबा खेचर

हेच म्हणतो ! छान अनुवाद आहे ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by अवलिया

सहज आणी सुंदर !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

एकदम हळुवार भावानुवाद मस्त झकास ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.

:) छान आहे हा भावानुवाद. अरे... इसारलंय... मालवणीतसुन बोलुचा चल्लाहा ना माजा...! भाऊनू, झ्याक!