✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पॉईंट झीरो

अ
अभ्या.. यांनी
Wed, 09/21/2016 - 18:06  ·  लेख
लेख
झीरो ................ "चला राजं, नवं साह्याब आलंत रेस्ट हाऊसला. पीआय साह्यबानं सांगीतलय. जाऊन येऊ." रेस्ट हाऊसला सगळा थाटच, लाल दिवा मिरवत बाहेर थांबलेली अ‍ॅम्बॅसेडर, दोन जीपा, चार पाच सफारीवालं, दोन इन्शर्टात गॉगल मिरवणारं. एक जण फाईल घिवून भईर आला की मोरेदाजीनी वर्दी दिली. रव्याला घीवून आत घुसले तसा साह्यब फिरुन बघितला. खालमानेच्या रव्याकडे डोसक्यापासून पायापर्यंत पहात मोरेदाजीवर कडाडला. "काय मोरे, युनिफॉर्म बदलला का नियम बदलले परस्पर? आँ" "न्हाई सोनकांबळे साहेब, मी आहे की. ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे, गावचाच आहे आपल्या. रवी जाधव नाव हाय, आपल्या पाव्हण्यातलाय. वळकत असताल तुम्ही बी, आयकलाव की हितलेच हाव ना तुम्ही" ....................... मोरेदाजीची पडकी भाषा ऐकताच रव्याचा फणा उठला. ताठ मानेनं साह्यबासमोर उभारला. "दाजी चलतो मी, जातीच्या न पुस्तकाच्या जीवावर हितं बसलंय हे. दोनदा कुत्र्यागत हाणला ते विसरलंय. चला" "आऊट, आय से." उपजिल्हाधिकारी नितीन सोनकांबळेचा शांत आवाज आला. ...................... "लका रव्या, तुझा क्लासमेट होता ना, घ्यायचं की धीरानं. लावला असता कुठं तर ज्याक" "न्हाई दाजी, हे काय खरं न्हाई. ह्याच्या ज्याकनं वर चढाया आपण रस्त्यावर न्हाई. दारात कधी उभा केला न्हाई ह्याला, आता त्येचं उंबरं झिजवायाची ड्युटी होत नसती बघा." "आरं पण जमाना बदलला आता, काय घेऊन बसला जातनपात, आपण बरं, आपलं घर बरं" "न्हाई तर, जमत नाही. पाटील साह्यबाला गाठावं लागतया. बघतो कायतरी त्येंच्याकडं" "आरं आयक रव्या, पाटील मुलखाचा चोर बोड्याचा. ही कर ड्युटी. करु आपण कायतरी" "दाजी, जातीसाठी माती खाईन पण असला अपमान नको. सोडा मला" ....................... पाटलाचा दरारा मोठा तसा व्याप बी मोठा. दोन डेर्‍या, कारखाना, पतसंस्था न एक बँक बुडाखाली दाबलेली. वाड्यावर शे दोनश्याचा राबता कायम. रव्याची वर्दी कुठं लागावी हे पीए सावंताला कळंना. रव्याचं डोस्कं गरम. पटकन हात उचलला जायचा. त्यात डोक्यात जात बसलेली. युनिफॉर्मच्या वेडात अंगात असलेली मग्रुरी उतरंना. शेवटी पतसंस्थेच्या वसुली पथकात भरती झाली. जीपमध्ये थाटात फ्रंटसीटवर बसून गावोगाव फिरायला रव्याला भारी वाटायलं. चार गरीबाचं बकुटं पकडून कागदं फेकायची मजा अलग वाटायली. मॅनेजर सांगायचा मागं. "हे कुळं असलीच बघा जाधव. आपल्या साह्यबांची मया आड येती. कर्ज घेतेत, द्यायच्या नावानं बोंब" रव्याला पण साह्यबाचा पैसा आपला पैसा अशी सुरसुरी यायची. रोज दोन तीन तरी खाती वसूली केल्याबिगर घरी येऊ वाटंना. वसूली संपत आली तशी इलेक्शन लागली. साह्यबांनी थाटातच शहरगावच्या सिक्युरीटीचे बौंसर लावले शो करायला. त्यांना मार्गदर्शनाला दिला रव्या. सिक्युरीटीने एक मापातला सफारी आन शोचं पिस्टल रव्याला दिलं. मजबूत बुट चढवून, टाईट सफारी आन आर्मीकट मारलेला रव्या थाटात उभारायला पाटलासंगं. जणू काय पंतप्रधान राष्ट्रपतीमागं उभारल्याचा आव घेऊन. इलेक्शनच्या धुराळ्यात माय न घराकडं लक्ष बी देण हुईना. मम्मी दोन दिवस तापानी फणफणली न म्हातार्‍याने अ‍ॅडमिट केलं. रव्यामागच्या सभा न प्रचार काय संपनांत. रात्री दावखान्यात गेला तर डॉक्टरानी ३० हजाराची जुळणी सांगितली. आता असल्या धुरळ्यात पाटलाकडं मागायची सोय नव्हती. सावंत पीएला सांगितले तर सकाळी ये म्हणला बंगल्यावर. सकाळी बंगल्यावर जाताच पाटील समोरच झोपाळ्यावर बसलेलं. "अरे कॅप्टन या या. राजं तुमची मेहनत रंग आणतीय बरका. असे मावळे असले की गड आपलाच ओ" "पण साहेब तेवढं सावंत सोयर्‍यांनी सांगितलय न्हवं" "काय झालं राजं, काळजी करु नका. तुमची माऊली, आमची माऊली, एकच ओ. जावा बिनधास्त पतसंस्थेत." "पण तिथं हुईल ना काम? नाही म्हनजे..." "जावा कॅप्टन, आपलीच हैत सगळे" ............................. पतसंस्थेत जाताच मॅनेजरने आत बोलावून घेतला रव्याला. काय न बोलता हातात हाजाराच्या दोन नोटा कोंबल्या. "पण साहेब, नड ३० ची हाय ओ, मागचं पेमेंट बी दिलं नाही अजून" "हे बघा जाधव, वरनं सांगितलं तेवढं दिलं, या आता तुम्ही" "आर्र साह्यबानी सांगितलंय, कळंना व्हय. फोन लावा साह्यबांना, ३० ची नड आन दोन हजारात कशी भागवू" इतकं बोलत रव्याचा आवाज चिरकायला. साह्यबाला फोन लावून ५ मिनट्ं मॅनेजर हूं हूं करत राह्यला. शेवटी दिला फोन आस लावून बसलेल्या रव्याला. "हे बघा कॅप्टन, दिलेत तेवढं घ्या. सिक्युरीटीवाले बी गेलेत परत आता. आचारसंहिता लागलीय आता. संपलं काम. त्याचं युनिफॉर्म आन शूज तेवढं ठीवून जावा. निघा" दारापर्यंत पोहोचलेल्या रव्यानं मागं वळून पाह्यलं. स्टाफ सकट भल्या दांडग्या फोटोतलं पाटीलसाहेब आपल्याकडं बघून हासतेत काय वाटायलं. शांतपणे दारातल्या बाकावर बसून काढला तो बुट अन भिर्रदिशी कॅशिअरच्या केबिनवरुन पाटलाच्या फोटोकडं भिरकावला. ................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
14495 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

अफाट आणि नेमकी.

यशोधरा
Wed, 09/21/2016 - 18:26 नवीन
अफाट आणि नेमकी.
  • Log in or register to post comments

+१

टवाळ कार्टा
Wed, 09/21/2016 - 18:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+++१ ११

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/23/2016 - 13:36 नवीन
+++१ ११ अगदी. ह्ये अब्याडब्या कंदितरीच लिवतं. पन लै जोरकस जंक्शान लिवतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जबर चाललंय...!

जव्हेरगंज
Wed, 09/21/2016 - 18:35 नवीन
जबर चाललंय...! अजून वाढवत ऱ्हावा...
  • Log in or register to post comments

ब्येस.

कंजूस
Wed, 09/21/2016 - 18:46 नवीन
ब्येस.
  • Log in or register to post comments

२२५+ प्रतिसाद

संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 19:16 नवीन
२२५+ प्रतिसाद < अभ्याची एकच कथा.
  • Log in or register to post comments

अर्र्रर्र.. चुकला प्रतिसाद

संदीप डांगे
Wed, 09/21/2016 - 19:18 नवीन
अर्र्रर्र.. चुकला प्रतिसाद वरचा.. अभ्याची एकच कथा. > २२५+ प्रतिसाद
  • Log in or register to post comments

लय बेस्ट अभ्या

राघवेंद्र
Wed, 09/21/2016 - 19:22 नवीन
लय बेस्ट अभ्या
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

रातराणी
Wed, 09/21/2016 - 19:59 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

आम्ही असेच बरबाद झालो. नशिबी

फेदरवेट साहेब
Wed, 09/21/2016 - 20:06 नवीन
आम्ही असेच बरबाद झालो. नशिबी कुत्र्याची जीनगानी आली, अन मिसळपाववरच निःसंग कुत्रा होता आले. इमान अबाधित त्यामुळे मालकाचा बाजार उठवता येईना अन पोटाला भाकरी नाही म्हणून थांबता ही येईना. अभ्या सर, आमची जिंदगी उभी केलीत तुम्ही आमच्याच समोर. निघतील आमच्याही पाटलांचे किस्से पुढे मागे कधी अंमल जास्त झाल्यास. (केविलवाणा) ढेल्या
  • Log in or register to post comments

अर्रर्रर्र,

अभ्या..
Wed, 09/21/2016 - 23:23 नवीन
अर्रर्रर्र, येउंद्या तुमच्या पाटलाचं बी किस्से. . तुमचाच जिगर अभ्या पाटिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

एकदम मस्त!

चैतू
Wed, 09/21/2016 - 20:06 नवीन
एकदम मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलीय..

शलभ
Wed, 09/21/2016 - 20:45 नवीन
मस्त लिहीलीय.. अशा गोष्टींमुळेच मोर्चे व्ह्यायला लागलेत काय..जातीचा वॄथा अभिमान, पुढार्‍यांनी कामापुरतं वापरणं, तथाकथित हलक्या जातींना कमी लेखनं..
  • Log in or register to post comments

लय भारी टाईमिंग साधलं बुआ........!!!

भम्पक
Wed, 09/21/2016 - 21:11 नवीन
कथा नेहेमीचीच...किंबहुना गुळगुळीत पण लय भारी टाईमिंग साधलं बुआ........!!!
  • Log in or register to post comments

अभ्याच्या कथेच सार जातीत

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/21/2016 - 22:55 नवीन
अभ्याच्या कथेच सार जातीत शोधायचं म्हणलं तर ती व्यर्थ जाइल. अभ्याची(च) परवानगी असली तरच ह्या कथेचे एक विडंबन करावे म्हणतो रे भावा,चालणार असले तर कळव. कथ आवडली हे वेगळे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments

माझी परवानगी कवापासून लागायली

अभ्या..
Wed, 09/21/2016 - 23:20 नवीन
माझी परवानगी कवापासून लागायली तुला? आँ? बिनधास्त कर काय बी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मस्त ...

अमितदादा
Wed, 09/21/2016 - 23:03 नवीन
मस्त ...
  • Log in or register to post comments

जिंकलंस भावा.

प्रचेतस
Wed, 09/21/2016 - 23:44 नवीन
जिंकलंस भावा.
  • Log in or register to post comments

आई शप्पथ. अतिशय अफाट बे अभ्या

बॅटमॅन
Wed, 09/21/2016 - 23:47 नवीन
आई शप्पथ. अतिशय अफाट बे अभ्या. वाचकाला सुन्न करण्याची ताकद आहे लेका तुझ्याकडे.
  • Log in or register to post comments

कुठली ताकद न कुठलं काय

अभ्या..
Wed, 09/21/2016 - 23:52 नवीन
कुठली ताकद न कुठलं काय बॅट्योबा, दोस्त हाय आपलं ते रव्या. नावगावनपत्त्यासहित सगळा खरा. १०० टक्के. ये कवा बी, भेटू घालतो.(नाराज हाय सध्या आमच्यावर पण भेटायला नाय म्हननार नाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

छान लिहिली आहे कथा

ज्योति अळवणी
गुरुवार, 09/22/2016 - 02:15 नवीन
छान लिहिली आहे कथा
  • Log in or register to post comments

डोळ्यासमोर घडत असल्यासारखं

रेवती
गुरुवार, 09/22/2016 - 02:25 नवीन
डोळ्यासमोर घडत असल्यासारखं वाटत होतं. भारी कथा.
  • Log in or register to post comments

डोळ्यासमोर घडत असल्यासारखं

पद्मावति
गुरुवार, 09/22/2016 - 11:49 नवीन
डोळ्यासमोर घडत असल्यासारखं वाटत होतं. भारी कथा.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हेच

स्वाती दिनेश
Sat, 10/01/2016 - 12:30 नवीन
रेवतीसारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नेमक चित्रण...

शित्रेउमेश
गुरुवार, 09/22/2016 - 11:25 नवीन
नेमक चित्रण... सगळ समोर घडतय अस वाट्तय....
  • Log in or register to post comments

मस्त रे अभ्या !!! जबरा लिहलयस

राजाभाउ
गुरुवार, 09/22/2016 - 11:36 नवीन
मस्त रे अभ्या !!! जबरा लिहलयस भावा.
  • Log in or register to post comments

लय भारी... एकदम बेस्ट!!!

संजय पाटिल
गुरुवार, 09/22/2016 - 11:41 नवीन
लय भारी... एकदम बेस्ट!!!
  • Log in or register to post comments

लय भारीच

सुमीत
गुरुवार, 09/22/2016 - 16:27 नवीन
एका दमात झीरो, आणि पोईट झीरो वाचली. येड लावलास भावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

+१

मी-सौरभ
Fri, 09/23/2016 - 12:36 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत

कस्लं लिहिलस बे

मन१
गुरुवार, 09/22/2016 - 12:06 नवीन
कस्लं लिहिलस बे :(
  • Log in or register to post comments

नेमके चित्रण

सिरुसेरि
गुरुवार, 09/22/2016 - 16:57 नवीन
नेमके चित्रण . हिरोचा झाला झीरो . झीरोचा झाला पॉईंट झीरो .
  • Log in or register to post comments

एकदम

नाखु
Fri, 09/23/2016 - 15:26 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

भिडलं राव

झेन
गुरुवार, 09/22/2016 - 21:22 नवीन
भिडलं राव तुमचं लिखाण. प्रातिनिधीक वाटलं, शेवटच्या क्षणापर्यंत जो वापरला जातो त्याला वापरणा-याचा लै म्हंजे लै अभिमान जसं कसायाला गाय वश.
  • Log in or register to post comments

अभ्या भौ, दोन्ही भाग आवडले.

शिव कन्या
Fri, 09/23/2016 - 08:46 नवीन
अभ्या भौ, दोन्ही भाग आवडले. स्पर्धा परीक्षांत पास होण्यासाठी काय काय करणारी गल्लीबोळातल्या क्लासेस मधली सगळी पोरं झटक्यात डोळ्यासमोर तरळली..... त्यात अपेशी ठरलेल्याचे पुढे काय काय म्हणून होते, लिहू पुढे कधीतरी. सकस लेखन! लिहित रहा.
  • Log in or register to post comments

चित्रदर्शी!!

सूड
Fri, 09/23/2016 - 14:53 नवीन
चित्रदर्शी!!
  • Log in or register to post comments

० आणि .० दोन्ही भाग जबरदस्त

शिद
Mon, 09/26/2016 - 22:59 नवीन
० आणि .० दोन्ही भाग जबरदस्त लिहिले आहेत. अभ्या, तुमच्या कथा एकदम वेगळ्या व वास्तवदर्शी असतात.
  • Log in or register to post comments

+०

हेमंत लाटकर
Wed, 09/28/2016 - 23:20 नवीन
+०
  • Log in or register to post comments

अभ्या भौ, दोन्ही भाग आवडले.

साहेब..
गुरुवार, 09/29/2016 - 10:18 नवीन
अभ्या भौ, दोन्ही भाग आवडले. अशा साहेबाच्या मागे पळणार्यांबद्दल फार वाईट वाटते.
  • Log in or register to post comments

साहेब दंडवत. लै च भारी

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 09/29/2016 - 14:19 नवीन
साहेब दंडवत. लै च भारी लिवलायसा.
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग वाचले

निओ
Fri, 09/30/2016 - 23:56 नवीन
दोन्ही भाग वाचले..केविलवाणी अवस्था झाली हिरोची. भारी लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

खूप छान. आवडली...

खटपट्या
Sat, 10/01/2016 - 00:37 नवीन
खूप छान. आवडली...
  • Log in or register to post comments

सालं, अभ्या तू अगदी नेमकं

किसन शिंदे
Sat, 10/01/2016 - 10:36 नवीन
सालं, अभ्या तू अगदी नेमकं लिहितोस. जी नाईन काय किंवा पॉईन्ट झीरो काय, उत्कृष्ठ आहे तुझं लेखन !!
  • Log in or register to post comments

काय सुचेना.... :(

असंका
Mon, 10/03/2016 - 18:15 नवीन
काय सुचेना.... :( वर खरंच असं झालंय म्हणता!! श्या.. :(
  • Log in or register to post comments

झैरात वाचून येऊन समाधानी झालेला कष्टमर :)

टर्मीनेटर
Wed, 06/26/2019 - 19:22 नवीन
मगाशी झैरात वाचली झीरोची म्हणून आलो, पुढचा भाग पॉईंट झीरो पण वाचला आणि समाधान झाले... मध्यंतरी जेम्स वांड ह्यांच्या कथेवर प्रतिक्रिया देताना मि जव्हेरगंज आणि ते ग्रामीण भाषेत चांगले लिहितात असे म्हंटले होते, पण तुम्हालाही ति कला (शैली) चांगलीच अवगत आहे. झैरात वाचून येऊन समाधानी झालेला कष्टमर. टर्मीनेटर
  • Log in or register to post comments

वास्तवाशी जवळीक साधणारी कथा

Rajesh188
Wed, 06/26/2019 - 20:01 नवीन
खूप मस्त लिहलय समोर घडतंय असे वाचताना वाटत. कथेचा जो नायक आहे तशी लोक आजूबाजूला वावरत असतात. खूप कष्ट करून सुद्धा जीवनाच्या रंगमंचावर हरलेल्या अशा लोकांचं खूप वाईट वाटत. अस्वस्थ होत मन. त्यातून काही सावरतात तर जे भावनाशील असतात ते निराशेने ग्रासले जातात आणि व्यासनच्या आहारी जावून ५० शी chya आताच जीवन संपवता त
  • Log in or register to post comments

वास्तवाशी जवळीक साधणारी कथा

Rajesh188
Wed, 06/26/2019 - 20:02 नवीन
खूप मस्त लिहलय समोर घडतंय असे वाचताना वाटत. कथेचा जो नायक आहे तशी लोक आजूबाजूला वावरत असतात. खूप कष्ट करून सुद्धा जीवनाच्या रंगमंचावर हरलेल्या अशा लोकांचं खूप वाईट वाटत. अस्वस्थ होत मन. त्यातून काही सावरतात तर जे भावनाशील असतात ते निराशेने ग्रासले जातात आणि व्यासनच्या आहारी जावून ५० शी chya आताच जीवन संपवता त
  • Log in or register to post comments

दण्डवत

जॉनविक्क
Wed, 06/26/2019 - 21:04 नवीन
  • Log in or register to post comments

+1

जालिम लोशन
Wed, 06/26/2019 - 21:31 नवीन
+1
  • Log in or register to post comments

लै भारी लिहिलंय

सुबोध खरे
गुरुवार, 06/27/2019 - 19:07 नवीन
लै भारी लिहिलंय वाचनातून कसं काय मिस झालं माहिती नाही देर सही दुरुस्त है! झकास
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो, कसं मिस झालं.

गवि
गुरुवार, 06/27/2019 - 19:18 नवीन
हेच म्हणतो, कसं मिस झालं. आता पुन्हा एकदा समग्र अभ्या वाचणे आले. काही काही कथा म्हणजे तर रत्ने आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा