Skip to main content

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 14/11/2014 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच. माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता. तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे. आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे. १) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss prpr २) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla drred ३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk boss ४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla. brut ५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk jm ६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss. lomani ७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar. nblue ८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar. cred ९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk edw १०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco. tabac जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो. आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.

वाचने 123697
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

In reply to by नांदेडीअन

परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( ============================= तुम्हाला फेक पर्फ्युम्म मिळाला आहे. मी आज तोच पर्फ्युम लावला आहे. ८-१० तास टिकतो. ईबे वरुन मागवला होता.

अत्तरांवर माझा सतत सोध सुरु असतो... असाच तू-नळीवर सर्च करताना मला निखीलचा चॅनल सापडला ! जबरा व्यक्तिमत्व,अभ्यास आणि त्याचे स्वतःचे कलेक्शन अफलातुन आहे. मी त्याच्या चॅनलच्या प्रेमात पडलो... नव्हे तर त्याने व्हिडियोत सांगितलेल्या ठिकाणी जाऊन अत्तर खरेदी केली. त्याचे दोन चॅनल्स आहेत, ज्यावर मी अधुन मधुन चक्कर टाकत असतो... ते दोन्ही चॅनल्स इथे अत्तर प्रेमी मंडळींसाठी देउन ठेवतो. Perfume Guru :- https://www.youtube.com/user/gobarboss/videos [ परफ्युम लव्हर्ससाठी सुद्धा हा चॅनल आहे.] Perfume Guru India :- https://www.youtube.com/channel/UCiF045KuvDiT4NE7dGZiNpA [ सध्या इथे ३ व्हिडियो आहेत, निखील ने exotic scents चे बहुधा आता नाव बदलुन Perfume Guru केले आहे.] निखील ने ज्या व्हिडियोत उद मुखल्लतचे कौतुक केले ते मी बराच प्रयत्न करुन मिळवलेच ! :) तो व्हिडियो मी खाली देत आहे. याच बरोबर मी नॉन सिंथेटिक अत्तरे घेतली :- इस्तांबुली गुलाब, केवडा, केशर , खस [ खास कनैज मधले १२ वर्ष जुने असलेले ], टीक्स [ हे विविध उदांचे मिश्रण असुन मला विशेष आवडले आहे. मी यावेळी विविध प्रतीचे आणि विविध देशातील उद हुंगुन पाहिले, अगदी कंबोडियन उद देखील. हे उद हुंगल्यावर माझं डोक जवळपास तास-दीड तास ठणकत होते. उद सर्वांना आवणारा नाही, परंतु उत्तम मिश्रण असलेला, किंवा मुख्ल्लत उद जादुयी परिणाम करणारा असतो इतकं मी खात्रीने सांगु शकतो.] हल्लीच ज्येष्ठ साहित्यिक दाजी शास्त्री पणशीकर माझ्या घरी आले होते, त्यांना सुद्धा अत्तरांची फार आवड आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी माझ्या अत्तरावर भरपुर गप्पा झाल्या.त्यांना मी आवडीने माझ्याकडचे उद मुखल्लत लावले आणि त्यांना ते फार आवडले. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- MahaGanapatim | Ft.Agaadh - Priyanka Barve | Sarang Kulkarni

In reply to by वेल्लाभट

मुबंईत मी २ ठिकाणी अत्तर घेतले त्याचे पत्ते खाली देतो :- अजमल :- Shop No: 1, Ground Floor, Cecil Court, Near Regal Cinema, Colaba. Attar Mohd.Ayub & Co. :- 4/14 A, Kamal Mansion Corner, Hajiniyaz Ahmed Azmi Marg,A.B Road Colaba. [ इथुन हॉटेल कैलास पर्बत जवळच आहे, तिथे छोले भटुरे एकदम सही मिळतात. :) ] माझी एक सवय आहे, ती म्हणजे मी जिथेही अत्तर घेतो तिथे सर्वात आधी खस घेतो, जिथे खस उत्तम मिळतो तिथे इतर अत्तरे सुद्धा उत्तम मिळतात असा आजवरचा अनुभव आहे. माझी आवडती अत्तरे मी आवडीच्या उतरत्या क्रमाने देतो :- १} खस :- माझ्या वैयक्तिक मतानुसार आणि आवडीनुसार हे अत्तर सर्व अत्तरांचा सम्राट आहे. उत्तम खसचा प्रभाव हा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिला आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तिला आवडेलच असा आहे, कमालिचा गारवा देणारा हे अत्तर आहे. २} मोगरा :- या अत्तराचे वर्णन करायचा प्रयत्न केल्यास मी असं म्हणीन की... ताज्या ५ मोगर्‍यांच्या गजर्‍याला जो सुगंध येइल अगदी तसे. :) ३] शमामा :- याच्या पहिल्याच वापरात माझ्या लक्षात आले कि हे एकदम जबरदस्त अत्तर आहे, बर्‍याच काळ मी उत्तम शमामाच्या शोधात होतो जे मी कनौज मधुन हल्लीच मागवले. त्यांच्या संकेतस्थाळाचा पत्ता खाली देत आहे, त्यांना मेल करुन अत्तरे मागवता येतात :- http://mlramnarain.com/ यांच्याकडुन मी खस [ अर्थातच ] , शमामा आणि काश्मिर नावाचे अत्तर मागवले, यातले काश्मिर हे अजुन त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. काश्मिर हे मुखल्लत अत्तर असुन ते फार गोडुस वाटले आहे, त्यामुळे ते कोणी ट्राय मारावे मी असा सल्ला आता तरी देणार नाही.मला या अत्तराला समजायला वेळ लागेल असं वाटत. ४] उद :- एकदा तरी उत्तम दर्जाचे लाईट उद ट्राय मारायलाच हवे... तुमच्या आवडीचे उद जेव्हा तुम्हाला सापडेल तेव्हा तुम्ही नक्कीच उदाच्या आकंठ प्रेमात पडालच. ५]मजमुआ :- याचा गंध हीच याची ओळख आहे, मजमुआ केवडा, कदंब, आणि मिट्टी अत्तर यांच्या रहस्यमयी मिश्रणाची निर्मीती आहे. यात कदंबाचे प्रमाण जास्त असल्यास डोकेदुखी होते असा एक माझा ढोबळ अंदाज आहे. डेडली काँबिनेशन :- मी स्वतःवर केलेल्या अत्तरांच्या प्रयोगात अचानक मला अत्ता पर्यंत दोन जबरदस्त काँबिनेशनचा शोध लागला आहे. ते दोन्ही खाली देतो. १} उद + मोगरा :- वर्णन करायला शब्द सुचत नाहीत. २} खस + गुलाब :- खसचा गंध इतर गंधांना खाउन टाकत असला तरी या प्रकारात तसे होताना जाणवत नाही, तर एक अफलातुन गंध तुम्हाला अनुभवता येतो. सध्या खस + काश्मिर यांच्या प्रयोगात आहे. :) @ मराठी कथालेखक तुम्हीला ऑनलाईन अजमलचे अत्तर अ‍ॅमेझॉन वरुन मागवता येइल आणि जरी कनौज ला जाउ शकत नसलात तरी तिथुनच अत्तरे घरपोच मिळवु शकतात त्यापैकी एका संकेस्थळाचा पत्ता वरती दिला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ऐ मेरे हमसफ़र, एक ज़रा इंतजार सुन सदायें दे रही है, मंज़िल प्यार की... :- Qayamat Se Qayamat Tak

In reply to by मदनबाण

धन्यवाद. पिंपरीतले ZK perfumes मध्ये गेलो होतो. ते पण अजमलचे अत्तर ठेवतात असे ते म्हणाले. त्यांच्याकडून मी चंदन आणि केवडाचे अत्तर घेतले. चंदन चांगले आहे पण केवड्याचा सुगंध काही फारसा जाणवत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

ओक्के... केवड्याचा गंध अत्तर लावण्यार्‍या पेक्षाही त्याच्या आजु-बाजुच्या लोकांना मात्र नक्की कळतो... सुक्ष्म गंध असतो याचा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Mood of Satya

चांगल्या दर्जाचे केवडा , मोगरा असे अत्तर कुठे मिळू शकतील (पुण्यात अथवा ऑनलाईन ... मुंबई / कनौज ई ठिकाणी मी जावू शकणार नाही)

लोकांचं भन्नाट ज्ञान पाहून लाजायला होतं राव. आपल्याला त्यातलं काही कळत नाही. एखादा परफ्युम विकत घेतो( किंवा लोकांना भेट देतो) ते केवळ त्याचा सुगंध आवडला म्हणून. मला पण मित्रांनी किंवा रुग्णांनी भेट दिलेले परफ्युम होते. गंध खास आवडला नाही तर दुसऱ्याला भेट देऊन टाकतो त्याअगोदर त्यांना त्याचा गंध देतो आणि आवडला तरच भेट देतो. ते बेस नोट, टॉप नोट, वूडी फ्रेग्रन्स वगैरे काही कळत नाही. कुठे माहिती मिळू शकेल?.

छान नवीन माहिती मिळाली. हे सगळं आधी माहीतच नव्हते ! किंबहुना अत्तर, पर्फ्युमज् , फ्रेग्रन्स, सुगंधी हे हुच्चभ्रू प्रतिष्ठितांचे चोचले असा पूर्वीपासून गैरसमज असल्याने त्या कडे लक्ष गेले नव्हते. आणि अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया या सारख्या गाण्यांमुळे हा गैरसमज आणखी दृढ होत गेला. थोडा फार संबंध आला तो उदबत्तीतून येणाऱ्या सुगंधा पुरताच. परंतु मिपावर या क्षेत्रातील जाणकार मंडळी आहेत हे पाहून आनंद वाटला आणि त्यामुळे ज्ञानात भर पडली. रच्चाकाने, रंगांधळे लोकं असतात त्याप्रमाणे वासांधळे देखील असतात का हो? मिपावरील डॉ. मंडळींकडून उत्तर मिळू शकेल.

In reply to by चामुंडराय

प्रत्येकाची वास जाणवण्याची क्षमता (गंधज्ञान ) कमी जास्त असते. अगदीच शून्य असेल असे वाटत नाही पण जास्त धुम्रपान करणार्‍यांत गंधज्ञान खूप खालावलेले असते असे ऐकून आहे.

वासांधळे पणा किंवा वास न येणे. याचे दोन प्रकार आहेत १) तात्पुरते- यात नाक बंद झाले असले सर्दीमुळे किंवा नाकाच्या आतल्या भागास जखम झाली असेल किंवा दुसऱ्या कारणाने सूज अली असेल तर आपल्याला वास आणि स्वाद जाणवत नाही २) कायमचे -- यात नाकातील घ्राणेंद्रियांचे संवेदक पासून मेंदूचे वासाचे केंद्र या पूर्ण मार्गात कुठेही अडथळा किंवा इजा झाली असल्यास त्या व्यक्तीची वास हि संवेदना नष्ट होते. https://en.wikipedia.org/wiki/Anosmia या विषयावर मी मागे दोन लेख लिहिले होते. त्यात बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला आहे. जिज्ञासूंनी वाचून पहावेत( जाहिरात) https://www.misalpav.com/node/25432 https://www.misalpav.com/node/25466

In reply to by सुबोध खरे

हा वासाचाच एक प्रकार आहे का? भिन्न लिंगी व्यक्ती आवडण्यामध्ये किंवा न आवडण्यामध्ये फेरमोन्स कारणीभूत असतात का?

In reply to by चामुंडराय

https://www.medicalnewstoday.com/articles/232635.php फेरोमोन्स बद्दलची अद्ययावत माहिती सध्या शब्दात वरील दुव्यावर वाचता येईल. अद्यापही मानवी फेरोमोन्स बद्दल नक्की असा पुरावा सापडलेला नाही. परंतु याबद्दल थोडी कल्पना येण्यासाठी हे थोडेसे परस्पर विरोधी दोन्ही दुवे वाचून पहा. https://en.wikipedia.org/wiki/Human_sex_pheromones http://www.sciencemag.org/news/2017/03/do-human-pheromones-actually-exi…

कॉलेज मध्ये असताना एक प्रोफेसर डिओ वापरायचे सेम तो सेम RMD आणि पान पराग सारखा सुगंध असायचा... नाव कधी विचारलेच तर धप्पा मिळालेला .. नंतर कधी नाद केला नाही विचारायचा.. असो

आनद अनतरा यानी महटलयापमाणे मी पण हेमनत मधिल वाळा अततराचा तयिनी तयार केलेला (spray)वापरते ऊनहाळयात खूप छान वाटतो. दुसरे रेवलान चे हवाईट,, यलो वगैरे आवडतेतेही असतेच. व मोगरा ई० आवडते अततर. अततरे सेनट सरवच आवडते, मला खूप वरषापासून ओ दि लता लताबाईनचा सेनट घयायचाय पण किममत व माझे पैसे यानचा पाठशिवणीचा खेळ चालू आहे आता बरयाच दिवसात सेनट बघितलेच नाहीत कारण रोज लावायची वेळ येत नाही. पण हिना स्प्रे खूप खूप आवडतो, बाकीचे भारीतले सेनट घरात असले तरी.

आता ओ दि लताची किममत कोणी सानगेल का? तसेच १वापरलेले ओ दि कोलन लेमन फलेवर ही आवडते पण मधेच विसरूनही गेले बरेच वरषेआणायचे.