नमस्कार...
कालच मी इथे "
मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे"
ह्या नावाचा लेख (?) वाचला... हिंदू धर्माचा, हिंदू इतिहासाचा, काडीचाही अभ्यास नसताना उगाच आपण कोणी खूप थोर विचारवंत वगैरे आहोत आणि माझ्या मताने हा देश बदलणार आहे असा सूर वाटला (अर्थात मी चुकीचा असेनही). त्या संदर्भात हे माझे चिंतन...
"मला असं वाटतं कि धर्मनिरपेक्षता ही अत्यंत निरर्थक गोष्ट आहे जी कधीच वास्तवात उतरू शकत नाही... कधीच नाही" हे वाक्य मी खूप जबाबदारीने बोलत वा लिहीत आहे. मुळात पूर्ण जगात धर्मनिरपेक्ष व्यवस्था कोठे असेल का ही माझ्या मनात शंका आहे.. सर्व शक्तिमान राष्ट्रेसुद्धा स्वतःला ख्रिश्चनराष्ट्रे म्हणवतात. हिंसक राष्ट्रे आणि तेलकट राष्ट्रे स्वतःला इस्लामी राष्ट्रे म्हणवतात. उरलो नेपाळ आणि आपण. नेपाळ आपल्या महाराष्ट्रापेक्षाही छोटा.. बाकी ते बाली आणि मौरिशस आहेत पण ते लिंबूटिम्बु.... उरलो आपणच... आपल्यालाच का सेक्युलर व्हायची घाई? मुळात सेक्युलर हाही शब्द मूळ घटनेत नाही... नंतर टाकला गेला (४२ वी घटनादुरुस्ती). मुळात मलातरी सध्याच्या परिस्थितीत सेक्युलर हा शब्द हिंदूंविरोधीही असाच घेतला जातो असं वाटतं. म्हणून मी ह्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे (कोण्याही धर्माच्या नाही)
तरी बरं धर्मनिरपेक्षता आणि विकास ह्याचा काडीचाही संबंध नाही... (असल्यास उदाहरणासहित दाखवावा) म्हणून मला हिंदू धर्माची बाजू घ्यावी वाटते... कारण नं १
१९४७ नंतर बाबासाहेबांना हिंदू कोड बिल आणायचं होतं, जे फक्त हिंदूंनाच लागू होणार होतं.. (म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख वगैरे वगैरे). सर्वांनी विरोध केला... कारण फक्त हिंदूच का... सर्वांनाच लागू करा... पण बाबासाहेबांना फक्त हिंदू समाजाची काळजी होती, (मुस्लिमांची नव्हती बहुतेक). बाबासाहेब एव्हढे आग्रही होते ह्या बिलाबद्दल कि त्यांनी स्वतः ह्या बिलाबद्दल असं म्हटलं होतं कि, जर कोणी त्यांना विचारलं कि त्यांचं भारत देशाप्रती त्यांचं सगळ्यात स्पृहणीय कार्य कुठलं तर मी सांगेन कि हिंदू कोड बिल म्हणून... पण राजेंद्रप्रसादांनी विरोध केला, राजीनामा द्यायची धमकी दिली. नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं उगी राजकीय अस्थिरता नको म्हणून नेहरूंनी ते पुढे ढकललं... नंतरच्य निवडणुकीत पुन्हा अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच आलं. आणि नंतरच्या काळात हे हिंदू कोड बिल चार भागात विभागून लागू करण्यात आलं. १.हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डीयनशिप ऍक्ट ३. हिंदू एडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आणि ४.हिंदू सकशेशन ऍक्ट असे ते चार ऍक्टस... हिंदू समाज खूप सुधारला. त्यातल्यात्यात हिंदू स्त्रियांच्या परिस्थितीत खूप चांगला आणि अमूलाग्र बदल घडवला ह्या बिलाने.... ह्यात कुठलाच वाद नाही... अगदी मान्य... पण फक्त हिंदू समाजच का? आणि इतर समाजासाठी तरतूद केल्यासारखी दाखवणे म्हणजे कलम ४४, भारतीय राज्यघटनेचे (वादग्रस्त युनिफॉर्म सिव्हिल कोड)... पुढच्या सरकारांवर ही जबाबदारी टाकली गेली... खरंतर आधीच ते शक्य होतं... कारण एकतर काँग्रेस ला पर्याय नव्हता... आणि बरेच कट्टर आणि धर्मान्ध मुस्लिम जिनांमागे पाकिस्तानात गेले होते... तेंव्हाच जर मुस्लिमांसाठी सुद्धा हे बिल लागू केलं असतं तर??? त्यांचं वाईट झालं असतं? ते तसं नं करण्यामुळे त्त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढली. आणि आज त्यांच्या खर्चाचा बोजा आपण टॅक्स भरून उचलत आहोत... तेंव्हा हे बिल सर्व धर्मांना नं लागू करून त्यावेळेसच्या सरकारनं ह्या देशाचं सर्वार्थानं आणि अपरिमित, कधीही भरून नं निघणारं नुकसान केलं आहे. दरवेळेस सुधारण्याचा आणि इतरांची घाण काढण्याचा मक्ता हिंदूंनीच का घ्या बुवा??? कारण नं २
मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर.... कारण नं ३
भारताच्या घटनेत कलम २९ आणि ३० मायनॉरिटीला काही विशेष अधिकार देतात त्यांची संस्कृती अबाधित आणि जपली जावी म्हणून. तोच न्याय जर जगाला लावला तर हिंदू हेही अल्पसंख्यांकच आहेत.. तर आम्ही जर आमची संस्कृती जपायला सुरु केलं तर इतरांच्या पोटात का दुखावं?? आणि सेक्युलरीझमच्या नावाखाली हिंदुधर्माचा (अर्थात कोणत्याही धर्माचा) बळी देणे चुकीचे आहे असं मला वाटतं. कारण ४
मी जर माझ्याच घरावर टीका करत असेन, सतत इतरांच्या घराकडे दुर्लक्ष करत आणि तीच जर कसोटी असेल माझ्या निरपेक्षतेची तर ह्या असल्या निरपेक्षतेला आपण मधलं बोट दाखवतो, आणि तेही शेणात बुडवून... हिंदूंच्या बाबतीत हे असंच होत आलेलं आहे. हिंदूंवर टीका करणारे इतर धर्माच्या बाबतीत सोयीस्कर मौन पाळतात.. (अर्थात जे मुळात चुकीचं आहे त्याचं कधीच समर्थन होत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही) निरपेक्ष लोकांनी सर्व बाजू लक्षात घ्याव्यात.. तसं नं करता उठसुठ हिंदू धर्माचं पायपुसणं करण्याच्या आपण विरोधात आहे. कारण ५
दहशतवाद आणि इस्लाम ह्यात काहीच संबंध नाही. दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाऱयांनीच "हिंदू दहशतवाद" किंवा "भगवा दहशतवाद" ही संज्ञा रूढ केली, कुठलाही पुरावा नसताना. आजही ते प्रकरण खितपत पडलंय.. आणि ना शेंडा ना बुडखा... काही कुत्र्यांच्या छत्र्या "भगव्या दहशतवादाच्या" नावानं बॉम्ब मारत आपल्या पोळ्या शेकून घेत असतात.. आणि त्यांचा टी आर पी वाढवून घेत असतात. कारण ६
माझ्या धर्माने कधीही धर्मप्रसारासाठी कोणावर आक्रमण वा अत्याचार केल्याचे ऐकिवात नाही. कोणी ह्याच्यामागची कितीही कारणे द्यावीत तरी होय माझा धर्म सर्वात सहिष्णू आहे. मग माझ्या ह्या धर्मावर कोणी कसलीही माहिती नसताना किंवा अगदीच जुजबी माहिती असताना टीका केल्यावर माझं रक्त पेटतं... कारण ७
माझ्या धर्मात काही अनिष्ट रूढी, प्रथा आहेत. त्यांचं समर्थन मी अजिब्बात करत नाही. त्या नक्कीच काढून टाकल्या पाहिजेत. पण त्या काढून टाकताना हिंदू समाज विचारात घेतला जावा. हिंदू धर्म नाही. कारण धर्म हा रूढी आणि परंपरा ह्यापासून बर्याचदा वेगळा असतो. त्या काढून टाकल्यामुळे हिंदू धर्माला काहीच अडचण नसते. कायदा हा लवचिकच असावा. त्याप्रमाणे धर्म पण लवचिकच असावा ह्या मताचा मी आहे. काळानुसार बदल व्हावेच. ज्याप्रमाणे आपल्या घटनेमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळा घटनादुरुस्ती झालीये. पण ती करताना कधीही घटनेवर टीका करत झालेली नाही. हिंदू धर्माच्या बाबतीत मात्र असे होताना दिसत नाही. काही अनिष्ट प्रथेमुळे पूर्ण हिंदू धर्माला जाणूनबुजून लांच्छन दिले जाते. ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण ८
सध्यातरी एव्हढीच कारणे... अजून सापडल्यास टाकेन अजून...
बाकी तथाकथित पुरोगाम्यांचे स्वागत...
वाचने
21584
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचं स्वागत आहे
In reply to मै कूच बोलू क्या? ;) by संदीप डांगे
अर्थहीनभाऊ,
In reply to तुमचं स्वागत आहे by अर्थहीन
तुम्हा पुरोगाम्यांना हेच हवं
In reply to अर्थहीनभाऊ, by संदीप डांगे
प्रसिद्धी ची भूक हो फक्त!
In reply to तुम्हा पुरोगाम्यांना हेच हवं by सतिश गावडे
माणूस
जात आणि धर्म हवेतच कशाला.
In reply to माणूस by तिमा
=))
In reply to जात आणि धर्म हवेतच कशाला. by सतिश गावडे
बाSSSSSबोSSSSS
In reply to जात आणि धर्म हवेतच कशाला. by सतिश गावडे
जगातील सर्व मानव समूहाचा
In reply to बाSSSSSबोSSSSS by वटवट
संदीप डांगे,
या विषयावरील दोन धागे बघून
काढा.
In reply to या विषयावरील दोन धागे बघून by श्रीगुरुजी
हॅट लेको, मांझ्या प्रतिसादाला
सोप्पेय ते
In reply to हॅट लेको, मांझ्या प्रतिसादाला by संदीप डांगे
एक लक्षात आलं का ....
In reply to सोप्पेय ते by शाम भागवत
तत्सम
In reply to एक लक्षात आलं का .... by गामा पैलवान
तुम्ही हिंदू धर्म नाही हे
मि हिंदु आहे आणी त्यातील दलित
आता मी जर ह्यावर स्पष्टीकरण
In reply to मि हिंदु आहे आणी त्यातील दलित by प्रतापराव
... असा कसा अर्थ काढणार ?
In reply to आता मी जर ह्यावर स्पष्टीकरण by वटवट
जाउ द्या हो chitraa.आम्हाला
In reply to ... असा कसा अर्थ काढणार ? by chitraa
दलितेतर हिंदु म्हणजे
आम्हिही हिंदु आहोत जरी
मला विषय भरकटवायचा नाही ...
In reply to आम्हिही हिंदु आहोत जरी by प्रतापराव
आजून एक कारण ....
लेखक महोदयांनी विषय भरकटवू
In reply to आजून एक कारण .... by गामा पैलवान
तुमच्या प्रतिसादाचे मुद्देसूद खंडन ....
In reply to लेखक महोदयांनी विषय भरकटवू by संदीप डांगे
गरजा? सध्या फक्त लेखविषयाशी
In reply to तुमच्या प्रतिसादाचे मुद्देसूद खंडन .... by गामा पैलवान
कुणाच्या घाटावर कुणाचे धुणे
In reply to गरजा? सध्या फक्त लेखविषयाशी by संदीप डांगे
असो.
In reply to कुणाच्या घाटावर कुणाचे धुणे by गामा पैलवान
पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न