Skip to main content

आरक्षणाशिवाय कसे जगावे?

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 24/09/2016 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मराठा मोर्च्याच्या निमित्त एका धाग्यावर आपल्या दणदणीत चर्चा झाल्या. त्याचा पुढचा भाग काढावा लागणार आहेच कारण अनेक मुद्दे अजून आलेले नाहीत. तर ते एक असो. हा धागा वेगळ्या विचाराने काढलाय व सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती आहे की यात जमेल तसे, तितके योगदान आपल्या अनुभव, कौशल्य, ज्ञान याद्वारे द्यावे. तर मंडळी, असे आहे की अनेक हुशार, कर्तबगार मुलांना, विद्यार्थ्यांना, होतकरु तरुणांना शिक्षण व रोजगार ह्या जीवनयापनासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने झगडावे लागते आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक परिहार्य कारणांमुळे संधींची उपलब्धता कमी झाल्याचे, नसल्याचे जाणवत आहे. अशा नागरिकांना, आपल्या भारतीय बांधवांना जातपातीची आडकाठी येणार नाही व आपल्या क्षमतेनुसार योग्य ते शिक्षण व रोजगाराची संधी मिळू शकेल असे मार्गदर्शन करता येईल काय हा विचार मनात आला, म्हटले आपल्या मिपाकरांनाच विचारल्यास एक चांगला मार्गदर्शक धागा तयार होईल. काय अपेक्षित आहे? : १. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिप्पणी, दोषदर्शन नसावे. २. प्रतिसाद थेट मुद्द्याला धरुन असावे. ३. रोजगार वा शिक्षण संधींची माहिती देतांना हात आखडता घेऊ नये. ४. आपल्या माहितीतल्या कंपन्या, संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्यांच्या कामाची माहिती. ५. हा 'खर्‍या गरजूं'साठी मदतीचा धागा आहे हे कायम लक्षात असू द्या. ६. आपले बहूमूल्य मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद!

वाचने 36682
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

प्रत्येक सुस्थित माणसाने एक दुसऱ्या जातीच्या मुलाच्यासंपूर्ण शिक्षण आणि नोकरी /व्यवसाय याची जबाबदारी घ्यावी.वयाच्या २५वर्षापर्यंत.

In reply to by सुबोध खरे

They say Fees of Good Schools is one of the main reason of not opting for second child ;) जोक्स अपार्ट, हा पर्याय कठीण वाटतो. कारण उत्तम ठिकाणच्या शाळा निदान भारताततरी महाग होत चालल्यात. मिड लेव्हल शहरांमध्ये देखील शाळेची फी लाखांच्या घरात गेलीये. अन नोकरीची जबाबदारी घ्यावी म्हणजे नेमकं काय कराव? जास्तीत जास्त कोणी प्रोफेशनल एज्युकेशन देऊ शकेल, पण नोकरी लाऊन देण, मला स्वतःला पटत नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

सहमत. आपण कुणाच्या नोकरीची जबाबदारी कशी घेवू शकतो? जास्तीत जास्त मार्गदर्शन किंवा नोकरीच्या संधीची उपलब्धता या बाबतीत मदत करता येईल. आणी व्यवसायाला मदत वैगरे माझ्या मते खुपच मोठी बाब आहे. कारण कुठलाही व्यवसाय करायला भांडवल हे लागणारच. जिथे आपण आपले इन्कम आणि खर्च यांचा रेशो सांभाळत असतो तिथे इतका पैसा मी तरी दुसर्यासाठी नाही गुंतवू शकत. म्हणजे डाॅक्टर साहेबांनी केली असेल अशा स्वरुपाची मदत कुणाला पण सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही. इथे अशा स्वरुपाची व्यवसायासाठी ची मदत कुणी केली असेल तर अनुभव नक्की शेअर करा.

In reply to by त्रिवेणी

नोकरीची जबाबदारी घ्यावी याचा अर्थ नोकरी लागेपर्यंत शक्यतो सर्व मदत करावी किंवा धंदा /व्यवसाय यासाठी लागणारी मदत कर्जासाठी तारण इ जमेल तितकी मदत करावी जेणेकरून एक होतकरू तरुण आपल्या पायावर उभा राहील. व्यवसाय त्या माणसाने स्वतःच चालू करायचा आहे किंवा चालवायचा आहे. त्याला करायची मदत अशा गोष्टी माझा भाऊ गेली काही वर्षे करीत आला. उदा. त्याच्या मित्राकडे औद्योगिक क्षेत्रात जागा विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळेस माझ्या भावाने एक गाळा विकत घेतला आणि तो त्या मित्राला व्यवसाय चालू करण्यासाठी दिला. पुढे व्यवसाय चांगला चालू झाल्यावर तो गाळा त्यालाच विकत दिला. आज त्याचा मित्र त्या गाळ्यात उत्तम तर्हेने व्यवसाय करीत आहे. दुसऱ्या एका तरुण इंजिनियर ( जो त्याच्या कारखान्यात कामाला होता) त्याला स्वतःचे कॉन्टॅक्टस वापरून व्यवसाय वर मानण्यासाठी मदत केली आणि जेंव्हा हा तरुण आपल्या पायावर उभा राहील अशा स्थितीत आला तेंव्हा त्याने भावाची नोकरी सोडून दिली आणि आता तो स्वतः दोन डिप्लोमा इंजिनियर्सना नोकरीवर ठेवून आहे. त्याच्या कडे एक उत्तर प्रदेशीय मुसलमान तरुण वातानुकूलन यंत्राच्या दुरुस्ती साठी येत असे. याचा धंदा नुसताच दुरुस्ती करणे आणि रोख पैसे घेणे असे होते. त्याच्या कडे स्थावर जंगम मालमत्ता काहीच नव्हते. माझ्या भावाने त्याला प्रथम बँकेत करंट अकाउंट (चालू खाते) उघडायला लावले आणि त्याला चेकनेच पैसे दिले आणि नंतर घ्यायला लावले. काही दिवसांनी त्याला एक गाळा भाड्याने घ्यायला लावला. कारण याचा ठावठिकाणा नसल्याने त्याला वातानुकूल यंत्र घेऊन जाण्यासाठी लोक नकार देत. एकदा त्याचे दुकान झाले त्यामुळे त्याला लोकांच्या घरी किंवा दुकानात कामाच्या वेळेपेक्षा नंतर काम करता येऊ लागले. जसे त्याला पैसे मिळू लागले तसे त्याचे आयकर रिटर्न्स भरायला लावून तीन वर्षाच्या रिटर्न्स वर त्याला कर्ज देववून एक आडजागी दुसरा गाळा विकत घ्यायला लावला. आता हाच तरुण इतर दोन नातेवाईकांना हाताशी धरून चांगला व्यवसाय करीत आहे. "ज्योतसे ज्योत जलाते चलो"

In reply to by सुबोध खरे

आपण एखाद्याला आयुष्यात उभे केले, आधार दिला, नौकरी दिली, पैसा दिला तर यापैकी कितीजण केलेली मदत लक्षात ठेवेल.

पण वर डॉक्टर साहेब बोले तसही अवघड आहे आणि निदान भारतातून तरी जाती पातीच्या समीकरणांना जायला अजून काही वर्ष लागतील हे निश्चित !

छान सुरूवात. पण काहि आयडी धींगाणा घालतीलच. असो. व्यवसायोन्मुख शिक्षण पध्दतीचा विकल्प तयार करणे. त्यानंतर त्याना व्यवसाय उभा करण्यास अर्थ पुरवणारी सोपी आणि याचा दुरुपयोग होणार नाहि याची दक्षता घेणारी यंत्रणा. ह्यावर खुप सुचवावस अस आहे खर. मला जे वाटतय ते नक्कीच मांडतो.

छान सुरूवात. पण काहि आयडी धींगाणा घालतीलच. असो. व्यवसायोन्मुख शिक्षण पध्दतीचा विकल्प तयार करणे. त्यानंतर त्याना व्यवसाय उभा करण्यास अर्थ पुरवणारी सोपी आणि याचा दुरुपयोग होणार नाहि याची दक्षता घेणारी यंत्रणा. ह्यावर खुप सुचवावस अस आहे खर. मला जे वाटतय ते नक्कीच मांडतो.

नमस्कार, 2011 साली EBC सवलतीसाठी उत्पन्न मर्यादा 15000 रूपये होती. (वालचंद सांगली), वार्षिक शुल्क 50000 होते. हा विरोधाभास दुर झाला तर अनेक गरीब शिक्षणाचा विचार करू शकतील.

यांचा थेट संबंध असेलच असे नाही. म्हणजे यशस्वी करियरसाठी चांगले शिक्षण आवश्यक असले तरी आपण जे शिक्षण घेतो त्यात यशस्वी करियर होईलच असे नाही. माझ्या इंजिनियरिंग शिक्षणामुळे व नोकरीमुळे बरेच नातेवाईक (माझी सांगायची लायकी नसली तरी- मी कशातलाच तज्ञ नाही, शिक्षणातील तर अजिबात नाही) मला विचारतात पोरगं/पोरगी दहावीला आहे. दहावीनंतर काय करायचं? माझ्या गोतावळ्यात अगदी tier-३ नातेवाईकांपर्यंत बहुतेक सगळे शेतकरी. अजूनही 'काहीतरी' शिकलं की 'कुठेतरी' चिकटता येईल, ही मानसिकता. आणि शेतीच्या आकासणाऱ्या आकारामुळे नोकरी करण्यातली अपरिहार्यता. मी साधारण असं सांगतो: आपल्याला काय आवडतं? आपल्याला काय जमतं? आपल्याला काय परवडेल? आपल्याला काय झेपेल? आणि चांगल्या करियर साठी स्कोप कशात आहे? म्हणजे काय? (फक्त उदाहरण आहे) मला चित्रं काढायला आवडतात.पण मला ते नीट जमत नाही. त्यात शिक्षण घ्यायचं तर माझ्या गावात/जवळपास चांगले शिक्षण उपलबध नाही. बाहेर राहून शिकायचे तर कॉलेज+राहणे हा खर्च परवडेल का? आणि इतकं करून मला त्यात (आर्थिक व मानसिक समाधान देणारं) यशस्वी करियर करता येईल का? किंवा सगळ्यांप्रमाणे मला इंजिनियर होण्याची हौस आहे(आणि त्यात चांगलं करियर करता येईल असं वाटतंय). पण मला गणितात जास्त गती नाहीये किंवा विज्ञानातील बेसिक संकल्पनाच कळत नाहीत. मग कसं करावं? किंवा मला वैद्यकीय क्षेत्रात रस आहे व मी विज्ञानात हुशारही आहे. पण मला त्याची लाखो रुपये फी परवडणार नाही. मग काय करायचं? या सर्व समस्यांवर उपलब्ध असणाऱ्या गोष्टी (आर्थिक मदत/पर्यायी शिक्षण) याचं actual प्रमाण कमी आहे आणि त्यातून ते फार कमी जणांपर्यंत पोहोचतं. त्याच्यासाठी मग प्रचंड स्पर्धा. विद्यार्थ्यांनी व पालकांनी शिक्षण व करियरविषयी प्रॅक्टिकल ऍप्रोच ठेवणंसुद्धा आवश्यक आहे. आवड/समज असो व नसो, दहावीनंतर डिप्लोमा करून आपलं पोरगं डोक्यावर पिवळं हेल्मेट घालून धरणाच्या भिंतीवर उभा राहून drawing बघतंय, अशी फिल्मी स्वप्नं सगळ्यांनी पहिली तर त्यांचा 'रव्या' होऊ शकतो, हे समजावणारं कोणीतरी असावं.

प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला लवकरात लवकर रोजगार कसा मिळु शकेल हे बघावे,त्यासाठी नेहमीच्या मार्गाने न जाता आधी व्यवसायीक शिक्षण घ्यावे त्याच्याने रोजगार मिळु लागला कि पुढच्या शिक्षणाचे बघावे, बरेच जण १० वी १२ वी नंतर पदवी घेण्यामागे लागतात मध्येच कुठेतरी गुचक्या देउन व्यवस्थेच्या नावाने बोट मोडत बसतात्,त्यापेक्षा आपल्या भागात कसला व्यवसाय चालु शकेल हे बघुण त्याप्रमाणे शिक्षण घ्यावे व तो व्यवसाय सुरु करावा त्यासाठी केंद्र सरकारच्या भरपुर स्किम आहेत,प्रत्येक वेळेस सरकारी किंवा खाजगी नोकरीची वाट न धरता आपल्या शिक्षणाप्रमाणे एखादा लघु उद्योग सुरु करावा व त्या व्यवसायात आपल्या सारखेच बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार द्यावा.

माणूस संधीने संचिताच्या साह्याने किंवा संचिताने संधीच्या साह्याने घडत असतो.मानवी मनाचे काही दशक पैलू आता शोधण्यात आले आहेत. आरक्षणाच्या मुळे फक्त संधी मिळते. संचित नाही. तीक्ष्न नजर चपळपणा या निसर्गदत्त देण्ग्या॑ आहेत त्यातून संधी मिळाली की उत्तम फिल्डरही बनता येते वा ड्रायव्हर. आपले दुरदैव असे की फिल्डरला एका दिवसाला पन्नास हजार मिळाले तर ड्राय॑व्हरला सहा महिन्याला तितके. म्हणून सर्वजण क्रिकेटर होईन म्हणतात. दुर्लभ ते किमती यापेक्षा उपयुक्त ते किमती हे ज्यावेळी मानव जात स्वीकारेल त्यावेळी लोखंण्डाचा भाव ५० रू किलो व सोन्याचा ५ रू किलो होईल.

In reply to by चौकटराजा

चौरा काका लोखंड व sonyachi तुलना काही कळली नाही.जे दुर्मिळ आहे त्याची किंमत कमी कशी होणार. बाकी डांगेसाहेब माझे मित्र आहेत पण त्यांच्याएवढी विद्वत्ता नसल्याने वाचनमात्र असणार आहे.

In reply to by मुक्त

काही गोष्टींना मिळणारी किंमत ते किती दुर्मिळ आहे यावर फक्त मानवी समाजा॑तील प्रवाह ठरवतात तर नैसर्गिक महत्व हे त्याचा मानवी व्यवहारातील महत्वाने ठरते. मानवी जगापलिकडे किंमत ठरवणे हा प्रकारच नाही. आपल्याला ड्रायव्हर झाल्याचे दु: ख दोन कारणानी होते. एक त्याला पगार चांगला नाही म्हणून व दुसरे त्याला प्रतिष्ठा नाही म्हणून. बाकी दुसरा प्रकार गौण आहे. कारण फॉरमुला वन मधला विनर ड्रायव्हरच असतो पण मानवी समाजाच्या नजरेत कोणतेही कल्याणकारी काम न करता॑ त्याला प्रतिष्ठा दुर्मिळ पणाने मिळते. टेनिस चा सामना हरणारा देखील मनोरंजन करीतच असतो पण त्याला निम्मे पैसे मिळतात . मानवी समाजात संपतीचे वाटप फार खुळेपणाने होत असते. सोन्याचे जे काही औद्योगिक उपयोग असतील त्यापेक्षा कितीतरी महत्वाचे उपयोग लोखंडाचे आहेत. पण बिचार्‍या लोखण्डाला चकाकी नाही व दुर्मिळपणा नाही या दोन न्रिरुपयोगी गुणांमुळे ते मानवी मनाला खूळ लावू शकते. एकही गुंज सोने विकत न घेणारा माझ्यासारखा दुर्मिळ पण मला दुर्मिळपणाचा मोठेपणा बिलकुल नको. मी किती उपयुक्त आहे हे माझ्या नजरेत महत्वाचे.

In reply to by चौकटराजा

उपयुक्ततेचे उदाहरण झेपत नाहीये. काय उपयुक्त आणि काय दुर्मिळ पण अनुपयुक्त हे कसे ठरवावे? भीमण्णा, पुल, अमिताभ इ. आणि एक सामान्य शेतकरी / एखादा IT अभियंता / हवालदार, यातील अधिक उपयुक्त कोण? कोणाला अधिक उत्पन्न मिळावे?

In reply to by sagarpdy

पिन्डे पिन्डे मर्तिभिन्ना: .हे तर आहेच . पण मानवी समाजाचा विकास हा पहिला महत्वाचा निकष मानला की मला अन्न, वस्त्र, निवास, आरोग्य ,शिक्क्षण ,दळण वळण ,तंत्र विकास याच क्रमाने जाउन मग करमणूक क्रीडा साहित्य काव्य याकडे जायला आवडेल. भांडवल शाही विचारधारा व समाजवादी विचारधारा यात हाच मूलभूत फरक आहे.

In reply to by चौकटराजा

मूलभूत गरजांची पूर्ती करणाऱ्यास सर्वाधिक उत्पन्न असल्यास, त्या अधिक महाग व चैनीच्या गोष्टी स्वस्त असे होईल असे वाटत नाही का?

In reply to by sagarpdy

मूलभूत गरजांची पूर्तता करणार्यास सर्वाधिक उत्पन्न अन त्या वस्तू यांच्या किमतीचा काय संबंध..? म्हण्जे शेतकरी, कापडवाला, बिल्डर, डोक्टर, रस्ते निर्मिती करणारे ई चे उत्पन्न्न वाढले तर त्या वस्तू महाग होतील ? अहो आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत तरीही डाळी १०० च्या वर आहेत. वस्तूची किंमत पुरवठा व त्यास येणारा उत्पादन खर्च व मागणी यांच्या समन्वयावरून ठरते असे मी तरी अर्थशास्त्रात शिकलोय. आत चैनीच्या गोष्टी एका विशिष्ट पातळी नंतर निर्माण होतातच कारण मूलभूत गरजांची गरज अमर्याद नसते. अन्न वस्त्र पुन्हा पुन्हा लागते जरूर पण जरूरी पाहिली तर २ पोळ्या व थोडा भात भाजी, ९००चौ फो चे घर व चार पाच शर्ट पुरेसे होतात. खरी समस्या निर्माण होते ती चैन चालू झाल्यावर. मग भीमसेनना एका कार्यक्रमाचे दोन लाख द्या , सलमानला ५० कोटी द्या असे आपण करतो व डाळ १०० ची १२० झाली की बोंब करतो.

In reply to by चौकटराजा

अंतूबर्वा उवाच : "तो तुमचा गांधी, जगात गेला पण कोकणात नाय आला, कारण त्याला माहितीये, कोकणात त्याच्या पंच्याचं कोण कौतुक करणार, इथे सगळे पंचेवाले.." (सर्व तसंच्यातसं आठवत नाही, अंदाजपंचे लिहिलंय)

In reply to by संदीप डांगे

कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही." "म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?" "ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं !

In reply to by चौकटराजा

शेतकऱ्याला नगण्य मोबदला मिळतो तेव्हा डाळ १००-२०० च्या घरात आहे. मधली पूर्ण व्यापार साखळी तशीच ठेवून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवल्यास डाळीची किंमत नक्कीच वाढणार. व्यापार साखळी काही किमान प्रमाणात नक्कीच आवश्यक आहेच. त्यांचा खर्च देखील हमाली, साठवणूक करणे हे अत्यावश्यक कामांत येत असल्याने काहीशी वाढेल.
खरी समस्या निर्माण होते ती चैन चालू झाल्यावर
सत्य, पण चैन हि मानवी समाज घडण्याची/विकसित होण्याची आवश्यक पायरी आहे असे वाटत नाही का? अत्यावश्यक गरजा भागावण्याची कामे सामान्य प्राणी देखील करतातच. करमणुकीसाठी ते देखील जुजबी खेळ खेळतातच. सुरुवातीच्या शेतकरी/शिकारी समाजाला जेव्हा अत्यावश्यक गरजा भागवणे सहज शक्य होऊ लागले तेव्हाच तो चैनीकडे वळला व संशोधन / अभ्यास / कला / क्रीडा यांकडे वळाला. आता त्या चैनीची सवय झालीये. असो, शेतीखेरीज जी अन्य उदाहरणे जी आपण दिलीत, ज्यांचे उत्पन्न थेट ग्राहकांकडून मिळणाऱ्या मोबादल्यावर चालते, त्यात त्या वस्तू / सेवा महागतील कि नाही?

In reply to by sagarpdy

चैन ही मानवी विकासातील पायरी काहीशी आहे. पूर्ण नाही. एखाद्या गोष्टीने रोजगार निर्मिती होते म्हणून ती गोष्ट करा असे जर ठरवले तर असासिनेशन हा देखील रोजगार होउन शकतो.डान्सबार ला मग बंदी कशासाठी दारू बंदी कशासाठी? आपल्यावर संयम असेल तर या प्रकारची रोजगार निर्मिती काय हरकत आहे ? अर्थव्यवस्थेत एकदा आवश्यक ची सोय झाली की चैन येणारच.आज अमेरिकेत धरण बांधणे हा विषयच नाही सबब तिथे नाईट क्लब काढला तर काहीच अडचण नाही .पंण इथे भारतात नाईट क्लब काढतो व लोड शेडिंगमुळे तो बंद ठेवावा लागतो किंवा सौर उर्जेवर न चालवता डिझेल वर चालावावा लागतो इथे गफलत आहे.नशीब फॉरम्युला वन सारख्या रेसेस आपल्या इथे चालत नाहीत.

In reply to by चौकटराजा

समाजवाद हि अविकसित/विकसनशील समाजासाठी चैनच आहे. चर्चा करण्यासारखे आहे. पण इकडे बरेच विषयांतर होतेय. त्यामुळे थांबतोय.

कुठल्याही करीयरमध्ये यशस्वी होण्यासाठी एक ध्यास जरुर बाळगावा "सर्वोत्कृष्ठते" चा एक्सलन्स चा म्हणजे त्याला एक अंतिम आदर्श मानुन सतत त्याच्या जवळ जाण्याचा एक आटोकाट प्रयत्न सातत्याने करत राहावा. रोज अगदी रोज नेहमी काल पेक्षा आपले आजचे काम "बेटर" कसे करता येईल. "वेगळ्या" रीतीने कसे करता येइल. "दोष" एक एक करुन कसे कमी करता येतील. याचा सतत प्रयत्न एक "व्यावसायिक" म्हणून करावा. अशी विचारसरणी ठेवावी. दुसरं "कॅपॅसीटी डेव्हलपमेंट" "क्षमता विकास" कसा करता येइल या दिशेनेही प्रयत्न करत राहावा. म्हणजे मुळ क्षमता उदा. जर आपल्याला आपल्या कामा संदर्भातील एकच सॉफ्टवेअर येत असेल. व एकुण अजुन तीन मध्ये आपल्या फिल्ड चे काम होत असेल तर इतर दोन सॉफ्टवेअर आपण शिकु तेव्हा आपल्या मुळ "क्षमते" चा विकास होतो. उदाहरण जमले नाही बहुधा सांगायचे तात्पर्य आपल्या क्षेत्रासंदर्भातील नविन आवश्यक शिक्षण सातत्त्याने घेत अपडेट करत राहावे. तिसरा मुलभुत गुणवत्तेवर भर द्यावा म्हणजे जग काहीही करो आपण आपल्या गुणवत्तीचाच आधार घेउन पुढे मार्गक्रमण करु लांडीलबाडी अ‍ॅडजस्टमेंट करायची नाही असा निर्धार ठेवावा. त्यानेच अंतिमतः स्वविकास साध्य होतो. मेरीट इज मेरीट आफ्टरऑल. त्यावरच फोकस ठेवला तर काहीच अवघड नाही. चौथा जे जे आपण आपल्या करीयरमध्ये वा एकुण जीवनातही यशस्वीरीत्या साध्य केलेल आहे. ज्या तंत्रावर हुकुमत मिळवलेली आहे त्याचा तात्काळ त्याग करावा. हे अशा अर्थाने की सोडुन द्याव अस नाही त्याच्या कौतुकातुन लवकरात लवकर बाहेर पडावे व पुन्हा पाटी पुसुन नव्याने नविन बाब शिकण्याकडे उर्जा वळवावी. कंटीन्युअस एज्युकेशन कंटीन्युअस इम्प्रुव्हमेंट असे धोरण बाळगावे. पाचवी बाब "सर्जनशीलता" जी आहे तिला भरपुर महत्व द्यावे. म्हणजे आपल्या अगोदर लाखोंनी करोडोंनी का होइना एकाच तर्‍हेने विचार वा काम केलेले असेल तर ते आपण टाळावे. प्रत्येक जुन्या बाबीला विचासरणीला कामाच्या रीतीला आव्हान द्यावे चॅलेंज द्यावे म्हणजे अर्थहीन मारामारी करा वांझ विरोधच करा या अर्थाने नाही तर याहुन अधिक चांगला "पर्याय" काय असु शकेल याचा विचार करत राहावा. हा बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफुल अ‍ॅप्रोच आयुष्यात फार महत्वाचा आहे. अ‍ॅथॉरीटीला चॅलेंज करणे नेहमीच वाईट नसते. ही निर्भयता बाळगावी. अजुन एक वेगळ्या आपल्यापेक्षा सर्वस्वी वेगळ्या सांस्कृतिक वैचारीक आर्थिक सामाजिक बौद्धिक स्तर असलेल्या व्यक्ती विचारांबरोबर "स्व" ची घुसळण करावी. त्याने स्व- विकास होतो. अशाच वेगळ्या पुस्तकांचे वाचन करावे अशा वेगळ्या व्यक्तींचा सहवास करावा. म्हणजे करीयर ला व त्यापेक्षा एकुण जीवनाकडे बघण्याचा एक विशाल दृष्टीकोण मिळतो. जो विशाल दृष्टीकोण "स्व" ला प्रगल्भ करतो ज्याने अतिंमतः आपण आपल्या करीयरसहीत एकुण जीवनात यशस्वी होतो. बदल व नविन अनुभव नविन आव्हाने त्रासदायकच असतात मात्र ती तितकीच प्रगत करणारीही ठरतात त्यामूळे बदलातील ताणाला सामोरे जावे. बदलाला व नविन आव्हानांना सहर्ष सामोरे जावे. यात विशेष वा नविन काहीच नाही. फक्त एक करीयर करतांना किंवा एकुण जीवनाच्या आव्हानाचा सामना करतांना असा अ‍ॅप्रोच उपयोगी ठरतो असे मला एक आपले वाटते असे माझे एक मत आहे. थोडाफार अनुभव आहे., पटेल तितके घ्यावे. अजुन एक टेड टॉक्स चे सेवन करत राहावे. बरेचसे टेड टॉक्स प्रेरणादायी आहेत. अनेक विलक्षण सुंदर नविन कल्पना नविन विचार यातुन प्राप्त होतात. यु ट्युब वर उपलब्ध आहेत. या काही लिंक्स. १-https://www.youtube.com/watch?v=JQ0iMulicgg&list=PLIAz2VA7_AMG0cJW17V25… २-https://www.youtube.com/watch?v=86x-u-tz0MA&list=PLVYIA3Y7IGXvOfXsgzomB… ३-https://www.youtube.com/watch?v=4vl6wCiUZYc यातील प्रत्येक विचार पटेलच असे नाही वा नविनच असेल असेही नाही. मात्र यात नक्कीच एखादा तरी दमदार विचार प्रेरणा मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे एक आपल ट्राय करायला हरकत नाही.

In reply to by मारवा

विचार करायला लावणारा प्रतिसाद आहे. टेड टॉक्स बघणेत येतील. आणखी देखील काही टेड टॉक्सच्या प्रेरणादायी लिंकोळ्या असतील तर व्यनि कराल का?

In reply to by मारवा

प्रत्येक कृती करताना "हे करणे महत्वाचे आहे का ?" हा प्रश्नपण स्वतःला विचारावा.

प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला सतत वाचन करायची सवय लावावी. अगदी लहानपणा पासून जितकं मुलाला जास्त पुस्तकाच्या सानिध्यात ठेवता येईल तेवढं ठेवावं. पाल्याला ज्या विषयात आवड असेल त्या प्रत्येक विषयावर लहान मुलांना (६ वर्षा पुढील) समजेल अशा भाषेत पुस्तक उपलब्ध आहेत. ती मिळवायचा प्रयत्न करावा. रोज कमीतकमी १ तास आपल्या मुलं बरोबर कुठल्यातरी विषयाच वाचन / डिस्कशन करण्यात घालवावा. कुठल्याही गोष्टीत त्याचं मत विचारावं, लहान आहे म्हणून सोडून देऊ नये. माझ्या एका मैत्रिणीने गेली २ वर्ष प्रत्येक सुट्टी मुलाला (वय वर्ष ८) प्लॅन करायला लावली. हॉटेल / रेंटल कार / कुठली ठिकाणं बघायची / पैसे किती लागणार याची एक्सेल शीट बनवायला लावली. लागेल तेवढीच मदत केली आणि ट्रिप नंतर चुका लिहून ठेवायला सांगितल्या, मुलाने जवळपास ८०% काम केल. मुलाच्या भविष्याची काळजी १०वी १२वी नंतर सुरु करण्याऐवजी लहानपणापासूनच सुरु केली तर खूप फायदा होईल, मुलाची आवड कल खूपच चांगल्या प्रकारे कळलेला असेल. अवांतर: आरक्षण आणि शिक्षणपद्धती आत्ता आली, ज्ञान आधीपासूनच होतं. आणि आंतरजालामुळे आता सहज स्वस्तात उपलब्ध आहे. माझ्या आसपास मी जी उदाहरणं बघितली त्यावरून मेडिकल सोडून इतर कुठल्याही अभ्यासक्रम केलेली मुलं आपलं शैक्षणिक ज्ञान सोडून भलत्याच क्षेत्रात करिअर करताना दिसतात , त्यामुळे एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमाचा आग्रह धरण्यापेक्षा १२ वी नंतर जे मिळेल ते शिकावं आणि एखादा स्पेसिफिक जॉब (आवडीप्रमाणे) टार्गेट करून त्यात प्राविण्य मिळवायचा प्रयत्न करावा.

In reply to by वीणा३

ह्यूमन बीईंग इज नॉट टू बी इंजिनिअर्ड. रोज कमीतकमी १ तास आपल्या मुलं बरोबर कुठल्यातरी विषयाच वाचन / डिस्कशन करण्यात घालवावा. कुठल्याही गोष्टीत त्याचं मत विचारावं, लहान आहे म्हणून सोडून देऊ नये. माझ्या एका मैत्रिणीने गेली २ वर्ष प्रत्येक सुट्टी मुलाला (वय वर्ष ८) प्लॅन करायला लावली. लहान मुलांची सुट्टी नासवणार्‍या पालकांचा फार राग येतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

सहमत आहे. एक्सेल शीट बनवायला लावणार्‍या आणि रोज तासभर कॉन्फरन्समध्ये बसवणार्‍या पालकांपासून पळून जाण्यात बालपण जाईल.

In reply to by मोदक

बौद्धिक आहे की नाही हा प्रश्न गौण आहे. डिस्कशन काय फॉर्ममध्ये होतं हे जास्त महत्त्वाचं. सहज पोराशी गप्पा मारता मारता आपण वाचलेलं पुस्तक*, त्याने वाचलेलं पुस्तक* याबद्दल बोलणं वेगळं. आणि "चल रे/ग आता आपला डिस्कशन टाईम" किंवा "कर बरं सुट्टी प्लॅन. मी दाखवतो/ते कशी करायची. स्टेप वनः ओपन अ‍ॅन एक्सेल शीट..." असा रामगोपालबजाजपणा करणं हे वेगळं. *पुस्तक हा प्लेसहोल्डर आहे. सिनेमा, अनुभव, ट्रेक, किस्सा, काहीही घ्या.

In reply to by आदूबाळ

वरचे आक्षेप बरोबर आहेत जर तुम्ही मुलांना नको असताना त्यांना काहीतरी करायला सांगत असाल तर. मैत्रिणीने हे जेव्हा पहिल्यांदी केलं तेव्हा मुलाला प्रचंड उत्सुकता होती एका विशिष्ट ठिकाणी फिरायला जाण्यासाठी (त्याने त्याबद्दल भरपूर ऐकलं होतं, त्याचे १-२ मित्र जाऊन आले होते आणि तो मागे लागल्यामुळेच ते तिकडे चालले होते ) त्यामुळे तिने ती उत्सुकता नीट वापरून घेतली, त्या मुलाने स्वतः खूप वाचन केलं ,(ती स्वतः तो लहान असल्यापासून त्याला खूप पुस्तक वाचून दाखवते, आणि आता तो पुस्तकांशिवाय राहू शकत नाही, स्वतःहूनच रोज काहीतरी वाचत असतो ) त्याच्या मित्रांनी तिकडे काय केलं होतं त्याची यादी केली, आपल्याला वेळ किती कसा कुठे घालवायचा हे ठरवलं. मित्रांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी त्याला करायच्या नव्हत्या, त्या त्याच्या त्याने काढून टाकल्या. सगळ्या प्रकारात तो जाम खुश होता कि जस तो ठरवेल तशी ट्रिप झाली. पुढच्या वेळी आदल्या वर्षीचा अनुभव असल्याने आणि त्यात जाम मजा आल्यामुळे तो आवडीने तयार झाला. रोजचं डिस्कशन / वाचन सुद्धा मुलाचा कल बघून खूप वेग-वेगळ्या विषयांवर होऊ शकतं. मुलाला कार्स अतिशय आवडतात, आमच्या इथे काही कार्स ची मासिक (तत्सम), लायब्ररी मध्ये दिसली तर आणली जातातच. अजून वाचन जमत नसल्याने (चळवळ जास्त असल्याने) प्रत्येक कार बघून "हि कुठली " विचारात असतो. आता रस्त्याने जाताना तोच मला "आई हि बघ xyz कार" सांगत राहतो. मी रोज ऑफिस मधून आल्यावर त्याला काहीतरी सांगते (आज मला रस्त्यात पिवळ्या रंगाची कार दिसली, एक मोठा ट्रक खूप कार घेऊन चालला होता, ऑफिस मध्ये मैत्रिणीने डब्याला xyz आणलं, खूप छान होतं इ ), आता त्याला पण ती सवय लागलीये. हे सतत चालू ठेवलं कि हळू हळू वेग-वेगळे विषय बोलता येतात (मुलाच्या वयाप्रमाणे). सांगायचा मुद्दा हा कि वाचनाची, वेग-वेगळ्या गोष्टी (मुलांचा कल -आवड) बघून करायची सवय लावली तर त्यांचाच आत्मविश्वास वाढेल. एखाद्या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही म्हणून असं मूल निराश होण्याचा संभव कमी होईल. कधी काही गोष्टी चुकतात, आपल्याला हव्या ताशा होत नाहीत, पण कधी कधी आपण न ठरवलेल्या गोष्टी सुद्धा चांगल्या होऊ शकतात हे जास्त चांगल्या प्रकारे कळू शकेल.

नगर मध्ये म्हणे ३० लाख लोक जमले होते मोर्चाला त्यातल्या एकेकाने १ रु दिला तरी ३० लाखात बर्याच मुलाचे शिक्षण सहज होइल अस मझ भाउ म्हणत होता काल :)

In reply to by पियुशा

किती मुलांचे शिक्षण होईल ? रु.3 लाख प्रति मूल म्हंटलं तर फक्त 10. बाकी लाखोंचं काय? करु द्यात त्यांना मोर्चा. मोर्चाच्या माध्यमातून कोणाला त्रास दिला आहे का त्यांनी ?

In reply to by विशुमित

सगळं शिक्षण स्पॉन्सर करायची गरज नसते मालक. वर्षाला १०, १२ हजार रु. जरी मदत मिळाली तरी गरीब पालकांवरचा ताण किती हलका होतो आणी आपल्या गुणवत्तेमुळे मिळालेल्या मदतीमुळे किती उभारी मिळते हे मी स्वतः अनुभवले आहे. माझे शिक्षण अनेक संस्थांनी केलेल्या मदतीमुळेच होउ शकले अन्यथा मला शिक्षण सोडावे लागले असते. एव्ढा मोठा जनसमुह एकत्र होतोय तर खरंच अश्या प्रकारची मराठा समाजातील गरीब पण गुणवंत मुलांना, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी एखादी संस्था स्थापन करण्याचा कुणीच विचार करीत नाही. समस्या निश्चीत आहेत, सर्वच मराठे तालेवार नाहीत आणि शिक्षण, नोकरीसाठी अनेक गरीब घरातील मुलांची परवड होते ही वस्तुस्थिती आहे परंतू, अश्या संकटावर मात करण्यासाठी आरक्षणाशिवाय इतर विधायक मार्ग नाही का असा प्रश्न विचारावासा वाटतो. पण असं काही विचारलं कि तुमचा प्रश्न "करु द्यात त्यांना मोर्चा. मोर्चाच्या माध्यमातून कोणाला त्रास दिला आहे का त्यांनी ?" हा असतो.. जो निरर्थक आहे..

In reply to by पुंबा

अशा खूप संस्था आणि लोक कार्यरत आहेत जे गरजूना शैक्षणिक मदत करतात. यादी देऊन त्यांचे मला मूल्य कमी नाही करायचे. आताची अशी वस्तूस्थिती आहे की चांगले गुण आणि पैसे असले तरी ऍडमिशन मिळत नाही. 30 लाख रुपये ओतले तरी ऍडमिशन मिळणार नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की त्या 30 लाखाने फक्त 10 च जणांचे शिक्षण होईल पण जर आरक्षण मिळाले तर कितीतरी लाख मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मिटू शकेल (मी फक्त अंदाज व्यक्त करतोय. यदाकदाचित आरक्षण मिळाले आणि त्याची योग्य अंमलबजावणी झाली तर आकडे वेगळे सुद्धा असू शकतात.). ही तफावत मी दाखवत आहे. बाकी जो रु.1 लोकांकडून गोळा केले जात आहेत ते मोर्चा साठी केले जात आहेत. हाच सल्ला साई संस्थान, बालाजी संस्थान, हाजी अली दर्गा, नागपूर चैत्यभूमी, पंढरपूरची वारी, कुंभमेळे, न्यू इयर बॅश, मल्टी प्लेक्स च्या समोर जाऊन तुम्ही देऊ शकाल का? उत्तर नाहीच असणार आहे . मी बऱ्याच वेळा लिहतोय आरक्षण शिक्षण आणि नोकरीसाठी मागत आहेत, मंदिर, मदरशे, समाजमंदिर आणि गुरूंच्या शाखा खोलण्यासाठी नाही. मी अजून ही म्हणतो करू द्यात त्यांना मोर्चे, निरर्थक का असेनात पण लाखाचे ज्ञान देणारे नक्कीच आहेत.

In reply to by विशुमित

बाकी जो रु.1 लोकांकडून गोळा केले जात आहेत ते मोर्चा साठी केले जात आहेत. हाच सल्ला साई संस्थान, बालाजी संस्थान, हाजी अली दर्गा, नागपूर चैत्यभूमी, पंढरपूरची वारी, कुंभमेळे, न्यू इयर बॅश, मल्टी प्लेक्स च्या समोर जाऊन तुम्ही देऊ शकाल का? उत्तर नाहीच असणार आहे . १. कशावरून उत्तर नाहीच असेल असे वाटले. २. प्रत्येकाकडून फक्त १ रू. घेतला जात आहे? लाखालाखाची दवलतजादा करत नाहीयेत मातब्बर मराठा नेते?

In reply to by पुंबा

आपण दोघांनीही कॄपया मराठा मोर्चासंबंधीत चर्चेसाठी दुसरा धागा वापरावा, ह्या धाग्यावर अवांतर करुन धाग्याचे मूल्य हरवू नये ह्याची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असे मला वाटते.

In reply to by विशुमित

1. आरक्षित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा (वाचा : फी माफी / सवलत) खर्च कुठून निघतो ? 2. 3 लाख प्रति विद्यार्थी हा आकडा कुठून आला ? हा प्रति वर्ष आहे का ? नसल्यास केवळ प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाचा आहे का ? सविस्तर माहितीस इच्छूक आहे.

बच्चा काबिल बनो काबिल कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी वाक्य जरी सीनेमातल असल तरी ह्यामागे खुप मोठा अर्थ दडलाय. रीलेट करायच झाल्यास ईथेच मिपावर मला माहित असलेल्या कीत्येकांना हे लागु होतय. डांगेबॉ तुमचे होस्टेल किंवा ईतर लेख पाहता तुम्ही सुध्दा फिट बसता की. ** संपादक महोदय हा प्रतिसाद ह्याच धाग्यावर द्यायचा होता, चुकीने तो मराठा मोर्चा धाग्यावर टाकल्या गेलाय विनंति आहे कि तो तेथुन उडवुन टाकण्यात यावा.

सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावायला पाहिजे असा मी मागे सविस्तर प्रतिसाद दिला होता. आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीला( उदा डॉ. देवयानी खोब्रागडे) आरक्षण देणे हे आरक्षणाच्या मूळ हेतूला हरताळ फासल्यासारखे आहे. ज्या माणसाला महिना अडीच लाख रुपये पगार तो मागासलेला कसा ? तेच परत टंकण्याचा कंटाळा आहे.

मोर्चाला जवळपास 70 लाख लोक आले होते म्हणे या सर्वानी आपल्या गावातील आर्थिक दृष्टीने गरीब पण हुशार मुलांची यादी आणली असती तर मोर्चा मधे सर्वानी 1 रू जरी जमा केला असता तरी 100 मुलांच शिक्षण झाल असत

ह्या धाग्याचा उद्देश आधीच नमूद केल्याप्रमाणे मराठामोर्चा, आरक्षण योग्य-अयोग्य, इत्यादी नाही हे लक्षात घ्यावे. त्यानुसारच प्रतिसाद यावेत अशी परत विनंती करत आहे. अन्यथ चांगल्या भावनेने काढलेल्या धाग्याचा आखाडा व्हायला वेळ लागणार नाही. अनेक लोकांना मराठा-मोर्चा, आरक्षण इत्यादीबद्दल अजून बरेच बोलायचे आहे पण त्यासाठी वेगळा धागा काढूयात. ह्या धाग्याला ऑलटाईम रेफरेन्स धागा म्हणून ठेवावा अशी माझी संकल्पना आहे.

मित्रहो, व्यवस्था एका रात्रीत बदलत नाही, अनेक दिवस, अनेक वर्ष तर कधी कधी अनेक पिढ्याही व्यवस्था बदलण्यात खर्ची पडतात. पण मग एखाद्या अडलेल्याचे, खचलेल्याचे, गरजूचे जे आजचे प्रश्न आत्ताच्या आत्ता ताबडतोब सोडवायचे आहेत त्याचे काय करावे? प्रत्येकाच्या आयुष्यात व्यवस्थेमुळे अनेक अडचणी उभ्या राहत आल्या आहेत, अनेकदा आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. मग आपल्याला काय शक्य आहे ते आपण करायचं. आपलं आयुष्य बदलणं आपल्या हातात आहे. कोणीही बसल्या जाग्यावर आपल्या काहीही आणून देत नाही. आज उघड्या डोळ्यांनी मी जेव्हा भारताकडे बघतो तेव्हा मला हजारो संधी होतकरुंची वाट पाहत उभ्या असलेल्या दिसतात. कित्येक ठिकाणी भरमसाठ गॅप्स आहेत, त्या गॅप्स मेहनत करणार्‍या तरुणांची वाट पाहत आजही उभ्या आहेत. वीस वर्षांपूर्वी ज्या समस्या होत्या त्यावर अजूनही सर्वसमावेशक काम सुरु झालेले नाहीये. काम आणि पैसा दोन्ही हात जोडून उभे आहेत. आणि ह्या प्रकरणात आरक्षण कुणालाच नाही, ज्याच्या मनगटात जोर आहे, ज्याच्याकडे मेरिट आहे त्याच्यासाठी हे सर्व खुलं आहे. ज्याला मेरिटवर आपल्याला जोखलं जावं असं वाटतं त्याच्या मेरिटची अस्सल पातळी दाखवणारी ही स्पर्धा खुली आहे. जगण्यासाठीच्या समस्या अनेक आहेत, त्यावर आपल्या सर्वांना मिळून उत्तरं शोधायची आहेत. मदतीचे हात जमतील तसे द्यायचे आहेत. कुणीही आयुष्याचा रस्ता एका भींतीपुढे येऊन संपलाय असे समजू नये. त्यासाठीच हा धागा आहे. ...तुर्तास एवढेच.

विविध कोर्सेसची माहिती आपल्याला नसते. अनेक पर्याय उपलब्ध असतात त्याबद्दल एका सरकारी कार्यालयात पुस्तके मिळतात. त्यात बारीक छपाईमध्ये अनेक अभ्यासक्रम व त्याची सरकारी कॉलेजे याबद्दल माहिती असते. सर्व भारतभरातील माहितीसाठी निळ्या कव्हरचे पुस्तक व महाराष्ट्रातील माहितीसाठी गुलाबी कव्हरचे पुस्तक असे पंचविसेक वर्षांपूर्वी होते. ती पुस्तके कुठे मिलतात हे माहित नाही पण आमच्याकडे आणली गेली होती. माझे वडील त्यांच्या बजेटप्रमाणे एका मुलीला शैक्षणिक मदत करतात. मुलगी असणे, कमी उत्पन्न गट व ब्राह्मणेतर असे साधारण निकष असतात. मुलीचे आईवडील व्यसनी नसून त्यांचा मुलीस सपोर्ट आहे हे बघतात. मुलीचे गणित, शास्त्र हे विषय करून घेणे, बाहेरून मार्गदर्शन मिलवून देणे वगैरे जमेल तसे असते. यात मागे प्रभूमास्तरांचीही हेल्प झाली होती. दुर्दैवाने एका मुलीस गुण कमी मिलाले. आता काय होते की एकतर इंजिनियरींग नाहीतर जाऊ दे! ते जमले नाही तर लग्न करून ताकू नाहीतर अगदीच फुतकळ कोर्स करू देत. अशी मानसिकता आहे. त्यातून मुलीच्या घरच्या लोकांना बाहेर काढणे जमलेले नाही. त्यामुळे एका विद्यार्थ्याची जबाबदारी घेणे तितकेसे फायदेशीर झालेले नाही. आता वडील पुढे हे करत राहतील असे वाटत नाही पण बर्‍याच मुलींना काही ना काही मदत झालेली आहे. माझे दोन्ही भाऊ मात्र आपल्याच नात्यात कोणी गरजू आहे का हे पाहतात व मदत करतात.

as per my thinking, you need only willpower. few year ago i lost my established business, lot everything. but not lost my hope. i started my new work, without any knowledge about anything new work. but i used google, youtube for understand works steps. i did 2 short study about my work. after that now... without investment and degree i started my full time working business,now i am working with worldwide clients with very good repo. No need any reservation for do work. need only hard-work and willpower. and i have reservation but i not used any right in my life from this reservation system. if anyone need help he can contact me anytime.

In reply to by निओ१

मस्त हो निओसाहेब, तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर मराठीतून लिहिता आले तर अनेकांना मार्गदर्शन होइल. अर्थात तुम्हाला स्पर्धेची चिंता नसेल तर!

In reply to by संदीप डांगे

Sure sir, few years ago i was good in Marathi typing but this keyboard typeset is different as per typing knowledge,. but now days I am using only English as per my work need. i am coming back to my root again.. but i planed when i join this team i will need good hand in Marathi typing. i am practicing daily about this need some extra time. i hope your team will understand my issue.

sanDip Dange खूप विद्वान माणूस. akhe जग बदलण्याची takad असणारा. अमी मूर्ख. amhala kahich samjat nahi. aso.

In reply to by मुक्त

ओ साहेब, तुम्ही रागावलात काय? काय राव! प्रत्येक घटनेकडे बघण्याचा माझा वेगळा दृष्टीकोन असतो, प्रत्येक गोष्टीला आडवे जाणे म्हणतात, मी शोधतो वेगळं काही. स्वतंत्र. माझ्यापुरतं.

In reply to by संदीप डांगे

kas आहे. मराठ्यांचे घरातले प्रॉब्लेम मिपावर fakt तुम्हालाच माहित आहेत. आम्हाला काहीच काळात नाही. तुम्ही सगळ्या जगाचे ज्ञान कोळून पाल्येत. इथे बाकी लोक म्हणजेkachara. तुमच्या भाषेत किंवा ithalya so ....