Skip to main content

शब्दभूली

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 23/09/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक कधीतरी, तू उमलून येतेस. काळ वेळ न पाहता, राग लोभ न जाणता. पापणीतल्या पाण्यात कोणाच्या मुग्ध हास्यात, चुकार निवांत क्षणी कोण्या विस्कटल्या मनी. शब्दांचा आधार घेतेस तशी मौनातही बोलतेस उलगडतेस, तरीसुद्धा अलगद मिटू मिटू होतेस... तुझा सूर, तुझा नूर कधी फटकून दूर, गूज जीवाचे सांगण्या शब्द कधी महापूर. सभोवताली वावरत रहा शब्दांची नक्षत्रं पेरत, गावा शब्दभूलीच्या जाईन माग नक्षत्रांचा काढत.
लेखनविषय:

वाचने 7262
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

आवडली कविता. -दिलीप बिरुटे

आवडली, "शब्दभूल" किती वेल्हाळ शब्द आहे!!

सुंदर कविता.

सुंदर कविता!

सुरेख मैय्या, फारच अप्रतिम उतरलीय शब्दभूल. लिहित जा रेग्युलरली.

तुम्ही कविता करता माहित नव्हते, शब्दभूलीचे गाव, शब्दांची नक्षत्रं, नक्षत्रांचा माग, सगळंच सुंदर..

किती सुरेख आहे हे...
सभोवताली वावरत रहा शब्दांची नक्षत्रं पेरत, गावा शब्दभूलीच्या जाईन माग नक्षत्रांचा काढत.

कविता खूप तरल आहे. आवडली. यावरून याच्या अगदी विरुद्ध म्हणता येईल अशा आशयाची माझी एक इंग्रजी कविता आठवली. कधीतरी शेअर करेन.

कविता आवडली. म्हणजे शब्द आवडले. मला पण कविततेतला गूढ अर्थ बऱ्याचदा कळताच नाही. अर्थात हे माझे अज्ञान किंवा 'ढ' पणा आहे.

शब्दांचिया रानात शब्दांचीच झाडे! शब्दांचीच पाने! शब्दांचीच फुले! त्यांचीच शब्दभूल!

वाह.. क्या बात!!

वाह ! आवडली.

कविता आवडली

कविता आवडली.

रेग्यांची 'कविता' आठवली

कविता आवडली. कवितेला उद्देशून किंवा एखाद्या बोलक्या मैत्रिणीला उद्देशून, या अर्थाने पाहिली तरी चांगली वाटते. तुम्ही नेहमी लिहिलं पाहिजे.

सुंदर! स्वगतः ही रचना कशी सुटली ब्वॉ???

खरं या वेळी उपस्थित नसल्याने​ दृष्टीस पडलीच नाही ही अप्रतिम कविता कवितेतील औरंगजेब नाखु खालमाने

In reply to by नाखु

इथेच वरती...
कवितेच्या वाटेला फारसा जात नाही पण ही रचना आव्डली ! हिमालयीन कवयत्रीचा गो(वा)डुला अविष्कार
येऊन गेलात तुम्ही... ! असो, यानिमित्ताने पुन्हा एकदा कविता वाचली. पुन्हा आवडली. Sandy