पॉईंट झीरो
झीरो
................
"चला राजं, नवं साह्याब आलंत रेस्ट हाऊसला. पीआय साह्यबानं सांगीतलय. जाऊन येऊ."
रेस्ट हाऊसला सगळा थाटच, लाल दिवा मिरवत बाहेर थांबलेली अॅम्बॅसेडर, दोन जीपा, चार पाच सफारीवालं, दोन इन्शर्टात गॉगल मिरवणारं. एक जण फाईल घिवून भईर आला की मोरेदाजीनी वर्दी दिली. रव्याला घीवून आत घुसले तसा साह्यब फिरुन बघितला. खालमानेच्या रव्याकडे डोसक्यापासून पायापर्यंत पहात मोरेदाजीवर कडाडला.
"काय मोरे, युनिफॉर्म बदलला का नियम बदलले परस्पर? आँ"
"न्हाई सोनकांबळे साहेब, मी आहे की. ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे, गावचाच आहे आपल्या. रवी जाधव नाव हाय, आपल्या पाव्हण्यातलाय. वळकत असताल तुम्ही बी, आयकलाव की हितलेच हाव ना तुम्ही"
.......................
मोरेदाजीची पडकी भाषा ऐकताच रव्याचा फणा उठला. ताठ मानेनं साह्यबासमोर उभारला.
"दाजी चलतो मी, जातीच्या न पुस्तकाच्या जीवावर हितं बसलंय हे. दोनदा कुत्र्यागत हाणला ते विसरलंय. चला"
"आऊट, आय से." उपजिल्हाधिकारी नितीन सोनकांबळेचा शांत आवाज आला.
......................
"लका रव्या, तुझा क्लासमेट होता ना, घ्यायचं की धीरानं. लावला असता कुठं तर ज्याक"
"न्हाई दाजी, हे काय खरं न्हाई. ह्याच्या ज्याकनं वर चढाया आपण रस्त्यावर न्हाई. दारात कधी उभा केला न्हाई ह्याला, आता त्येचं उंबरं झिजवायाची ड्युटी होत नसती बघा."
"आरं पण जमाना बदलला आता, काय घेऊन बसला जातनपात, आपण बरं, आपलं घर बरं"
"न्हाई तर, जमत नाही. पाटील साह्यबाला गाठावं लागतया. बघतो कायतरी त्येंच्याकडं"
"आरं आयक रव्या, पाटील मुलखाचा चोर बोड्याचा. ही कर ड्युटी. करु आपण कायतरी"
"दाजी, जातीसाठी माती खाईन पण असला अपमान नको. सोडा मला"
.......................
पाटलाचा दरारा मोठा तसा व्याप बी मोठा. दोन डेर्या, कारखाना, पतसंस्था न एक बँक बुडाखाली दाबलेली. वाड्यावर शे दोनश्याचा राबता कायम. रव्याची वर्दी कुठं लागावी हे पीए सावंताला कळंना. रव्याचं डोस्कं गरम. पटकन हात उचलला जायचा. त्यात डोक्यात जात बसलेली. युनिफॉर्मच्या वेडात अंगात असलेली मग्रुरी उतरंना. शेवटी पतसंस्थेच्या वसुली पथकात भरती झाली.
जीपमध्ये थाटात फ्रंटसीटवर बसून गावोगाव फिरायला रव्याला भारी वाटायलं. चार गरीबाचं बकुटं पकडून कागदं फेकायची मजा अलग वाटायली. मॅनेजर सांगायचा मागं. "हे कुळं असलीच बघा जाधव. आपल्या साह्यबांची मया आड येती. कर्ज घेतेत, द्यायच्या नावानं बोंब"
रव्याला पण साह्यबाचा पैसा आपला पैसा अशी सुरसुरी यायची. रोज दोन तीन तरी खाती वसूली केल्याबिगर घरी येऊ वाटंना.
वसूली संपत आली तशी इलेक्शन लागली. साह्यबांनी थाटातच शहरगावच्या सिक्युरीटीचे बौंसर लावले शो करायला. त्यांना मार्गदर्शनाला दिला रव्या.
सिक्युरीटीने एक मापातला सफारी आन शोचं पिस्टल रव्याला दिलं. मजबूत बुट चढवून, टाईट सफारी आन आर्मीकट मारलेला रव्या थाटात उभारायला पाटलासंगं. जणू काय पंतप्रधान राष्ट्रपतीमागं उभारल्याचा आव घेऊन. इलेक्शनच्या धुराळ्यात माय न घराकडं लक्ष बी देण हुईना. मम्मी दोन दिवस तापानी फणफणली न म्हातार्याने अॅडमिट केलं. रव्यामागच्या सभा न प्रचार काय संपनांत. रात्री दावखान्यात गेला तर डॉक्टरानी ३० हजाराची जुळणी सांगितली. आता असल्या धुरळ्यात पाटलाकडं मागायची सोय नव्हती. सावंत पीएला सांगितले तर सकाळी ये म्हणला बंगल्यावर.
सकाळी बंगल्यावर जाताच पाटील समोरच झोपाळ्यावर बसलेलं.
"अरे कॅप्टन या या. राजं तुमची मेहनत रंग आणतीय बरका. असे मावळे असले की गड आपलाच ओ"
"पण साहेब तेवढं सावंत सोयर्यांनी सांगितलय न्हवं"
"काय झालं राजं, काळजी करु नका. तुमची माऊली, आमची माऊली, एकच ओ. जावा बिनधास्त पतसंस्थेत."
"पण तिथं हुईल ना काम? नाही म्हनजे..."
"जावा कॅप्टन, आपलीच हैत सगळे"
.............................
पतसंस्थेत जाताच मॅनेजरने आत बोलावून घेतला रव्याला. काय न बोलता हातात हाजाराच्या दोन नोटा कोंबल्या.
"पण साहेब, नड ३० ची हाय ओ, मागचं पेमेंट बी दिलं नाही अजून"
"हे बघा जाधव, वरनं सांगितलं तेवढं दिलं, या आता तुम्ही"
"आर्र साह्यबानी सांगितलंय, कळंना व्हय. फोन लावा साह्यबांना, ३० ची नड आन दोन हजारात कशी भागवू" इतकं बोलत रव्याचा आवाज चिरकायला.
साह्यबाला फोन लावून ५ मिनट्ं मॅनेजर हूं हूं करत राह्यला. शेवटी दिला फोन आस लावून बसलेल्या रव्याला.
"हे बघा कॅप्टन, दिलेत तेवढं घ्या. सिक्युरीटीवाले बी गेलेत परत आता. आचारसंहिता लागलीय आता. संपलं काम. त्याचं युनिफॉर्म आन शूज तेवढं ठीवून जावा. निघा"
दारापर्यंत पोहोचलेल्या रव्यानं मागं वळून पाह्यलं. स्टाफ सकट भल्या दांडग्या फोटोतलं पाटीलसाहेब आपल्याकडं बघून हासतेत काय वाटायलं.
शांतपणे दारातल्या बाकावर बसून काढला तो बुट अन भिर्रदिशी कॅशिअरच्या केबिनवरुन पाटलाच्या फोटोकडं भिरकावला.
................................
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अफाट आणि नेमकी.
+१
+++१ ११
जबर चाललंय...!
ब्येस.
२२५+ प्रतिसाद
अर्र्रर्र.. चुकला प्रतिसाद
लय बेस्ट अभ्या
जबरदस्त!
आम्ही असेच बरबाद झालो. नशिबी
अर्रर्रर्र,
एकदम मस्त!
मस्त लिहीलीय..
लय भारी टाईमिंग साधलं बुआ........!!!
अभ्याच्या कथेच सार जातीत
माझी परवानगी कवापासून लागायली
मस्त ...
जिंकलंस भावा.
आई शप्पथ. अतिशय अफाट बे अभ्या
कुठली ताकद न कुठलं काय
छान लिहिली आहे कथा
डोळ्यासमोर घडत असल्यासारखं
डोळ्यासमोर घडत असल्यासारखं
हेच
नेमक चित्रण...
मस्त रे अभ्या !!! जबरा लिहलयस
लय भारी... एकदम बेस्ट!!!
लय भारीच
+१
कस्लं लिहिलस बे
नेमके चित्रण
एकदम
भिडलं राव
अभ्या भौ, दोन्ही भाग आवडले.
चित्रदर्शी!!
० आणि .० दोन्ही भाग जबरदस्त
+०
अभ्या भौ, दोन्ही भाग आवडले.
साहेब दंडवत. लै च भारी
दोन्ही भाग वाचले
खूप छान. आवडली...
सालं, अभ्या तू अगदी नेमकं
काय सुचेना.... :(
झैरात वाचून येऊन समाधानी झालेला कष्टमर :)
वास्तवाशी जवळीक साधणारी कथा
वास्तवाशी जवळीक साधणारी कथा
दण्डवत
+1
लै भारी लिहिलंय
हेच म्हणतो, कसं मिस झालं.