Skip to main content

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 14/11/2014 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
'मारवा' यांच्या (गंभीर्/चिल्लर्/थिल्लर - वर्गीकरण माहीत नाही) प्रश्नावरून प्रेरित होऊन म्हटलं आवडते परफ्यूम्स विषयावर एक धागा काढावा. सो; हा धागाप्रपंच. माझ्या बाबांकडून मी उचललेल्या अनेक आवडींपैकी ही एक. परफ्यूम्स. प्रचंड आवडतात, मी याच्या व्यसनाधीन आहे असंही म्हटलं जातं. पण I am okay with it. मला लागतात. मी वाण्याकडे जातानाही सेंट फवारून जातो. काय करणार आता. तर, आत्तापर्यंत मी कमी अधिक क्वालिटीचे अनेक सेंट्स वापरलेत, वापरतो. त्यातल्या काही निवडक सेंट्स ची इथे यादी करत आहे. प्रतिसादागणिक यादी वाढत जाणं अपेक्षित आहे. आवडीनुसार उतरत्या क्रमाने: हे क्रम बदलत असतात. या क्षणी हा क्रम आहे. १) पाको रबान pour homme - अतिशय वेगळा आणि स्ट्राँग वास. वुडी व फ्लोरल नोट्स Top Notes - Rosemary Clary Sage Brazilian Rosewood Middle Notes - Tonka Bean Lavender Geranium Base Notes - Honey Amber Musk Oakmoss prpr २) डनहिल डिझायर फॉर अ मॅन - गोडूस वास. प्रामुख्याने फ्रूटी. Top Notes-Apple Neroli Bergamot Lemon Middle Notes-Patchouli Teak Wood Rose Base Notes-Musk Vanilla drred ३) बॉस - बॉटल्ड नाईट - कडक स्पायसी वूडी सेंट. लाँग लास्टिंग. हार्ड टू डिसलाईक. Top Notes-Lavender Birch Middle Notes-Violet Base Notes-Woodsy Notes Musk boss ४) ब्रूट - ओल्ड इज गोल्ड. एव्हरग्रीन सेंट. निर्विवाद. Brut, one of the most popular men's colognes was first launched in 1964. It is originally produced by Faberge Paris. Top notes: lemon, bergamot, lavender, anise and basil. Heart: geranium, jasmine and ylang-ylang. Base: sandalwood, oak moss, vetiver, patchouli, tonka bean and vanilla. brut ५) जोवान मस्क फॉर मेन - हाही जुना आहे. शाळेपासून वापरतो आहे. मादक वास. मस्त. Fragrance Notes-Jasmine Neroli Bergamot Musk jm ६) लोमानी ओरिजिनल - शाळेपासून वापरलेला आणखी एक. मिडियम स्ट्राँग. Lomani pour Homme was launched in 1987. Top notes are lavender, lemon, bergamot and rosemary; middle notes are geranium, camphor and cloves; base notes are patchouli, coumarin and moss. lomani ७) नॉटिका ब्लू फॉर मेन - चार एक वर्षापूर्वीचा टॉप सेलर. सुपर्ब सेंट. Top notes are pineapple, peach and bergamot; middle notes are jasmine and water lily; base notes are sandalwood, musk and cedar. nblue ८) चार्ली रेड - चार्ली चे सगळेच छान आहेत. पण हा मला जास्त आवडला. हा खरं तर वूमन सेंट आहे, पण अप्रतिम आहे. बनवणारी कंपनी रेव्ह्लॉन. Top notes are orange blossom, gardenia, plum, black currant, violet and peach; middle notes are carnation, tuberose, orchid, jasmine, ylang-ylang, lily-of-the-valley and rose; base notes are honey, sandalwood, amber, musk and cedar. cred ९) इसेन्झा डि विल्स - हा आयटीसी ने बनवलेला परफ्यूम आहे. मला माझ्या मित्राने भेट दिला होता. सुसाट आहे हा परफ्यूम. स्ट्राँग आहे, मादक आहे, स्पायसी आहे. Notes Lemon, Cedar wood, Sandalwood, Plum ,Amber, Musk edw १०) टबॅक - याचं सँपल वापरलेलं छोट्या बाटलीतलं. पण नंतर विकत घेणं झालं नाही. घेईन कधीतरी. अतिशय भारी वास आहे याचा. Tabac was launched in 1959. Top notes are aldehydes, lavender, neroli, bergamot and lemon; middle notes are carnation, sandalwood, orris root, jasmine, rose and pine tree needles; base notes are tonka bean, amber, musk, vanilla, oakmoss and tobacco. tabac जसं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल, तसं ज्याला आवड आहे त्याच्यासाठी परफ्यूमस चं हे विश्व प्रचंड व्यापक आहे, रंजक आहे. एक मात्र नक्की आहे, तुमची सर्वात पहिली ओळख जी समोरच्याला होते ती तुमच्या वासातून होते. परफ्यूम्स, अत्तरं हे त्याचंच द्योतक आहेत. राजे सजवाड्यांपासून माणूस आपलं अस्तित्व सुवासिक ठेवण्यासाठी यांचा प्रयोग करत आलेला आहे. असो. आता तुम्हाला कुठले सेंट्स आवडतात ते सांगा ! मी माझ्या यादीत डिओ, अत्तरं वगळली आहेत, ती केवळ यादी भरकटू नये म्हणून. डिओ म्हटलं की वरचा एकही पर्याय टॉप १० मधे येणार नाही. पण असं काही नाही, तुम्हाला जे सुगंध, मग ते कुठल्याही फॉर्म मधे असूदेत, आवडतात ते सांगा ! जाणण्यास उत्सुक.

वाचने 123708
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

धागा वाचुन अनेक सुगंध मनात दरवळुन गेले. मला ही अत्तरे आणि परफ्युम खुप आवड्तात. तुमच्या लिस्ट मधील बरिचशी परफ्युम मी वापरलेली आहेत. अजुनही ती पसंतीच्या यादीत आहेत. मला अजुन काही आवड्लेली परफ्युम म्हणजे- वन-ओ-वन फॉर वुमन, सिगार, मोगरा, चंदन.

वेल्ला साहेब, पेट थेरपी आणी अजुनही कोणी जाणकार..एक सल्ला द्या ना...फक्त चंदनाचाच सुवास (टॉप, मिडल आणि बेस नोटस फक्त sandalwood) असलेला पर्फ्युम कोणता ??

आहा, काय मस्तं धागा आहे. माझा वीक पॉइण्ट. मला भयंकर आवडतात. माझे काही आवडते..शनेल 5, estee लॉडर चं सेन्शुअस, ब्यूटिफुल, bvlgari चं जॅसमिन noir. cartier चा माझ्या एक खूप आवडीचा पर्फ्यूम होता पण तो आता बनवत नाही म्हणे त्याचं उत्पादन थांबवलंय चार, पाच वर्षांपासून:( नेहमी वेगवेगळे सुगंध ट्राय करते एकच एक सुगंध नाही वापरत. मस्क, जॅसमिन, सॅंडलवुड अशाप्रकारचे जरा हेवी नोट वाले सुगंध मला आवडतात. फ्रूटी, citric फ्लेवर्स नाही आवडत.

In reply to by पद्मावति

शनेल५................ अ क्लासिक. मॅरिलिन मॉन्रो पासून लोकांनी वापरलेला पर्फ्यूम. अफलातून वास. एन्चॅन्टिंग

@प्रसाद भागवत चंदनाचा सुगंध असलेला प्रफ्युम माहित नाही, पण अत्तर ठावुक आहे. Arochem चे सुखद हे उत्तम चंदनाचे रोल ऑन अत्तर आहे. p1 माझ्या तिर्थरुपांनी मला कलोन असलेला परफ्युम हवा होता म्हणुन लिश्टनस्टाइन { जगातला ६ वा लहान देश एक,राजधानी वडुज } मधुन मला सुपर ड्राय नाईट नावाचा प्रफ्युम आणला.{ क्राफ्टेड अँड बॉटल्ड इन फ्रान्स } P2 लाईट् आणि झकास... आता अत्तरात रजनीगंधा आणि मिट्टी अत्तरची भर पडली आहे,ही अर्थातच इंदुरातुन आणली. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bass Rani - Mumbai Dance feat. Julius Sylvest :- Nucleya

धागा लैच जमलाय, बाकी अत्तराचा फाया प्रकार काय कळला नाही राव.

In reply to by कबीरा

कापसाचा लहानसा बोळा! त्याला अत्तर लावायचं आणि तो बोळा कानात खुपसायचा. बेंगरुळ दिसतं म्हणा... पुर्वी श्रीमंती मिरवण्याची फ्याशन होती तेव्हा ठिक होतं.

रोजच्या वापरासाठी चांगला डीयोड्र्न्ट सुचवा ... प्लेबाय,सिन्थोल,निविया,नायके,KS ई. वापरुन झालेत ..

In reply to by वेदांत

ऑल टॅम फेवरेट - ओल्ड स्पाईस (शक्यतो ओरिजिनल) आदिदास, नायके, रीबॉक - गुड वन्स प्लेबॉय - महाग पण चांगले. फ्युएल चा अनुभव चांगला आहे. फॉग चे काही काही बरे आहेत. जोवान मस्क बघा. सिगार उत्तम टिकतो. जस्ट कॉल मी मॅक्सी निव्हिया ने इरिटेशन होऊ शकतं, माझा अनुभव. डेनिम फ्रॅगरन्सला बरे आहेत पण वास टिकत नाही. डेव्हिड ऑफ कूल वॉटर (२५०-४००) रुपये याच्या मोहात मुळीच पडू नका. अ‍ॅक्स भंपक आहेत माझ्या मते.

In reply to by वेल्लाभट

माहिती बद्दल धन्यवाद ... ओल्ड स्पाईस (ओरिजिनल) वापरला आहे, पण आवडला नाही. खर सांगायाच तर, फेरारी अत्तर वापरत असल्यामुळे डिओ घ्यायचा का की नाही यात गोंधळून गेलो आहे.

In reply to by वेल्लाभट

रच्याकने
डेव्हिडऑफ कुल वाटर
हे वाचून डेव्हिड नावाचा माणूस थंड पाण्यात ऑफ झालाय असं वाटते

In reply to by वेल्लाभट

धागा खूपच छान आणि अनपेक्षित आहे .....मस्त माहिती प्रसारित झालीये ......जणू परफ्युम्स ची बँकच मला उध आवडतो डीओ मध्ये किलर जीन्स च्या शोरूम मध्ये मिळणारा रेक्लेस छान आहे. Axe चा तिकिट ट्राय करून पहा engage मध्ये क्लासिक वूडी छान आहे

In reply to by वेदांत

सिंथोलचे डीयो-स्टीक्स मिळतात हल्ली, ७० रुपये किंमत आहे आणि साधारण महिना-दीड महिना पुरते. वास उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे लॉंगलास्टिंग आहे. बाकी लेयर शोट चा कलोनस्प्रे पण चांगला आहे रोजच्या वापरासाठी (नेव्हीब्ल्यू रंगाच पकिंग आहे)

In reply to by रंगासेठ

हे मीही ऐकलंय. पण अनुभव चांगला आहे माझा. प्रत्यक्ष घेणं चांगलं असं मानलं तर काही गोष्टी बघून घ्याव्यात जसं की, पॅकिंग (उघडलेलं, रीपॅक्ड वाटत असेल तर घेऊ नये) दुकान (एकदम नवीन दुकानातून मोठ्या रकमेचा घेऊ नये), ... आणि काही गोष्टी.... परंतु तरीही चुना लावला जाऊ शकतो. त्यामुळे जस्ट बी व्हिजिलंट इतकंच म्हणेन.

पहील्यांदाच एवढी नावे वाचली, नायतर आपल्याला दोनच नाव माहीत, एक केळकरांचा मोगरा, आणी दुसरा चार्ली. गोव्यात काही ठीकाणी रस्त्याच्या कडेला काही लोकं केवड्याची फुलं पारदर्शी काचेच्या बाटलीत पाणी भरुन वीकायला ठेवल्याचं पाहीलय.

'अरमाफ'चे डिओ 'शेड्स' आणि 'पॅराटी' (Shades & Paraty) एकदम लाजवाब ....!

ह्म्म्म , धागा वाचुन काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ... फार पुर्वी चित्रांगदासाठी हा परफ्युम घेतला होता .... a अजुनही हा सुगंध मनात दरवळतोय , नुसत्या आठवणीनेच मोहरुन जायला होतं , नक्की कशाने , सुगंधाने की तिच्या आठवणीने ... कळतच नाही :)

१) अझारो क्रोम लिजेंड/युनाईटेड/स्पोर्ट्स २) बर्बेरी ३) नौटिका चा अक़्वा रश ४) डेव्हिडऑफ कुल वाटर ५) पोलीस विंग्स गोल्ड

सध्या अत्तर मार्केट मधे बरेच वेग-वेगळे सुगंध मिळत आहेत, उदा. लिरिल,पोलो स्पोर्ट्स,ह्यूगो बॉस ई. याच्या विषयी जाणकारानी माहिती द्यावी.

In reply to by वेदांत

बॉस चं अत्तर कव्वा असतं राव. आणि जिव्हॉन्शाय इर्रेझिस्टेबल पण छान तसंच एक आवडणारं म्हणजे डनहिल डिझायर चं अत्तर.

सध्या वापरात असलेली अत्तरे - 1. कस्तुरी अंबर - उग्र वास पण तेवढाच प्रसन्न. गुणधर्मानुसार उन्हाळ्यात वापरू नये म्हणतात. सर्दी झाल्यास नाकाला थोडे लावावे. 2. चंदन - एव्हरग्रीन. सगळ्यात आवडते अत्तर. 3 . खस - उन्हाळ्यामध्ये वापरायला जास्त छान वाटते. 4. मोगरा - एकदम नॅच्युरल 5. पारिजातक - अजून एक आवडते अत्तर. प्युअर फुलांचा सुवास. ह्याचा सुवास जास्त वेळ टिकत नाही म्हणून कुपी जवळ बाळगूनच असतो. खीखीखी 6. उद - मागे एकदा मित्र मक्के ला गेला असताना खास लक्षात ठेऊन माझासाठी आणलेले अत्तर. ह्याचा वास म्हणजे केवळ जन्नत. अहाहा. अगदी पुरवून पुरवून वापरतो. 7. मुखमल अजमल - केवळ अप्रतिम. 8. ice बर्ग - काहीसे deo च्या वासाकडे झुकणारे आणि थोडे चिकट असणारे अत्तर. शाही चंदन - काही फारसा फरक जाणवला नाही पण किंमत मात्र डबल. दिवसाच्या मूड प्रमाणे आज कुठले अत्तर लावावे हे ठरवतो. :) :) :) औरंगाबादेत अत्तर गल्ली आहे. तिकडचा एक पंटर पकडला आहे. साहेब आमचं अत्तर प्रेम बघून थेट पुण्याला कुरिअर करतात. त्यांच्याकडे खास वर्जिनल माल असतो म्हणे.

In reply to by पद्मावति

अत्तर मनगटाला,कानाच्या मागे,मानेला लावतात. आजकाल बाजारात अत्तर पर्फ्यूम पण मिळत आहेत.. http://www.amazon.in/s/ref=bl_dp_s_web_1355016031?ie=UTF8&node=13550160…

डियो वापरणे बंद करावे, त्यापेक्षा परफुम अत्तर कधीही योग्य, मला असाच एकदा अनुभव आल्यानंतर, (एखादा दिवस डियो नाही मारला तर अंगाला घाण वास यायचा, प्रत्यक्षात डियो वापरायला लागलो त्या आधी असे नव्हते) मी ओळखीतल्या दहा बारा जणांना हा प्रयोग करायला सांगितला. एक महिना कोणताच डियो वापरायचा नाही, सुरुवातीचे तीन ते सात दिवस अतिशय घाण वास यायला लागतो शरीराला, डियो शिवाय जगणे शक्यच नाही असे वाटते, नंतर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात शरीराचा हरवलेला नैसर्गिक गंध परत येतो, महिना पूर्ण होताच आपल्याला डियो ची गरजच नाही हे समजतं. ज्यांनी हा प्रयोग केला त्यांची डियो न वापरल्यामुळे येणाऱ्या घाणेरड्या वासापासून सुटका झाली, हा वास काहीतरी केमिकल लोच्यामुळे तयार होतो-हा नैसर्गिक घामाचा वास नव्हे, ह्याच वासामुळे उपभोक्ते सतत डियो वापरात ठेवतात. ज्यांना डिओचे व्यसन लागले असेल त्यांनी हा प्रयोग जरूर करावा, प्रत्येकाला डियोची गरज नसते, पण वापरात राहिल्याने निर्माण होते, त्यापेक्षा नैसर्गिक सुगंध वापरावेत,

In reply to by संदीप डांगे

तंतोतंत. म्हणजे डिओ वापरणं बंद करुन पाहिलं. नंतरचाही घटनाक्रम ऑल्मोस्ट तसाच. अर्थात शरीरशास्त्राची माहिती , केमिस्ट्रीतली अक्कल, डिओ मध्ये वापरल्या जाणार्‍या नेहमीच्या घटकांबद्दलचं सामान्य ज्ञान माझं शून्य असल्यानं हे सांगायला धजावत नसे. अजूनही ह्याबद्दल खात्री नाही मलाच. पण तंतोतंत अनुभव आला. सध्या चंदन, गुलाब वगैरेचे परफ्युम वापरतो. ती खास सुगंधी दुकानं नसतात का देवस्थानांच्या आसपास वगैरे, तिथून आणतो. तिथे फक्त उदबत्त्या, परफ्युम , अत्तरं अशाच वस्तू असतात . तशी दुकानं. किंचित महाग पडतं, पण एकूणात वर्थ इट.

In reply to by संदीप डांगे

खर तर डिओडरंट च्या वापराबद्दल एक वेगळा धागा बनू शकेल ,डिओडरंट चे खूप प्रकार आहेत ( स्टिक ,ओईल बेस्ड,अल्कोहोल वाला,ब अल्कोहोल रहित , अल्युमिनियम कण असलेला , किंवा नसलेला ) डिओडरंट मध्ये असलेले घातक पदार्थ मानवी शरीरावर कसे परिणाम करतात ? कुठल्या व्यक्तीने कोणता डिओडरंट वापरावा. संदीप नि फारच कमी शब्दात डिओडरंट बद्दल मत मांडल आहे... आणि काही अंशी ते खरही आहे .. आपण शरीराची रचना पाहिली तर आपल्याला शरीरातील विशेष ग्रंथी या उत्सर्जना साठी काम करतात त्याच पैकी बगलेत असलेल्या ग्रंथी घाम उत्सर्जित करतात आणि तो उत्सर्जित होणे महत्वाचे आहे . तो बाहेर येउच नये असे काही केले तर त्याचा परिणाम शरीरामध्ये ते कुठेतरी परिणाम करत असतो. मी मागे एकदा डिओडरंट बद्दल वाचले होते त्यामध्ये असे कळले कि घामांच्या गंध काढण्यासाठी वापरल्या जाणार्या परफ्यूम आणि डिओडोरंट्स केवळ घाम ग्रंथेवर प्रभाव टाकत नाहीत, परंतु शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या विषारीपणाच्या नैसर्गिक प्रक्रियेस देखील नुकसान करतात. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याकरिता मानवी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी घाम येतो उदा. नाकावर , कपाळावर , छातीवर , पाठीवर , बगलेत , जांघेत , तळव्याला इत्यादी. जर या घाम येण्याच्या वाटा आपण कशाचे तरी लेपन करून बंद केल्या तर शरीराचे तापमान वाढते. आणि शरीर या ना त्या मार्गांनी तापमान संतुलित ठेवण्याची धडपड करत असते. मग बाहेर पडू न शकलेली विषारी,शरीराला नको असलेली द्रव्ये शरीरातच राहतात आणि त्यांची तीव्रता हि वाढते.ज्यामुळे अजून एक नवीन समस्या जन्माला येते. डियो वापरणे बंद करावे, त्यापेक्षा परफुम अत्तर कधीही योग्य, हे मला योग्य वाटले , आपण जशी शरीराला सवय लावतो तसे ते आत्मसात करीत असते. संदीप म्हणतायत तसे काही दिवस डिओडरंट वापरणे बंद केले तर जी दुर्गंधी आणि द्रव्ये ग्रंथीमध्ये साचून राहिलेली असतात ते बाहेर यायला सुरुवात होते. शरीराला हवे आहे तितके पाणी पिणे आणि ज्यावेळेस लघुशंका होत आहे असे जाणवेल तेव्हा लाघुश्न्केस जाणे हाच हि दुर्गंधी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. यावर मिपा मधील तद्न्य मंडळी उपापोह करतीलच.

शनिवारी मोहमद्द अली रोड वरुन ४-५ अत्तर घेऊन आलोय. रोझ,मोगरा,रॉयल ब्लू (रॉयम मीराज) , ब्लू वेव, आणि अल-रहीब चे सिल्वर .

आताच केशर-कस्तुरी(८०-२० %) आणलाय जबरदस्त सुगंध आहे त्याचा. व्हर्जिनल 'केशर' चा सुगंध फार तिव्र असल्याची जाणवले.

वरच्या यादीतील ब्रुट, लोमानी, चार्ली वापरले आहेत. मलाही आवडतात मंद सुगंध असलेले. जास्त डार्क नाही आवडत. एक माहीती हवी होती. सुरंगीचे अत्तर कुठे मिळते हे माहीत आहे का कोणाला?

In reply to by जागु

सुरंगीच्या अत्तराचे उत्पादन दापोली च्या जवळ आसूद बाग नावाचे गाव आहे तिथे कुणीतरी ( नक्की नाव माहित नाही ) ते बनवतात मी एकदा आणले होते बायको साठी .....छान गंध आहे पण अतिशय नैसर्गिक .....झकपक कपडे घालून त्यावर अजिबात न शोभणारा सुरंगी चे अत्तर आता स्प्रे मध्ये पण उपलब्ध आहे पण अत्तरा प्रमाणे दिवसभर टिकत नाही .....तरीही छानच

काल अल-रहिब चे ३ अत्तर (सुल्तान्,स्पेस्,झिदान) ईबे वरुन मागवले. ऑफिस मध्ये वापरयला पण छान आहेत. http://www.ebay.in/itm/AL-REHAB-6ML-Perfume-Roll-On-Attar-Ithar-3s-Pack… त्याच बरोबर अमझोन वरुन वॉव परफ्यूम्स चे IS-MIAMI मागवले आहे.

पुण्यात कॅम्प मध्ये HP पेट्रोल पंप च्या मागे अली सोमजी स्ट्रीट ला 'FAA' नावाचे एक perfume चे छोटेसे दुकान आहे. पहिले तिथे 'प्राईड ऑफ हैदराबाद' नावाचे नावाजलेले हॉटेल होते आणि हॉटेल च्या बाहेर हे दुकान होते. आता त्या हॉटेलऐवजी शेरवानी चे मोठ्ठे दुकान आहे आणि त्याच्या आत हे FAA आहे. त्यांचा FAA special हा परफ्युम अफलातून आहे. मला ऑफिस मध्ये आणि बाहेर कमीत कमी 100 लोकांनी या परफ्युम बद्दल विचारलं आहे आणि त्यांच्या साठी एक आणायला सांगितलं आहे. MUST TRY! 550 रुपये किंमत आहे. तुम्हाला लगेच प्रेमात पडेल असा फ्रेश आणि मोहक सुगंध आहे. या अत्तराचे contents हा दुकानदार काही सांगत नाही. FAA मध्ये अजूनही बरेच छान छान परफ्यूम्स आहेत. पण या FAA SPECIAL ला तोड नाही. त्या दुकानदाराच्या म्हणण्यानुसार इथले अत्तरं विदेशातही पाठवले जातात. जाणकारांनी एकदा तरी भेट द्यावी.

In reply to by वेदांत

मी मागावलेले टायटन स्किन परफ्यूम आले आज पण दोनही बॉक्स वर "Tester Not for sale" असं लिहिलंय. त्यांना कॉल केला तर नाही उचलला. साईट वर मेसेज केलाय. काय करू. तसच वापरू की परत करू. असं टेस्टर प्रोडक्ट विकणं बरोबर आहे का.

In reply to by शलभ

अजिबात वापरू नका, परत करा, एकतर हे बेकायदेशीर आहे तसेच पैसे देऊन प्रायोगिक उत्पादन देणे अक्षम्य अपराध आहे, तसेच ह्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करा व संबंधित दोन्ही कंपन्यांच्या फेसबुक पेजवर टाका

In reply to by शलभ

Unboxed.in ला फेसबुक वर मेसेज टाकल्यावर आता कॉल येऊन गेला. त्यांचं म्हणणं आहे, 1. टेस्टर प्रॉडक्ट विकणं बेकायदेशीर नाहीय जोवर तुम्ही त्यावरचा सेल्स टॅक्स बुडवत नाही. 2. प्रॉडक्ट च्या स्पेसिफिकेशन मध्ये लिहिलंय कि Product Packaging = Tester जे मी कन्फर्म केलं. 3. ते अशा प्रकारे बरेच प्रॉडक्ट विकतात म्हणून स्वस्त देऊ शकतात बाकीच्या पेक्षा. अमेझॉन वर टायटन स्किन्न सेलेस्ट 1390 ला आहे, इथे ते 999 ला आहे. 4. सर्व प्रॉडक्ट ऑथेंटिक आहेत. सध्या तरी मी मला आलेले परफ्युम वापरणार आहे तो परत घ्यायला तयार असताना सुद्धा. तुमच्या मदतीसाठी धन्यवाद.

In reply to by शलभ

"Tester Not for sale" ह्या उल्लेखाविषयी तुम्ही त्यांना काहीच म्हटले नाही? जेव्हा ते नॉट फॉर सेल आहे तर मग ते सेल कसे होऊ शकते? तुम्ही वापरा न वापरा तो तुमचा निर्णय, त्याने काही फरक पडणार किंवा नाहीसुद्धा, पण भविष्यात इतर कुणी असे प्रॉडक्ट ऑर्डर करू नये किंवा वापरू नये या मताचा मी आहे, याचे कारण वैद्यकीय समस्या उद्भवल्या तर यापासून नुकसान भरपाई मिळणे शक्य होईल काय याबद्दल शंका आहे, तसेच आंतरराज्यीय कर वाचवायला हा झोल करत असावेत अशीही शंका आहे,

In reply to by वेदांत

============================= killeroud, unboxed, perfumery, armaf.in या सगळ्या वेबसाईट्स एकाच व्यक्तीच्या (मोहीत खत्री) आहेत. splashfragrance.in वेबसाईटबद्दल चांगले ऎकून आहे, पण मी ट्राय केली नाही. =============================

============================= महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे. तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात. मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे. आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे. तो स्वतः बनवतो परफ्युम. तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो. त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत. सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय. तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा. फारच मस्त आहे! पुरवून पुरवून वापरतोय मी. याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत. शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात. विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही. =============================

============================= पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे. हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात. यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे! =============================

============================= मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता. तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला. या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम. =============================

============================= परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( =============================

In reply to by नांदेडीअन

नेटवर असा पत्ता मिळाला. गुगल मॅप्सवर अनेक चांगले अभिप्राय आहेत. हेच का ते ? ZK Perfumes 18/3,Vastu Udyog, Near Rasrang Sweets, Masulkar Colony, Pimpri,,, Pune, Maharashtra

In reply to by नांदेडीअन

धन्यवाद. मागच्या आठवड्यात ZK perfumes मध्ये गेलो होतो. ते अजमलचे अत्तर ठेवतात असे ते म्हणाले. त्यांच्याकडून मी चंदन आणि केवडाचे अत्तर घेतले. चंदन चांगले आहे पण केवड्याचा सुगंध काही फारसा जाणवत नाही.

हल्लीच जरा नविन अत्तर ट्राय मारले आहे, नाव आहे :-कुकुंबर तसेच पॉयझनचे अत्तर सुद्धा ट्राय मारले, ते सुद्धा मस्त आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

वेगळाच विषय आणि छान चर्चा .... डिओडरंट पेक्षा ही परफ्युम जास्ती आवडतात... झारा आणि रसासी विषयी जाणकारांनी माहिती द्यावी

============================= killeroud, unboxed, perfumery, armaf.in या सगळ्या वेबसाईट्स एकाच व्यक्तीच्या (मोहीत खत्री) आहेत. splashfragrance.in वेबसाईटबद्दल चांगले ऎकून आहे, पण मी ट्राय केली नाही. ============================= ============================= महागाचे इंटरनॅशनल ब्रँड्स नको असतील, तर पुण्यात टिळक रोडवर एक स्पार्कल पर्फ्युम्स नावाचे दुकान आहे. तिथे स्वस्तात मस्त परफ्युम्स मिळतात. मागच्या वर्षीपर्यंत ४०० रुपयांना १०० एम.एल. मिळायचे. आता बहुतेक ५५० किंवा ६०० रुपये केले आहे. तो स्वतः बनवतो परफ्युम. तुमच्याकडचा परफ्युम तुम्ही त्याला नेऊन दाखवला, तर तो त्याचा क्लोनही बनवून देऊ शकतो. त्याचे सगळ्यात जास्त विकल्या जाणारे पर्फ्युम इंटरनॅशनल ब्रँड्सचे क्लोनच आहेत. सध्या मी त्याने बनवलेले अझारो क्रोम आणि वर्साचे वापरतोय. तुम्हाला अत्तर आवडत असेल, तर त्याच्याकडे मिळणारे 'असील' अत्तर ट्राय करा. फारच मस्त आहे! पुरवून पुरवून वापरतोय मी. याच्या पर्फ्युम्सची खासियत म्हणजे, इतके स्वस्त असूनही ते बरेच लॉंग लास्टिंग आहेत. शर्टवर तर दोन-दोन दिवस राहतात. विशेष म्हणजे कपड्यांवर डागही पडत नाही. ============================= ============================= पिंपरी-चिंचवडकरांसाठी Z. K. Perfumes हा जवळचा आणि चांगला ऑप्शन आहे. हेसुद्धा स्वतः पर्फ्युम बनवतात. यांचा लब्बैक परफ्युम मस्त आहे! ============================= ============================= मागच्या वर्षी औंधच्या रिलायंस मार्टमध्ये Sugacci परफ्युम्सचा स्टॉल दिसला होता. तिथे त्यांचे दोन दोन-तीन परफ्युम ट्राय केले आणि त्यातला Vivo हा परफ्युम निवडला. या परफ्युमचे नोट्स चांगले आहेत, पण ५०० रुपयांना फक्त ५० एम.एल. परफ्युम मिळतो. आणि ३-४ तासांपेक्षा जास्त टिकत नव्हता हा परफ्युम. ============================= ============================= परफ्युम ऑनलाईन ब्लाईंड बाय करण्याचा चांगला फटका बसलाय मला काही दिवसांपूर्वी. Armaf च्या club de nuit intense बद्दल बरेच वाचले होते, म्हणून फ्लिपकार्टवरून १५०० चा हा परफ्युम मागवला. सिट्रसच्या सुरूवातीच्या टॉप नोट्स अर्ध्या तासासाठी खूप स्ट्रॉंग आहेत. मिडल नोटमध्ये फुलांचा थोडासा चांगला वास येतो. बेस नोट सगळ्यात मस्त आहे, पण तोसुद्धा जास्त वेळ टिकत नाही. फार फार तर ३ तास टिकतोय हा परफ्युम कपड्यांवर. फेक परफ्युम मिळाला बहुतेक मला. :( =============================