Skip to main content

काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न

लेखक सुरवंट यांनी रविवार, 14/02/2016 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे. १. प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light ) समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती? प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ? २. दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने. जेव्हा या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करतील तेव्हा पहिल्या ट्रेन मधील observer ला दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिसेल? दुप्पट? सापेक्ष वेग जरी असला तरी तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त कसा असू शकतो? यालाच जोडून एक उपप्रश्न - पृथ्वीवर मी ५० किमी प्रतितास वेगाने स्कुटर चालवत आहे. चंद्रावरुन पाहिल्यास ह्याच स्कुटरचा वेग कितीतरी जास्त वाटेल. सुर्यावरुन पाहिल्यास अजून वेगवान वाटेल. दिर्घीकेच्या केंद्रापासून पाहिल्यास अजून अफाट वाढलेला दिसेल. अजून कुठूनतरी पाहिल्यास हाच वेग प्रकाशाच्या वेगाएवढा वाटेल. यावरुन हा निष्कर्ष काढावा काय? विश्वातील प्रत्येक गोष्ट ही प्रकाशाच्या वेगाने जात असते. ३. बिग बँग- विश्वाचा जन्म एका बिंदूच्या स्फोटापासून झालाय असे सर्वमान्य आहे. मात्र स्पोटाअगोदर जर तो एक बिंदू अस्तित्वात असेल तर असे अनेक बिंदू अस्तित्वात असले पाहिजेत. आणि त्यांच्या स्फोटांतून अनेक विश्वे निर्माण झाली असली पाहिजेत. multiuniverse थेरी ग्राह्य धरली जावी का? ४. पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही? पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे? उपप्रश्न - झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही? ५. प्रतीगुरुत्वाकर्षण - गुरुत्वाकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेणारे. प्रतीगुरुत्वाकर्षण म्हणजे स्वतःपासून दूर ढकलणारे. प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही. याचा अर्थ असा घ्यावा काय? प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसते.

वाचने 22553
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

> त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती? बुलेट ची गती निर्धारीत करण्याचा फॉर्मुला खालील प्रकारे आहे : w = (u + v)/(1 + uv/c²) अर्थात आपण प्रकाशाच्या वेगाने जात असल्याने आपल्यासाठी काळाची गती मंदावेल आणि तुम्हाला साधारण बंदूक झाडल्याप्रमाणेच जाणवेल.