Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Fri, 11/14/2014 - 15:07
'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच. माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता. तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे. आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे. १) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss prpr २) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla drred ३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk boss ४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla. brut ५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk jm ६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss. lomani ७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar. nblue ८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar. cred ९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk edw १०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco. tabac जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो. आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments
  • 123288 views

प्रतिक्रिया

Submitted by वेदांत on Wed, 08/03/2016 - 12:48

In reply to मस्तं लिस्ट. अत्तर कधी ट्राय by पद्मावति

Permalink

अत्तर मनगटाला,कानाच्या मागे

अत्तर मनगटाला,कानाच्या मागे,मानेला लावतात. आजकाल बाजारात अत्तर पर्फ्यूम पण मिळत आहेत.. http://www.amazon.in/s/ref=bl_dp_s_web_1355016031?ie=UTF8&node=1355016031&field-brandtextbin=W.O.W.+Perfumes
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Wed, 08/03/2016 - 13:48

Permalink

धन्यवाद वेदांत.

धन्यवाद वेदांत. amazon ची लिंकही उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 08/03/2016 - 17:46

Permalink

डियो वापरणे बंद करावे,

डियो वापरणे बंद करावे, त्यापेक्षा परफुम अत्तर कधीही योग्य, मला असाच एकदा अनुभव आल्यानंतर, (एखादा दिवस डियो नाही मारला तर अंगाला घाण वास यायचा, प्रत्यक्षात डियो वापरायला लागलो त्या आधी असे नव्हते) मी ओळखीतल्या दहा बारा जणांना हा प्रयोग करायला सांगितला. एक महिना कोणताच डियो वापरायचा नाही, सुरुवातीचे तीन ते सात दिवस अतिशय घाण वास यायला लागतो शरीराला, डियो शिवाय जगणे शक्यच नाही असे वाटते, नंतर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात शरीराचा हरवलेला नैसर्गिक गंध परत येतो, महिना पूर्ण होताच आपल्याला डियो ची गरजच नाही हे समजतं. ज्यांनी हा प्रयोग केला त्यांची डियो न वापरल्यामुळे येणाऱ्या घाणेरड्या वासापासून सुटका झाली, हा वास काहीतरी केमिकल लोच्यामुळे तयार होतो-हा नैसर्गिक घामाचा वास नव्हे, ह्याच वासामुळे उपभोक्ते सतत डियो वापरात ठेवतात. ज्यांना डिओचे व्यसन लागले असेल त्यांनी हा प्रयोग जरूर करावा, प्रत्येकाला डियोची गरज नसते, पण वापरात राहिल्याने निर्माण होते, त्यापेक्षा नैसर्गिक सुगंध वापरावेत,
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 08/03/2016 - 18:05

In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे

Permalink

बघतो प्रयोग करुन...

बघतो प्रयोग करुन...
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/03/2016 - 18:07

In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे

Permalink

खरंच की काय संदीपराव?

खरंच की काय संदीपराव? च्यायला बघायला पैजे प्रयोग करुन.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 08/23/2016 - 19:43

In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे

Permalink

+१

तंतोतंत. म्हणजे डिओ वापरणं बंद करुन पाहिलं. नंतरचाही घटनाक्रम ऑल्मोस्ट तसाच. अर्थात शरीरशास्त्राची माहिती , केमिस्ट्रीतली अक्कल, डिओ मध्ये वापरल्या जाणार्‍या नेहमीच्या घटकांबद्दलचं सामान्य ज्ञान माझं शून्य असल्यानं हे सांगायला धजावत नसे. अजूनही ह्याबद्दल खात्री नाही मलाच. पण तंतोतंत अनुभव आला. सध्या चंदन, गुलाब वगैरेचे परफ्युम वापरतो. ती खास सुगंधी दुकानं नसतात का देवस्थानांच्या आसपास वगैरे, तिथून आणतो. तिथे फक्त उदबत्त्या, परफ्युम , अत्तरं अशाच वस्तू असतात . तशी दुकानं. किंचित महाग पडतं, पण एकूणात वर्थ इट.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 08/23/2016 - 19:56

In reply to +१ by मन१

Permalink

खूप खूप धन्यवाद मनराव, मी आता

खूप खूप धन्यवाद मनराव, मी आता विचारणारच होतो कि कुणी प्रयोग करुन पाहिलाय की नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by II श्रीमंत पेशवे II on Wed, 09/26/2018 - 12:39

In reply to डियो वापरणे बंद करावे, by संदीप डांगे

Permalink

सहमत ......

खर तर डिओडरंट च्या वापराबद्दल एक वेगळा धागा बनू शकेल ,डिओडरंट चे खूप प्रकार आहेत ( स्टिक ,ओईल बेस्ड,अल्कोहोल वाला,ब अल्कोहोल रहित , अल्युमिनियम कण असलेला , किंवा नसलेला ) डिओडरंट मध्ये असलेले घातक पदार्थ मानवी शरीरावर कसे परिणाम करतात ? कुठल्या व्यक्तीने कोणता डिओडरंट वापरावा. संदीप नि फारच कमी शब्दात डिओडरंट बद्दल मत मांडल आहे... आणि काही अंशी ते खरही आहे .. आपण शरीराची रचना पाहिली तर आपल्याला शरीरातील विशेष ग्रंथी या उत्सर्जना साठी काम करतात त्याच पैकी बगलेत असलेल्या ग्रंथी घाम उत्सर्जित करतात आणि तो उत्सर्जित होणे महत्वाचे आहे . तो बाहेर येउच नये असे काही केले तर त्याचा परिणाम शरीरामध्ये ते कुठेतरी परिणाम करत असतो. मी मागे एकदा डिओडरंट बद्दल वाचले होते त्यामध्ये असे कळले कि घामांच्या गंध काढण्यासाठी वापरल्या जाणार्या परफ्यूम आणि डिओडोरंट्स केवळ घाम ग्रंथेवर प्रभाव टाकत नाहीत, परंतु शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या विषारीपणाच्या नैसर्गिक प्रक्रियेस देखील नुकसान करतात. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याकरिता मानवी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी घाम येतो उदा. नाकावर , कपाळावर , छातीवर , पाठीवर , बगलेत , जांघेत , तळव्याला इत्यादी. जर या घाम येण्याच्या वाटा आपण कशाचे तरी लेपन करून बंद केल्या तर शरीराचे तापमान वाढते. आणि शरीर या ना त्या मार्गांनी तापमान संतुलित ठेवण्याची धडपड करत असते. मग बाहेर पडू न शकलेली विषारी,शरीराला नको असलेली द्रव्ये शरीरातच राहतात आणि त्यांची तीव्रता हि वाढते.ज्यामुळे अजून एक नवीन समस्या जन्माला येते. डियो वापरणे बंद करावे, त्यापेक्षा परफुम अत्तर कधीही योग्य, हे मला योग्य वाटले , आपण जशी शरीराला सवय लावतो तसे ते आत्मसात करीत असते. संदीप म्हणतायत तसे काही दिवस डिओडरंट वापरणे बंद केले तर जी दुर्गंधी आणि द्रव्ये ग्रंथीमध्ये साचून राहिलेली असतात ते बाहेर यायला सुरुवात होते. शरीराला हवे आहे तितके पाणी पिणे आणि ज्यावेळेस लघुशंका होत आहे असे जाणवेल तेव्हा लाघुश्न्केस जाणे हाच हि दुर्गंधी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. यावर मिपा मधील तद्न्य मंडळी उपापोह करतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on गुरुवार, 08/04/2016 - 01:00

Permalink

माझे लेटेस्ट आवडते पर्फ्यूम.

माझे लेटेस्ट आवडते पर्फ्यूम. मिस dior आणि कोको शनाल. अप्रतिम सुगंध...addictive!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Mon, 08/22/2016 - 10:39

Permalink

शनिवारी मोहमद्द अली रोड वरुन

शनिवारी मोहमद्द अली रोड वरुन ४-५ अत्तर घेऊन आलोय. रोझ,मोगरा,रॉयल ब्लू (रॉयम मीराज) , ब्लू वेव, आणि अल-रहीब चे सिल्वर .
  • Log in or register to post comments

Submitted by संदिप एस on Mon, 08/22/2016 - 11:01

Permalink

मागच्या आठ्वड्यात ऊद बहार नावाचा अरबी सुगंध आणलाय

ऊद बहार एकदम म्स मस्त वाटतं लावले की,
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Mon, 08/22/2016 - 11:25

Permalink

आताच केशर-कस्तुरी(८०-२० %)

आताच केशर-कस्तुरी(८०-२० %) आणलाय जबरदस्त सुगंध आहे त्याचा. व्हर्जिनल 'केशर' चा सुगंध फार तिव्र असल्याची जाणवले.
  • Log in or register to post comments

Submitted by सोनुली on Tue, 08/23/2016 - 17:59

Permalink

आईच्या साडीच्या पदराला येणारा

आईच्या साडीच्या पदराला येणारा सुगंध, सगळ्यात जास्त आवडतो
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त on Wed, 08/24/2016 - 13:22

Permalink

मी रसासी चस्टीटी वापरतो.

मी रसासी चस्टीटी वापरतो. चांगला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 08/24/2016 - 15:01

Permalink

वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी,

वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी, चार्ली वापरले आहेत. मलाही आवडतात मंद सुगंध असलेले. जास्त डार्क नाही आवडत. एक माहीती हवी होती. सुरंगीचे अत्तर कुठे मिळते हे माहीत आहे का कोणाला?
  • Log in or register to post comments

Submitted by II श्रीमंत पेशवे II on Tue, 09/25/2018 - 16:18

In reply to वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी, by जागु

Permalink

सुरंगी

सुरंगीच्या अत्तराचे उत्पादन दापोली च्या जवळ आसूद बाग नावाचे गाव आहे तिथे कुणीतरी ( नक्की नाव माहित नाही ) ते बनवतात मी एकदा आणले होते बायको साठी .....छान गंध आहे पण अतिशय नैसर्गिक .....झकपक कपडे घालून त्यावर अजिबात न शोभणारा सुरंगी चे अत्तर आता स्प्रे मध्ये पण उपलब्ध आहे पण अत्तरा प्रमाणे दिवसभर टिकत नाही .....तरीही छानच
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Mon, 09/19/2016 - 10:54

Permalink

काल अल-रहिब चे ३ अत्तर

काल अल-रहिब चे ३ अत्तर (सुल्तान्,स्पेस्,झिदान) ईबे वरुन मागवले. ऑफिस मध्ये वापरयला पण छान आहेत. http://www.ebay.in/itm/AL-REHAB-6ML-Perfume-Roll-On-Attar-Ithar-3s-Pack-Pick-Any-3-Free-Shipping-/231792480843?hash=item35f7e8924b:g:CRUAAOSwFqJWiQ6i त्याच बरोबर अमझोन वरुन वॉव परफ्यूम्स चे IS-MIAMI मागवले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमेरिअन on Mon, 09/19/2016 - 11:52

Permalink

आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला

पुण्यात कॅम्प मध्ये HP पेट्रोल पंप च्या मागे अली सोमजी स्ट्रीट ला 'FAA' नावाचे एक perfume चे छोटेसे दुकान आहे. पहिले तिथे 'प्राईड ऑफ हैदराबाद' नावाचे नावाजलेले हॉटेल होते आणि हॉटेल च्या बाहेर हे दुकान होते. आता त्या हॉटेलऐवजी शेरवानी चे मोठ्ठे दुकान आहे आणि त्याच्या आत हे FAA आहे. त्यांचा FAA special हा परफ्युम अफलातून आहे. मला ऑफिस मध्ये आणि बाहेर कमीत कमी 100 लोकांनी या परफ्युम बद्दल विचारलं आहे आणि त्यांच्या साठी एक आणायला सांगितलं आहे. MUST TRY! 550 रुपये किंमत आहे. तुम्हाला लगेच प्रेमात पडेल असा फ्रेश आणि मोहक सुगंध आहे. या अत्तराचे contents हा दुकानदार काही सांगत नाही. FAA मध्ये अजूनही बरेच छान छान परफ्यूम्स आहेत. पण या FAA SPECIAL ला तोड नाही. त्या दुकानदाराच्या म्हणण्यानुसार इथले अत्तरं विदेशातही पाठवले जातात. जाणकारांनी एकदा तरी भेट द्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 10/04/2016 - 15:32

In reply to आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला by सुमेरिअन

Permalink

जायलाच पैजे

जायलाच पैजे
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्य वाचक on Tue, 10/04/2016 - 15:39

In reply to आजवरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला by सुमेरिअन

Permalink

अत्तर आहे का perfume स्प्रे?

Perfume असेल तर या शनिवारी आणण्यात येईल नक्की
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Tue, 10/04/2016 - 13:20

Permalink

पर्फ्यूम विकत घेण्यासाठी

पर्फ्यूम विकत घेण्यासाठी बेस्ट ऑनलाइन साईट http://perfumery.co.in/designer-perfumes.html?mode=grid http://unboxed.in/
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Tue, 10/04/2016 - 16:07

In reply to पर्फ्यूम विकत घेण्यासाठी by वेदांत

Permalink

तुम्ही ऑर्डर केल्या आहेत का.

तुम्ही ऑर्डर केल्या आहेत का..म्हंजे ओरिजीनल असतात का?
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Tue, 10/04/2016 - 16:21

In reply to तुम्ही ऑर्डर केल्या आहेत का. by शलभ

Permalink

कालच unboxed.इन वरुन

कालच unboxed.इन वरुन Hugo Boss Bottled आणी david's cool water मागवले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Sat, 10/08/2016 - 19:25

In reply to कालच unboxed.इन वरुन by वेदांत

Permalink

मी मागावलेले टायटन स्किन

मी मागावलेले टायटन स्किन परफ्यूम आले आज पण दोनही बॉक्स वर "Tester Not for sale" असं लिहिलंय. त्यांना कॉल केला तर नाही उचलला. साईट वर मेसेज केलाय. काय करू. तसच वापरू की परत करू. असं टेस्टर प्रोडक्ट विकणं बरोबर आहे का.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 10/08/2016 - 22:06

In reply to मी मागावलेले टायटन स्किन by शलभ

Permalink

अजिबात वापरू नका, परत करा,

अजिबात वापरू नका, परत करा, एकतर हे बेकायदेशीर आहे तसेच पैसे देऊन प्रायोगिक उत्पादन देणे अक्षम्य अपराध आहे, तसेच ह्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करा व संबंधित दोन्ही कंपन्यांच्या फेसबुक पेजवर टाका
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Sun, 10/09/2016 - 00:13

In reply to अजिबात वापरू नका, परत करा, by संदीप डांगे

Permalink

ओके..करतो..

ओके..करतो..
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Sun, 10/09/2016 - 17:03

In reply to ओके..करतो.. by शलभ

Permalink

Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज

Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज टाकल्यावर आता कॉल येऊन गेला. त्यांचं म्हणणं आहे, 1. टेस्टर प्रॉडक्ट विकणं बेकायदेशीर नाहीय जोवर तुम्ही त्यावरचा सेल्स टॅक्स बुडवत नाही. 2. प्रॉडक्ट च्या स्पेसिफिकेशन मध्ये लिहिलंय कि Product Packaging = Tester जे मी कन्फर्म केलं. 3. ते अशा प्रकारे बरेच प्रॉडक्ट विकतात म्हणून स्वस्त देऊ शकतात बाकीच्या पेक्षा. अमेझॉन वर टायटन स्किन्न सेलेस्ट 1390 ला आहे, इथे ते 999 ला आहे. 4. सर्व प्रॉडक्ट ऑथेंटिक आहेत. सध्या तरी मी मला आलेले परफ्युम वापरणार आहे तो परत घ्यायला तयार असताना सुद्धा. तुमच्या मदतीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 10/09/2016 - 17:28

In reply to Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज by शलभ

Permalink

"Tester Not for sale"

"Tester Not for sale" ह्या उल्लेखाविषयी तुम्ही त्यांना काहीच म्हटले नाही? जेव्हा ते नॉट फॉर सेल आहे तर मग ते सेल कसे होऊ शकते? तुम्ही वापरा न वापरा तो तुमचा निर्णय, त्याने काही फरक पडणार किंवा नाहीसुद्धा, पण भविष्यात इतर कुणी असे प्रॉडक्ट ऑर्डर करू नये किंवा वापरू नये या मताचा मी आहे, याचे कारण वैद्यकीय समस्या उद्भवल्या तर यापासून नुकसान भरपाई मिळणे शक्य होईल काय याबद्दल शंका आहे, तसेच आंतरराज्यीय कर वाचवायला हा झोल करत असावेत अशीही शंका आहे,
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Tue, 09/11/2018 - 17:35

In reply to पर्फ्यूम विकत घेण्यासाठी by वेदांत

Permalink

=============================

============================= killeroud, unboxed, perfumery, armaf.in या सगळ्या वेबसाईट्स एकाच व्यक्तीच्या (मोहीत खत्री) आहेत. splashfragrance.in वेबसाईटबद्दल चांगले ऎकून आहे, पण मी ट्राय केली नाही. =============================

============================= महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे. तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात. मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे. आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे. तो स्वतः बनवतो परफ्युम. तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो. त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत. सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय. तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा. फारच मस्त आहे! पुरवून पुरवून वापरतोय मी. याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत. शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात. विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही. =============================

============================= पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे. हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात. यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे! =============================

============================= मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता. तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला. या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम. =============================

============================= परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( =============================
  • Log in or register to post comments

Submitted by पंतश्री on Fri, 09/14/2018 - 17:19

In reply to ============================= by नांदेडीअन

Permalink

नक्कि कुथेशी??

हे तिळक रोड वर नक्कि कुठेशी आहे??
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Fri, 09/14/2018 - 21:26

In reply to नक्कि कुथेशी?? by पंतश्री

Permalink

https://goo.gl/maps

https://goo.gl/maps/WDLCzCyeD6K2 ^^ याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 09/17/2018 - 11:29

In reply to ============================= by नांदेडीअन

Permalink

Z. K. Perfumes हेच का ?

नेटवर असा पत्ता मिळाला. गुगल मॅप्सवर अनेक चांगले अभिप्राय आहेत. हेच का ते ? ZK Perfumes 18/3,Vastu Udyog, Near Rasrang Sweets, Masulkar Colony, Pimpri,,, Pune, Maharashtra
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Tue, 09/25/2018 - 12:37

In reply to Z. K. Perfumes हेच का ? by मराठी कथालेखक

Permalink

हो, हेच ते.

हो, हेच ते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 10/04/2018 - 16:55

In reply to हो, हेच ते. by नांदेडीअन

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. मागच्या आठवड्यात ZK perfumes मध्ये गेलो होतो. ते अजमलचे अत्तर ठेवतात असे ते म्हणाले. त्यांच्याकडून मी चंदन आणि केवडाचे अत्तर घेतले. चंदन चांगले आहे पण केवड्याचा सुगंध काही फारसा जाणवत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 10/04/2016 - 15:31

Permalink

हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय

हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय मारले आहे, नाव आहे :-कुकुंबर तसेच पॉयझनचे अत्तर सुद्धा ट्राय मारले, ते सुद्धा मस्त आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Tue, 10/04/2016 - 16:23

In reply to हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय by मदनबाण

Permalink

अल रिहब , अरोचेम आणि एक्वादस

अल रिहब , अरोचेम आणि एक्वादस चे अत्तर पण चांगले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तुम on Sun, 10/09/2016 - 00:02

Permalink

वेगळाच विषय आणि छान चर्चा ...

वेगळाच विषय आणि छान चर्चा .... डिओडरंट पेक्षा ही परफ्युम जास्ती आवडतात... झारा आणि रसासी विषयी जाणकारांनी माहिती द्यावी
  • Log in or register to post comments

Submitted by vikramaditya on Sun, 10/09/2016 - 07:16

Permalink

I bought Hasan migrate attar

I bought Hasan migrate attar from Amazon. Quite good.
  • Log in or register to post comments

Submitted by vikramaditya on Sun, 10/09/2016 - 07:17

Permalink

Sorry it is ahsan mogara

Sorry it is ahsan mogara
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Tue, 09/11/2018 - 17:35

Permalink

=============================

============================= killeroud, unboxed, perfumery, armaf.in या सगळ्या वेबसाईट्स एकाच व्यक्तीच्या (मोहीत खत्री) आहेत. splashfragrance.in वेबसाईटबद्दल चांगले ऎकून आहे, पण मी ट्राय केली नाही. ============================= ============================= महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे. तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात. मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे. आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे. तो स्वतः बनवतो परफ्युम. तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो. त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत. सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय. तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा. फारच मस्त आहे! पुरवून पुरवून वापरतोय मी. याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत. शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात. विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही. ============================= ============================= पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे. हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात. यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे! ============================= ============================= मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता. तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला. या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम. ============================= ============================= परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( =============================
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Tue, 09/11/2018 - 17:39

In reply to ============================= by नांदेडीअन

Permalink

माहितीपूर्ण प्रतिसाद.

माहितीपूर्ण प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Wed, 09/12/2018 - 13:58

In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by पुंबा

Permalink

धन्यवाद :)

धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 09/14/2018 - 21:26

In reply to धन्यवाद :) by नांदेडीअन

Permalink

हे दुकान नक्की कुठे आहे?

हे दुकान नक्की कुठे आहे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user नांदेडीअन

Submitted by नांदेडीअन on Fri, 09/14/2018 - 21:27

In reply to हे दुकान नक्की कुठे आहे? by यशोधरा

Permalink

https://goo.gl/maps

https://goo.gl/maps/WDLCzCyeD6K2 ‍‌^^ याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदांत on Wed, 09/12/2018 - 15:04

In reply to ============================= by नांदेडीअन

Permalink

फेक परफ्युम

परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( ============================= तुम्हाला फेक पर्फ्युम्म मिळाला आहे. मी आज तोच पर्फ्युम लावला आहे. ८-१० तास टिकतो. ईबे वरुन मागवला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 09/12/2018 - 16:15

Permalink

ते परफ्युम आणि अत्तर वेगवेगळं

ते परफ्युम आणि अत्तर वेगवेगळं असतंय का? मला वाटायचं परफ्युम ला विंग्रजीत अत्तर म्हणतात..
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 09/12/2018 - 22:30

Permalink

अत्तरांवर माझा सतत सोध सुरु

अत्तरांवर माझा सतत सोध सुरु असतो... असाच तू-नळीवर सर्च करताना मला निखीलचा चॅनल सापडला ! जबरा व्यक्तिमत्व,अभ्यास आणि त्याचे स्वतःचे कलेक्शन अफलातुन आहे. मी त्याच्या चॅनलच्या प्रेमात पडलो... नव्हे तर त्याने व्हिडियोत सांगितलेल्या ठिकाणी जाऊन अत्तर खरेदी केली. त्याचे दोन चॅनल्स आहेत, ज्यावर मी अधुन मधुन चक्कर टाकत असतो... ते दोन्ही चॅनल्स इथे अत्तर प्रेमी मंडळींसाठी देउन ठेवतो. Perfume Guru :- https://www.youtube.com/user/gobarboss/videos [ परफ्युम लव्हर्ससाठी सुद्धा हा चॅनल आहे.] Perfume Guru India :- https://www.youtube.com/channel/UCiF045KuvDiT4NE7dGZiNpA [ सध्या इथे ३ व्हिडियो आहेत, निखील ने exotic scents चे बहुधा आता नाव बदलुन Perfume Guru केले आहे.] निखील ने ज्या व्हिडियोत उद मुखल्लतचे कौतुक केले ते मी बराच प्रयत्न करुन मिळवलेच ! :) तो व्हिडियो मी खाली देत आहे. याच बरोबर मी नॉन सिंथेटिक अत्तरे घेतली :- इस्तांबुली गुलाब, केवडा, केशर , खस [ खास कनैज मधले १२ वर्ष जुने असलेले ], टीक्स [ हे विविध उदांचे मिश्रण असुन मला विशेष आवडले आहे. मी यावेळी विविध प्रतीचे आणि विविध देशातील उद हुंगुन पाहिले, अगदी कंबोडियन उद देखील. हे उद हुंगल्यावर माझं डोक जवळपास तास-दीड तास ठणकत होते. उद सर्वांना आवणारा नाही, परंतु उत्तम मिश्रण असलेला, किंवा मुख्ल्लत उद जादुयी परिणाम करणारा असतो इतकं मी खात्रीने सांगु शकतो.] हल्लीच ज्येष्ठ साहित्यिक दाजी शास्त्री पणशीकर माझ्या घरी आले होते, त्यांना सुद्धा अत्तरांची फार आवड आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी माझ्या अत्तरावर भरपुर गप्पा झाल्या.त्यांना मी आवडीने माझ्याकडचे उद मुखल्लत लावले आणि त्यांना ते फार आवडले. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- MahaGanapatim | Ft.Agaadh - Priyanka Barve | Sarang Kulkarni
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 09/25/2018 - 13:05

In reply to अत्तरांवर माझा सतत सोध सुरु by मदनबाण

Permalink

मुंबईत कुठे मिळेल हे? एखादं

मुंबईत कुठे मिळेल हे? एखादं विशेष दुकान? की प्रचलित ठिकाणी चौकशी करू?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 09/29/2018 - 23:08

In reply to मुंबईत कुठे मिळेल हे? एखादं by वेल्लाभट

Permalink

मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर

मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर घेतले त्याचे पत्ते खाली देतो :- अजमल :- Shop No: 1, Ground Floor, Cecil Court, Near Regal Cinema, Colaba. Attar Mohd.Ayub & Co. :- 4/14 A, Kamal Mansion Corner, Hajiniyaz Ahmed Azmi Marg,A.B Road Colaba. [ इथुन हॉटेल कैलास पर्बत जवळच आहे, तिथे छोले भटुरे एकदम सही मिळतात. :) ] माझी एक सवय आहे, ती म्हणजे मी जिथेही अत्तर घेतो तिथे सर्वात आधी खस घेतो, जिथे खस उत्तम मिळतो तिथे इतर अत्तरे सुद्धा उत्तम मिळतात असा आजवरचा अनुभव आहे. माझी आवडती अत्तरे मी आवडीच्या उतरत्या क्रमाने देतो :- १} खस :- माझ्या वैयक्तिक मतानुसार आणि आवडीनुसार हे अत्तर सर्व अत्तरांचा सम्राट आहे. उत्तम खसचा प्रभाव हा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिला आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तिला आवडेलच असा आहे, कमालिचा गारवा देणारा हे अत्तर आहे. २} मोगरा :- या अत्तराचे वर्णन करायचा प्रयत्न केल्यास मी असं म्हणीन की... ताज्या ५ मोगर्‍यांच्या गजर्‍याला जो सुगंध येइल अगदी तसे. :) ३] शमामा :- याच्या पहिल्याच वापरात माझ्या लक्षात आले कि हे एकदम जबरदस्त अत्तर आहे, बर्‍याच काळ मी उत्तम शमामाच्या शोधात होतो जे मी कनौज मधुन हल्लीच मागवले. त्यांच्या संकेतस्थाळाचा पत्ता खाली देत आहे, त्यांना मेल करुन अत्तरे मागवता येतात :- http://mlramnarain.com/ यांच्याकडुन मी खस [ अर्थातच ] , शमामा आणि काश्मिर नावाचे अत्तर मागवले, यातले काश्मिर हे अजुन त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. काश्मिर हे मुखल्लत अत्तर असुन ते फार गोडुस वाटले आहे, त्यामुळे ते कोणी ट्राय मारावे मी असा सल्ला आता तरी देणार नाही.मला या अत्तराला समजायला वेळ लागेल असं वाटत. ४] उद :- एकदा तरी उत्तम दर्जाचे लाईट उद ट्राय मारायलाच हवे... तुमच्या आवडीचे उद जेव्हा तुम्हाला सापडेल तेव्हा तुम्ही नक्कीच उदाच्या आकंठ प्रेमात पडालच. ५]मजमुआ :- याचा गंध हीच याची ओळख आहे, मजमुआ केवडा, कदंब, आणि मिट्टी अत्तर यांच्या रहस्यमयी मिश्रणाची निर्मीती आहे. यात कदंबाचे प्रमाण जास्त असल्यास डोकेदुखी होते असा एक माझा ढोबळ अंदाज आहे. डेडली काँबिनेशन :- मी स्वतःवर केलेल्या अत्तरांच्या प्रयोगात अचानक मला अत्ता पर्यंत दोन जबरदस्त काँबिनेशनचा शोध लागला आहे. ते दोन्ही खाली देतो. १} उद + मोगरा :- वर्णन करायला शब्द सुचत नाहीत. २} खस + गुलाब :- खसचा गंध इतर गंधांना खाउन टाकत असला तरी या प्रकारात तसे होताना जाणवत नाही, तर एक अफलातुन गंध तुम्हाला अनुभवता येतो. सध्या खस + काश्मिर यांच्या प्रयोगात आहे. :) @ मराठी कथालेखक तुम्हीला ऑनलाईन अजमलचे अत्तर अ‍ॅमेझॉन वरुन मागवता येइल आणि जरी कनौज ला जाउ शकत नसलात तरी तिथुनच अत्तरे घरपोच मिळवु शकतात त्यापैकी एका संकेस्थळाचा पत्ता वरती दिला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इंतजार सुन सदायें दे रही है, मंज़िल प्यार की... :- Qayamat Se Qayamat Tak
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 10/04/2018 - 16:53

In reply to मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर by मदनबाण

Permalink

धन्यवाद मदनबाण

धन्यवाद. पिंपरीतले ZK perfumes मध्ये गेलो होतो. ते पण अजमलचे अत्तर ठेवतात असे ते म्हणाले. त्यांच्याकडून मी चंदन आणि केवडाचे अत्तर घेतले. चंदन चांगले आहे पण केवड्याचा सुगंध काही फारसा जाणवत नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com