येते आठवण अधून -मधून ....
येते आठवण अधून -मधून ,
पहिल्या भेटीची ,
तहानलेल्या स्पर्शाची ,
तुझ्या नाजूक हातांची ,
अन त्यावर कोरलेल्या स्वप्नांची …
येते आठवण अधून -मधून ,
पहिल्या चुंबनाची ,
निसटलेल्या ओठांची ,
तुझ्या डोळ्यातील आसवांची ,
अन एकाचवेळी बघितलेल्या चंद्राची ….
येते आठवण अधून -मधून ,
पहिल्या प्रणयाची ,
लाखो धकधकींची ,
तुझ्या नयनांतील भीतीची ,
अन त्या क्षणी जगलेल्या एका जन्माची ……
येते आठवण अधून -मधून ,
घरी सारे कळल्याची ,
तुझ्या थरथरनाऱ्या पायांची ,
मान -अपमानांची ,
अन तुझ्या चेहरा सुकल्याची
येते आठवण अधून -मधून ,
तू पुन्हा -पुन्हा रड्ल्याची ,
दाबलेल्या माझ्या आसवांची ,
तुझ्या उतरलेल्या वजनांची ,
अन समाजाने दुखवलेल्या नसेची ….
येते आठवण अधून -मधून ,
घर की प्रेम ह्या दुविधेची ,
जळलेल्या स्वप्नांची ,
आपले हात सुटल्याची ,
अन वेड्या मनातील वेड्या आक्रोशाची ……
भारीच!
धन्यवाद
मनातली उतरलीय.
+1
धन्यवाद
धन्यवाद
आवडली
मस्त!!!