✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Tue, 10/11/2016 - 08:50  ·  लेख
लेख
"काल दुसरं डिबेट झालं.हिलरी चवदा पॉइन्ट्सने दुस‍र्‍यांदा जिंकली. २००५ मधे खासगीत ट्रम्प जे व्हिडीयोवर स्त्रींयाबद्दल(हलकट,चावट) बोलला होता, तो व्हिडीयो डिबेटच्यापूर्वी ऐनवेळी सर्व देशात टिव्हीवर उघडपणे दाखवला गेला. डिबेटमधे त्याबद्दल त्याला प्रथम माफी मागावी लागली.हिलरीने त्याला डिबेटमधल्या तिच्या भाषणात शाल-जोडीतले जोडे योग्य प्रकारे दिले म्हणा. आणि ट्रम्पच शेवटी हिलरीबद्दल बोलला, "She doesn’t quit. She doesn’t give up. I respect that. I tell it like it is. She’s a fighter." म्हणजेच ती दूर्गा आहे असंच त्याला म्हणायचं होतं.होय ना रे भाऊ? "होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता." "त्यामानाने अमेरिकन स्त्रीया जरा बावळटच आहेत नाही का रे भाऊ?" "तसं नव्हे रे, आपल्या भारतीय स्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या फाल्तूगीरी चालवून घेणार नाहीत.इमिग्रेशनमुळे निरनीराळ्या संस्काराच्या स्त्रीया इकडे आहेत.त्यामुळे इकडच्या स्त्रीयांचे संस्कार निराळे आहेत.त्या आता निवडणूकीत त्याला धडा शिकावतील.७२ टक्के स्त्रीया अगोदरच डॉनाल्डच्या विरोधात गेल्या आहेत असं ऐकतो." श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
20208 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

आपण अमेरिकेचे नागरिक आहेत का?

हेमन्त वाघे
Tue, 10/11/2016 - 09:59 नवीन
आपण अमेरिकेचे नागरिक आहेत का? ( मतदान करू शणारे )
  • Log in or register to post comments

होय

श्रीकृष्ण सामंत
Wed, 10/12/2016 - 07:07 नवीन
होय,मी अमेरिकन सिटीझन आहे.बिल क्लिन्टनच्या निवडणूकी पासून मी मतदानात भाग घेत आलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

अमेरिकेची सुरक्षा

गामा पैलवान
Wed, 10/12/2016 - 11:45 नवीन
श्रीकृष्ण सामंत, तुम्ही अमेरिकी नागरिक आहात म्हणजे अमेरिकी घटनेला बांधील आहात. मग भ्रष्ट हिलरीने आणि तिच्या महाभ्रष्ट नवऱ्याने अमेरिकी सुरक्षेची केलेली वाताहात तुम्हाला दिसंत नाही? की जाणूनबुजूनदुर्लक्ष करताय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

सूर्याजी पिसाळ

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/13/2016 - 07:34 नवीन
"तुम्ही अमेरिकी नागरिक आहात म्हणजे अमेरिकी घटनेला बांधील आहात" निस्सन्देह मग भ्रष्ट हिलरीने............ मला वाटतं आपले हे बे-छूट आरोप आहेत.अमेरिकेची सुरक्षता इतकी फाल्तू नाही.आणि अमेरिकन नागरिक,मग तो कुणीही नागरिक असो,देशाला गहाण ठेवणार नाही.प्रेसिडेंटच्या पदावरचा तर नाहीच नाही.इथे सूर्याजीपिसाळ अजूनतरी जन्माला आलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

साफ चूक हो काका!

यशोधरा
गुरुवार, 10/13/2016 - 07:47 नवीन
इथे सूर्याजीपिसाळ अजूनतरी जन्माला आलेले नाहीत.
Please don't be so sure Kaka. :) घ्या अमेरिकन सूर्याजी पिसाळांची लिस्ट. एडवर्ड स्नोडन. रॉबर्ट हॅन्सन. आझम द अमेरिकन (Adam Yahiye Gadahn) जुलिअस आणि एथेल रोझेनबर्ग जॉन वॉकर , ज्यु. बेनेडिक्ट अर्नॉल्ड सद्ध्या इतकी पुरेत, मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

साफ चूक हो काका

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/13/2016 - 11:08 नवीन
यशोधराताईस, घ्या अमेरिकन सूर्याजी पिसाळांची लिस्ट. वगैरे सूर्याजी पिसाळ म्हणजेच Traitor अशा अर्थाने सर्व साधारण समज असल्याने आपण जी लिस्ट दिली आहे ती मलाही माहित आहे.गुगल करून मी ही ती मोठ्ठी लिस्ट पाहिलेली होती. आपल्या प्रयत्नाबद्दल आपले आभार. पण खरा अर्थ सूर्याजी पिसाळ म्हणजे, ’साम्राज्याला राजकीय विरोध करणारी व्यक्ती" ती सूर्याजी पिसाळ असा आहे. "सूर्याजी पिसाळ आपल्या राजकीय कारकिर्दीत मोगलांच्या पक्षात सामील झाला. आणि मोगलांच्या राजकीय धोरणांना अनुसरत शिवाजीच्या वाढत्या मराठा साम्राज्याला त्याने राजकीय विरोध केला." अशी व्यक्ती ती सूर्याजी पिसाळ म्हणून खर्‍या अर्थाने समजली जाते. कुठचाही, "अमेरिकन नागरिक,मग तो कुणीही नागरिक असो,देशाला गहाण ठेवणार नाही.प्रेसिडेंटच्या पदावरचा तर नाहीच नाही." ह्या अनुषंगाने मी त्या व्यक्तीला "सूर्याजी पिसाळ" असं संबोधल होतं.आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रेसिडेंटसकट कुणाही राजकीय नागरीकाने साम्राज्याशी गद्दारी केलेली नाही असा त्याचा अर्थ आहे.("भ्रष्ट हिलरी,भ्रष्ट तिचा नवरा" ह्या लिहीण्यावर.) आपण दिलेली लिस्ट ही स्पाईझ,म्हणजेच स्वतःच्या आर्थीक स्वार्थासाठी देशाची गद्दारी केलेले लोक होते. आपल्या माहितीसाठी सांगतो, मात्र एडवर्ड स्नोडन हा स्पाय आहे असं बर्‍याच अमेरिकनना वाटत नाही.फक्त ओबामा सरकारला वाटतो.सरकारची लुच्चेगीरी उघड करण्यासाठी आणि नागरिकाना जागृत करण्यासाठी व्हिसल-बोअर होण्याचं काम त्याने केलं.स्वसंरक्षणासाठी तो रशियात पळून गेला आणि त्याला रशियाने आधारही दिला.पण तो स्पाय नव्हता असं बरेच अमेरिकन नागरिक समजतात.असो. स्पष्टीकरण थोडं लांबलं.बद्द्ल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

काका, तुमचा अट्टाहासच असला तर

यशोधरा
गुरुवार, 10/13/2016 - 11:12 नवीन
काका, तुमचा अट्टाहासच असला तर असूदेत बापडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

आणि सूर्याजी पिसाळ ह्या

यशोधरा
गुरुवार, 10/13/2016 - 11:20 नवीन
आणि सूर्याजी पिसाळ ह्या शब्दसमूहाच्या तुमच्या अर्थानुसार हा एक सूर्याजी पिसाळ -Aaron Burr - अमेरिकन वाईस प्रेसिडेंट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

यशो तै... एकदा "दुर्गा"

मदनबाण
गुरुवार, 10/13/2016 - 11:30 नवीन
यशो तै... एकदा "दुर्गा" म्हंटले ना ? मग झालं तर ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India can’t ban Chinese products but individuals can decide not to buy: Manohar Parrikar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अमेरिकेत जर

नाखु
गुरुवार, 10/13/2016 - 14:31 नवीन
दुर्गा उत्सव होणार असेल तर मिपावरच्या (अमेरिका स्थित) नास्तींकाचे कसे होणार ते अमेरिकेला श्या देनार का नेहमीप्रमाणे भारताने अम्रिका बिघडवली असे म्हणन्नार.

या इंडीयात सगळं कसं वाईट्ट आणि अंधश्रद्दाच यू नो

अश्या कळपाच्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. बाकी सल्ल्याबाबत बाणाशी सहमत आहे,मैय्या मान्य करून टाका एकदा दुर्गा म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मैय्या मान्य करून टाका एकदा

यशोधरा
गुरुवार, 10/13/2016 - 14:37 नवीन
मैय्या मान्य करून टाका एकदा दुर्गा म्हणून.
नाय, नो, नेव्हर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दुर्गा कोल्ड कॉफी म्हण मैय्या

अभ्या..
गुरुवार, 10/13/2016 - 14:47 नवीन
दुर्गा कोल्ड कॉफी म्हण मैय्या काय बिघडते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सूर्याजी पिसाळ

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/14/2016 - 07:31 नवीन
हा एक सूर्याजी पिसाळ -Aaron Burr - अमेरिकन वाईस प्रेसिडेंट. यशोधराताई, आपण लिहीतां ते खरं नाही हो!आपण सरळ Aaron Burr - अमेरिकन वाईस प्रेसिडेंटला सूर्याजी पिसाळ म्हणून टाकलंत. माझा कसलाच अट्टाहास नाही.फक्त हे वाचा. Historians Nancy Isenberg and Andrew Burstein write that Burr: was not guilty of treason, nor was he ever convicted, because there was no evidence, not one credible piece of testimony, and the star witness for the prosecution had to admit that he had doctored a letter implicating Burr.[51] आणि माझं खरं नाही वाटत तर कृपया ही लिंक वाचावी... https://en.wikipedia.org/wiki/Aaron_Burr
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओके काका. ठीक आहे, वाचते.

यशोधरा
Fri, 10/14/2016 - 07:54 नवीन
ओके काका. ठीक आहे, वाचते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

उंदराला मांजर साक्षी?

गामा पैलवान
Fri, 10/14/2016 - 12:50 नवीन
श्रीकृष्ण सामंत, आयसेनबर्ग या आडनावावरून अंदाज बांधला की उंदराला मांजर साक्षी! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

कॉन्फेड्रेट्स कोण होते??

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/13/2016 - 14:21 नवीन
कॉन्फेड्रेट्स कोण होते??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

घ्या अमेरिकन सूर्याजी

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/13/2016 - 14:28 नवीन
घ्या अमेरिकन सूर्याजी पिसाळांची लिस्ट.
या यादीत नोएम चोस्कीला टाकता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खिक्क, असे वाटत असेल तर झापडे

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/13/2016 - 10:09 नवीन
खिक्क, असे वाटत असेल तर झापडे बंद केली आहेत तुम्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

ह्याह्याह्या.

सतिश गावडे
Tue, 10/11/2016 - 22:01 नवीन
ह्याह्याह्या. आपल्याकडे भाष्यकार ग्रंथावर टीका करताना, प्रवचनकार ओवीवर निरुपण करताना, किर्तनकार पुर्वरंगाचा अभंग खुलवून सांगताना मुळ साहीत्यकृतीच्या निर्मात्याला अभिप्रेत नसलेला अर्थ जसा श्रोत्यांच्या कानावर फेकतात तसे झाले हे.
  • Log in or register to post comments

चान चान

कपिलमुनी
Tue, 10/11/2016 - 22:43 नवीन
बर्मंगठ्ठीव्का
  • Log in or register to post comments

काका, कबुली वगैरे काही नव्हती

पिलीयन रायडर
Tue, 10/11/2016 - 23:10 नवीन
काका, कबुली वगैरे काही नव्हती ती. शेवटी प्रश्न विचारला की "तुम्हाला तुमच्या विरोधकामधला कोणता गुण प्रशंसनीय वाटतो" त्याला उत्तर दिलं त्याने. हिलरीनेही असंच काही बाही उत्तर दिलंच. ट्रम्प मुर्खच आहे, त्यात वाद नाही. पण हिलरीसुद्धा काही धुतल्या तांदुळासारखी नाही..
  • Log in or register to post comments

काय की?

श्रीकृष्ण सामंत
Wed, 10/12/2016 - 09:06 नवीन
"ट्रम्प मुर्खच आहे, त्यात वाद नाही. पण हिलरीसुद्धा काही धुतल्या तांदुळासारखी नाही." तीस वर्ष राजकारणात राहून आणि ते सुद्धा एका बाईने आणि ते सुद्धा अमेरिकेतल्या राजकारणात,जिथे टुम्पसारखे बहुतांश पुरूष (तिचा नवरा धरून), बाई ही एक मजा करण्याची वस्तू आहे, असं मनोमनी समजतात अशा ठिकाणी आणि अशा पुरूषांशी दोन हात करायची पाळी आल्यावर "धुत्तल्या तांदळासारखं" रहाणं महा कठीण आहे.तिच्याकडून चांगल्या गोष्टी झाल्या आहेत हे कधीच कुणी हायलाईट करत नाहीत.स्त्रीयांच हिलरीची जास्त अवहेलना करतात असं दिसून येतं.हे जलसी म्हणून नव्हे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हिलरी "दुर्गा" आहे अशी डॉनाल्ड ट्रम्पचीच कबुली.

जयन्त बा शिम्पि
Wed, 10/12/2016 - 00:21 नवीन
हिलरी क्लिंटन ने ट्रंपबद्दल काहीतरी चांगले बोलण्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना , त्याच्या मुलांबद्दल चांगले उद्गार काढले.
  • Log in or register to post comments

सामांत काका हिलरी सारखी

मदनबाण
Wed, 10/12/2016 - 09:54 नवीन
सामांत काका हिलरी सारखी पाताळयंत्री,खोटारडी आणि युद्धखोरीला पोसणारे व्यक्तिमत्व असणारी स्त्री असुन तिची तुलना दुर्गा देवीशी करावी ? हा तर दुर्गा देवीचा घोर अपमान झाला ! तिला हवे तर शुर्पणखा / पुतना इं इं इं काहीही,म्हणा. "होय तर,अरे ट्रम्प जे व्हिडीयोवर स्रींयाबद्दल बोलला,ते जर एखादा भारतातला नेता निवडणूकीत स्त्रींयाबद्दल बोलला असता तर भारतीय स्रीयांनी मोर्चा काढला असत्ता, त्याला रस्त्यावर आणून त्याची दिंड काढली असती आणि जाहिर माफी मागायला लावली असती.आणि निवडणूकीत त्याला धडा शिकवला असता." हँहँहँ... मोनिका लेविंस्की ची तुम्हाला आठवण आली नाही का ? याच हिलरी बाईचा पतीदेव क्लिंटन मजा मारत होता ना ? तसेही क्लिंटन असल्या उध्योगांसाठीच प्रसिद्ध पावले ना ? ज्या राष्ट्राला व्यभिचारी राष्ट्राधक्ष चालतो तिथे ट्रंप्म ने नुसते उद्गार काढले तरी आज तिकडच्या जनतेला नितिमत्तेची चाड निर्माण होते काय ? बरं जे शब्द ट्रंप्म यांनी उच्चरले आहेत अगदी त्या शब्दाच्यांच अर्थाची कॄती बिल क्लिंटन यांनी एका एअर हॉस्टेस बरोबर केली आहे हे आपणास ठावुक आहे का ? याचा व्हिडियो तू-नळीवर उपलब्ध आहे. याच बरोबर हिलरीची ऑडियो टेप सुद्धा आहे, भुतकाळात वकिली करताना एका रेपिस्टचा खटला चालवताना या हिलरी ने काय उद्गार काढले आहेत ते जरा पडताळुन पहा ! बाकी अमेरिकन मिडिया आणि हिलरी यांचे सख्य लिक्स मधुन बाहेर आले आहेत तेव्हा हिलरीचा तुम्ही जयजयकार करत आहात यात नवलं वाटले नाही, झापडं उघडुन आणि ते काय म्हणतात ते मीठाची { इथे मुठभर चालेल } चिमटी टाकुन तिच्या यशोगाथा वाचाव्यात ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
  • Log in or register to post comments

सामांत काका हिलरी सारखी

गंम्बा
Wed, 10/12/2016 - 11:55 नवीन
सामांत काका हिलरी सारखी पाताळयंत्री,खोटारडी आणि युद्धखोरीला पोसणारे व्यक्तिमत्व असणारी स्त्री असुन तिची तुलना दुर्गा देवीशी करावी ? हा तर दुर्गा देवीचा घोर अपमान झाला ! तिला हवे तर शुर्पणखा
सहमत. अतिशय वाईट बाई आहे हिलरी. पण अमेरीकी जनतेला पॉलिटीकली करेक्ट रहाण्याचे जे वेड लागले आहे ते बघता तिच निवडुन येणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सगळी यंत्राणा तिच्या मदतीला

मदनबाण
Wed, 10/12/2016 - 12:05 नवीन
सगळी यंत्राणा तिच्या मदतीला आहे, फंड देणारे , मिडिया , वॉलस्ट्रीट इंइंइं... ट्रंप्म यांना नविन वादग्रस्त विधाने करुन तरी प्रकाश झोतात राहता येइल का ? असा विचार येत असावा ! देव अमेरिकेच्या बुडत्या नावे चे रक्षण करो ! आमेन ! आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा

अंमळ लय झाला आहे.

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 10/13/2016 - 08:07 नवीन
सामांत काका हिलरी सारखी पाताळयंत्री,खोटारडी आणि युद्धखोरीला पोसणारे व्यक्तिमत्व असणारी स्त्री असुन तिची तुलना दुर्गा देवीशी करावी ? हा तर दुर्गा देवीचा घोर अपमान झाला ! तिला हवे तर शुर्पणखा / पुतना इं इं इं काहीही,म्हणा. नऊ नव्हेंबर २०१६ची वाट पहावी लागेल.अमेरिकन जनता दूर्गेलाच निवडून देईल. "पुतण्याला" नाही. हिलरीचा तुम्ही जयजयकार करत आहात...झापडं, मिठाची चिमटी....यशोगाथा ...वगैरे वगैरे अहो,मी आपल्या विचाराचा सन्मान करतो.पण आपल्यासारखाच माझा विचार असावा हा आपला अट्टाहास अंमळ लय झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अमेरिकन जनता दूर्गेलाच निवडून

मदनबाण
गुरुवार, 10/13/2016 - 10:59 नवीन
अमेरिकन जनता दूर्गेलाच निवडून देईल. क्रुकेड हिलरी जिंकली तर अर्थातच नवल वाटणार नाही ! आम्हाला ना क्रुकेड हिलरी बद्धल ममत्व आहे ना ट्रप्म बद्धल फक्त या दोघांन मध्ये ट्रंप्म हिलरी इतका करप्ट नक्कीच नाही हे या घडीला तरी नक्कीच माहित आहे ! मी आपल्या विचाराचा सन्मान करतो.पण आपल्यासारखाच माझा विचार असावा हा आपला अट्टाहास अंमळ लय झाला आहे. मी फक्त सत्य आणि वस्तुस्थिती काय आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न केला, आपणास आपले विचार प्रकट करण्याचे आणि "योग्य" व्यक्तिला मत ध्यायचे स्वातंत्र्य आहेच... जाता जाता :-

किंवा https://www.youtube.com/watch?v=wK2K5v5bm0Q मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India can’t ban Chinese products but individuals can decide not to buy: Manohar Parrikar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

ट्रम्प मरतय एकुण असे दिसते.

मृत्युन्जय
Wed, 10/12/2016 - 10:52 नवीन
ट्रम्प मरतय एकुण असे दिसते. त्याचे निवडुन येण्याचे चांसेस कमी झाले आहेत. दुर्दैवाने यावेळेस अमेरिकेला २ अयोग्य उमेद्वारांमधुन एक निवडायचा आहे. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाला अयोग्य आहे असे माझे तरी वैयक्तिक मत आहे. अर्थात माझ्झ्या मताला न्युयोर्क मुनिस्पाल्टीच्या गटारातल्या उंदरांच्या राज्यात सुद्धा महत्व नाही ही गोष्ट वेगळी. पण क्लिंटन अमेरिकेच्या बाई राष्ट्राध्यक्ष होणे भारतीयांसाठी काही फार चांगले नसेल हे खरे.
  • Log in or register to post comments

दुर्दैवाने यावेळेस अमेरिकेला

चिनार
Wed, 10/12/2016 - 11:25 नवीन
दुर्दैवाने यावेळेस अमेरिकेला २ अयोग्य उमेद्वारांमधुन एक निवडायचा आहे.
सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ते आमच्या भागात

नाखु
Wed, 10/12/2016 - 12:26 नवीन
नगरसेवक पदासाठी गेली १०-१२ वर्षे चालू आहे. नक्की कोण महामस्तवाल तेच कळेना. नाटोवर ठाम असलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

तुमच्या वक्तव्यावरून तुमचा

चिनार
Wed, 10/12/2016 - 13:55 नवीन
तुमच्या वक्तव्यावरून तुमचा प्रभाग कोणता हे ओळखावं म्हटलं तर एकदम चार-पाचशे प्रभाग डोळ्यासमोर येऊन गेले राव..:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

थोडक्यात, कोणत्या चोराला आपण

खटपट्या
Wed, 10/12/2016 - 21:15 नवीन
थोडक्यात, कोणत्या चोराला आपण लूटायची परवानगी द्यायची ते ठरवतो आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

..... क्लिंटन बाई अमेरिकेच्या

मृत्युन्जय
Wed, 10/12/2016 - 10:52 नवीन
..... क्लिंटन बाई अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होणे.... असे वाचावे
  • Log in or register to post comments

हिलरी बै मला जर 'गिरण कार्ड'

महासंग्राम
Wed, 10/12/2016 - 12:00 नवीन
हिलरी बै मला जर 'गिरण कार्ड' देत तर मी पण मोर्चा काढीन त्यांच्या साठी बॉं !!!
  • Log in or register to post comments

कोण आलं तर मॅक स्वस्त होतील?

अभ्या..
Wed, 10/12/2016 - 12:43 नवीन
कोण आलं तर मॅक स्वस्त होतील?
  • Log in or register to post comments

ख्या!!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 10/12/2016 - 13:49 नवीन
मॅक स्वस्त होण्यासाठी रुप्या मजबुत करा लागन न भो! अ‍ॅपल काय सोस्त नाय करत मॅकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आपला एक जवळचा मानुस

चिनार
Wed, 10/12/2016 - 13:58 नवीन
आपला एक जवळचा मानुस याप्पलमंदी ज्वाईन व्हनार हाय लवकरच..त्येच्याकडून काय सेटींग लागते का पायतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कोण हो कोण?

बोका-ए-आझम
Wed, 10/12/2016 - 15:30 नवीन
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

+११

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 10/17/2016 - 13:56 नवीन
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कोथरूड-कर्वेनगर सह वेगळा

महासंग्राम
Fri, 10/21/2016 - 09:39 नवीन
कोथरूड-कर्वेनगर सह वेगळा विदर्भ झालाच पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

बावा तुमीच माये दोस्त ....

महासंग्राम
Wed, 10/12/2016 - 15:41 नवीन
बावा तुमीच माये दोस्त ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

हो हो.. त्यांना १० की १५ %

रुपी
Wed, 10/12/2016 - 23:46 नवीन
हो हो.. त्यांना १० की १५ % डिस्कौंट मिळतो म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

ओहो, अगदी हुच्चभ्रू प्रतिसाद

महासंग्राम
Wed, 10/12/2016 - 16:23 नवीन
ओहो, अगदी हुच्चभ्रू प्रतिसाद ... अमेरिकेचे भावी नेतृत्व आणि मॅक चे भाव : एक परस्पर कारण संबंध या विषयावर आपणासोबत एक वेळ बसून चर्चा करावी लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चालेल. त्यानंतर चर्चेतून काही

अभ्या..
Wed, 10/12/2016 - 16:59 नवीन
चालेल. त्यानंतर चर्चेतून काही निष्पन्न न झाल्यास 'काही फायदातोटा/सहभाग नसताना आपण अशी चर्चा करावी का?' ह्या विषयावर चर्चेला लगेच बसू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

थांबा ना बे पोट्टेहो..निस्ता

चिनार
Wed, 10/12/2016 - 16:01 नवीन
थांबा ना बे पोट्टेहो..निस्ता कल्ला करू नका..मानसाले अगदूर जाऊ तरी देसान का नाही तटी...सार्यांचीच सेटींग लावाची हाय...
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो,

संदीप डांगे
Wed, 10/12/2016 - 17:10 नवीन
मी काय म्हणतो, पोट्यापाट्याइले आंदी बसू द्या, म्होटी माणसं बस्तीन मांगुन... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

हा बराब्बर..थेच आपली नेहमीची

चिनार
Wed, 10/12/2016 - 17:32 नवीन
हा बराब्बर..थेच आपली नेहमीची स्टॅण्डर शीसटीम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लागली का सेटिंग?

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 10/17/2016 - 13:56 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

चला म्हणजे एक गोष्ट सिद्ध

माझीही शॅम्पेन
Wed, 10/12/2016 - 18:38 नवीन
चला म्हणजे एक गोष्ट सिद्ध झाली भक्त असण किंवा रुग्ण असण हा फिनोमिना खर्या अर्थाने ग्लोबल आहे :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा