Skip to main content

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 29/09/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted…) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-… _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

वाचने 73322
प्रतिक्रिया 290

प्रतिक्रिया

काँग्रेसच्या वाचाळ संजय निरूपमने सर्जिकल स्ट्राईक झालाच नसून केंद्र सरकार राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवित असल्याचे सांगितले आहे. केजरीवाल व निरूपम या दोघांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या इतर सर्व नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल शंका उपस्थित न करता सैन्याचे व केंद्राचे अभिनंदन केले आहे. एकंदरीत ही काँग्रेसची दुहेरी स्ट्रॅटेजी दिसते. एकीकडे सैन्याचे अभिनंदन करायचे, केंद्राला पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे निरूपमसारख्या वाचाळांकडून सर्जिकल स्ट्राईल झालाच नव्हता असे पसरवून केंद्र सरकार व सैन्याबद्दल शंका उपस्थित करून केंद्राला त्याचा राजकीय लाभ न मिळता सरकारबद्दल संशय निर्माण करायचा. सर्जिकल स्ट्राईकची माहिती सर्वात प्रथम सरकारने न देता सैन्याधिकारींनी दिली होती. केंद्र सरकारच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही स्वरूपाचा जिंगोइझम व युफोरिया न दाखविता संयमित प्रतिक्रिया दिली आहे. मागील सरकारला देखील हिणविण्याचे टाळले आहे. म्हणजे राजकीय लाभ उठविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने फारसे काही केलेले नाही. निरूपमच्या म्हणण्यानुसार सैन्य खोटे बोलत आहे. परंतु आपले २ सैनिक मारले गेले व ९ जखमी झाले असे पाकिस्तानने अधिकृतरित्या मान्य केले आहे. म्हणजे ५० अतिरेकी मारल्याचा भारताचा दावा कदाचित अवास्तव मानला तरी काही स्वरूपाचा हल्ला झाला असणार हे नक्की. पाकिस्तान फक्त २ सैनिक मारले गेल्याचे कबूल करतो त्याअर्थी २ पेक्षा बरेच जास्त सैनिक मारले गेले असावेत. म्हणजे कोणत्या तरी स्वरूपाचा हल्ला भारताने केला व त्यात २ ते ५० च्या दरम्यान पाकडे सैनिक/अतिरेकी मारले गेले हे पण नक्की. असो. पुढील सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी सैन्याने निरूपम व केजरीवालांना प्रत्यक्ष साक्षीदार या नात्याने बरोबर न्यावे. या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतातील काही जणांच्या बुडाला आग लागली आहे हे मात्र नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

भारतीय सैन्याने कधीही राजकारणात लुडबूड केल्याचे पुरावे केजरीवाल व संजय निरूपम यांचे कडे असतील तर ते त्यानी द्यावे नाहीतर....... देशद्द्रोही असल्याचा खटला या दोघांवर भरता येइइल काय याचा पाठपुरावा सर्व निवृत्त सरन्यायाधीशानी करावा॑.

In reply to by चौकटराजा

केजरीवाल व संजय निरूपम या दोघांनाही सर्जिकल ऑपरेशन बद्धल फार शंका आणि उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे. लष्कराने गुपचुप १- १ कंमांडो एका रात्री यांच्या घरी पाठवुन ध्यावा { १च बास यांना } दुसर्‍या दिवशी हे स्वतःहुन पाकिस्तानला सांगतील... अरे गलती से भी बॉर्डर क्रॉस करके इधर किसिको मत भेजना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

सगळ्या तथाकथित शांतीप्रीय आणि [लघु/दीर्घ]शंकावाद्यांना हे एक मस्त उत्तर आहे - http://zeenews.india.com/news/india/major-gaurav-arya-writes-open-lette… हे वाचून व्हॉट्सअ‍ॅप वरचा एक मॅसेज आठवतो - "कधी कधी केवळ सांगून काही फरक पडत नाही.. कानफट्टात सुद्धा द्यावीच लागते."

काल एका कार्यक्रमात ओम पुरी ने जे अकलेचे तारे तोडले आहेत ते अतिशय संताप आणणारे होते . काही चिल्लर पाकिस्तानी रुपड्यांकरता हा आपल्या सैन्याला शिव्या घालत आहे . कारण का तर हा एका पाकी चित्रपटात काम करत आहे . हे असले लोकं जर भारतात असतील तर भारताला शत्रूची गरजच काय ?  https://youtu.be/03M__i9Tbqo?t=1s ही त्या कार्यक्रमाची लिंक

मला समजत नाहीय कि आता काँग्रेसचे प्रतिनिधी सांगताहेत कि त्यांच्या कारकिर्दीत पण असे सर्जिकल स्ट्राईक्स झाले ते पण जास्त इंटेंसिटी चे झाले होते.तेव्हा तर त्यांनी कसलेही प्रूफस दिले नाहीत आणि आता तोंड वर करून पुरावे कसले मागताहेत ? म्हणजे आता पहिल्यांदा त्यांच्याकडून पुरावे मागितले पाहिजेत मग आम्ही देऊ असं भाजप गव्हर्नमेंट ने सांगायला हरकत नाही. ;)

हे घ्या सर्जिकल स्ट्राईक्सचे पाकिस्तानने दिलेले पुरावे... १. पाकिस्तानी पोलिस अधिकार्‍यावर केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघड केलेले सर्जिकल स्ट्राईक्सचे तपशील... Pakistan army caught by surprise, lost 5 men: PoK cop reveals in sting operation २. पाकिस्तानी "डॉन" वर्तमानपत्राने जाहीर केलेले पकिस्तान शासन आणि सैन्यदलातले बदललेले नाते व त्यांच्या संयुक्त सभांमधिल चर्चेचे तपशिल... In extraordinary development, Pak's Nawaz Sharif govt orders Army to act against terrorists, Dawn reports सर्वच बातमी माहितीने भरलेली आहे. पण, त्यातले खालचे वाक्य आंतरराष्ट्रिय राजकारणच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे... In addition, Chaudhry said that Chinese authorities have conveyed their willingness to keep putting on technical hold a UN ban on Jaish-e-Mohammad leader Masood Azhar, but they have questioned the logic of doing so repeatedly.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इतके दिवस फिलिपाईन्स अमेरिकेची आय माय काढत होता आणि चीन आणि रशियाकडुन शस्त्रे घेउ असे आता म्हणु लागला आहे. यात आता पाकड्यांची भर पडली ! संदर्भ :- 'Pakistan would move towards China, Russia as US is declining power' मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

In reply to by मदनबाण

हे पण "पोश्चरिंग" आहे ! पाकिस्तानमधले लुंटरसुंटर कर्नल्सही वाघाच्या आवेशात अणूबॉंबच्या धमक्या देत होते, आता त्यातला अणूबॉंबमधला अ सुद्धा अस्पष्ट झाला आहे ;) आताही सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर दोन्ही शरिफांनी अंकल सॅमची बाही पकडली होती. चीन अमेरिकेपेक्षा मोठा "पाऊंड ऑफ फ्लेश" वसूल केल्याशिवाय मदत करणार नाही हे न ओळखण्याइतके पाकिस्तानी शासक व जनरल्स खुळे नाहीत. याशिवाय, पाकिस्तानी शासक व जनरल्सच्या करोडो डॉलर्सच्या गुंतवणूका अमेरिकेत आहेत... त्या "फ्रिझ करू अशी अफवा" उडाली तरी त्यांना दे माय धरणी ठाय होईल ! :) नुकताच पाकिस्तानबरोबर सराव (तो ही भारताच्या अमेरिकेकडे झुकावाविरुद्ध पोश्चरिंग होता) केला असला तरी सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भात रशियाचे निवेदन भारताच्या बाजूने झुकणारे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे जरी सत्य असले, तरी वेपन सेल्स मध्ये चीन ने अमेरिकेला आधीच रिप्लेस केले आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

In reply to by मदनबाण

जो पर्यंत जग अँड्रॉईड, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, अगदी इंटरनेट सर्वर्स पण अमेरीकेतले वापरत राहील तो पर्यंत अमेरीका ही declining power होण्याची शक्यता कमी आहे... दुसरा महत्वाचा भाग (आणि तो भारताच्या संदर्भात देखील तितकाच आहे): अमेरीका हे लोकशाही राष्ट्र आहे त्यामुळे चुका झाल्या तरी त्या दुरूस्त करून (corrective actions) पुढे जाऊ शकते आणि तसे ते आज पर्यंत जात राहीले आहे. असो.

In reply to by विकास

असं असेल तर या महान देशाला गेल्या ७-८ वर्षात फक्त रिक्व्हरीच्याच चर्च्या का करता आल्या ? बाकी येणारा काळ सांगेलच... की पॅडलिंग फिक्शन आहे कि अजुन काही... ;) बाकी मनिला ओबामामामांना सन ऑफ टिंब टिंब म्हणुन देखील अमेरिका त्यांच्या बद्धल ब्र देखील काढत नाही ! असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शराफ़त अली को शराफ़त ने मारा... :- अमृत

In reply to by मदनबाण

बाकी मनिला ओबामामामांना सन ऑफ टिंब टिंब म्हणुन देखील अमेरिका त्यांच्या बद्धल ब्र देखील काढत नाही !
म काय करायचं म्हणता? शिवी दिली म्हणून युद्ध सुरू करायचं का?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे म्हणजे पाकिस्तान च्या राष्टीय चारित्र्य नुसारच झाले. जे एका वारांगनेचे (सामान्य भाषेत "वेश्या")आहे. अमेरिका नावाच्या बाप्याकडून भाव आणि पैसे मिळणे कमी झाले की चीन नावाचा बाप्याची संगत आधी छुपी होतीच, आता उघडपणे तो माझा यार आहे हे सांगणे सुरु होईल. तिकडे रशिया नावाच्या बाप्याला डोळा मारणे,खुणावणे चालू आहेच. थोडक्यात काय ? तर जो मला पैसा पुरवेल त्याच्याबरोबर मी जाणार.

In reply to by lakhu risbud

कृपया वारांगनांचा अपमान करू नयेत ही विनंती! बाकी पाकिस्तानबद्दल सेम उच्चार आमचे लाडके तारेक फतेह साहेब सुद्धा काढतात , ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कृपया वारांगनांचा अपमान करू नयेत
सहमत. अटलांटिक कौसिंल मध्ये जबरा कपडे फाडले पाकड्यांच्या स्पेशल ऐनव्हॉय चे बलोच, सिंध आणि POK वाल्यानी. या पाकि भिकारड्यांचा निलाजरेपणा तर बघा ह्यांच स्टेटमेंट आहे कि अमेरीकेला आवडो की न आवडो पण अफगाणिस्तानात अमेरीकेला आमची मदत लागणारच आहे, जर अमेरीका काश्मिर प्रश्नी मदत करणार नसेल तर आम्हि काबुल सुध्दा शांत होउ देणार नाहि. चिन, रशिया आणि ईराण आमच्या पाठीशी आहे जर अमेरीकेचा कल असाच भारताच्या बाजुने राहिला तर वुई विल अबांडन अमेरीका फॉर चिन, रशिया आणि ईराण. ह्याले वर्हाडीत भिक्कार ठस्सन ह्मणतात.

In reply to by सचु कुळकर्णी

इचिभन हे म्हणजे खेल देशपांडे बुद्रुक न उमरोतीले इकासाची ठसन देने झाले न भो खेल देशपांडे - अकोला जिल्ह्यातील एक अत्युच्च टशन देणारे गाव! इथे सगळेच देशपांडे आहेत, अजून काय एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसावी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सहि पकडे है ;) बेक्कार ईज्जत काढली ना हो पाक एनव्हॉय ची निरा चोर, खोटारडे म्हनल त्याईले त्याईच्याच पब्लीकन वर हे बि विचारल का सब्बन पैशे संपले वाट्टे काहुन का तुम्हि कटोर घेउन परत अंकल सँम कडे आले.

In reply to by सचु कुळकर्णी

अटलांटिक काऊंसिल मधे बोललेले बोल तुम्हाला बेइज्जती वाटते आहे, तर एकदा हा विडीयो पहा(च) असे सुचवतो देवा. अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चार भद्र लोकांत बोलणे कौतुकास्पद आहेच हो, पण खुद्द पाकिस्तानात, जिथे बलुचिस्तानचा ब बोलले तरी गोळ्या घालतात, तिथे ह्या कॉलेजात जाणार्या पोरांनी ज्या डरकाळ्या फोडल्यात त्या वाचुन त्यांच्या लढाऊ बाण्याला खरंच मुजरा करावा वाटला मला, नमन करतो मी त्या बलोच भुमीला अन तिथे जन्माला येणार्या निधड्या वाघांना

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पु धन्यवाद हा व्हीडियो पाहिलाय भावा. अटलांटिक कौंसील च उदाहरण एव्हढ्याच करता देल्ल देवा का हे आता बसता लात अन उठता बुक्की खाउन रायलेत. आता तर थोडेच का होईना पण POK मध्ये सुध्दा टेरर कँप विरोधात लोक मोर्चा काढुन राहिले.

पाकिस्तानची परिस्थिती पाहता नवाज शरीफच्या विरूद्ध लष्करी उठाव होऊन लष्करप्रमुख राहील शरीफ देश ताब्यात घेईल अशी शक्यता वाटतीये. तसाही राहील शरीफ महिन्या दिडमहिन्यात निवृत्त होतोय. अर्थात एक शरीफ जाऊन दुसरा आला तरी भारताच्या दृष्टीने तसूभरही फरक पडणार नाही. दुसरी शक्यता म्हणजे लष्कर उठाव करून आपला पित्त्या इम्रान खानला पंतप्रधानपदी बसवेल.

In reply to by श्रीगुरुजी

यातले काहीही झाले तरी, योग्य वेळ मिळताच आपण त्यांचे कंबरडे मोडुन टाकावे. म्हणजे भविष्यात आपले जवान त्यांचे प्राण गमवणार नाहीत किंवा त्यांची विटंबना केली जाणार नाही, टिव्हीवर डिबेट्स होणार नाहीत्,असे धागे निघणार नाहीत आणि चु केजरीवाल / चु संजय निरुपम / चु सलमान यांना अजुन चु करण्याची संधी मिळणार नाही ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations

In reply to by श्रीगुरुजी

- सध्या पाकची आर्थिक स्थिती सध्या जेमतेम आहे. अजुनही गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही आणि निर्यातीवर ताण बर्‍यापैकी आहे. - राहिल शरीफ यांनी सत्ता ताब्यात घेतल्यास - --- आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर ताण आणखी वाढतील --- आधीच एकाकी पडलेल्याला पाकिस्तानला चीनही खुलेआम मदत करतांना दहादा विचार करेल. --- देशांतर्गत वाढत जाणारा महागाई/बेरोजगारीचा ताण आणि खालावणारी आर्थिक स्थिती यांतील समतोल साधणे अत्यंत कठीण होत जाईल. मंदीसदृश परिस्थितीसुद्धा उद्भवू शकेल. --- बलूच आणि सिंध येथे आणखी धुरळा उठायला अत्यंत पोषक वातावरण निर्माण होईल. --- भारताला आयते कोलीत हातात दिल्यासारखे होईल. --- युद्धाशिवाय पर्याय उरणार नाहीत अशा परिस्थितीकडे वाटचाल सुरू होईल.. किंबहुना ते अपरिहार्य ठरेल. अर्थात् हे सगळे माझे विचार आहेत, असेच होईल असे काही नाही. पण अगदीच मूर्ख वा सत्तापिपासू नसलेत तर राहिल शरीफ सत्ता सध्यातरी बळकावणार नाहीत. आणि तसे केलेच तर तो आत्मघात ठरेल.

In reply to by सचु कुळकर्णी

आजच फेसबुकवर अजून एक पोस्ट बघितली. रागां आणि केजरीवल भाजपाच्या २०१९ ला लोकसभेच्या ४०० हून जास्त जागा निवडून येतील याची व्यवस्था करण्यात बिझी आहेत म्हणे! =))

In reply to by सचु कुळकर्णी

मा. केजरीवाल जे काही बोलले त्याला त्यांच्या जिभेवर शस्त्रक्रीया करणारे डॉक्टर जबाबदार आहेत. चुकून त्यांनी शस्त्रक्रीया करताना उरलंसुरलं जिभेच हाड काढून टाकलं असे म्हणतात... ;)

रागां तर आता रक्ताच्या दलालीवर आलाय. मोदींना आयतीच मदत होतीये. मौत का सौदागर, खूनका दलाल .... आणखी काही डोक्यांत येत असलं तर तेही एकदाच ओकून टाक बाबा.

In reply to by तिमा

काही टारगट मुलं गाढवाच्या शेपटीला लवंगी फटाक्याचा बांधून मजा बघायची. सर पेटला की फटाक्यांच्या आवाजाने आणि भाजल्यामुळे गाढव किंचाळत, सैरावरा लाथा झाडत वाट फुटेल तिकडे पळत सुटायचं. या सर्जिकल स्ट्राईकमुळे काही जणांच्या बुडाला आग लागलेली दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

काही टारगट मुलं सैन्याला शक्तीचा विसर पडलेल्या हनुमानाची उपमा देत आहेत, तिकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे की नाही, बुडाला आग लागलेल्या गाढवांपेक्षा?

In reply to by श्रीगुरुजी

तसेही युपीए काळात दहा सर्जिकल स्ट्राईक झाले असे पवार बोललेत, तेव्हा बुडाला आग लागण्याचे कारण तरी काय हा मला प्रश्न पडलाय, बहुतेक राजकीय लाभ उठवू शकले नाहीत म्हणून जळजळ होत असावी;)

In reply to by संदीप डांगे

पवारांची राजकीय कारकीर्द संपलेली आहे. ते काय बोलतात ते कोणीही गांभिर्याने घेत नाही. अर्थात त्यांचे उपद्रव मूल्य अजून शाबूत आहे हे मात्र नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

वरच्या माझ्या प्रतिसादातील फक्त पवार शब्द उचलला, म्हणजे तुम्च्यालेखी ते बोललेत ते सर्व खोटे असते का?

In reply to by संदीप डांगे

राजकीय लाभासाठी खोटे बोलतात हे शर्वश्रुत आहेच. खुद्द तातकालीन सैन्ममुखांनी असे काहीही झालेले नाही असा निर्वाळा दिला आहे. ़अल्हई गेलेल्या भांदाय्ला कल्हई लावायचे केविल्वाणे प्रयत्न म्हणजे हे प्रकार आहेत. अर्थात तुम्ही क्रिकेटमुळे पॉवरबाज छक्केपंजे नक्कीच ओळखून असाल की?

In reply to by नाखु

समजा युपीएच्या काळात असे हल्ले केले होते व ते अत्यंत गुप्त ठेवले गेले होते, तर त्याची माहिती फक्त पंतप्रधान, लष्कराचे अत्यंत वरीष्ठ अधिकारी, संरक्षणमंत्री, राष्ट्रपती इ. मोजक्याच व्यक्तींकडे असायला हवी होती. पवारांसारख्या अत्यंत लहान पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पक्षाबाहेरील व्यक्तीला आणि कृषी खात्यासारख्या कमी महत्त्वाचे खाते सांभाळणार्‍याला अशा हल्ल्यांची माहिती असण्याचे कारणच नाही. रागा, निरूपम, केजरी इ. प्रमाणे पवार, चिदंबरम यांच्या बुडालाही आग लागलेली आहे. परंतु ते इतरांइतके अपरिपक्व नसल्याने "We too" अशी भूमिका घेऊन सौम्य प्रतिक्रिया देत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पवार संरक्षण मंत्री होते बहुतेक, नव्हते का? तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी मोदींनी पवारांना पाचारण केले ते का बुआ?

In reply to by संदीप डांगे

पवार जून १९९१ ते मार्च १९९३ या २० महिन्यात संरक्षणमंत्री होते. ते ज्या युपीएचा उल्लेख करताहेत तो काळ २००४ ते २०१४ हा होता व त्या काळात ते कृषी मंत्री होते. केंद्रीय मंत्रीमंडळात सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी अर्थ, संरक्षण, गृह, परराष्ट्र व्यवहार इ. खाती त्यांच्याकडे नव्हती. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस नामक जेमतेम ९ खासदार असलेल्या एका अत्यंत लहान पक्षाचे प्रतिनिधि होते व त्या पक्षाच्या पाठिंब्याची केंद्र सरकारात गरज नव्हती. पक्ष अत्यंत लहान, पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही व दुय्यम खात्याचे मंत्री असल्यामुळे इतकी महत्त्वाची आणि अत्यंत गुप्त असलेली कारवाई त्यांना माहिती असण्याचे कारणच दिसत नाही. समजा सांप्रत केंद्र सरकारने हा हल्ला अत्यंत गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला असता तर अवजड उद्योग मंत्री अनंत गीते किंवा क्रीडा मंत्री अशी दुय्यम खाते दिलेल्यांना ही गुप्त माहिती सांगण्याची गरजच भासली नसती.

In reply to by संदीप डांगे

तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी मोदींनी पवारांना पाचारण केले ते का बुआ?
मोदींनी फक्त पवारांना माहिती दिलेली नसून सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून माहिती दिलेली आहे. फक्त पवारांना हॉटलाईनवरून काही खास माहिती दिल्याचे ऐकिवात नाही.

In reply to by संदीप डांगे

तर आता पवारांचा problem काय आहे? आपल्याला चांगले मार्क्स मिळाल्यावर आपण ते मुद्दामच आपला दुस्वास करणाऱ्याला सांगतो. जेव्हा तो त्याच्या मनाविरूद्ध आपलं अभिनंदन करतो तेव्हा पाहायला मजा येते. मोदींनी हाच विचार करुन पवारांना सर्जिकल स्ट्राईकबद्दल सांगितलं असणार. बाकी पवारांनी चार सर्जिकल स्ट्राईक्स केले होते म्हणे - पहिला धरणांत, दुसरा महाराष्ट्र सदनात, तिसरा लवासात चौथा पुरावे मिटवण्यासाठी मंत्रालयात.

In reply to by बोका-ए-आझम

दिल्लीत आपल्याला फार मान आहे, आपण फार महत्त्वाचे समजले जातो, सर्व पंतप्रधान व इतर सर्व पक्षांचे नेते नेहमी आपला सल्ला घेतात अशा गप्पा पवारांनी, त्यांच्या चमच्यांनी व त्यांच्या वृत्तपत्राने कायमच पसरविल्या आहेत. पूर्वी युपीए असताना किमान समान कार्यक्रम Common Minimum Program (CMP) या नावाने ओळखला जायचा. 'सकाळ'वाल्यांनी पसरविले होते की यातला C म्हणजे चिदंबरम, M म्हणजे मनमोहन सिंग आणि P म्हणजे पवार (म्हणजे पवार मनमोहन सिंग व अर्थमंत्री चिदंबरम यांच्या बरोबरीचे आहेत असे सांगण्याचा हा प्रयत्न होता). मनमोहन सिंग कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी सर्वात प्रथम पवारांशी सल्लामसलत करतात असेही पसरविले गेले होते. आपण खूप अनुभवी व व वरीष्ठ असल्याने सर्वजण आपला सल्ला घेतात, आपल्याला केंद्र सरकारमध्ये व इतरत्र फार महत्त्व आहे, मनमोहन सिंगांखालोखाल आपण सर्वात महत्त्वाचे आहोत असे पवारांबाबत कायम पसरविले गेले. काँग्रेस किंवा इतर कोणत्याही नेत्याने यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. ते जे दावा करतात त्यावर इतर नेत्यांनी कधीच आक्षेप घेतला नाही. मात्र पवार त्यांना ठरवून दिलेल्या चाकोरीबाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले किंवा आपल्या खात्याबाहेर लुडबूड करू लागले की की लगेच काँग्रेसचा एखादा वरीष्ठ नेता डोळे वटारायचा व लगेच पवारांना गप्प व्हायला लागायचे. २००९ मध्ये पवारांच्या पक्षाने महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर व ओरिसात कॉंग्रेसचा विरोधक असलेल्या बिजादबरोबर युती केली होती. नवीन पटनाईकांनी इतर विरोधी पक्षांबरोबर एक सभा आयोजित केली होती व त्यात युती असल्याने पवारांना आमंत्रण दिले होते. सभेच्या काही तास आधी चिदंबरम यांनी फोन करून समज दिल्यावर लगेच पवारांनी माघार घेतली व सभेला गेले नाहीत. या हल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. इतर सर्व लहानमोठ्या, चिल्लर पक्षांच्या नेत्यांप्रमाणेच पवारांना सुद्धा त्यात बोलविले होते. 'सकाळ'ने बातमी देताना असे काही लिहिले की जणू काही पवारांसारख्या अनुभवी व वरीष्ठांना सल्ल्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले.

In reply to by श्रीगुरुजी

बाकी अजून किती चिल्लर पक्षांच्या चिल्लर नेत्यांच्या अंगणात हेलिकॉप्टर उतरवून माननीय पंतप्रधान त्या चिल्लर नेत्यांच्या पंगतीत जेवले आहेत हो?? पवार ह्यांनी भ्रष्टाचार केले आहेत, तसेच ते काही पवित्र वगैरे नाहीत, हे बहुदा आपले एकमत व्हावेच, फक्त पवार तुम्ही म्हणता तसे फुटकळ , चिल्लर किंवा दुर्लक्ष करण्याजोगे नक्कीच नाहीत, अन असे तुम्ही कुठल्या फाजील आत्मविश्वासापाई समजत आहात ते कारण अनाकलनीय आहे, इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हं गुर्जी.अस्तु

In reply to by अर्धवटराव

ते वन मॅन आहेत, आर्मी वगैरे अजिबात नाहीत. इतर पक्षांनी त्यांचे पाणी जोखले असल्याने राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या ऐवजी द्रमुक, अद्रमुक, सप इ. पक्षांना जास्त मान आहे. त्यांच्या पक्षाचे शिवसेनेशी बरेच साम्य आहे. उद्धव ठाकरे वगैरे मंडळीसुद्धा आपला पक्ष फार ग्रेट, आपल्यामुळेच भाजप वाढला इ. वल्गना करीत असतात. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. राष्ट्रवादीचे व पवारांचे अगदी तसेच आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पवार ह्यांनी भ्रष्टाचार केले आहेत, तसेच ते काही पवित्र वगैरे नाहीत, हे बहुदा आपले एकमत व्हावेच, फक्त पवार तुम्ही म्हणता तसे फुटकळ , चिल्लर किंवा दुर्लक्ष करण्याजोगे नक्कीच नाहीत, अन असे तुम्ही कुठल्या फाजील आत्मविश्वासापाई समजत आहात ते कारण अनाकलनीय आहे, इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नव्हं गुर्जी.अस्तु
२०१४ च्या निवडणुकीनंतर पवारांची राजकीय कारकीर्द संपलेली आहे. केंद्रात किंवा कोणत्याही राज्यात ते किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर नाही व निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग नाही. बीसीसीआयमधून त्यांची हकालपट्टी अटळ आहे. उर्वरीत काळ ते फक्त साहित्य संमेलनाला हजेरी लावणे, नाट्यसंमेलनाला हजेरी लावणे, जातीयवादी काड्या घालणे व फडणवीस सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे इ. त घालविणार आहेत. अर्थात फेब्रुवारी २०१७ मध्ये महाराष्ट्रात १० महापालिकांच्या निवडणुका आहेत. हे 'राष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य नेते' महापालिकांच्या निवडणुकीत भरपूर प्रचार करणार हे नक्की. मुळात सुरवातीपासूनच म्हणजे १९८० पासून ते फार मोठे नेते आहेत असा भ्रम निर्माण करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ते एकत्रित काँग्रेसच्या माध्यमातून (१९९० व १९९५), स्वत:च्या वेगळ्या पक्षाची इतर पक्षांबरोबर युती करून (१९८५ २००४ व २००९) व स्वत:च्या वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून पूर्णपणे स्वतंत्र निवडणुक लढविणे (१९८०, १९९९ व २०१४) अशा ३ माध्यमातून ८ वेळा जनतेसमोर गेले. त्यांना या ८ प्रयत्नात कधीही बहुमत मिळविता आले नाही. १९९० ते मुख्यमंत्री असताना एकत्रित काँग्रेसला मिळालेल्या १४१ जागा व १९९५ मध्ये पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री असताना एकत्रित काँग्रेसला मिळालेल्या ८० जागा ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी. दोनही वेळा त्यांना बहुमताचा १४४ हा आकडा पार करता आला नाही. कॉंग्रेसबरोबर युती केल्यावर त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती ७१ जागा व पूर्णपणे स्वतंत्र लढल्यावर त्यांची मजल जास्तीत जास्त ५८ पर्यंत पोहोचली. महाराष्ट्रातील आपण फार मोठे नेते आहोत, राष्ट्रीय स्तरावर आपला फार मोठा दबदबा आहे, सर्व पक्षांचे सर्व राष्ट्रीय नेते आपल्याला मानतात असा भ्रम निर्माण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या काही भागातच त्यांना व त्यांच्या पक्षाला थोडेफार स्थान आहे. विदर्भ व मुंबई या दोन मोठ्या भागात त्यांच्या पक्षाला फारसे स्थान नाही. राष्ट्रीय स्तरावर त्यांचा पक्ष चिल्लर म्हणून ओळखला जातो. त्यांच्यापेक्षा करूणानिधी, नवीन पटनाईक, ममता बॅनर्जी, मुलायम, मायावती, जयललिता इ. प्रादेशिक नेते जास्त बलवान समजले जातात. बेसिकली त्यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या असण्याने किंवा नसण्याने इतर पक्षांना काहीच फरक पडत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

खरे तर, आप च्या जागा या शिवसेना, राष्ट्रवादी आणी मनसे या प्रत्येक पक्शापेक्षा जास्त आहेत हे पाहुन याणी आत्मपरीक्षन करायची गरज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अजून किती चिल्लर पक्षांच्या चिल्लर नेत्यांच्या अंगणात हेलिकॉप्टर उतरवून माननीय पंतप्रधान त्या चिल्लर नेत्यांच्या पंगतीत जेवले आहेत हो?? ह्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित होते गुरुजी

In reply to by संदीप डांगे

राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना बारामतीला बोलावून त्यांचा पाहुणचार करणे व त्यांच्या तोंडातून आपली स्तुती ऐकणे हे पवार अनेकदा करतात. अनेक राष्ट्रीय नेत्यांना पवारांनी बारामतीला बोलाविले आहे. जसे आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर त्याच्याबद्दल चार शब्द बरे बोलतो तसेच बारामतीला भेट देऊन पवारांचा पाहुणचार स्वीकारणारे नेते तिथून येताना पवारांबद्दल चार बरे शब्द बोलून येतात व त्यामुळे पवारांच्या अंगावर मूठभर मांस चढते. आपण खूप महत्त्वाचे नेते आहोत, राष्ट्रीय पातळीवर आपल्याला खूप मान आहे, सत्ता असो वा नसो आपले महत्त्व कायम आहे हे दाखविण्याचा पवारांना खूप जुना छंद आहे. अगदी १९८३ मध्ये महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असताना पवारांनी पुण्यात विविध राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचे संमेलन बोलावून मिरवून घेतले होते. ९० च्या दशकात चंद्रशेखर व इतर काही नेत्यांनी बारामतीला भेट देऊन पवारांचे कौतुक केले होते. अगदी जानेवारी २०१४ मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी बारामतीला भेट देऊन पवारांवर स्तुतीसुमने उधळली होती. तशीच मोदी व जेटलींनीही बारामतीला भेट दिलेली आहे. आपल्याला खूप राष्ट्रीय महत्त्व आहे, आपण खूप महत्त्वाचे वरिष्ठ नेते आहोत, आपला दिल्लीत खूप दबदबा आहे हे पवारांना कायम दाखवून द्यायचे असते. त्यामुळेच त्यांनी २००१ मध्ये आपला ६१ वा वाढदिवस (त्यावेळी पंतप्रधान वाजपेयी सुद्धा आले होते ज्यांचा उल्लेख नंतर पवारांनी १० तोंडाचा रावण असा केला होता) व २०१५ मध्ये आपला ७५ वा वाढदिवस सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देऊन साजरा केला होता. इतर कोणताही नेता इतका गवगवा व गाजावाजा करून आपला वाढदिवस साजरा करीत नाही. अगदी १९९३ मध्ये सुद्धा (ज्या वर्षात मुंबईतील दंगली, मुंबईतील १३ बॉम्बस्फोट, लातूरचा महाभूकंप, लोकलच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेने धावत्या लोकलमधून उडी मारून मृत्युमुखी पडलेल्या २५-३० महिला, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वेने स्कूलबसला धडक दिल्यामुळे झालेला ३०-४० मुलांचा मृत्यु अशा अनेक दु:खदायक घटना एकाच वर्षात महाराष्ट्रात घडल्या होत्या) पवारांनी आपला वाढदिवस वानखेडे स्टेडियममध्ये नोटांचे हार स्वीकारून थाटामाटात साजरा केला होता. तस्मात बारामतीला कोण गेले होते या घटनांना फारसे महत्त्व नाही. पवार खूप महत्त्वाचे नेते आहेत म्हणून हे नेते तिथे जात नसून आपण महत्त्वाचे आहोत हे जगाला दाखविण्यासाठी पवार या नेत्यांना आमंत्रण देत असतात.

In reply to by श्रीगुरुजी

पवार खूप महत्त्वाचे नेते आहेत म्हणून हे नेते तिथे जात नसून आपण महत्त्वाचे आहोत हे जगाला दाखविण्यासाठी पवार या नेत्यांना आमंत्रण देत असतात.
हे पण भारी आहे हां गुरुजी! मानलं तुम्हाला. खतरनाक लॉजिक आहे!!! _/\_ तरी मांज्या डोस्क्यात येक सवाल येऊन रायलाय, का बा, हे पवार कोण तिसमारखां लागून गेलं की त्याने बोलावलं का लोग धावू धावू त्याच्या अंगणात जाऊन त्याच्या पंगतीत जेवतेत? आम्ही नमस्कार केला तर च्यामारी कोपर्‍यावरचा चहावालाबी परतुन नमस्कार नाही करत बुवा. काय तरकिब आसंल बरं?

In reply to by संदीप डांगे

डांगे डांगे डांगे कसं कळत नाही तुम्हाला म्हणतो मी! "आमचा बबल्या नाय हो त्यातला, ते जाधवाचं कारटं बसवतंय बघा त्याला प्यायला अन पिऊन पत्ते कुटायला, आमच्या पोराला नाही नाद, ते हलकट बसवतात अन हे बिचारं फसतं" वरील दिलेला एका आईचा आपल्या पोराबद्दलचा अंधतर्क, अन गुरुजींनी दिलेला 'पवारच बोलवून घेतात' हा महान उच्च तर्क ह्यात काहीही समानता नाहीये! तसा संबंध तुम्ही शोधल्यास तुमच्यावर आमचे परममित्र मोदकभाऊ ह्यांची अवकृपा होईल अन तुम्ही कसे देशद्रोही आहात हे परत एकदा सगळ्यांना उच्चारवाने सांगितले जाईल, तेव्हा हा तुमचा सुडो सिक्युलर दंगा बंद करा!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गुरुजींनी दिलेला 'पवारच बोलवून घेतात' हा महान उच्च तर्क
अहो तसंच आहे ते. पवार वारंवार अनेकांना डोळा मारत असतात. १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पवार मुख्यमंत्री झाले होते. १९७९ मध्ये इंदिरा गांधींनी तत्कालीन पवार सरकार बरखास्त केल्यावर पवारांना काळाची पावले ओळखून इंदिरा काँग्रेसमध्ये जायचा प्रयत्न केला होता. परंतु आपल्याला इंदिरा कॉंग्रेसमध्ये घेण्यास वसंतदादा पाटलांचा तीव्र विरोध आहे हे ओळखून "मी वसंतदादांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे" असे पवारांनी जाहीररित्या सांगितले होते. आपले सरकार पाडल्यामुळे संतापलेल्या वसंतदादांनी पवारांना धुडकावून लावले होते. नंतर १९९६ मध्ये देवेगौडांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागल्यावर पवारांनी देवेगौडांशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर व जनता दलाच्या इतर नेत्यांना बारामतीला बोलाविणे हा त्याच प्रयत्नाचा एक भाग होता. पवारांच्या प्रयत्नातून देवेगौडांनी मुंबईत येऊन बाळ ठाकर्‍यांची भेट घेतली होती. शिवसेना आपल्याला पाठींबा देईल का याची चाचपणी ते करायला आले होते. नंतर पवार देवेगौडांबरोबर एकत्रित ओरिसांच्या दौर्‍यावर गेले होते. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरींनी, कॉंग्रेस देवेगौडांच्या दावणीला नेऊन बांधण्याचे पवारांचे प्रयत्न ओळखून लगेचच देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेऊन ते सरकार पाडले व पवारांचे प्रयत्न फसले. २०१४ नंतर सुद्धा पवार भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी जवळीक वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत याचे तेच कारण आहे. बारामतीला वरीष्ठ नेत्यांना बोलावून त्यांच्याशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करायचा व त्याचबरोबर आपलेही महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करायचा, जमल्यास सत्तेत घुसण्याचा प्रयत्न करायचा, आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवायचे यासाठीच ही आमंत्रणे आहेत. अर्थात पवारांनी कितीही वेळा डोळा मारला तरी भाजप नेते बधणार नाहीत हे उघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी, पवार डोळा मारतात म्हणून पवार वाईट असे एकावेळेस मानले तर त्यांनी कचकून डोळा मारल्यावर त्यांच्या अंगणात उतरून जेवण करणारे चांगले मानावे का वाईट असा माझा थेट प्रश्न थेट तुम्हाला विचारून मी थेट माझे चार थेट शब्द संपवतो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गुर्जी, पवार डोळा मारतात म्हणून पवार वाईट असे एकावेळेस मानले तर त्यांनी कचकून डोळा मारल्यावर त्यांच्या अंगणात उतरून जेवण करणारे चांगले मानावे का वाईट असा माझा थेट प्रश्न थेट तुम्हाला विचारून मी थेट माझे चार थेट शब्द संपवतो!
तुमच्या थेट प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे की ते चांगले किंवा वाईट असे काहीच मानू नयेत.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे जेवणारे चांगले किंवा वाईट काहीच मानू नयेत, फक्त यजमान वाईट मानावा असे का?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कोण चांगले, कोण वाईट याचा काथ्याकूट करण्याइतपत ही घटना महत्त्वाची नाही. या घटनेला काहीही महत्त्व नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तसा संबंध तुम्ही शोधल्यास तुमच्यावर आमचे परममित्र मोदकभाऊ ह्यांची अवकृपा होईल अन तुम्ही कसे देशद्रोही आहात हे परत एकदा सगळ्यांना उच्चारवाने सांगितले जाईल, तेव्हा हा तुमचा सुडो सिक्युलर दंगा बंद करा! शिक्के मारणे वाईट असते असे आमचे मित्र सोन्याबापू सांगतात त्याची आठवण आली. बाकी मी संदिप डांगेंना दिलेला प्रतिसाद आणि त्याच्या वरचे खालचे त्यांचे प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावेत ही नम्र विनंती. असो. :)

In reply to by मोदक

जालीम एक मूहर लग गई तो तुम तिल मिला उठ्ठे हो दोस्त, सोचो रोज जो मूहरे लगाते हो क्या रोता होगा ! ;) कसंय न मोदक भाऊ, चर्चा कोणाची चालली अन कश्यावर चालली होती हे जरा तुम्ही अगोदर पहा, बाकी एरवी कोणाला तात्विक समर्थन दिले की त्याला "महफिल" संबोधणारे महान सरजी इथे मात्र सोईस्कर वाचन मात्र मोड घेऊन बसलेत हे एक नव्याने निघालेले निरीक्षण, चिंता नको, आम्ही तसे करत नाही, ती आमची रीत नाही, तुम्ही वैयक्तिक होत नाही हा किमान अमच्यासंबंधी तुमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून मी तुमच्याशी मोकळ्या मनाने वाद घालू शकतो(च) ते संबंध तसेच राहतील, मुद्दे पटो न पटो माणूस आम्हाला मोदक पटतो, बाकी तुम्ही समर्थ आहात :)

In reply to by संदीप डांगे

तसेच ह्या ताज्या कारवाईसाठी मोदींनी पवारांना पाचारण केले ते का बुआ?
अगदी आतल्या गोटातली माहिती नसेल तर एखादी लींक वगैरे शेअर करु शकाल का? धन्यवाद.

कृषीमंत्रालय महत्वाचे नाही म्हणता ?? अजून कियी लवासा झाले तयार की मग महत्वाचे वाटू लागेल?

In reply to by विशुमित

राधामोहन सिंग हे केंद्रीय कॅबिनेट कृषी मंत्री असून या खात्यासाठी अजून ३ राज्यमंत्री सुद्धा आहेत. मुळात हे खाते फारसे महत्त्वाचे नसल्याने पोलिटिकल हेवीवेट्स कधीही हे खाते स्वीकारत नाहीत. पोलिटिकल लाईटवेट्स किंवा ज्यांना नाईलाजाने मंत्रीमंडळात घ्यावे लागते अशांना कृषी, अवजड उद्योग, क्रीडा इ. दुय्यम खाती दिली जातात.