तू...

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
4 Oct 2016 - 1:32 pm

आठवलीस तू धुसर धुसर,
वेळ असे ती कातर कातर,
स्मरता तुझ्या त्या आठवणींना,
दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!!

तव नयनांचे घाव उराशी,
अदा तुझी ती कातील कातील,
स्तुती करावी काय सौंदर्याची,
शब्द अपुरे पडतील पडतील !!२!!

रूप तुझे भरपूर देखणे,
त्यात लाजणे सुंदर सुंदर,
तुझे हृदय जिंकण्यासाठी,
हरून गेले बहु धुरंधर !!३!!

पाहून तुझे लावण्य साजरे,
माझी अवस्था मंतर मंतर,
पाहताना तुझ मरण ही आले,
त्यास विनंती नंतर नंतर !!४!!

प्रेम कविताकविता

प्रतिक्रिया

राजेंद्र देवी's picture

4 Oct 2016 - 2:15 pm | राजेंद्र देवी

पाहताना तुझ मरण ही आले,
त्यास विनंती नंतर नंतर !!४!!

कवि मानव's picture

4 Oct 2016 - 2:40 pm | कवि मानव

धन्य्वाद !!

प्रसाद_कुलकर्णी's picture

4 Oct 2016 - 4:41 pm | प्रसाद_कुलकर्णी

पाहताना तुझ मरण ही आले,
त्यास विनंती नंतर नंतर

कवि मानव's picture

4 Oct 2016 - 5:05 pm | कवि मानव

धन्यवाद !!

खरा तर... लिहिताना वाटलं की ही कल्पना फार अवास्तव आहे पण एकूणच त्याचा अर्थ छान निघून आला

रातराणी's picture

4 Oct 2016 - 10:52 pm | रातराणी

आवडली! छान आहे कविता!

वा! सुंदर कविता. आवडली आवडली.

कवि मानव's picture

5 Oct 2016 - 1:47 am | कवि मानव

खुप खुप धन्यवाद !!

पैसा's picture

5 Oct 2016 - 8:31 am | पैसा

छान कविता