Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्याक ऑफ ऑल on Tue, 09/13/2016 - 16:09
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !! तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील . म्हणजे साधारण एखाद्या कोकणस्थ माणसाकडील न्याहारी , सकाळचे जेवण , दुपारचे भूकलाडू आणि रात्रीचे जेवण एवढ सगळं मिळून होणार नाही इतका मेनू तर एका जेवणात होता . (सकाळचे जेवण दुपारी ३ ला होते हे सांगायला नकोच) असो , विषय परत लायनीवर आणतो. तर पुरणपोळी , खीर , श्रीखंड असा भरगच्च गोडाचा मेनू होता. आणि माझा झाला होता देवानंद . मला काही गोड घशाखाली उतरत नव्हतं . त्यामुळे मी आपलं या मांडीवरून त्या मांडीवर असं करत केव्हा एकदा सगळे आवरतं घेतायत या विचारात होतो ... आणि हाच तो जालीम क्षण , जेव्हा माझ्या समोर ती बला आली. माझ्या बाजूलाच बसलेले एक आजोबा मला म्हणाले “कारे ? घे की एक पुरणपोळी आणखी !!”. हो-नको करता करता माझ्या ताटात पुरणपोळी वाढली गेलीच. मी कुरकुरत मला आवडत नाही वगैरे पुटपुटत होतो. तेवढ्यात ते आजोबा म्हणाले , “कसे रे तुम्ही आजकालचे जवान ? इतक्यात गुंडाळला गाशा ? घे घे एक पोळी घे मी सांगतो तुला कसं खायचं !!” असं म्हणून त्यांनी मोर्चा स्वयपाकघराकडे वळवला आणि “सुनबाई sssssss जरा तूप पिठीसाखर लिंबू वेलदोडा पूड आण गं !!” असा आदेश सोडला . झाssssलं ….. ईकडे माझा देवानंद सोडून आता "राजेंद्रकुमार कम भारतकुमार" झाला होता . मला वाटलं आता आजोबा पुरण-गिरण कसं करतात प्रात्यक्षिका सकट सांगतात का काय ? पण नाही ... म्हातारा तितका पण वाईट नव्हता. त्यांनी माझ्या ताटात एक गरमागरम पुरणपोळी वाढायला लावली , त्यावर लोणकढया तुपाची धार धरली अन मला ते नीट पसरवून घ्यायला लावलं ... अन मग इथे खरी “रेशिपी” सुरु झाली ... त्या पसरलेल्या तुपावर साधारण २-३ चमचे पिठीसाखरेचा थर घालण्यात आला , मग परत थोडं तुप त्यावरून लावून ... सरप्राईज एलिमेंट “लिंबू” मागवण्यात आला ... !! आजोबा म्हणाले “पीळ बाळा हे पोळीवर !! “ ( माझा चेहरा तेव्हा साधारणत: “सर मी ?" हे विचारणार्या मुलाचा होतो तसा झालेला .) मी आवंढा गिळून ते पिळल . मग बारी आली वेलदोडापुडीची , ती भुरभुरली त्यावर ... आणि केला पोळीचा रोल .... अन मग आजोबांच्या या "बाप्तिस्मा" प्रमाणे मान खाली घालून ( अन डोळे मिटून) मी तो घास घेतला . आणि महाराजा sssssss ….. काय सांगू ? तो ज्या क्षणी तोंडात घोळला .... आहाहाहाहा , (Background la ते कॅथेड्रल मध्ये वाजतं न ते गोस्पेल का काय ते ... हां तेच ) काय तो क्षण ... वावावा ... (मनोमन मी त्या आजोबांना दिलेल्या शिव्या मागे घेतल्या आणि त्यांना अडिशनल १०० वर्षे ग्रांट केली. ) म्हणजे ऐश्वर्या ने अभिषेकला "हो" म्हणलं असेल तेव्हा ... जसा आनंद अभ्या ला झाला असेल ना ... तोच आनंद (कम आश्चर्य ) मी अनुभवत होतो . हीच होती माझी पहिली (शब्दश:) तोंडओळख त्या “त्रिपुर-सुंदरी”शी . एकीकडे पुरणाची चव जिभेवर घोळतेय ... एकीकडे लिंबू आणि पिठीसाखारेचा साल्सा नाकपुड्या आणि जीभ गाजवून सोडतोय , Backdrop ला लोणकढी तुपाचा धीरोदात्त सुगंध रुंजी घालतोय ... निस्ता धिंगाणा भाऊ ... अन यात वेलदोडा म्हणजे मल्टी-ष्टरार मूवी मध्ये अचानक अपेक्षा नसताना एखादा राजपाल यादव भाव खावून जातो तसा फ्रेश अपीयरंस !! खरय ... त्रिपुरं व्यापून उरेल असं स्वर्गसुख तुम्हाला रोज नै मिळत महाराजा .... !! बघा तुम्हाला पण भेटतेय का ही "त्रिपुर-सुंदरी" कधी !! - ज्याक ऑफ आल ... ( कारण व्होल वावर ईज आवर ) ता.क. : देवानंद होणे – देवानंद ने जन्मभर एक से एक खुबसुरत नट्यांबरोबर काम केले पण लग्न मात्र त्यातील एकीशीही केलं नाही . ईथे : ताटात अत्यंत छान पदार्थ असून सुद्धा मी ते खात नव्हतो ... पदार्थांच्या बाबतीत माझा “देवानंद झाला होता .”
  • Log in or register to post comments
  • 27164 views

प्रतिक्रिया

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 09/14/2016 - 20:53

In reply to पुरणपोळी आणि खीमा यावर ' by पद्मावति

Permalink

आम्ही तेलपोळीवाले

असल्यामुळे जरा विचित्र वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by mayu4u on गुरुवार, 07/04/2019 - 20:33

In reply to आम्ही तेलपोळीवाले by बोका-ए-आझम

Permalink

आम्ही पण!

आणि ज्याक दादा, सुंदर लिखाण! मात्र अशी माझ्याच्याने पुपो खाल्ली जाईल का ह्याबाबत सांशक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/14/2016 - 12:04

In reply to लेखन आवडले... by मुक्त विहारि

Permalink

बाकी पुपो खावी ती आमच्या सौ

बाकी पुपो खावी ती आमच्या सौ.च्या हातची. @मुवि केंव्हा बोलावताय जेवायला?
  • Log in or register to post comments

Submitted by पारुबाई on Tue, 10/11/2016 - 04:40

In reply to लेखन आवडले... by मुक्त विहारि

Permalink

तळलेली??? पहिल्यांदाच ऐकतेय.

तळलेली??? पहिल्यांदाच ऐकतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 09/14/2016 - 10:43

Permalink

पंचामृत आणि कटाची आमटी (डाळ

पंचामृत आणि कटाची आमटी (डाळ शिजवतांना जास्त झालेले पाणी सांबार करतांना पण वापरता येवू शकते.) हे स्वयंपाकघरातील उरले-सुरले संपवण्यासाठी, एखाद्या गृहीणीने रचलेला कट आहे, असे माझे मत.
काहीही हां मुवि! किंवा हाय कंबख्त! तुम्ही पंचामृत खाल्लंच नाहीत चांगलं!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 09/14/2016 - 10:45

Permalink

पुपो ताकात बुडवून खाल्लीय का

पुपो ताकात बुडवून खाल्लीय का कोणी? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 09/14/2016 - 11:34

In reply to पुपो ताकात बुडवून खाल्लीय का by यशोधरा

Permalink

Yuck!

:(
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 09/14/2016 - 11:51

In reply to Yuck! by बोका-ए-आझम

Permalink

अरेरे ;)

अरेरे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/15/2016 - 17:22

In reply to अरेरे ;) by यशोधरा

Permalink

ए, ह्या, असलं काही नसतं. उगा,

ए, ह्या, असलं काही नसतं. उगा, पदार्थाचे अपमान करत फिरु नका..........
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 09/15/2016 - 18:24

In reply to ए, ह्या, असलं काही नसतं. उगा, by रेवती

Permalink

असतं, असतं, असतंच मुळी.

असतं, असतं, असतंच मुळी.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 09/16/2016 - 09:43

In reply to असतं, असतं, असतंच मुळी. by यशोधरा

Permalink

पुपो ताकात बुडवून खाल्लीय का कोणी?

माझा धाकटा मुलगा, पुपो अशीच खात असे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 09/14/2016 - 10:57

Permalink

पुपो वीक पोइंट आहे. आता ही

पुपो वीक पोइंट आहे. आता ही त्रिपुरसुंदरी कधी खाइन की नाही हे मात्र सांगता येत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by ज्याक ऑफ ऑल on Wed, 09/14/2016 - 11:53

Permalink

धन्यवाद .... मंडळ आभारी हे ...

वरील सगळ्या असल्या नसल्या "कौतुक्यांचे" फार्फार आभार ... २-३ पोस्ट वर तेच ते कॉपी पेस्ट केल्या नंतर लक्षात आलं की हे सगळ्यांना म्हणायला (टायपायला) फार अवघड जाणार . त्यामुळे आपली ही "ब्लॅंकेट आभार" सोय . (मात्र भावना जुनून आहे बरकां ) (आणि खरं कारण हे ... की एक चित्पावन सारखं सारखं धन्यवाद तरी किती वेळा म्हणणार न ?? त्रास होतो हो !!)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 09/14/2016 - 12:37

Permalink

अच्छा !

ही त्रिपुरसुंदरी काय ? एकदा पहिली पाहिजे ट्राय करून ! लेख झकास ! कोल्लापुरी काय तुमी ?
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 09/14/2016 - 12:41

Permalink

या धाग्यावर देशस्थ/कोकणस्थ

या धाग्यावर देशस्थ/कोकणस्थ/कर्‍हाडे/चित्पावन वगैरे नसलेल्यांनी प्रतिसाद दिले तर चालतील का? =))
  • Log in or register to post comments

Submitted by ज्याक ऑफ ऑल on Sun, 09/18/2016 - 21:43

In reply to या धाग्यावर देशस्थ/कोकणस्थ by सतिश गावडे

Permalink

जरूर ... का नाही ??

काही हरकत नाही ...
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/14/2016 - 12:48

Permalink

च्यायला ह्या नावाचे एक

च्यायला ह्या नावाचे एक थ्रीस्टार हॉटेल आहे सोलापुरात तेवढे म्हाईते.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 09/14/2016 - 17:51

In reply to च्यायला ह्या नावाचे एक by अभ्या..

Permalink

हांना....मला पण वाटलेलं त्या

हांना....मला पण वाटलेलं त्या हॉटेलबद्दलच काहीतरी असेल म्हणून!! लेख मात्र लैच भारीये.
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Wed, 09/14/2016 - 13:24

Permalink

छान लेख

छान लेख . देवानंदने कल्पना कार्तीकशी लग्न केले होते ( टॅक्सी ड्रायव्हर , नौ दो ग्यारह फेम ) .
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on गुरुवार, 09/15/2016 - 16:04

Permalink

देशस्थी जेवणावळी खरच मजा

देशस्थी जेवणावळी खरच मजा आणतात. माझ्या ओळखीचे एक काका... खर नात नाही; वडिलांचे मित्र म्हणून काका........... एक ताट जिलब्या एका वाढण्यात फस्त करतात. मी स्वतः डोळ्यांनी बघितले आहे. आणि परत खाता याव म्हणून मग मध्ये गरम गरम वरण भात खातात. अर्थात हा पुरणपोळी प्रकार झक्कास वाटला. मात्र करून बघण्याची हिम्मत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 10/07/2016 - 03:40

In reply to देशस्थी जेवणावळी खरच मजा by ज्योति अळवणी

Permalink

ताटभर जिलब्या...

फार काहि अवघड नाहि. तोंडी लावायला भरपूर भजे आणि मट्ठा/ताक पाहिजे मात्र. किंवा एक लिटर दूध, साखर न घालता :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रार्जुन on गुरुवार, 09/15/2016 - 23:52

Permalink

लै भारी

लै भारी
  • Log in or register to post comments

Submitted by अरिंजय on गुरुवार, 10/06/2016 - 22:20

Permalink

भारी हो दादा

पुढल्या बारीला नक्की अशीच खाणार
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 10/07/2016 - 10:36

Permalink

सुंदर लिखाण मात्र अशी

सुंदर लिखाण मात्र अशी माझ्याच्याने पुपो खाल्ली जाईल का ह्याबाबत सांशक.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Fri, 10/07/2016 - 14:10

Permalink

लेख आवडला !

लेख आवडला ! देऊळगाव राजा ला बालाजीचे जे संस्थान आहे तिथे तिथे त्रिपुर सुंदरी हा नैवेद्य असतो. तिथे नात्यातल्या पुजाऱ्यांकडे खाल्लाय हा प्रकार.
  • Log in or register to post comments

Submitted by केडी on Fri, 10/07/2016 - 16:00

Permalink

कसला धमाल लेख लिहिलाय!! मी

कसला धमाल लेख लिहिलाय!! मी फार गोड खात नाही पण पुढल्या वेळी पुरणपोळी समोर आली की नक्की करून बघणार! लिहीत राहा.....
  • Log in or register to post comments

Submitted by palambar on Tue, 10/11/2016 - 00:20

Permalink

बेस्टच!

बेस्टच!
  • Log in or register to post comments

Submitted by chitraa on Tue, 10/11/2016 - 10:02

Permalink

छान

चान
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 10/11/2016 - 11:05

Permalink

आईशप्पत

ऐकला पण नाहीये हा प्रकार. पाहिलं पाहिजे अस करून
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 10/12/2016 - 18:46

Permalink

उजव्या हाताने तूप वाढलेली

उजव्या हाताने तूप वाढलेली पुरणपोळी आणि किंचितसं लिंबू पिळलेली कटाची आमटी !! स्वर्गीय काँबिनेशन!! तशी पुरणपोळी कशासोबतही आवडते पण त्यातल्या त्यात हे बेस्ट. आमरस-भात हापिसातल्या एका महाभागाने सांगितला म्हणून ट्राय केला होता. त्याने वर्णन केल्याइतका ब्रह्मानंदी टाळी लागणारा नसला तरी चव बर्‍यापैकी बरी होती. साधारण वाटीभर वाफाळत्या भातावर, किमान दोन चमचे तूप आणि वाटीभर आमरस!!
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on Sun, 10/16/2016 - 10:41

Permalink

वाचून वजन वाढले

लेख आणि प्रतिक्रिया वाचून वजन वाढले :LOL:
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com