Skip to main content

मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो? -- 4 कारणे

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 10/10/2016 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
4 कारणे... // --------------------------------------------------------------------------- पहिलं कारण- संख्या. या देशात 80 टकक्यांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदुची आहे. नॅचरली- कोणत्याही धर्मावर होणाऱ्या टोटल टीकेपैकी -80 टक्के टीकासुद्धा -मेजोरिटी फॉलो करत असलेल्या धर्मातल्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलच होणार. याईतकं साहजिक काय? उदाहरणार्थ. हेच जर अमेरिका किंवा यूरोपमधलं घेतलं तर- तिथले प्रोग्रेसिव लोक करत असलेली टिका- बहुसंख्य वेळा ख्रिश्चनिटी 'च्याच' विरोधात असते. अमिरिकेतले ख्रिश्चन लोक, तिथल्या अल्पसंख्य हिंदू धर्मावर टिका करून काय मिळवणार? ---तसंच भारतात आपण अत्यल्प असलेल्या ख्रिश्चन धर्मावर --टोटल टिकेच्या 50 टक्के टिका करून काय मिळवणार?? --------------------------------------------------------------------------- दुसरं कारण: मी जन्मलो -त्या धर्मातल्या लहानपणापासून पाहत आलेल्या चुक बरोबर अशा साऱ्या गोष्टी बद्दल बोलताना मला नेचुरल कॉन्फीडेंस असतो. मी ठामपणाने एखाद्या गोष्टीला चुक तर चुक किंवा बरोबर तर बरोबर म्हणू शकतो. हेच मी (पुरेशा अभ्यासा अभावी) दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना थोडासा तरी कचरेल... उदाहरणार्थ. मी हिंदू आहे अन जर मला इस्लामच्या ईद-उल-अध वर (हे नाव सुद्धा बरोबर आहे की नाही मला ठाऊक नाही) -टिका करायची म्हटलं-- तर त्याआधी ती मुळात साजरी का केली जाते?? याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार. या विरुद्ध -मी ज्या हिन्दू धर्मात जन्माला आलो त्यात फॉलो होणाऱ्या अंधश्रद्धा, जात-पात, भोंदू बाबा, फुकटे पुजारी, अंगात येणे, या चुकीच्या गोष्टी मी लहानपणा पासून पाहत आल्याने- यावर टिका करताना स्वत:च्या धर्माच्या (मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे) करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो. प्लस यात परत संख्या कामाला येते. आता 2015 च्या रिपोर्ट नुसार भारतात 80 टक्के हिन्दू 14 टक्के मुस्लीम 2 टक्के ख्रिश्चन 1 टक्का बुद्ध अन इतर 3 टक्के आहेत. त्यामुळे 10 पैकी टिकाकार घेतले तर- प्रत्येक धर्मावर होणारी टिका साहजिक अशी असेल... हिंदू 8% मुस्लीम 1.4% ख्रिश्चन 0.2% अन बुद्ध 0.1% म्हणजे हिंदू धर्माची होणारी समीक्षा 'कठोर' असणार यात वाद नाही. --------------------------------------------------------------------------- तिसरं कारण: मेजोरिटीचा-- माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम. म्हणजे कोणत्याही देशातल्या मेजोरिटीचं जेवढं रॅशनलायजेशन, सेक्युलरिजेशन आणि लिब्रलायजेशन होईल- तेवद्याच प्रामाणात त्या त्या देशातल्या माइनोरिटीजचंही -थॉट एंड बेहविरियल लिब्रलायजेशन "आपोआप" अन नकळत होईल. "आपोआप" -हा शब्द इथं फार महत्वाच्या आहे- कारण ही प्रोसेस अतिशय इम्प्लीसीट आहे. ठरवून न करता केलेली. अतिशय सोपं उदाहरण म्हणजे समजा 10 पोरांत 8 जन हुशार आहेत अन 2 थोड़े ढ. --तर त्या 2 ढ मधल्या, या 8 च्या संगतीत राहून ,एक तरी पोरगा हुशार होण्याची शकयता जास्त असते. And vice-a-versa! म्हणजे केरळ मधला मुस्लीम अन बिहारचा मुस्लीम यात साहजिक फरक असणार आहे. तसाच भारतातला मुस्लीम अन पकिस्तानला मुस्लीम यात खुप फरक असणार आहे. "माझ्या engg च्या वर्गातल्या, कित्येक मुस्लीम मूली इतर मुलींसारखं जीन्स टॉप घालायच्या." तेच पकिस्तान मधल्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना तिथे इंजिनिअरींग पर्यंत 'शिकू तरी देत असतील का?' हाच मला प्रश्न आहे. म्हणून हिंदू-- म्हणजे या देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही. --------------------------------------------------------------------------- चौथं कारण. माझी टिका ही --माझा धर्म धुसमसत का होईना पण स्वीकारेल. पण दुसऱ्या धर्मातल्या कोणी माझ्या धर्मावर केलेली टिका (मग ती कितीही बरोबर असली) तरी ती- माझा धर्म स्वीकारेल का? उदाहरणार्थ: एखादा मुस्लीम म्हटला की "काय तुमच्या हिन्दू धर्मात ते फालतू अंगात येणे अन असले काय काय प्रकार असतात." आता अंगात येणे हा प्रकार कितीही खोटा असला तरी त्याबद्दल ची टीका मी एका मुस्लीमाकडूम (प्रैक्टिकली बोलताना) स्वीकारेल का??? कुठेतरी मनातल्या मनात मी त्याला 'आउटसायडर' च मानेल. मग मी त्याला काय उत्तर देईल की "आधी तुम्ही त्या बुरख्याचा फाल्तुपना बंद करा- आता आपण ईसवी सन 2016 मधे आहोत. ईसवी सन - 216 मधे नाही". प्रसंगी मी त्याच्या अंगावर सुद्धा जाईल. हिंसक होईल. पण हेच एक हिंदू म्हणून मी म्हटलो की "काय यार आपल्या धर्मात हे अंगात येणे काय -अन जातीयवाद पाळने काय- प्रकार बिलकुल फालतू आहेत." तर समोरचा व्यक्ती माझा विरोध् करेल. पण शेवटी टोकाला न जाता किंवा हिंसक न होता -- गप्प बसेल. कारण त्यांच्यासाठी मनातल्या मनात मी कुठेतरी "इनसायडर" असतो. त्यामुळे प्रोग्रेसिव हिंदू म्हणून -माझी हिंदू धर्मावर (कंपेरिटीवली जास्त) टिका होते.. . माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे... // (Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) ) Article is inspired from T Manoj's view on religion...

वाचने 21989
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

In reply to by अर्थहीन

धर्माचं आणि अर्थशास्त्राचा तत्वज्ञान वेगवेगळं आहे... याला एका धाग्यात गुंफत येईल असं मला वाटत नाही...!
असहमत. धर्म आणि अर्थ हे दोन्हीही जीवनशैली ठरवतात. त्यामुळे त्यांचं तत्वज्ञान वेगवेगळं असू शकत नाही. नीतिमत्ता किंवा ethics याला धर्म आणि अर्थशास्त्र या दोन्हींमध्ये स्थान आहे.जागतिक पातळीवर इस्लामचं, विशेषतः वहाबी इस्लामचं मूळ सौदी अरेबियामध्ये आहे आणि सौदीच्या आर्थिक संपन्नतेचा आणि तिथल्या कडवेपणाचा संबंध नक्कीच आहे. हुप्प्या यांची मक्केतील उठाव ही मालिका याच विषयावर आहे. ती वाचा.
Law बोर्ड काहीही म्हणेल.त्यांना अजून फार दिवस पाहिल्याइतकंच महत्व राहील असं मला खरंच वाटत नाही...
फार दिवस हा फार गोंधळात टाकणारा शब्दप्रयोग आहे. जोपर्यंत आपल्या देशात समान नागरी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत AIMPLB (All India Muslim Personal Law Board) ला महत्व आहे. ते आत्ताच तलाकच्या मुद्द्यावरुन सरकारशी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. त्यावरून काही तडजोड झालीच तर त्याला वेळ लागेल. समान नागरी कायद्यासाठी प्रत्येक राज्याची मंजुरी लागेल. झालंच तर आपल्या देशात कायदा मंजूर होणं आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणं यात फरक आहे. त्यामुळे इथेही असहमत.
माझे कित्येक मुसलीम मित्र आहेत जे पूर्णपणे भारतीय Way Of Life जगतात
भारतातील मुस्लिम हे भारताचे नागरिक असल्यामुळे त्यांची जीवनपद्धती ही भारतीयच म्हणायला पाहिजे. झालंच तर आपल्या देशात प्रचंड विविधता असल्यामुळे भारतीय way of life या गोष्टीला भारतीय जेवण या गोष्टीसारखाच विशिष्ट अर्थ नाही. झालंच तर तुमच्या मित्रांवरुन सर्व मुस्लिम समाजाबद्दल अनुमान कसं काढणार?
ट्रिकल डाउन होत नाही असं मानलं तर मग आज कित्येक भारतीय मुलीनी बुरखा फेकून जीन्स अन टॉप का स्वीकारले
असं झालंय पण त्याच बरोबर अनेक मुस्लिम मुली identity म्हणून हिजाब वापरायला लागल्या आहेत. पण त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. झालंच तर काॅलेजमध्ये किंवा आॅफिसमध्ये आल्यावर हिजाब न वापरणाऱ्या आणि घरी जाताना वापरणाऱ्या अनेक मुली आणि स्त्रिया आहेत. शिवाय हिजाबपासून पूर्ण सुटका नाहीच झालेली. टेनिस कोर्टवर खेळण्याचा पोषाख आणि बाहेर हिजाब घालणाऱ्या सानिया मिर्झाचा फोटो पाहिला असेलच तुम्ही.
बहुसंख्यामुळे हे होत नाही असं मानलं तर पाकिस्तान इराण इराक मध्ये आजही का एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरखा का अस्तित्वात आहे??
पाकिस्तान, इराण आणि इराक हे इस्लामिक देश आहेत. इस्लाम हा तिथला अधिकृत धर्म आहे. भारताप्रमाणे हे देश धर्मनिरपेक्ष नाहीत. त्यामुळे तिथल्या स्त्रियांवर हिजाब आणि चादोरची (विशेषतः इराणमध्ये) सक्ती आहे. मीना प्रभूंच्या गाथा इराणी या प्रवासवर्णनात आणि आतिवास यांच्या भय इथले या अफगाणिस्तानमधील प्रत्यक्ष अनुभवांवरील पुस्तकांत याचा स्पष्ट उल्लेख आहे. परकीय स्त्रियांनाही हे नियम पाळावेच लागतात. त्यामुळे तुमच्या या मुद्द्याशीही असहमत.

In reply to by chitraa

मोगा खान नुसता हिजाब/ चादर वापरण्याची सक्ती असेल तरीही त्या स्त्रीला स्वतःच्या मताप्रमाणे कपडे वापरण्याची परवानगी नाही हेच सिद्ध होत नाही का? बाकी समान हक्क कुराणातच नाहीत. मग व्यवहारात कुठून येणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? उत्तर आफ्रिका ते कोरिया या प्रचंड पट्ट्यात (इस्रायल आणि भारत सोडल्यास) कोणत्याच देशात लोकशाही नाही. (बाकी सगळे इस्लामी बहुल देश आहेत आणि इस्लामला लोकशाही मान्य नाही) समान हक्क पुरुषांनाच नाहीत स्त्रियांना कुठून येणार.

In reply to by सुबोध खरे

हिजाब वापरूनही / सक्ती असुनही त्या देशात वुमन लिटरसी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. अ‍ॅवरेज एज ऑफ वुमन अ‍ॅट मॅरेजही आपल्यापेक्षा जास्त आहे. बाहेर फिरताना बुरखा वापरुन हस्पिटलात रेगुलर नाइट ड्युटी करणारे स्टाफ मला माहीत आहेत... घरी परवानगी देत नाहीत म्हणुन नाइट ड्युटी टाळणारे इतर धर्मियही असतात. तात्पर्य : नुसता बुरखा असणे नसणे या एकाच फ्याक्टरवर काही ठरत नाही , पण अशी सक्ती नसावी , हेही मान्य आहे.

In reply to by chitraa

हिजाब वापरूनही / सक्ती असुनही त्या देशात वुमन लिटरसी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे
मान्य.
अ‍ॅवरेज एज ऑफ वुमन अ‍ॅट मॅरेजही आपल्यापेक्षा जास्त आहे.
मान्य. पण का? इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. नंतरच्या ८ वर्षांच्या इराण-इराक युद्धाने तर देश डबघाईला आला. त्यामुळे स्त्रियांना घराबाहेर पडून काम करणं अनिवार्य झालं. एक पिढी युद्धात नष्ट झाली. त्यामुळे साहजिकच पुढची पिढी लग्नाच्या वयात यायला वेळ लागला. दुस-या शब्दांत सांगायचं तर हे परिस्थितीच्या रेट्याने झालं. तिथल्या राजवटीने आपणहून घडवून आणलं नाही. तसं करणारा एकच माणूस. तुर्कस्तानचा मुस्तफा केमाल अतातुर्क. बाकी कुठल्याही इस्लामिक देशाने आपणहून स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही केलेलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

असेल. सौदी अरेबियातही असेच आहे... त्याचे क्रेडिट कोणत्या युद्धाला द्यायचे ? https://en.wikipedia.org/wiki/Education_in_Saudi_Arabia#Literacy According to the World Bank, there is gender disparity in literacy rate. In 2007, 85.0 percent of adult (people ages 15 and above) are literate and 98.1 percent of youth (people ages 15 – 24) are literate, 89.1 percent of male adults are literate and 79.4 percent of female adults are literate. As for youth literacy rate (people ages 15 – 24), 97.0 percent is literate, 98.1 percent of male youths are literate, and 95.9 percent of female youths are literate.[37] One of the World Bank reports suggested the relatively high adult literacy rate of Saudi Arabia, considering the continued low level of primary enrollment, derived from the successful use of religious organizations, particularly local mosques and local religious institutions such as Koranic schools for the provision of ancillary educational services, which is a trend of particular note in the MENA region.

In reply to by chitraa

सौदी अरेबियाची भाषा अरेबिक, कुराणाची भाषा अरेबिक. म्हणजे एवढी सगळी साक्षरता फक्त एका भाषेपुरती आहे. तीही सक्तीची. अजून एखादं उदाहरण आणलंत तरी तिथे तेच सापडेल. तुर्कस्तान हा अपवाद. एक वेळ स्त्रियांच्या शिक्षणाचा मुद्दा जरी मान्य केला तरी नंतरचा भेदभाव नाकारता येणार नाही. एका शिक्षणाच्या मुद्द्याने बाकीचे सगळे अन्याय समर्थनीय ठरतात असं तुम्हाला वाटत असेल तर बोलणंच खुंटलं.

In reply to by बोका-ए-आझम

त्यांची मातृभाषा व्यवहाराची भाष जी असेल तीच ते शिकणार ना ? नुस्त्या युद्धात पुरुषांच्या मरण्याने बायका साक्षर होतात तर महाभारत युद्धानंतर भारत हा विश्वातला टॉप स्त्री साक्षर देश झाला असता !

In reply to by chitraa

भारतात स्त्री शिक्षण नव्हते / बायका सती जात होत्या. का ? अहो , युद्ध्हामुळे .. तरुण पुरुष मरायचे , मग बायका सती जायच्या . इराणात स्त्रीशिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. का ? अहो , युद्ध्हामुळे .... तरुण पुरुष मरायचे , मग बायका शिकून नोकरी करायला लागल्या !

In reply to by chitraa

तुमचे काही प्रतिसाद विचार करायला लावणारे असतात पण दरवेळी नुसती टीकाच उपयोगी नसते असे वाटते... बुरखा अथवा हिजाब घालायला भाग पाडणे हे बंधनाचेच प्रतीक आहे, हे तर मान्य असेल आपल्याला... आता तुलनेने आपल्याकडे त्यापेक्षा थोडे अधिक स्वातंत्र्य आहे असे म्हणता येईल, अर्थात हिंदू धर्मात वेगवेगळ्या जाती आपला अभिमान धरून असतात आणि त्याच्या नावाखाली आमच्या घरातल्या स्त्रिया अंगाचा एक भाग हि दिसणार नाही(किंवा कमीत कमी दिसेल) अशा साड्या/कपडे घालतात हे अभिमानाने सांगितले जाते. पर्यायाने स्त्रियांवर नकळत तसेच कपडे घालण्याचे बंधन येते, याला आपण संस्कार देखील म्हणू शकतो कारण अंग प्रदर्शन आपल्याकडे सभ्य मानले जात नाही. त्यात फारसे काही वावगे देखील वाटत नाही कारण प्रत्येक पाश्च्यात पद्धत अंगीकारणे म्हणजे प्रगत होणे नाही! आता काळानुसार हे अभिमान देखील पुसट होत चालले आहेत आणि स्त्रियांना त्यांच्या अधिकारांबद्दल मोठ्या आवाजात बोलणे शक्य होत आहे. हीच गोष्ट हिजाब अथवा बुरखा याबद्दल होऊ शकते. इस्लाम मध्ये विरोधाचा हा आवाज इतका मोठा आहे का? हे हि त्या धर्मातल्या प्रगतिशील लोकांनी पाहायला हवे...

In reply to by शब्दबम्बाळ

हिजाब हे बंधन म्हणता म्हणता अंगभर साडी नेसून अंग झाकणे याला मात्र शालीनता ठरवुन मोकळे झालात ! अंग झाकणे ही शालीनता असेल तर हिजाब , पदर , नऊवारी , पल्लो वगैरे ज्या त्या धर्म आणि संस्कृतीचा प्रश्न झाला. मूळ तत्व सारखेच असेल तर बाह्यरुपावरुन वाद घालणे हास्यास्पद होइल. राहिता राहिला आवाजाचा प्रश्न ! तर आमच्या धर्मात आवाज जास्त आहे वगैरे जे बोलताय तो आवाज यायला दहा हजार वर्षे जावी लागली आहेत. त्यासाठी अनेकाना शेणगोळे , दगड , निखारे खावे लागले आहेत.

In reply to by chitraa

आपण प्रतिसाद नीट वाचलात का? मी साडीचे उदाहरण देऊन झाल्यावर खाली "हीच गोष्ट हिजाब अथवा बुरखा याबद्दल होऊ शकते." हे लिहिले आहे. उगाच काहीतरी पूर्व ग्रह धरून अर्थ लावू नका... पण मूळ मुद्दा हा मांडला होता कि बदल होतोय. त्याला किती हजार वर्षे गेली तितकीच वर्ष झाली कि मग मुस्लिम परिवर्तनाला सुरुवात करणार आहेत का? तसे म्हणणे असेल तर मग झालंच!

In reply to by chitraa

तरी वडाची साल पिंपळाला लावणं काही जात नाही. महाभारत युद्धानंतर कशाला, युद्धाच्या वेळीच आणि त्याच्या आधीही भारतातल्या स्त्रिया साक्षर असणार. पण इस्लामी आक्रमणामुळे स्त्रियांवर बंधनं आली. बाकी इराणमध्ये युद्धात एक पिढी मारली गेल्यामुळे जी आर्थिक आपत्ती आली,त्यात स्त्रियांना शिक्षणाची आणि नोकरी करण्याची परवानगी तिथल्या सरकारला द्यावी लागली ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही हिंदूंना सुधरायला दहा हजार वर्षं लागली वगैरे जे म्हणताय त्याला तर काहीही आधार नाही. माणसाने १०,००० वर्षांपूर्वी शेती सुरु केली. तेव्हा धर्म ही संकल्पना जशी आज मानली जाते तशी नसावी. सती वगैरे चालीरीती फार नंतर आलेल्या आहेत. जेमतेम हजार वर्षे. दहा हजार वर्षांपासून वगैरे जे पालुपद तुम्ही तुमच्या प्रत्येक अवतारात आळवता ते साफ चुकीचं आहे. असो. Psuedo-science प्रमाणेच psuedo-history हाही प्रकार असतो हेच तुम्ही सिद्ध करताय. बाकी काही नाही.

In reply to by बोका-ए-आझम

काही झालं तरी इस्लामी आक्रमण व मेकॉले हेच जबाबदार. सतीप्रथा रामायण महाभारतापासून आहे. तेंव्हा , माझ्या माहितीनुसार तरी , मोघल इंग्रज नव्हते.

In reply to by chitraa

हा दहा हजार वर्षे एवढा जुना आहे का? रच्याकने अनेक रामायणं लिहिली गेली आहेत. तुलसीरामायण, भावार्थ रामायण वगैरे. ए.के.रामानुजम यांचा त्यावर अत्यंत प्रसिद्ध लेख आहे. महाभारतातही अनेक गोष्टी नंतर समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सती प्रथाही अशीच नंतर समाविष्ट करण्यात आलेली असू शकते. शिवाय महाभारतात सती ही ऐच्छिक दाखवली आहे. माद्री सती जाते, कुंती जात नाही.(इथे रामायण आणि महाभारत हे प्रत्यक्षात घडलं असावं असं मानलेलं आहे) नंतर शिवकाळात शिवाजीमहाराजांचे वडील शहाजीराजे मरण पावल्यावर जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं. बंगालमध्ये होत असावी, कारण १८२९ मध्ये जो सतीवर बंदी घालणारा कायदा लाॅर्ड बेंटिकने केला तो राजा राममोहन राॅय यांच्या अाग्रहावरुन केला असणार. काहीही असो. १०,००० वर्षांपूर्वी धर्मच नव्हते, त्यामुळे त्याच्या नावावर चालणारा फालतूपणाही नव्हता. आणि इस्लामी आक्रमण हे जोहार अाणि सती यासारख्या प्रथा लोकांमध्ये रुजायला जबाबदार आहेच. वस्तुस्थिती आहे. नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही १०,००० वर्षे ही जी जुनी record लावताय ती बंद करा. उलट त्यामुळे आयडी बदलला तरी लगेच पकडले जाताय तुम्ही.:)

In reply to by बोका-ए-आझम

जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं. जिजाऊ सती गेल्या नाहीत म्हणुन महाराष्ट्रात सती नव्हती हे वाक्य तुमच्या एरवी असणाऱ्या जबरी विश्लेषणात्मक लिखाणाला सूट होत नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नंतर शिवकाळात शिवाजीमहाराजांचे वडील शहाजीराजे मरण पावल्यावर जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं.
सतीची सक्ती होत नव्हती असं म्हटलंय. स्त्रिया सती जाणं हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असावं. पेशवाईतही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या आई गोपिकाबाई पती नानासाहेब पेशव्यांच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत पण माधवरावांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. अजून एक पुरावा म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थिनी या विधवा होत्या. त्यांनी दत्तक घेतलेले पुत्र यशवंतराव (चूभूद्याघ्या) यांची जन्मदात्री आई ही त्यावेळी विधवा होती. सतीसारखी प्रथा जर त्यावेळी असती आणि ज्या अमानुषपणे ती बंगालमध्ये होती, तशी असती तर त्याविरूद्ध ज्योतिबा नक्कीच उभे राहिले असते. पण तसं वर्णन त्यांच्या वाङ्मयात आढळत नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

http://www.misalpav.com/node/22806 हा जयंतकाकांचा २०१२ च्या श्रीगणेश लेखमालेत लिहिलेला लेख आहे. दीड-दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राबद्दल असलेलं हे वर्णन आहे. त्यात स्त्रिया सुशिक्षित असल्याचं वर्णन तर आहेच, पण सती हा शब्द कुठेही सापडत नाही. स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्यही होतं. मग हा सगळा माहोल उध्वस्त होऊन स्त्रियांवर एवढी बंधनं का लादण्यात आली? इस्लामी आक्रमण हेच कारण दिसतं. १०,००० वर्षांपूर्वी स्त्रिया सती जात होत्या हा तर खोटारडेपणा आहे आणि त्याला कुठचाही ऐतिहासिक आधार नाही हे आमच्या नेहमीच्या यशस्वी डू आयडींना समजेल अशी आशा.

In reply to by बोका-ए-आझम

महाभारतात माद्री सती गेली , कुंतीही जाणार होती. पण तू मुलांकडे बघ असे सांगून माद्रीने तिला परावृत्त केले. सती जाण्यामागे / न जाण्यामागे अशी अनेक कौटुंबिक कारणे असायची. बाहेरील कारणांमध्ये मुस्लिम आक्रमण हे एक कारण असू शकेल , पण सती प्रथेची सुरुवात व्हायचे ते नक्कीच कारण नव्हे. मराठ्यानी १६७० ला राज्य स्थापले ना ? नंतर पेश्वेही मोघलाना मार देत फिरत होते ना ? आणि तो औरंग्या ? तो तर बिचारा बुडाला ना ? आणि तरीही बंगालमधल्या स्त्रीया अशिक्षित राहिल्या किंवा पुण्यातील पेश्वीण सती गेली तर त्याला मोघलच जबाबदार का ? बरं , मोघलांची भिती फक्त रमाबाईनाच ? गोपिकाबाईना का नव्हती म्हणे ? औरंगजेबानंतरच जर मोघलाईला उतरती कळा लागली , तर सती अ‍ॅक्ट १८२७ ला का आला म्हणे ? तेंव्हा कोणते क्रूर मोघल सत्तेत होते म्हणे ? मोघलांच्या भितीने विधवा जाळून घेत होत्या म्हणे ! सधवा कुमारिका याना मोघल पळवुन नेत नव्हते की काय ? तो मेघदूताचा पुरावा ऐकुन तर धन्यच झालो ... प्रेमकाव्यात तरुणी , घट , बगिचा , मद्य , मोर हेच लिहिले जाणार ना ?की वरुन जाणार्‍या मेघाने खाली स्मशानात एका विधवेला लोक भाल्याने टोचुन चितेत ढकलत होते , याचे वर्णन करायला हवे होते ?

In reply to by chitraa

तुमसे न हो पायेगा! तुम्ही denial mode मध्ये आहात. अशा वेळी माणसाला सहानुभूतीची गरज असते. ती आहेच आमच्याकडून. Enjoy!

In reply to by chitraa

पण अशी सक्ती नसावी , हेही मान्य आहे. तोबा तोबा इस्लाम खतरे मे है . जिहाद करो मोगाखानने कुराणाविरुध्द भाष्य केले. कुफ्र बेमुकद्दस लाहोल वला क़ुवत

आता काय करणार हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त दुसर्या धर्म बाबत लिहिले तर रासुका लागू शकतो.(उत्तर भारतात अनेक लोक जेलमध्ये बंद आहेत). हिंदू धर्म रुपी गंगा नदीत घाण टाकण्याची आणि स्वच्छ करण्याची परवानगी प्रत्येकाला आहे. शिवाय आपल्या देशात हिंदू धर्म विरुद्ध लिहिणार्यांना पुरोगामी, सेकुलर, प्रगतीशील इत्यादी उपाध्या आणि सम्मान हि मिळतात.

अर्थहीन, तुमचा लेख वाचला. एक प्रश्न पडला आहे. आपल्या शरीराने आयुष्यभर घाण उत्पन्न केल्याखेरीज दुसरं काहीही केलेलं नाहीये. मग शरीरावर लोकं का टीका करंत नाहीत? उलट त्याला सुखावण्यासाठी लोकं कितीतरी मेहनत करतात. ते इतकं प्रिय का असतं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हा लेख वाचून असा प्रश्न का पडला, हा प्रश्न मला पडलाय! :) "घाण" म्हणजे काय? शरीराने उत्पन्न केलेल्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकच नाहीत का? निसर्गाने बहाल केलेल्या गुण अवगुणांशिवाय शरीर वेगळे काही "निर्माण" करू शकते का? मग शरीरावर टीका कशासाठी करावी? "देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर" आणि कदाचित त्या आत्म्याला टिकवण्यापायी देहाची आपसूकच काळजी घेतली जात असावी!

In reply to by शब्दबम्बाळ

शब्दबम्बाळ, तुमचा प्रश्न अत्यंत समर्पक आहे. किंबहुना तो कोणीतरी विचारावा याच हेतूने उपरोक्त संदेश टाकला होता. जसं शरीराचं नैसर्गिक वर्तन असतं अगदी तस्संच मनाचंही नैसर्गिक वर्तन असतं. ज्याप्रमाणे शरीरावर टीका करून उपयोग नसतो, त्याचप्रमाणे धर्मावर टीका करूनही काहीच साध्य होत नाही. शरीराचे व्यापार बिघडले तर त्यावर टीका करायची नसते. औषध घेऊन रोग दुरुस्त करायचा असतो. त्याचप्रमाणे धर्म ही स्वत: आचरणात आणायची वस्तू आहे. त्याचा रोख इतरत्र जाऊ द्यायचा नसतो. भले इतरांचा धर्म बिघडला असला तरी त्यावर उत्तर म्हणजे आपण स्वत:चा धर्म स्वत:च कसोशीने आचरणात आणणे हे होय. टीका कितीही सयुक्तिक असली तरी तो उपाय नव्हे. बस एव्हढंच. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शरीर घाण करतं कारण ते एक थर्मोडायन्यामिक मशिन आहे. घाण शून्य व्हायला इन्पुट आउटपुट रेशो एक व्हावा लागेल , असे मशीन आस्तित्वात येउ शकत नाही.

मला माझ्या धर्माबद्द्ल केवळ ऐकीव माहिती असते. आजुबाजुचे (कथीत) हिंदू लोक जसे वागतात त्यांचे बघून मी धर्म चांगला की वाईट ठरवतो. एखादी गोष्ट खरोखरीच धर्मसंमंत आहे काय ? हे तपासण्याइतका अभ्यास करण्याची तयारी नसणे / इच्छा नसणे हे ही मी हिंदू असून हिंदू धर्माविरोधात लिहिण्याचे कारण असू शकते. उपनिषदे पुराणे गहन आहेतच पण कमीत कमी मराठीत उपलब्ध असलेले गीता / ज्ञानेश्वरी / तुकोबाची गाथा / रामायण / महाभारत इ. प्राकृत ग्रंथांचा / कथांचा देखील कधीही वारा न लागल्यामुळे देखील मी हिंदू धर्मावर टिका करु शकतो. सगळेच्या सगळे आध्यात्मिक गुरु म्हणजे केवळ भोंदूच किंवा पुजा सांगणारा ब्राह्मण किंवा मंदिरातला पुजारी म्हणजे केवळ दलालच असे आपण स्वतः अगोदरच ठरवून टाकलेले असल्यामुळे देखील आपण स्वधर्मावर टीका करण्यास समर्थ होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'अच्छा जो देखन मै चला अच्छा न मिलिया कोय ! जो दिल खोजा अपना, मुझसे अच्छा न कोय' ही जी आपली धारणा झालेली असते तिच्यामुळेही आपण आपल्या धर्मावर टिका करु शकतो. अशी बरीच कारणे देता येतील. असो. विस्तारभयास्तव थांबतो.

In reply to by धर्मराजमुटके

परफेक्ट मुद्दा, पण मग या सगळ्याचा अभ्यास असणारेच जर काहीही न करता ढिम्म बसत असतील तर? आणि त्यांना काही सांगायला गेलो की लगेच ते सुद्धा वरचेच मुद्दे तोंडावर फेकतात काही गोष्टी या कॉमन सेन्सनेसुद्दा चुकीच्या आहेत हे समजू शकतात त्या बंद करायला पोथ्या पुराणे वाचायची काय आवश्यकता?

काही गोष्टी या कॉमन सेन्सनेसुद्दा चुकीच्या आहेत हे समजू शकतात त्या बंद करायला पोथ्या पुराणे वाचायची काय आवश्यकता? + १ नैसर्गिक न्याय (principle of natural justice) याविरुद्ध असणारी कोणतीही गोष्ट जर धर्माच्या आड लपत असेल तर तिचा त्याग करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रकांड पंडित असायची गरज नाही.

In reply to by सुबोध खरे

कॉमन सेन्स या शब्दावर वेगळी चर्चा होऊ शकते. कारण काहींच्या मते एखादी गोष्ट खूप कॉमन असू शकते तर काहींच्या मते तीच धार्मिक किंवा भावनिक असू शकते ..ठरवणार कसे ? ज्याला त्याला ज्याचे त्याचेच बरोबर वाटणार

In reply to by amit१२३

त्या हिशोबाने मध्यपुर्वेत जे सुरु आहे ते तिथे रहाणार्या जास्तीत जास्त लोकांना मान्य असणारेच आहे...ते सुध्धा बरोबरच म्हणायचे? common sense is not so common

असं म्हणणं जास्त सयुक्तीक ठरेल. यापूर्वीच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, हिंदू ही फक्त एक जीवनपद्धती आहे. माझ्या अल्प माहितीप्रमाणे, इंडस नदीच्या खोर्यातील नागरिकांना परकीयांनी दिलेलं एक नाव. या धर्माला एक बांधीव संरचना, एकच एक देव, एक धर्मग्रंथ आणि एक प्रेषित असं स्वरुप कधीच नव्हतं. नास्तिक किंवा अज्ञेयवादी चार्वाकापासून, मनुस्मृतीवाल्या मनूपर्यंत; मूर्तिपूजक,निसर्गपूजकांपासून, निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप मानणार्यापर्यंत,सगळेच या धर्मात समाविष्ट होऊ शकतात. आपापले विचार अनुयायांसाठी लिखित स्वरुपात ठेवू शकतात. ( पण महाभारताचा एक भाग असलेल्या गीतेला हिंदूंचा एकमेव धर्मग्रंथ म्हणून प्रचलित करण्याचा प्रकार अतार्किक वाटतो़) काळानुरुप राज्यकर्ते, आक्रमक शासक आणि समाजातील प्रभावी व्यक्तींनी नव्या रुढीपरंपरा निर्माण केल्या. जुन्या विस्मृतीत गेल्या. स्त्रीच्या ऋतुप्राप्तीचा समारंभ साजरा करणारा समाज कालांतराने त्याच गोष्टीला अपवित्र समजायला लागला. बौद्ध प्रसारानंतर सर्वाहारी असणार्या लोकांमध्ये शाकाहारींना महत्व प्राप्त झालं. मध्यपूर्वेतल्या आक्रमकांनंतर, विवाहपूर्व अपत्त्यप्राप्ती, बहुपतीत्व, स्त्रियांचं निवडस्वातंत्र्य अशा पुराणकथांना फक्त मनोरंजनमुल्य उरलं आणि योनिशुचिता, गोषापद्धती अशा गोष्टींचं महत्व वाढलं. निरर्थक कर्मकांड, जातिभेद, पुरुषी वर्चस्ववाद अशा सगळ्या अनिष्ट रुढींवर आपण टीका करु शकतो, त्याचप्रमाणे त्या बदलण्यासाठी प्रयत्नपण करु शकतो. कारण हा तथाकथित ''. 'हिंदू' धर्म प्रवाही आहे. तो बदल स्वीकारुन टिकून राहू शकतो.

माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे... हे एक वाक्य वगळता सर्व काहि पूर्णपणे भोन्गळ्पणे मान्डले आहे.

अतिशय सम्यक प्रतिक्रिया! छान विवेचन. हिंदू धर्म केवळ प्रवाही नाही तर सर्व समावेशक आहे. अती-सहिष्णुता हा हिंदूंचा कमकुवतपणा समजला गेला.

जेव्हा डॉक्टर दाभोळकरांना तुम्ही फक्त हिंदू धर्मातलच अंधश्रद्धा निर्मूलन करता का असा प्रश्न विचारला जात असे तेव्हा ते काय उत्तर देत असत ? पहा खालील विडीओ.

1) दुसऱ्या धर्मावर टीका करताना त्याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार मग हेच धोरण हिंदू धर्मा बद्दल का नाही ? काय तर म्हणे मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो ..अरे नुसत्या कॉन्फिडन्स वर टीका करणार. त्या गोष्टी मध्ये तथ्य काय आहे हे जाणून न घेता टीका करणार .वाह 2) 2015 ला कोणता रिपोर्ट दिला गेला कारण जनगणना तर 2011 ला झाली. बाकी आकडे बऱ्यापैकी मिळते जुळते आहेत. 3) माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम. ..माझ्यामते जर आपण छोट्या गोष्टींना बदलू शकत नाही तर मोठ्या गोष्टी बदलणे फार अवघड असते. हाच विचार जर माइनॉरिटी वर केला तर कमी लोकसंख्या असलेले लोकांचे विचार बदलणे हे बहुसंख्य लोकांचे विचार बदलण्यापेक्षा सोपे असेल. 4) हा मुद्दा ठीक आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ तरीही कोणत्याही धर्मावर किंवा प्रथेवर टीका करण्याआधी त्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपली हिंदू संस्कृती हि इतर संस्कृतींपेक्षा खूप प्रगल्भ होती. त्यांना त्या काळात ज्या गोष्टीची माहिती होती त्यांनी ती सण आणि प्रथांद्वारे समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला फक्त कालांतराने सत्य माहित नसल्याने त्या गोष्टीवर अंध विश्वास ठेवून आणि काही चुकीच्या लोकांमुळे त्या गोष्टी विस्मृतीत गेल्या आहेत. त्यामुळे आधी स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि मगच त्याविषयावर आपले तोंड उघडावे. नाहीतरी आपल्याकडे अर्ध्या हळकुंडाने पिवळे जास्तच असतात

देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही.>>>> भाऊ अभ्यास खरंच वाढवा... ह्या देशात फक्त हिंदूच जास्त लिबरल होत गेले आणि मुस्लिम अजून कट्टर... हिंदू कोड बिल आणि शाह बानो माहित नसेलंच बहुदा... वाचा, अभ्यास करा आणि मगच प्रतिसाद द्या... किंवा अर्थातच दुर्लक्ष करण्याचा तुमचा अधिकार अबाधित आहेच. आणि तसाही मी सहिष्णू आहे बरं...

या विरुद्ध -मी ज्या हिन्दू धर्मात जन्माला आलो त्यात फॉलो होणाऱ्या अंधश्रद्धा, जात-पात, भोंदू बाबा, फुकटे पुजारी, अंगात येणे, या चुकीच्या गोष्टी मी लहानपणा पासून पाहत आल्याने- यावर टिका करताना स्वत:च्या धर्माच्या (मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे) करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो.
ये बात कुछ हजम नही हुई. तुम्ही स्वतःच एकदा या वरील वाक्याबाबत नीट विचार करून पहा. अभ्यास न करता टीका करून वर त्यात तुम्हाला कॉन्फिडन्स दिसतो? ह्याला सामान्य बोलीभाषेत फेकुगिरी म्हणतात. अवांतर : अभ्यास आपोआप होतो ? कसा काय ? अभियांत्रिकीचा अभ्यास करावा लागला आणि ते कष्ट (4 वर्ष घासून घासून इंजिनिअर होणे हा शब्दप्रयोग) आठवून डोळे पाणावले बॉ

chitraa,
मोघलांच्या भितीने विधवा जाळून घेत होत्या म्हणे !
म्लेंच्छ आक्रमकांना प्रेताशी संभोग करायची हौस असे. त्यापासून सुटायचा मार्ग म्हणजे सहगमन करणे. महाराजा रणजितसिंहांच्या अनेक स्त्रियांनी चितागमन केलं. त्यात एका मुस्लिम स्त्रीचाही सहभाग होता. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कोणत्या प्रेताशी कोण संभोग करायचे ? तसे असेल तर प्रेत जाळतील ना ? की जिवंत स्त्री जाळतील ?

In reply to by गामा पैलवान

गामा गामा गामा .... म्लेंछ म्हणजे मोघल का ? कुठल्या तरी एका धाग्यावर कुठल्या तरी एका शब्दकोष की ज्ञानकोषाचा पुरावा देऊन म्लेंछ म्हणजे मुसलमान नव्हे , तर कुठल्यातरी हिमालयीन शिवपूजक टोळ्या होत्या , असे काहीतरी आपणच बोलला होतात ना ? आठवते का गडे ? की विस्मरण झाले ? आणि इथे म्लेंछ म्हणजे मोघल असे सांगताय ?

In reply to by chitraa

chitraa, म्लेंच्छ कोपरडीतही सापडतात. आ.न., -गा.पै.

धागा वाचला आणि प्रतिक्रिया पण वाचल्या. एक गोष्ट कळली की "जामोप्या परतुनी आला". =))