✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दीपशिखा!

स
स्वाती दिनेश यांनी
Fri, 09/30/2016 - 23:53  ·  लेख
लेख
आजपासून शारदीय नवरात्राला सुरूवात होत आहे. घरोघरी घट बसले असतील. आदिशक्तीची आराधना वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. नवरात्रीचा उत्सव हा आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. कोमल आणि कणखर अशा स्त्रीत्वाच्या दोन टोकांचा उत्सव आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. असंही म्हणता येईल की ही नऊ रुपे म्हणजे नऊ वेगवेगळी क्षेत्रे, वेगवेगळी क्षितीजे! आज साहित्य, कला, शास्त्र, खेळ, राजकारण, समाजकारण आदि सर्वच क्षेत्रातला स्त्रियांचा सहभाग नुसताच उल्लेखनीय नाही तर त्या त्या क्षेत्रातले एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रमही अनेक सौदामिनी करत आहेत. अशा व्यक्तिंना कुसुमाग्रज 'प्रकाशाची बेटे' म्हणतात. गार्गी, मैत्रेयीपासून सुरू झालेल्या ह्या परंपरेत जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रायबाघन सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर अशा अनेक स्त्रियांनी इतिहासात सोन्याचे पान लिहिले आहे. इंदिरा गांधी, दुर्गाबाई भागवत, मृणाल गोरे, डॉ. आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, सुधा मूर्ती, डॉ.मंदा आमटे, पी.टी..उषा, सायना नेहवाल ते अगदी आत्ताच्या ऑलिंपिक्समध्ये भारताला जगाच्या नकाशावर पाऊल ठेवू देणार्‍या साक्षी, सिंधुसारख्यांपर्यंत.. यादी न संपणारी आहे. भारताबाहेरही अशा अनेक जणी आहेत की ज्यांची दखल सार्‍या जगाला घ्यावी लागलीच आहे. क्लिओपात्रा, मार्गारेट थॅचर, मादाम क्यूरी, फ्लोरेन्स नाइटिंगेल, सिरिमाओ बंदारनायके.. अक्षरशः अशा कर्तृत्ववान स्त्रिया अमोज आहेत. कित्येकजणींची फक्त नावे आपल्याला माहित असतात तर कितीतरी जणींचे असामान्य कर्तृत्व काळाच्या पडद्याआड दडून जाते. आदिशक्तीची आराधना करताना कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. गेली काही वर्षे जिद्दीने स्वतःला सिध्द करणार्‍या,स्वतःबरोबर समाजाला पुढे नेणार्‍या, आपल्या असामान्य कर्तृत्वाने देशाचे,जगाचे राजकारण, अर्थकारण बदलणार्‍या व्यक्तिमत्वांची माहिती, चरित्रे मी वाचते. आंतरजालामुळे '.तिळा दार उघड..' म्हटलं की..माहितीचा खजिनाच समोर येतो. त्याच खजिन्यातले हे काही माणिक,मोती! आधुनिक युगातल्या अशा काही परिचित/अपरिचित असामान्य दुर्गा, काली, लक्ष्मी, सरस्वती, अंबा यांच्या बुध्दिमत्तेची, कलाकौशल्याची, अफाट कर्तृत्वाची, स्त्रीशक्तीची ही अक्षरपूजा! .
  • दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
  • दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
  • दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
  • दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना
  • दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी
  • दीपशिखा-६. ओफ्रा विनफ्रे- द क्वीन ऑफ ऑल मिडिया
  • दीपशिखा-७. डॉ.मुथ्थुलक्ष्मी रेड्डी
  • दीपशिखा-८. आउंग सान स्यू की
  • दीपशिखा-९. श्रीमती सुषमा स्वराज
  • दीपशिखा-१०. अवकाशकन्या- कल्पना चावला
  • दीपशिखा- समारोप

Book traversal links for दीपशिखा!

  • दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
10934 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

सुरुवात आवडली.

रेवती
Sat, 10/01/2016 - 00:08 नवीन
सुरुवात आवडली.
  • Log in or register to post comments

वाह! खूप छान.

पद्मावति
Sat, 10/01/2016 - 00:18 नवीन
वाह! खूप छान.
  • Log in or register to post comments

वा! मस्तच.

रुपी
Sat, 10/01/2016 - 06:15 नवीन
वा! मस्तच.
  • Log in or register to post comments

ओळखा

शरद
Sat, 10/01/2016 - 06:38 नवीन
वरील छायाचित्रातील किती "प्रसिद्ध" भगिनींना आपण ओळखू शकता ? प्रतिसादात आकडा द्या विजेतीला/विजेत्याला "अनाहिता" तर्फे नवरात्रीत एक नारळ मिळेल. शरद.
  • Log in or register to post comments

उपनिषदांवर लिहिणारे तुम्हीच

यशोधरा
Sat, 10/01/2016 - 06:57 नवीन
उपनिषदांवर लिहिणारे तुम्हीच का ते पाहून आले. असो. तुम्ही किती नारळ जमावताय पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

ओळख होणे हाच उद्देश आहे ना

पिलीयन रायडर
Sat, 10/01/2016 - 08:56 नवीन
ओळख होणे हाच उद्देश आहे ना काका.. आणि पुरुषांनी सुद्धा ओळखलं ह्यांना तरी काही हरकत नाही. त्यामुळे नारळ द्यायचाच असेल तर स्पर्धा सगळ्यांसाठीच घ्या की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

विजेत्याला एक नारळ मिळणार आहे

आदूबाळ
Sun, 10/02/2016 - 11:27 नवीन
विजेत्याला एक नारळ मिळणार आहे का दरडोई एक नारळ? ;) - छिद्रान्वेषक, 27 कफ परेड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

न्वेषक, 27 कफ परेड

असंका
Tue, 10/04/2016 - 18:59 नवीन
न्वेषक, 27 कफ परेड
________/\_________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भाऊ तुम्ही मला समजावुन सांगाल का

मारवा
Tue, 10/04/2016 - 19:17 नवीन
२७ कफ परेड कुठल्या महापुरुषाचा अ‍ॅड्रेस आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

छान लिहिले आहे स्वाती ताई,

यशोधरा
Sat, 10/01/2016 - 06:55 नवीन
छान लिहिले आहे स्वाती ताई, आवडले.
  • Log in or register to post comments

क्रमश: आहे का? सुरुवात आवडली.

एस
Sat, 10/01/2016 - 08:52 नवीन
क्रमश: आहे का? सुरुवात आवडली.
  • Log in or register to post comments

कल्पना आवडली! नक्कीच आवडेल

पिलीयन रायडर
Sat, 10/01/2016 - 08:58 नवीन
कल्पना आवडली! नक्कीच आवडेल अशी लेखमाला वाचायला!
  • Log in or register to post comments

स्वाती ताई, छान लिहिले.

पूर्वाविवेक
Sat, 10/01/2016 - 11:39 नवीन
स्वाती ताई, छान लिहिले. स्तुत्य उपक्रम.
  • Log in or register to post comments

ओळख..

स्वाती दिनेश
Sat, 10/01/2016 - 11:54 नवीन
@ शरद, प्रसिध्द आणि कर्तूत्ववान हे दोन वेगळे शब्द आहेत ना.. परिचित/अपरिचित असामान्य कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख हा माझ्या लेखमालेचा उद्देश आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

गैरसमज

शरद
Sun, 10/02/2016 - 07:39 नवीन
सर्वश्री. यशोधरा, पिलियन रायडर, स्वाती, मुलींनो, तुमचा गैरसमज झालेला दिसतो. लेख वाचल्यावर मी जवळजवळ अर्धा तास कागद-पेन घेवून बसलो व मला निम्मी चित्रेही ओळखता आली नाहीत वयाचा परिणाम ? शक्य आहे. प्रतिसाद देण्याचा उद्देश हा की माझे सोडा, पण किती मिपाकरांना या कर्तृत्ववान स्त्रीयांची ओळख पटते ते पहावे. नारळ माझ्या बागेतलेच द्यावयाचे आहेत. किती का लागेनात. आता प्रश्न असा की (माझ्यासारखे निरुद्योगी सोडून) किती जणींनी(जणांनी) ही छायाचित्रे आहेत तरी किती ? हे पाहिले आहे. असो. अजून आठ दिवस (खरे म्हणजे रात्री) आहेत. मिळवा जास्तीत जास्त नारळ दीपशिखा १,२ यांची ओळख छानच आहे. शरद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

छान लिहिलेय स्वातीताई,

गिरिजा देशपांडे
Sat, 10/01/2016 - 11:56 नवीन
छान लिहिलेय स्वातीताई, लेखमाला असेल तर अजूनच छान!!!!!!!
  • Log in or register to post comments

उत्तम सुरुवात,

नीलमोहर
Sat, 10/01/2016 - 15:16 नवीन
स्तुत्य उपक्रम, दीपशिखा नावही साजेसे.
  • Log in or register to post comments

सुंदर सुरुवात, पुढील

मोदक
Sun, 10/02/2016 - 08:30 नवीन
सुंदर सुरुवात, पुढील भागांच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

सुंदर सुरुवात, पुढील

मोदक
Sun, 10/02/2016 - 08:30 नवीन
सुंदर सुरुवात, पुढील भागांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Sun, 10/02/2016 - 09:51 नवीन
सुरेख उपक्रम! वाचायच्या तयारीत आहे.
  • Log in or register to post comments

एक नंबर आहे कल्पना. शुभेच्छा

आदूबाळ
Sun, 10/02/2016 - 11:28 नवीन
एक नंबर आहे कल्पना. शुभेच्छा आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त स्वातीताई

अनन्न्या
Wed, 10/05/2016 - 22:40 नवीन
वाचायला आवडेल!
  • Log in or register to post comments

आता हा पहिला भाग वाचला.

त्रिवेणी
Sun, 10/16/2016 - 19:46 नवीन
आता हा पहिला भाग वाचला. आता वाचते रोज.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा