नवरात्र चालू आहे. नऊ दिवस उपास करणाय्रांसाठी थोडी वेगळी पण चविष्ट पाककृती घेऊन आलेय. उपास नसला तरी करून आस्वाद घ्यायला हरकत नाहीच!
साहित्यः
पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं.
कृती:
खोबरं खवून घ्यावं. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरच्या वाटून घ्याव्या. खोबरं कोथिंबीर, मिरचीचं वाटप आणि मीठ एकत्र करावं. दोन वाट्या पाणी आणि ताक नॉनस्टीक पॅनमध्ये एकत्र करावं. चवीनुसार मीठ, लाल तिखट घालावं. आता त्यात शिंगाडापीठ आणि साबुदाणा पीठ घालून नीट मिसळावं. गोळी होता कामा नये.
आता मंद गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहावं. दोन ताटाना तूपाचा हात लावून घ्यावा. मिश्रण शिजत आलं की घट्ट होत जातं. पिठाचा रंग बदलतो. आता मिश्रण उलथ्याच्या सहाय्याने भराभर ताटावर पसरावे. त्यावर खोबरं कोथिंबीर घालावी. तूप जिय्राची फोडणी करावी. या मिश्राणावर पसरावी. हा फोटो फोडणी घालण्या पूर्वीचा आहे.
आता उभ्या रेषा मारून घ्याव्या. अर्ध्यापर्यंत गुंडाळावे.
अश्या पध्दतीने सर्व वड्या गुंडाळून घ्याव्या. मस्त डीश तयार आहे. आता मनसोक्त उपास करा!!!

वाचने
14483
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच
छान दिसताहेत वड्या!
छान दिसताहेत वड्या!
मस्त प्रकार.
भारी दिसतायेत.
अग
अगं करून बघ!
वा. मस्तच!
हे उपवासाला चालतं? हे खाललं
तुम्ही म्हणताय ती खांडवी
In reply to हे उपवासाला चालतं? हे खाललं by खटपट्या
ओह धन्यवाद. मराठीत खांडवी
In reply to तुम्ही म्हणताय ती खांडवी by सूड
पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव
In reply to हे उपवासाला चालतं? हे खाललं by खटपट्या
खूपच मस्त...कधी कल्पनाच केली
मस्त पाकृ. हा प्रकार माहित
रेखीव वड्या झाल्या आहेत. एकदम
थँक्स सगळ्यांना!
झकास पाकृ
क्या बात है... वा वा वा...!!!
वाह, मस्त वेगळा प्रकार आहे,
खरंय. अगदी वेगळी आणि मस्तं
सुरेख
छान पाकृ आणि फोटो सुद्धा!.
मस्त पाकृ!
फोटो दिसत नाहीत....
का बरं?
वॉव!
दंडवत-----^------
वेगळाच प्रकार
उचलून तोंडात टाकविशी वाटतेय
भारी! एक नंबर! किती छान
धन्य आहेस
मास्टर शेफ असं बोलतायत?
एकदम हटके आणि मस्त पाकृ.