Skip to main content

मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 10/10/2016 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
4 कारणे... // --------------------------------------------------------------------------- पहिलं कारण- संख्या. या देशात 80 टकक्यांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदुची आहे. नॅचरली- कोणत्याही धर्मावर होणाऱ्या टोटल टीकेपैकी -80 टक्के टीकासुद्धा -मेजोरिटी फॉलो करत असलेल्या धर्मातल्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलच होणार. याईतकं साहजिक काय? उदाहरणार्थ. हेच जर अमेरिका किंवा यूरोपमधलं घेतलं तर- तिथले प्रोग्रेसिव लोक करत असलेली टिका- बहुसंख्य वेळा ख्रिश्चनिटी 'च्याच' विरोधात असते. अमिरिकेतले ख्रिश्चन लोक, तिथल्या अल्पसंख्य हिंदू धर्मावर टिका करून काय मिळवणार? ---तसंच भारतात आपण अत्यल्प असलेल्या ख्रिश्चन धर्मावर --टोटल टिकेच्या 50 टक्के टिका करून काय मिळवणार?? --------------------------------------------------------------------------- दुसरं कारण: मी जन्मलो -त्या धर्मातल्या लहानपणापासून पाहत आलेल्या चुक बरोबर अशा साऱ्या गोष्टी बद्दल बोलताना मला नेचुरल कॉन्फीडेंस असतो. मी ठामपणाने एखाद्या गोष्टीला चुक तर चुक किंवा बरोबर तर बरोबर म्हणू शकतो. हेच मी (पुरेशा अभ्यासा अभावी) दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना थोडासा तरी कचरेल... उदाहरणार्थ. मी हिंदू आहे अन जर मला इस्लामच्या ईद-उल-अध वर (हे नाव सुद्धा बरोबर आहे की नाही मला ठाऊक नाही) -टिका करायची म्हटलं-- तर त्याआधी ती मुळात साजरी का केली जाते?? याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार. या विरुद्ध -मी ज्या हिन्दू धर्मात जन्माला आलो त्यात फॉलो होणाऱ्या अंधश्रद्धा, जात-पात, भोंदू बाबा, फुकटे पुजारी, अंगात येणे, या चुकीच्या गोष्टी मी लहानपणा पासून पाहत आल्याने- यावर टिका करताना स्वत:च्या धर्माच्या (मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे) करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो. प्लस यात परत संख्या कामाला येते. आता 2015 च्या रिपोर्ट नुसार भारतात 80 टक्के हिन्दू 14 टक्के मुस्लीम 2 टक्के ख्रिश्चन 1 टक्का बुद्ध अन इतर 3 टक्के आहेत. त्यामुळे 10 पैकी टिकाकार घेतले तर- प्रत्येक धर्मावर होणारी टिका साहजिक अशी असेल... हिंदू 8% मुस्लीम 1.4% ख्रिश्चन 0.2% अन बुद्ध 0.1% म्हणजे हिंदू धर्माची होणारी समीक्षा 'कठोर' असणार यात वाद नाही. --------------------------------------------------------------------------- तिसरं कारण: मेजोरिटीचा-- माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम. म्हणजे कोणत्याही देशातल्या मेजोरिटीचं जेवढं रॅशनलायजेशन, सेक्युलरिजेशन आणि लिब्रलायजेशन होईल- तेवद्याच प्रामाणात त्या त्या देशातल्या माइनोरिटीजचंही -थॉट एंड बेहविरियल लिब्रलायजेशन "आपोआप" अन नकळत होईल. "आपोआप" -हा शब्द इथं फार महत्वाच्या आहे- कारण ही प्रोसेस अतिशय इम्प्लीसीट आहे. ठरवून न करता केलेली. अतिशय सोपं उदाहरण म्हणजे समजा 10 पोरांत 8 जन हुशार आहेत अन 2 थोड़े ढ. --तर त्या 2 ढ मधल्या, या 8 च्या संगतीत राहून ,एक तरी पोरगा हुशार होण्याची शकयता जास्त असते. And vice-a-versa! म्हणजे केरळ मधला मुस्लीम अन बिहारचा मुस्लीम यात साहजिक फरक असणार आहे. तसाच भारतातला मुस्लीम अन पकिस्तानला मुस्लीम यात खुप फरक असणार आहे. "माझ्या engg च्या वर्गातल्या, कित्येक मुस्लीम मूली इतर मुलींसारखं जीन्स टॉप घालायच्या." तेच पकिस्तान मधल्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना तिथे इंजिनिअरींग पर्यंत 'शिकू तरी देत असतील का?' हाच मला प्रश्न आहे. म्हणून हिंदू-- म्हणजे या देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही. --------------------------------------------------------------------------- चौथं कारण. माझी टिका ही --माझा धर्म धुसमसत का होईना पण स्वीकारेल. पण दुसऱ्या धर्मातल्या कोणी माझ्या धर्मावर केलेली टिका (मग ती कितीही बरोबर असली) तरी ती- माझा धर्म स्वीकारेल का? उदाहरणार्थ: एखादा मुस्लीम म्हटला की "काय तुमच्या हिन्दू धर्मात ते फालतू अंगात येणे अन असले काय काय प्रकार असतात." आता अंगात येणे हा प्रकार कितीही खोटा असला तरी त्याबद्दल ची टीका मी एका मुस्लीमाकडूम (प्रैक्टिकली बोलताना) स्वीकारेल का??? कुठेतरी मनातल्या मनात मी त्याला 'आउटसायडर' च मानेल. मग मी त्याला काय उत्तर देईल की "आधी तुम्ही त्या बुरख्याचा फाल्तुपना बंद करा- आता आपण ईसवी सन 2016 मधे आहोत. ईसवी सन - 216 मधे नाही". प्रसंगी मी त्याच्या अंगावर सुद्धा जाईल. हिंसक होईल. पण हेच एक हिंदू म्हणून मी म्हटलो की "काय यार आपल्या धर्मात हे अंगात येणे काय -अन जातीयवाद पाळने काय- प्रकार बिलकुल फालतू आहेत." तर समोरचा व्यक्ती माझा विरोध् करेल. पण शेवटी टोकाला न जाता किंवा हिंसक न होता -- गप्प बसेल. कारण त्यांच्यासाठी मनातल्या मनात मी कुठेतरी "इनसायडर" असतो. त्यामुळे प्रोग्रेसिव हिंदू म्हणून -माझी हिंदू धर्मावर (कंपेरिटीवली जास्त) टिका होते.. . माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे... // (Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) ) Article is inspired from T Manoj's view on religion...

वाचने 21989
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

(Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) ) Article is inspired from T Manoj's view on religion... म्हणजे यात तुमचं स्वतःच असं काहीच मत नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही.

मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो
मुस्लीम असता तर फतवा निघून आतापर्यंत जीव मुठीत धरावा लगला असता . हिंदू धर्मामधल्या सहिष्णूतेमुळे हिंदू स्वधर्माची चिकित्सा करू शकतात . लौकरच हे सुद्धा नामशेष होइल

In reply to by कपिलमुनी

माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...

In reply to by अर्थहीन

आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे... >>मान्य ! पण सर्व धर्मात अशी आवाज उठवायची परवानगी नसते . आवाज बंद केले जातात

In reply to by टवाळ कार्टा

इतर काही धर्मात असे होते एवढेच निदर्शनास आणायचे होते. हिंदूमधे असे सध्या होत नाही पण कलबुर्गी आणि दाभोळकर यांच्ज्या हत्या जर वैचारीक विरोधातून झाल्या असतील तर हिंदू धर्म तीच वाटचाल करत आहे असे म्हणावे लागेल

In reply to by कपिलमुनी

साडे तीन अतिरेकी सनातन्यांमुळे हिंदू धर्म अशा वाटेवर जाईल हे म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती आहे. मिपावरसुद्धा ९९% टक्के लोक अशा सनातनी अतिरेक्यांना उघडपणे विरोध करताना दिसतील.

In reply to by सुबोध खरे

दोन हत्या किंवा दोन तीन अतिरेकी यांच्यामुळे सध्यातरी हिंदू धर्माला फरक पडणार नाही. परंतु या किंवा अशा प्रकारछ्या हत्यांमागे विचार मंथन , ब्रेन वॉशिंग आणि इतर सपोर्ट ग्रुप असतात त्यामुळे हे विचार फोफावतात त्याची काळजी वाटते . अर्थात अजून हे सनातन्यानी केलाय याचा कोणताच पुरावा नाही त्यामुळे जर तर जास्त चर्चण्यात अर्थ नाही.

चांगलं तर्कशुद्घ लिहीलय, सहमत.

>>"याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार." काय राव! असं असतंय का? टीका करायची तर असे विचार करून चालत नाही इकडे... बिनधास्त टीका करायची आणि पुढच्याने संदर्भ मागितले कि त्यालाच उलट पुरावे मागायचे अशी पद्धत असते! ;)

तुमचा स्वतःच्या हिंदू धर्माच्या अभ्यासा/आकलनावरुन हिंदू धर्म म्हणजे काय हे जाणून घ्यायला आवडेल.

माझी फाटते ... दरदरून बरोबर ना ? नाहीतर गिरीश कुबेर काकांना विचार ना ? केरळात बघा कि ? आणि चार्ली हेब्दो तर माहीतच आहे .. मग काय ??

In reply to by हेमन्त वाघे

बरोबर हेरून या वाक्याकडे दुर्लक्ष केलत... व्हेरी गुड... >> माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...

तुमचे नक्की काय म्हणणे आहे ? ह्या लेखातील मते तुमची आहेत का टी मनोज यांची? तुम्हाला एखादी गोष्ट (कुठल्याही धर्मातील) पटत नसेल तर जरूर टीका करा... त्याच बरोबरोबर सुधारण्याचा मार्गही सुचवा.. व त्याच बरोबर येणार्‍या बर्‍या वाईट प्रतिक्रियांना सामोरे जायची तायारी ठेवा.. हे जमत नसेल तर मिपा सारख्या स्थळावर लेख लिहा.. मर्यादित प्रतिक्रियांना सामोरे जाणे सोपे आहे.. तेही जमात नसेल तर घरच्या घरी टीका करा.. हा लेख लिहून हिंदू धर्माविरोधात(च) केल्लेल्या टीकेचे समर्थन कशाला? हिंदू धर्मात जे अयोग्य आहे जसे देवल बळी देणे.. ह्याचा विरोध जरूर करावा.. आणि आम्ही विरोध करतो हे जाहिरपणे सांगावे.. उगाच या लेखातील मुद्यांच्या कुबड्या कशाला?

In reply to by अमर विश्वास

काय एवढं बेसिक पण मिपा वर सांगावं लागतं का राव? बकऱ्याचा बली देऊ नका... आवरण सवर्ण मानू नका, सुचवला मार्ग अजून काय सांगायला पाहिजे? ... घरच्या घरी.. (त्याचा इथं काय संबंध) ... लेख नीट वाचलात (पूर्वग्रह न ठेवता) तर हे लगेच समजलं असता कि माझी ऑलरेडी टीका करून झालीय आणि करत राहणारे... फक्त ती का करतोय याची मला वाटलेली कारणे (मनोज च्या) लेखाच्या आधारे मी एक्सप्लिन केली आहेत...

बिनधास्त आणि मनोसोक्त टिका करा. आजिबात घाबरु नका. ज्यांच्या नावातच अर्थहिनता आहे त्यांचीन टिका सुद्धा तशीच असेल. आम्ही खुप सहिष्णु आहोत.

In reply to by Dhananjay Borgaonkar

अपेक्षित आहे... चालुद्या... . . लेखावर टीकाच होणार नाही... हे माहीत नसण्याइतका खुला मी नक्कीच नाही...

In reply to by Dhananjay Borgaonkar

बोरगावकर साहेब, अर्थहीन ह्यांनी काही माझ्या घरात ह्या महिन्याचा किराणा भरलेला नाही, फक्त कसंय न तुम्ही आत्ताच जे केलेत त्याला सभाशास्त्रात एड होमिनेम किंवा मुद्दे नसताना केलेले वैयक्तिक हल्ले म्हणतात, तेव्हा संभाषण शुचिता अबाधित ठेऊन जर चर्चेत विरोधाभासी तर्क देता आला तर जरूर द्या अन चर्चा सकस ठेवा. नाहीतर कमीपणा तुमच्या आयडीला येईल त्याच्याशी काही मला सोयरसुतक नाही, पण कमीपणा माझ्या धर्माला सुद्धा येईल, अन तो न येऊ देणे एक हिंदू म्हणून माझे कर्तव्य मी तरी समजतो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मला खूप मोठी अपेक्षा होती कि इथे या लेखाला खूप चांगल्या "काउंटर" अर्ग्युमेंट्स येतील पण इथे मला फक्त वैयक्तिक हल्ले - नाहीतर मग मुसलीम किंवा दुसरे धर्म कसे वाईट आहेत एवढच दिसत आहे...- सर्वां कडून नाही - पण काही जणा कडून... जे माझ्या दृष्टीने फारच दुर्दैवी आहे... अपेक्षा भंग झाल्यासारखे वाटते...

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एक वाक्यच पुरेसं आहे.. "तहाणलेल्याला ओंजळीने पाणी देणं" म्हणजेच हिंदू (अन दुसरा कोणताही) धर्म आहे... पण याच्यात खूप अर्थ आहे ... यशोधरा... नक्कीच समजेन तुम्हाला कि मला काय म्हणायचं आहे...

In reply to by अर्थहीन

तुम्ही धर्म आणि रुढी ह्यांची गल्लत करीत आहात असे मला वाटते. हिंदू धर्म म्हणजे "रिलिजन" ह्या अर्थी तो धर्म नाही. चांगल्या वाईट रुढी प्रत्येक धर्मात आहेत. त्या बर्‍या का वाईट हा वेगळा विषय. तेव्हा आधी तुम्ही रुढींविषयी बोलता आहात का धर्माविषयी, हे आधी सांगा.

In reply to by यशोधरा

अनेकांची दुकानं एव्हाना बंद झाली असती. असो. सावरकरांनी टिका जरुर करावी, पण ति सावरकरांनी करावी :ड

In reply to by यशोधरा

>>तुम्ही धर्म आणि रुढी ह्यांची गल्लत करीत आहात असे मला वाटते. धर्म आणि रुढी यात काय फरक असतो? एखादी प्रचलित बाब धार्मिक बाब आहे की रुढी हे कसे ठरवतात?

In reply to by सतिश गावडे

असो काय? :) मी खरेच विचारले होते. खालच्या काही खरडी वाचून त्या अनुषंगाने माझे जे काही आकलन आहे ते लिहिन.

In reply to by सतिश गावडे

धर्म = Macro रूढी = Micro असे सुचवावे वाटते सगा सर, आयुष्य जगायचे ढोबळ नियम म्हणजे धर्म त्या ढोबळ नियामातले व्यक्ती/ समूह/ गट/ भौगोलिक विविधातेनुसार पडलेले उपगट म्हणजे रूढी असाव्यात असे वाटते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माझ्या मतानुसार हिंदू हा धर्म नसून जगण्याचे ढोबळ मार्ग ( WAY OF LIFE ) आहेत. महाभारत किंवा रामायण किंवा कोणतेही वेद यामध्ये जगण्याची मार्गदर्शक तत्वे हि गोष्टीरूपाने सांगितली गेली असावीत.कारण लोक असेच प्रवचन सांगितले तर ऐकून घेत नाहीत पण देवाधर्माची भीती घातली तर गोष्टी सहज गळी उतरवता येतात त्यांच्या.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

अस्पृश्यता हा धर्माचा भाग होता की रुढी होती? मला वाटतं काहींना धर्मामध्ये काही गोष्टी वाईट असतात हे स्विकारणे अवघड जात असावे. त्यावर मग जे जे चांगले ते धर्म आणि जे जे वाईट त्या रुढी असा एक पळवाटसदृश्य मार्ग काढला जातो.

In reply to by सतिश गावडे

मान्य ! जातीवाद हा एक हिणकस प्रकार होता/आहे अन दुर्दैवाने अजून काही दिवस राहील. मला धर्म अन रूढी वर्गीकरण फक्त पळवाट म्हणून करावे वाटले असे नाही, तर तत्क्षणी जे मला ग्राह्य धरता येण्यालायक दिसले ते मी ग्राह्य धरले होते

In reply to by सतिश गावडे

मुळात, हिंदू तत्वज्ञान 'वसुधैव कुटुंबकम' ह्या संकल्पनेवर आधारीत आहे, असे मला वाटते. सुरुवातीला ऋग्वेद काळात - वैदिक धर्मामध्ये - जन्मावरुन जात ठरत नसावी. उदा. ब्राह्मणाची संतती ब्राह्मण, क्षत्रियाची क्षत्रिय वगैरे. प्रत्येकाला आपले व्यवसाय क्षेत्र निवडण्याची मुभा होती, तस्मात एकाच घरातील मंडळी वेगवेगळे व्यवसाय निवडू शकत आणि जाति ही व्यवसायावरुन ठरत असे. पुढे जेव्हा कधी जाती ठरवण्यामधील ही लवचिकता संपुष्टात आली असेल आणि काही व्यक्तींचे हितसंबंध, फायदे वगैरे टिकून राहण्यासाठी जन्मावरुन जात ठरवण्याचे प्रकार सुरु झाले असतील तेव्हा ह्या रुढीचा पायंडा पडला असावा. हिंदू तत्वज्ञान हे एकाच व्यक्तीने सांगितलेले नाही. अनेक व्यक्तींनी आपापल्या आकलनानुसार काही मते मांडली आहेत, त्यावर चर्चा, वाद- प्रतिवाद झडले, घडले असतील आणि त्यातून त्या मतांना काही आकार प्राप्त झाला असेल. हिंदू हा धर्म आहेच कुठे? आहे ते तत्वज्ञान. अनेक विचारधारा त्यामध्ये समाविष्ट आहेत. अनेक परस्पर विरोधी विचारधारांना त्यामध्ये स्थान आहे, त्यांना कोणी झिडकारलेले नाही - भलेही स्वीकारले नसेल पण म्हणून त्यांचा गळा दाबून टाकलेला नाही. हिंदू तत्वज्ञानाची लवचिकता हीच तर त्याची ताकद. त्यात जसे सुंदर आहे तसेच काही हीणही असेल, पण त्या हीणाचा प्रतिवाद करण्याची, त्याला नाकारण्याची, आणि सुधारण्याची संधी हे तत्वज्ञान प्रत्येकाला देते, हे त्याचे बलस्थान आहे. ते नाकारुन आपण काय मिळवतो? असो. :) मग वाटल्यास लिहीन आणि जे लिहिले आहे, ते पटायलाच हवे असाही आग्रह नाही.

In reply to by यशोधरा

वेदकाळात जात नसून वर्णव्यवस्था होती. जाती खूप नंतर आल्या. अर्थात वर्णसंकरही होत असेच. ह्या विषयावर कुरुंदकरांचे मनुस्मृती हे पुस्तक वाचनीय आहे.

In reply to by प्रचेतस

हो, वर्णव्यवस्था होती हे वाचनात आहे. वर्ण आणि ancestry महत्वाची मानली जात असे, असे वाचले आहे, परंतु पोस्ट वैदिक काळात ज्याप्रमाणे ठराविक व्यवसाय ठराविक जातीच्या व्यक्तीलाच करता येई, तसे नव्हते.

हा संपूर्ण लेख म्हणजे आपण फक्त हिंदू धर्मावर टीका करतो पण आपण निःपक्षपाती आहोत हे पटवण्याची केविलवाणी धडपड आहे.. तुम्हाला जर हिंदू धर्मावर(च) टीका करायची असेल तर जरूर करा.. पण तसे जहिरपणे सांगा.. कि येथे हिंदू धर्मावर टीका करून मिळेल.. बाकीच्या धर्मांच्या वाटेला जाण्याची टाप नाही.. उगाच आपल्या कृतीचे लंगडे समर्थन कशाला ? बाकी हिंधु धर्मात टीका करण्यसरखे बरेच काही आहे.. तेंव्हा तुमचे दुकान बराच काळ चालू राहील काळजी नसावी

In reply to by अमर विश्वास

बरोबर हेरून या वाक्याकडे दुर्लक्ष केलत... व्हेरी गुड... >> माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे... >> म्हणजे मी एकाच लेखात सगळ्या धर्माला धारेवर धरलं पाहिजे... कसल्या बाष्फळ अपेक्षा... वाह!

In reply to by अर्थहीन

अर्थहीन .. तुम्ही एकदा काय ते नक्की ठरवा... हिंदू धर्मावर टीका करण्याची चार कारणे देता.. आणि वर म्हणता की सर्व धरमांवर टीका करतो असेही म्हणता.. जर तुम्ही सर्व धर्मांवर टीका करत असाल तर मग अशी चार कर्णे द्यायची वेळ का यावी ?

In reply to by अमर विश्वास

अहो... मला जसं हिंदू धर्मात काही चुकीचं वाटतं त्यावर मी बोलतो... तसं इतर धर्मातल्या चुकांवर सुद्धा बोलला पाहिजे असं म्हणणे अयोग्य आहे --असं तुम्हाला वाटतं? ... वेळ वगैरे काही आलेली नाही माझ्यावर कशाची ... मला स्वतःला वाटलं कि मी का टीका करतो हे मी स्पष्ट करावं... मला वाटतं हा माझा हक्क असायला हरकत नाही...

In reply to by अर्थहीन

इतर धार्माबद्दल बोलले पाहिजे वगैरे मान्य... तुम्ही स्वाट: मात्र फक्त हिंदू धर्मा बद्दलच बोलता... इतर धार्माबद्दल नाही.. त्यमुळे निधर्मी असल्याचा आव आणु नये..

In reply to by अमर विश्वास

एकाच लेखात सगळ्या धर्माबद्दल बोलणं मला शक्य नाही... --- बाकी आव आणून मला करोड रुपये मिळणार आहेत म्हणून मी आणतोय... तुम्हाला तोटा? इथून पुढे असल्या कमेंट्स ना उत्तर देणे बंद... तुम्ही शिव्या दिल्या तरी तुमचा आदर --मात्र तुम्हाला उत्तर देण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ आहे --असं स्वतः "अर्थहीन" लाच वाटतं नाही... यावारून समजा काय समजायचं ते... शिवीगाळ वगैरे...चालुद्या तुमचं आता बिनधास्त...

In reply to by अर्थहीन

मी तुम्हाला कधी शिविगाळ केला? बाकी चलुद्या तुमचे दुकान..

In reply to by अर्थहीन

तुम्हाला एका लेखात सर्वा धर्माबद्दल लिहीणे शक्या नाही.. मान्य.. मग बाकीच्या लेखांच्या लिंक्स द्या.. जेथे तुम्ही इतर धर्माबद्दल मतप्रदर्शन केले आहे,,,

In reply to by अमर विश्वास

@ अमर विश्वास ..पटलं आपल्याला ..4 कारणे सांगण्यामागचा हेतू काय ? @ अर्थहीन एकीकडे म्हणता मला खूप मोठी अपेक्षा होती कि इथे या लेखाला खूप चांगल्या "काउंटर" अर्ग्युमेंट्स येतील आणि दुसरीकडे तुम्ही बोलता आव आणून मला करोड रुपये मिळणार आहेत म्हणून मी आणतोय... तुम्हाला तोटा? नावडतीचे मीठ आळणी तसा प्रकार आहे ..

तुम्ही हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहिता यामागची ४ कारणे समजली. परंतु हिंदू धर्मातल्या नक्की कोणकोणत्या गोष्टींविरूद्ध लिहिता आणि काय लिहिता ते सांगता का जरा. का टीका करतो हेच फक्त सांगण्यापेक्षा तुमच्यामते हिंदू धर्मातील टीकाकरण्यायोग्य गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि स्वीकारार्ह गोष्टी (असल्यास) कोणकोणत्या आहेत, त्या गोष्टी तुमच्यामते टीकाकरण्यायोग्य का आहेत, त्यावर तुम्ही कशाप्रकारे टीका करता व त्या गोष्टी सुधारण्यासाठी तुम्ही काय केले आहे किंवा काय करायला हवे हे सांगितले तर ते जास्त योग्य होईल.

In reply to by श्रीगुरुजी

काही गोष्टी मी वरती सांगितल्याचं आहेत... अंगात येणे, बकरी कापणे, मुहूर्त पाहणे, ब्राह्मण कडून सल्ले घेणे., देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे... जातपात पाळणे... आणि ओ माय गॉड अँड PK मध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी... -- चांगल्या म्हणाल तर सर्वात महत्वाची गोष्ट मला हिंदू धर्माकडून सहिष्णू पणा शिकायला मिलाली हि वाटते... -- चुकीच्या गोष्टीवर टीका करून त्या करण्यापासून लोकांना परावृत्त करणे हे मला माझ्या बाजूने केलेलं काँट्रीब्युशन वाटतं... -- धन्यवाद श्रीगुरुजी....... तुम्ही योग्य अर्ग्युमेण्ट केली असं वाटतं --नाहीतर इथे काहीजण नुसते वैयक्तिक हल्ले करण्यापलीकडे काही करतात असं वाटतं नाही... --

In reply to by अर्थहीन

अंगात येणे, बकरी कापणे, मुहूर्त पाहणे, ब्राह्मण कडून सल्ले घेणे., देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे... जातपात पाळणे.
अर्थहीन जी, अंगात येणे हि गोष्ट फक्त हिंदूंपुरती मर्यादित नाही असे मला वाटते. बकरी कापणे हे तुम्ही बळी देणे अर्थाने म्हणत असाल तर ते चुकीचेच आहे. बाकी ब्राह्मणाकडून सल्ले घेणे यात काय चुकीचे आहे ? प्रत्येक धर्मात काही लोक असतात ज्यांचा सल्ला इतर लोक घेतात. चांगले आणि वाईट दिवस ते शोधून देतात(मुहूर्त ह्या अर्थाने) आणि त्यानुसार सल्ला मागणारा माणूस निर्णय घेऊ शकतो. ब्राह्मण काही त्यांना सक्तीने बोलावून घेत नाहीत आणि अमकी तमकी गोष्ट कराच अशी सक्ती करू शकत नाहीत.(एखाद्या गोष्टीची भीती घालणे हे एक अजूनच वेगळे प्रकरण आहे, आणि त्याला कुठलाच धर्म अपवाद नाही.... अमके तमके नाही केलेस तर तुझे वाईट होईल वगैरे वगैरे)
देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे.
हे हिंदू करतात ? ह्याचा काही विदा आहे का ? म्हणजे फक्त हिंदूच असे करतात ह्याचा काही विदा/ पुरावा आहे का ? माझ्या मते तुमचे हे विधान हे सरसकटीकरण आहे. माझ्या माहितीतही मध्ये किती लोक असे आहेत कि त्यांनी खूप रक्कम दान केली आहे आणि तिचा विनियोग त्याच कारणासाठी होतो आहे हे ते बघतात. हे सगळे हिंदू आहेत. (अवांतर : काही लोक दुसर्याने त्याच्या पैशाचे काय करावे हे ज्या आग्रहीपणे मांडतात ती गोष्ट मला फार खटकते. "इतका पगार कमावतोय, दिले *** रुपये दान तर काय जातेय ह्याचे!" असे अगदी सहज बोलून जातात. मुळात दुसर्याने त्याच्या संपत्तीचे काय करावे हे ठरवणारे आपण कोण हा विचार हे लोक कधी करणार देव जाणे. तो माणूस दान देईल/ पैसे खर्च करेल/ उधळेल नाहीतर कुजवून ठेवेल, आयजीच्या जीवावर बायजी उदार कशाला ? असो.) बाकी गरजू गरजू म्हणवणारे सगळेच प्रत्यक्षात गरजू नसतात हे सुद्धा काही अनुभवातून दिसून येते. त्यामुळे हे ज्याच्या त्यावर सोडून द्यावे हेच खरे.
जातपात पाळणे
हि गोष्ट चुकीची आहे, पण फक्त हिंदूंमध्ये हे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.इस्लाम ह्या शब्दाखातर सर्व मुस्लिम एकत्र येत असले/ येऊ शकत असले तरी त्यांच्यात पण एकी नाही.सुफी आणि शिया ह्यांची भांडणे आहेतच. अहमदिया मुस्लिमांना इतर मुस्लिम हे मुस्लिम मानत नाहीत असे ऐकले आहे. बोहरा मुस्लिम हे व्यवसायात जास्त असल्याने त्यांच्यात कर्मठपणा त्यामानाने कमी आहे आणि लवचिकपणा सुद्धा आहे.जातीपाती तर प्रत्येक धर्मात आहेत, गोव्यातल्या ख्रिश्चनांमध्ये पण सारस्वत ख्रिश्चन वेगळे आणि बाकीचे वेगळे असे ऐकले आहे. प्रोटेस्टंट वेगळे, कॅथॉलिक वेगळे हा भेद आहेच. त्यामुळे फक्त हिंदू धर्मातच जातीपाती आहेत असे जर तुम्ही म्हणत असाल तर ते संपूर्ण सत्य नाही. हिंदू धर्म लवचिक आहे हे मानण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा. सर्वसामान्यपणे माझ्या धर्मात ज्या गोष्टी पाळल्या जातात त्यांना विरोध करण्याचे मला स्वातंत्र्य आहे ही एक फार मोठी बाब आहे. मला हवा तो ग्रंथ मी प्रमाण मानू शकतो, त्याप्रमाणे आचरण करू शकतो, काही दिवसांनी त्यातल्या काही गोष्टी नाही पटल्या तर सोडून देऊ शकतो, किंवा दोन विचारप्रवाहांमधून माझा माझ्यापुरताच एक स्वतंत्र आचरण मार्ग तयार करू शकतो. अशा प्रकारचे स्वातंत्र्य दुसऱ्या कुठल्या धर्मात असेल असे वाटत नाही( हा स्वधर्माचा दुराभिमान नाही). तुम्ही बाकीच्या धर्मांवर अश्या प्रकारचा लेख लिहिला असेल तर त्याची लिंक द्यावी.

In reply to by अर्थहीन

देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे..
लोकसत्ते मार्फत चालावला जाणारा "सर्वकार्येशु सर्वदा" नावाचा उपक्रम आणि त्या अंतर्गत लोकांचा येणारा मदतीचा ओघ पहा.

मी फटू आहे , माझी फाटे आणि म्हणूनच मला तुलनेबे बारा हिंदू भर वाटतो झाले समाधान ?? तुमची लाल , कलाम लाल !!

तिसरं आणि चौथं याबद्दल मात्र शंका आहे. तिसऱ्याबद्दल जास्त. तिसरं कारण म्हणून तुम्ही जे मांडलंय त्याला trickle down theory म्हणतात. प्रामुख्याने अर्थशास्त्रात तिचा बराच प्रभाव होता. या theory नुसार जर श्रीमंत देशांनी गरीब देशांबरोबर व्यापार वाढवला तर श्रीमंत देशांमधली संपत्ती तिथे झिरपेल किंवा trickle down होईल. काळाच्या ओघात असं आपोआप होणार नाही हे सिद्ध झालंय. बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक यांच्यातही तसं आपोआप होण्याची शक्यता कमी आहे, rather नाहीच. जर १. अल्पसंख्यांक समाज बहुसंख्यांकांच्या जीवनशैलीला आपल्या जीवनशैलीवरचं आक्रमण समजायला लागला आणि २. अल्पसंख्यांक समाज जर आपल्या कमी संख्येमुळे स्वतःला असुरक्षित समजत असेल तर - असा समाज स्वतःला बहुसंख्यांपासून जाणीवपूर्वक वेगळं ठेवायचा प्रयत्न करेल. मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्ड आणि देवबांदी धर्मगुरूंनी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विरोध केलाय त्यामागे हेच कारण आहे. त्यामुळे असा समाज आपोआप लिबरल होणं शक्य नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मुख्यतः स्त्रियांची परिस्थिती सुधरावी लागेल कारण कोणत्याही सामाजिक सुधारणा या स्त्रियांशिवाय होऊच शकत नाहीत. चौथं कारण फारच आशावादी वाटलं मला. आॅनर किलिंगच्या ज्या दुर्दैवी घटना आपल्या देशात आणि हिंदूंमध्ये झालेल्या आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं की हिंदू समाजही पूर्णपणे प्रागतिक किंवा पुरोगामी झालेला नाही. शहरांत कदाचित सुरूवात झाली असेल. गावांत अजूनही वेगळी परिस्थिती आहे. मी एका तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंजिनियरिंग काॅलेजच्या वसतिगृहात ४-५ जातींचे वेगळे गणपती बसलेले पाहिले आहेत. बसवणारी मुलं १९-२० वर्षांची. एवढ्या लहान वयात जर जात डोक्यात पक्की बसली असेल तर ती पुढे निघून जाणं फार कठीण आहे. त्यामुळे दुसरा धर्म सोडा, आपल्या धर्माचे लोक ऐकून घेतील असंही नाही. हिंदू धर्मात तर असंख्य मतप्रवाह आणि विचारधारा असल्यामुळे धर्माच्या स्वरुपाबाबत एकमत होणं हे जवळपास अशक्य असावं.

In reply to by बोका-ए-आझम

सहमत आहे बोक्याभाऊला आमच्या, ट्रिकल डाउन शक्य नाही कारण मुळात भारतात अल्पसंख्य लोक अब्राहमीक धर्मांचे किंवा सेमिटीक धर्माचे आहेत, ह्या मंडळींचे पूर्ण आयुष्य आजही 1200-2000 वर्षे आधीच थांबलेले आहे, ते ही एकाच पुस्तकाभोवती थांबलेले आहे. अश्यात बहुसंख्य लोकांनी कितीही ट्रिकल डाउन केले तरी ते शोषून घ्यायची वृत्तीच मुळात नसली तर पंचायत होते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अजून एक, सेमिटीक धर्मांतील अचल वृत्ती पाहता हिंदू धर्म हा अतिशय वेगवान अन प्रवाही वाटू शकतो, किंबहुना काही प्रमाणात आहेच तरीही २१व्या शतकात माहिती/ज्ञानाचा महास्फोट झाल्यानंतर मात्र विलक्षण जास्त वेगाने धावणाऱ्या मानवी मेंदू पेक्षा ही प्रवाहगती फारच धीमी असल्याचे जाणवते.तस्मात हिंदूधर्मातही टिकेला स्कोप बराच उरला आहे

In reply to by बोका-ए-आझम

सर धर्माचं आणि अर्थशास्त्राचा तत्वज्ञान वेगवेगळं आहे... याला एका धाग्यात गुंफत येईल असं मला वाटत नाही...! ... Law बोर्ड काहीही म्हणेल त्यांना अजून फार दिवस पाहिल्याइतकंच महत्व राहील असं मला खरंच वाटत नाही... माझे कित्येक मुसलीम मित्र आहेत जे पूर्णपणे भारतीय Way Of Life जगतात... ट्रिकल डाउन होत नाही असं मानलं तर मग आज कित्येक भारतीय मुलीनी बुरखा फेकून जीन्स अन टॉप का स्वीकारले... अन बहुसंख्यामुळे हे होत नाही असं मानलं तर पाकिस्तान इराण इराक मध्ये आजही का एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरखा का अस्तित्वात आहे?? सॉरी मुद्द्याशी असहमत...