वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत.
आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.
एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे.
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted…)
ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said.
“… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army.
Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said.
दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-…
_________________________________________________________________________
असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता.
आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते.
परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत.
आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे.
आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.
वाचने
73322
प्रतिक्रिया
290
मिसळपाव
प्रतिक्रिया
काँग्रेसच्या वाचाळ संजय
भयंकर
In reply to काँग्रेसच्या वाचाळ संजय by श्रीगुरुजी
केजरीवाल व संजय निरूपम
In reply to भयंकर by चौकटराजा
working very hard
In reply to केजरीवाल व संजय निरूपम by मदनबाण
सगळ्या तथाकथित शांतीप्रीय आणि
घरभेदी ........
मला समजत नाहीय
हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे
इतके दिवस फिलिपाईन्स
In reply to हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे by डॉ सुहास म्हात्रे
हे पण "पोश्चरिंग" आहे !
In reply to इतके दिवस फिलिपाईन्स by मदनबाण
हे जरी सत्य असले, तरी वेपन
In reply to हे पण "पोश्चरिंग" आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
जो पर्यंत...
In reply to इतके दिवस फिलिपाईन्स by मदनबाण
असं असेल तर या महान देशाला
In reply to जो पर्यंत... by विकास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृतबाकी मनिला ओबामामामांना सन ऑफ
In reply to असं असेल तर या महान देशाला by मदनबाण
पाकिस्तान चे राष्टीय चारित्र्य
In reply to हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे by डॉ सुहास म्हात्रे
कृपया वारांगनांचा अपमान करू
In reply to पाकिस्तान चे राष्टीय चारित्र्य by lakhu risbud
कृपया वारांगनांचा अपमान करू
In reply to कृपया वारांगनांचा अपमान करू by कैलासवासी सोन्याबापु
इचिभन हे म्हणजे खेल देशपांडे
In reply to कृपया वारांगनांचा अपमान करू by सचु कुळकर्णी
सहि पकडे है ;)
In reply to इचिभन हे म्हणजे खेल देशपांडे by कैलासवासी सोन्याबापु
सचिन भाऊ, जर बलोच नेते
In reply to सहि पकडे है ;) by सचु कुळकर्णी
बाप्पु धन्यवाद हा व्हीडियो
In reply to सचिन भाऊ, जर बलोच नेते by कैलासवासी सोन्याबापु
उठता लात बसता बुक्की असे
In reply to बाप्पु धन्यवाद हा व्हीडियो by सचु कुळकर्णी
पाकिस्तानची परिस्थिती पाहता
यातले काहीही झाले तरी, योग्य
In reply to पाकिस्तानची परिस्थिती पाहता by श्रीगुरुजी
- सध्या पाकची आर्थिक स्थिती
In reply to पाकिस्तानची परिस्थिती पाहता by श्रीगुरुजी
http://m.timesofindia.com/world/pakistan/Top-trend-in-Pakistan-P
=))
In reply to http://m.timesofindia.com/world/pakistan/Top-trend-in-Pakistan-P by सचु कुळकर्णी
दोष
In reply to http://m.timesofindia.com/world/pakistan/Top-trend-in-Pakistan-P by सचु कुळकर्णी
+१००० लोल
In reply to दोष by विकास
रागां
काही टारगट मुलं गाढवाच्या
In reply to रागां by तिमा
काही टारगट मुलं सैन्याला
In reply to काही टारगट मुलं गाढवाच्या by श्रीगुरुजी
तसेही युपीए काळात दहा सर्जिकल
In reply to काही टारगट मुलं गाढवाच्या by श्रीगुरुजी
पवारांची राजकीय कारकीर्द
In reply to तसेही युपीए काळात दहा सर्जिकल by संदीप डांगे
वरच्या माझ्या प्रतिसादातील
In reply to पवारांची राजकीय कारकीर्द by श्रीगुरुजी
होय. बहुतांशी ते खोटे असते.
In reply to वरच्या माझ्या प्रतिसादातील by संदीप डांगे
ते बर्याचदा
In reply to वरच्या माझ्या प्रतिसादातील by संदीप डांगे
समजा युपीएच्या काळात असे
In reply to ते बर्याचदा by नाखु
पवार संरक्षण मंत्री होते
In reply to समजा युपीएच्या काळात असे by श्रीगुरुजी
पवार जून १९९१ ते मार्च १९९३
In reply to पवार संरक्षण मंत्री होते by संदीप डांगे
तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी
In reply to पवार संरक्षण मंत्री होते by संदीप डांगे
=)) get out of blindzone!!
In reply to तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी by श्रीगुरुजी
कसला blindzone?
In reply to =)) get out of blindzone!! by संदीप डांगे
पवारांना मुद्दामहून माहिती दिली असेल
In reply to =)) get out of blindzone!! by संदीप डांगे
दिल्लीत आपल्याला फार मान आहे,
In reply to पवारांना मुद्दामहून माहिती दिली असेल by बोका-ए-आझम
बाकी अजून किती चिल्लर
In reply to दिल्लीत आपल्याला फार मान आहे, by श्रीगुरुजी
फक्त पवार तुम्ही म्हणता तसे फुटकळ , चिल्लर...
In reply to बाकी अजून किती चिल्लर by कैलासवासी सोन्याबापु
ते वन मॅन आहेत, आर्मी वगैरे
In reply to फक्त पवार तुम्ही म्हणता तसे फुटकळ , चिल्लर... by अर्धवटराव
उधोजी आणि पवारांची तुलना ???
In reply to ते वन मॅन आहेत, आर्मी वगैरे by श्रीगुरुजी
पवार ह्यांनी भ्रष्टाचार केले
In reply to बाकी अजून किती चिल्लर by कैलासवासी सोन्याबापु
खरे तर, आप च्या जागा या
In reply to पवार ह्यांनी भ्रष्टाचार केले by श्रीगुरुजी
अजून किती चिल्लर पक्षांच्या
In reply to पवार ह्यांनी भ्रष्टाचार केले by श्रीगुरुजी
राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना
In reply to अजून किती चिल्लर पक्षांच्या by संदीप डांगे
पवार खूप महत्त्वाचे नेते आहेत
In reply to राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना by श्रीगुरुजी
डांगे डांगे डांगे कसं कळत
In reply to पवार खूप महत्त्वाचे नेते आहेत by संदीप डांगे
गुरुजींनी दिलेला 'पवारच
In reply to डांगे डांगे डांगे कसं कळत by कैलासवासी सोन्याबापु
गुर्जी, पवार डोळा मारतात
In reply to गुरुजींनी दिलेला 'पवारच by श्रीगुरुजी
गुर्जी, पवार डोळा मारतात
In reply to गुर्जी, पवार डोळा मारतात by कैलासवासी सोन्याबापु
म्हणजे जेवणारे चांगले किंवा
In reply to गुर्जी, पवार डोळा मारतात by श्रीगुरुजी
कोण चांगले, कोण वाईट याचा
In reply to म्हणजे जेवणारे चांगले किंवा by कैलासवासी सोन्याबापु
तसा संबंध तुम्ही शोधल्यास
In reply to डांगे डांगे डांगे कसं कळत by कैलासवासी सोन्याबापु
तसा संबंध तुम्ही शोधल्यास तुमच्यावर आमचे परममित्र मोदकभाऊ ह्यांची अवकृपा होईल अन तुम्ही कसे देशद्रोही आहात हे परत एकदा सगळ्यांना उच्चारवाने सांगितले जाईल, तेव्हा हा तुमचा सुडो सिक्युलर दंगा बंद करा!शिक्के मारणे वाईट असते असे आमचे मित्र सोन्याबापू सांगतात त्याची आठवण आली. बाकी मी संदिप डांगेंना दिलेला प्रतिसाद आणि त्याच्या वरचे खालचे त्यांचे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावेत ही नम्र विनंती. असो. :)जालीम एक मूहर लग गई तो तुम
In reply to तसा संबंध तुम्ही शोधल्यास by मोदक
असो :)
In reply to जालीम एक मूहर लग गई तो तुम by कैलासवासी सोन्याबापु
व्हेरी रडका प्रतिसाद...!!
In reply to दिल्लीत आपल्याला फार मान आहे, by श्रीगुरुजी
ह्याविषयी माहिति नाही
In reply to पवार संरक्षण मंत्री होते by संदीप डांगे
एक कायप्पा forward
In reply to समजा युपीएच्या काळात असे by श्रीगुरुजी
कृषीमंत्रालय महत्वाचे नाही
आत्ता कोण आहेत कृषिमंत्री?
In reply to कृषीमंत्रालय महत्वाचे नाही by कैलासवासी सोन्याबापु
नाव आठवत नाही... गुरुजींना पण
In reply to आत्ता कोण आहेत कृषिमंत्री? by संदीप डांगे
राधामोहन सिंग हे केंद्रीय
In reply to नाव आठवत नाही... गुरुजींना पण by विशुमित