मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे
4 कारणे...
//
---------------------------------------------------------------------------
पहिलं कारण-
संख्या.
या देशात 80 टकक्यांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदुची आहे. नॅचरली- कोणत्याही धर्मावर होणाऱ्या टोटल टीकेपैकी -80 टक्के टीकासुद्धा -मेजोरिटी फॉलो करत असलेल्या धर्मातल्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलच होणार. याईतकं साहजिक काय?
उदाहरणार्थ. हेच जर अमेरिका किंवा यूरोपमधलं घेतलं तर- तिथले प्रोग्रेसिव लोक करत असलेली टिका- बहुसंख्य वेळा ख्रिश्चनिटी 'च्याच' विरोधात असते. अमिरिकेतले ख्रिश्चन लोक, तिथल्या अल्पसंख्य हिंदू धर्मावर टिका करून काय मिळवणार? ---तसंच भारतात आपण अत्यल्प असलेल्या ख्रिश्चन धर्मावर --टोटल टिकेच्या 50 टक्के टिका करून काय मिळवणार??
---------------------------------------------------------------------------
दुसरं कारण:
मी जन्मलो -त्या धर्मातल्या लहानपणापासून पाहत आलेल्या चुक बरोबर अशा साऱ्या गोष्टी बद्दल बोलताना मला नेचुरल कॉन्फीडेंस असतो. मी ठामपणाने एखाद्या गोष्टीला चुक तर चुक किंवा बरोबर तर बरोबर म्हणू शकतो. हेच मी (पुरेशा अभ्यासा अभावी) दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना थोडासा तरी कचरेल...
उदाहरणार्थ.
मी हिंदू आहे अन जर मला इस्लामच्या ईद-उल-अध वर (हे नाव सुद्धा बरोबर आहे की नाही मला ठाऊक नाही) -टिका करायची म्हटलं-- तर त्याआधी ती मुळात साजरी का केली जाते?? याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार.
या विरुद्ध -मी ज्या हिन्दू धर्मात जन्माला आलो त्यात फॉलो होणाऱ्या अंधश्रद्धा, जात-पात, भोंदू बाबा, फुकटे पुजारी, अंगात येणे, या चुकीच्या गोष्टी मी लहानपणा पासून पाहत आल्याने- यावर टिका करताना स्वत:च्या धर्माच्या (मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे) करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो.
प्लस यात परत संख्या कामाला येते. आता 2015 च्या रिपोर्ट नुसार भारतात
80 टक्के हिन्दू
14 टक्के मुस्लीम
2 टक्के ख्रिश्चन
1 टक्का बुद्ध अन
इतर 3 टक्के आहेत.
त्यामुळे 10 पैकी टिकाकार घेतले तर-
प्रत्येक धर्मावर होणारी टिका साहजिक अशी असेल...
हिंदू 8%
मुस्लीम 1.4%
ख्रिश्चन 0.2% अन
बुद्ध 0.1%
म्हणजे हिंदू धर्माची होणारी समीक्षा 'कठोर' असणार यात वाद नाही.
---------------------------------------------------------------------------
तिसरं कारण:
मेजोरिटीचा-- माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम.
म्हणजे कोणत्याही देशातल्या मेजोरिटीचं जेवढं रॅशनलायजेशन, सेक्युलरिजेशन आणि लिब्रलायजेशन होईल- तेवद्याच प्रामाणात त्या त्या देशातल्या माइनोरिटीजचंही -थॉट एंड बेहविरियल लिब्रलायजेशन "आपोआप" अन नकळत होईल. "आपोआप" -हा शब्द इथं फार महत्वाच्या आहे- कारण ही प्रोसेस अतिशय इम्प्लीसीट आहे. ठरवून न करता केलेली.
अतिशय सोपं उदाहरण म्हणजे समजा 10 पोरांत 8 जन हुशार आहेत अन 2 थोड़े ढ. --तर त्या 2 ढ मधल्या, या 8 च्या संगतीत राहून ,एक तरी पोरगा हुशार होण्याची शकयता जास्त असते. And vice-a-versa!
म्हणजे केरळ मधला मुस्लीम अन बिहारचा मुस्लीम यात साहजिक फरक असणार आहे. तसाच भारतातला मुस्लीम अन पकिस्तानला मुस्लीम यात खुप फरक असणार आहे. "माझ्या engg च्या वर्गातल्या, कित्येक मुस्लीम मूली इतर मुलींसारखं जीन्स टॉप घालायच्या." तेच पकिस्तान मधल्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना तिथे इंजिनिअरींग पर्यंत 'शिकू तरी देत असतील का?' हाच मला प्रश्न आहे.
म्हणून हिंदू-- म्हणजे या देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही.
---------------------------------------------------------------------------
चौथं कारण.
माझी टिका ही --माझा धर्म धुसमसत का होईना पण स्वीकारेल.
पण दुसऱ्या धर्मातल्या कोणी माझ्या धर्मावर केलेली टिका (मग ती कितीही बरोबर असली) तरी ती- माझा धर्म स्वीकारेल का?
उदाहरणार्थ:
एखादा मुस्लीम म्हटला की "काय तुमच्या हिन्दू धर्मात ते फालतू अंगात येणे अन असले काय काय प्रकार असतात." आता अंगात येणे हा प्रकार कितीही खोटा असला तरी त्याबद्दल ची टीका मी एका मुस्लीमाकडूम (प्रैक्टिकली बोलताना) स्वीकारेल का??? कुठेतरी मनातल्या मनात मी त्याला 'आउटसायडर' च मानेल. मग मी त्याला काय उत्तर देईल की "आधी तुम्ही त्या बुरख्याचा फाल्तुपना बंद करा- आता आपण ईसवी सन 2016 मधे आहोत. ईसवी सन - 216 मधे नाही".
प्रसंगी मी त्याच्या अंगावर सुद्धा जाईल. हिंसक होईल.
पण हेच एक हिंदू म्हणून मी म्हटलो की "काय यार आपल्या धर्मात हे अंगात येणे काय -अन जातीयवाद पाळने काय- प्रकार बिलकुल फालतू आहेत." तर समोरचा व्यक्ती माझा विरोध् करेल. पण शेवटी टोकाला न जाता किंवा हिंसक न होता -- गप्प बसेल. कारण त्यांच्यासाठी मनातल्या मनात मी कुठेतरी "इनसायडर" असतो.
त्यामुळे प्रोग्रेसिव हिंदू म्हणून -माझी हिंदू धर्मावर (कंपेरिटीवली जास्त) टिका होते..
.
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
//
(Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) )
Article is inspired from T Manoj's view on religion...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आता तुम्हाला "सुंता करून या"
शब्द
बोळा अडकला की होतं असं...
ओकेे
(Constructive counter
मी का टीका करतो - हेच मी म्हटलो आहे
कारणमीमांसा बरोबर आहे.
+१
हिंदू धर्माविरोधात का लिहितो
प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टीं
आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
मग आपणसुध्धा हिंदू धर्माला
नाही
साडे तीन अतिरेकी
विचार
सहमत
बर, मग?
जाऊं द्याना
प्रत्येक मुद्द्याशी सहमत..
>>"याचा प्रचंड आणि "थेरोटिकल"
वेड्यासारखा हसलो... एक नंबर...
तुमचा स्वतःच्या हिंदू
पाचवे आणि खरे कारण ..
बरोबर हेरून
तुमचे नक्की काय म्हणणे आहे ?
काय एवढं बेसिक
टी मनोज यान्च्या लेखाचा
बिनधास्त आणि मनोसोक्त टिका
अपेक्षित आहे... चालुद्या...
बोरगावकर साहेब, अर्थहीन
मला खूप मोठी अपेक्षा होती
तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर
अर्थहीन साहेब, कृपया उत्तर
आरग्युमेंटची सुरुवात करा. ऑ?
हां हां..
एक वाक्यच पुरेसं आहे साहेब..
तुम्ही धर्म आणि रुढी ह्यांची
तेव्हढं कळलं असतं तर...
>>तुम्ही धर्म आणि रुढी
धार्मिक बाब म्हणजे काय?
असो.
असो काय? :) मी खरेच विचारले
धर्म = Macro
1+ मलाही हेच म्हणायचे आहे.
अस्पृश्यता हा धर्माचा भाग
मान्य ! जातीवाद हा एक हिणकस
मुळात, हिंदू तत्वज्ञान
वेदकाळात जात नसून
हो, वर्णव्यवस्था होती हे
हा संपूर्ण लेख म्हणजे