Skip to main content

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 02/10/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

वाचने 150746
प्रतिक्रिया 648

प्रतिक्रिया

सायलेन्सर कुठला बेस्ट असेल हो मंडळी???? माझ्या गरजा १. अर्थातच दणदणीत आवाज २. कमी किंमत (अध्याहृतच आहे ते) ३. शक्यतो ऑफ रोडिंगला त्रास देणार नाही असे डिझाईन माझ्या माहिती असलेले काही सायलेन्सर १. पंजाब (गुरप्रीत एग्जोस्ट) २. इंदौर ३. मेगाफोन ४. ग्लासवूल ह्यांच्यातील कुठला बेस्ट आहे ते सांगा. ह्या शिवाय काही ऑप्शन असली तर ती ही सांगा. आगाऊ आभार अवांतर:- गाडीची वॉरंटी संपली आहे तस्मात आता राणी मनाला येईल तशी सजवणार, वर्ल्ड वॉर २ थिम मॅट ब्लॅक रंग द्यायचं चालू आहे डोक्यात, त्यासोबत बार हँडल (स्लान्टेड बॉबर इअर्स टाईप) अन सायलेन्सर

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

राणीच्या मेकअपचे स्टेजवाईज फोटो काढून ठेवा आणि नंतर आठवणीने एक धागा काढा.

In reply to by कपिलमुनी

कमु, मोदक शेठ ग्लासवूल ने मायलेज वर काय फरक पडतो ??? किती उतरते, किती स्टेबल राहते, काही ठिकाणी वाचले होते की ग्लासवूल (का इंदोरी, नीट आठवत नाही) मुळे इंजिन ब्लॉकला चरे पडतात (scratches) , ते खरे आहे का? नाहीतर आवाजाचा शौक हजारोत पडायचा !! =)) =)) माझं मन बसलंय पंजाब वर, ८००₹ ला मिळतोय, घ्यावा काय? ग्लासवूल ची रेंज काय आहे, मला गाडीचा आवाज उगा हर्ले टाईप करायचा नाहीये, तर जितका ओल्ड स्कुल बुलेट टाईप खणखणीत असेल तितका करायचा आहे, त्या हिशोबाने सल्ला द्या ही विनंती, भटकंती अनलिमिटेड वाले भाऊ असतील तर त्यांनीही सल्ला द्यावा आपल्याच ब्रदरहूडचा आभारी बापु

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ग्लासवुलबद्दल मनरावचा एक प्रतिसाद आहे, शोधून देतो. ..बाकी सायलेन्सर बदलण्याचा मानस नसल्याने याबाबत माहिती काढलेली नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जरा उशीर झाला त्यामुळे क्षमस्व. चीता घेऊन हंपीत शिकारी करत होतो. आलो काल. सुंदर baasy आवाज आणि कमीत कमी परफॉर्मन्सवर परिणाम यासाठी गोल्डस्टार ग्लासवूल मी सुचवीन. साधारण २२००-२५०० किंमत आहे. कुठल्या तरी मेकॅनिककडे जिथे सगळे ऑप्शन उपलब्ध असतील तिथे जाऊन लावून बघा. युट्यूबवर आवाजाजेही व्हिडिओ आहेतच.

In reply to by पी. के.

हे अवांतर आहे खरं तर. हंपीचा धागा मी लिहू शकेन की नाही माहित नाही, कारण एकसंध लिहिण्याची आमची हातोटी नाही. पण जसे जमेल तसे फोटो पेजवर टाकतोय, सोबत जसे मला जोडता येतील तसे शब्दही जोडतोय. फोटोदेखील जसे पाहिले त्या क्रमाने जमत नाहीत प्रोसेस करायला. जेव्हा जी फ्रेम आवडेल ती घ्यायची, संस्करण करायचे आणि अपलोड करायचा असा अजागळ कारभार आहे माझा.

In reply to by भटकंती अनलिमिटेड

एक काम करा मग... एक साधा धागा टाका. कुठून कुठे गेलात आणि किती वेळ लागला वगैरे वगैरे... नंतर प्रतिसादात सवडीने एक एक फोटो अपलोड करा...

In reply to by भटकंती अनलिमिटेड

कारण एकसंध लिहिण्याची आमची हातोटी नाही.
इ ना चोलबे... चेपू वर पाहिलंय लिखाण तुमचं देवा

In reply to by टवाळ कार्टा

तुला स्वतःचा "आबुआगा" करायची इतकी का हौस आहे..? बाकी लाल डब्याचे तुमचे आणि तुमच्या खास मित्रांचे पॅरामीटर्स माहिती असल्याने मित्रांसह तुम्हाला इथुन पुढे फाट्यावर मारल्यास आश्चर्य वाटून घेवू नये.

In reply to by मोदक

टक्या 'बाबबाब' आहे हे सांगून मी बापूचा ५०० सीसी (कॉमेन्ट्स अँड कॉम्प्लिमेन्ट्स) धागा संपन्न करतो. धन्यवाद.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या घे ह्याला बी घोळात! *विचित्र दिसत (इथे बोलत) असले तरी आपलेच आहेत ते. *प्रेरणास्थान - अशी ही बनवाबनवी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे टक्या 'बाबबाब' म्हणजे बाबा बजरंग बाईकवर बसले. ;)

In reply to by मोदक

अनुल्लेखाने मारा असे सूचक दोन शब्द बोलून मी माझे म्हणणे संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र जय एन्फिल्ड!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मलादेखील सायलेंसर, हॅण्डल बार बदलवुन घ्यायचेय. हे पुण्यात कोठे मिळतील? ते कलरींगच पण आहे मनात, पण आरटीओ मध्ये नेउन आरसीवर चेंजेस करावे लागतील काय?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

नाना पेठेत बदलून मिळतात. आणि कस्टमाइज्ड करायची असेल तर http://gabrielmotorcycle.com/ वर्दे पेक्षा क्वालीटी काम.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बघतो तिथ! बाकी कस्टमाईझ नाही करायचीय. आहे ती मस्तय. गॅब्रीअल अण्णांना प्लसारच नेकेड कस्टमाइझेशनच बजेट विचारलं होतं तेच लाखात नेलं त्यांनी! म्हणुन तसही ऑट्टा लिमीट आहेच ते.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

हे हायच म्हणा पण तुमचाच वरचा डायलॉग चिटकवतो
अहो हौस करायची तर खिशाकडं बघायचं नाय मालकं!
;)

ग्लासवूल हे मटेरियलचे नाव आहे शॉर्ट-बॉटल व गोल्डस्टार या दोन्हीमध्ये ग्लासवूल वापरलेले असते. थोडा अधिक खर्च करायची तयारी आसेल तर वाइल्ड बोअर चान्गला पर्याय आहे

In reply to by अमर विश्वास

आभार अमर भाऊ, वाइल्ड बोर चा परफॉर्मन्स कसा असतो?? वर व्यक्त केलेल्या शंकांच्या बाबतीत तो कसा उतरतो कसोटी वर???

अभ्या लगा

बाबबाबचा अर्थ पोचला!! काय बोलू ह्यावर ठ्ठो =))) =)))) (मोडक्या तोडक्या पंजाबी मध्ये ) हाय हाय वीरे लूट लिता महफिल त्वानु!! (मायमराठीत) बाजार बाराच्या भावात उटीवलांस र मर्दा!! (वऱ्हाडी ठसक्यात) अबे हा निरानाम झांगडबुत्ता हाय

वाइल्ड बोर सायलेन्सरमध्ये ग्लासवूल नसते. हा फ्री-फ्लो प्रकरतला आहे पिकअप थोडासा जास्त मिळतो... पण गाडी आवज भरपुर करते मला स्वतःला हा आवज खूप जास्त (लाउड) वाटतो... जर जुन्या बुलेटसारखा (कास्ट आयर्न इन्जिन) आवाज हवा असेल तर शॉर्ट बॉटलच वापरा... इन्जिनसाठीही उत्तम ... मी अनेक वर्षे हा वापरला आहे..

In reply to by अमर विश्वास

शॉर्ट बॉटल पाहिला, युट्युब वर विडिओ पाहिले अन मुख्य म्हणजे आवाज ऐकला, फिक्स आहे शॉर्ट बॉटलच घ्यायचा. पण त्यातही कन्फ्युजन आहे राव, विथ ग्लासवूल का वीथाऊट ग्लासवूल घ्यावा, कंपनी कुठली? इत्यादी, जमल्यास खात्रीशीर अन चांगल्या शॉर्ट बॉटल ची विक्री करणारी एखादी कंपनी सुचवा, किंवा एखादी लिंक अमेझॉन, ईबे ची. धन्यवाद बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मस्त वाटला. पण थंडरबर्डला बसेल का? सोन्याबापु, रॉयल एन्फिल्डचाच, अपस्वेप्टप्रकारात येतो सायलेंसर, तो बघितलाय का? क्लासिक्ला बसतो. मला हवा होता, पण थंडरबर्डला लागणार नाही अस सांगण्यात आलंय.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मला सायलेन्सरबद्दल फारसे माहिती नाही आणि मी बदलायचा विचारही करत नाहीये.. ..पण अपस्वेप्टचा एक मोठा इश्श्यू म्हणजे टायर खोलायचे असेल तर पहिला सायलेन्सर काढायला लागतो आणि मगच टायरला पाने बसतात. बरोबरै का?

In reply to by मोदक

येवढी डीटेल माहिती नाहि काढली. पण एकुणात डिझाईन बघता, तुमचा मुद्दा व्यवस्थित वाटतोय! पण थंप चांगला येतो त्याचा.

स्वतःची गाडी modify करणे यासारखा आनन्द नाही.. Process is as enjoyable as end result या महान कार्यास माझा थोडा हातभार.. फोटो जरूर पाठ्वा... शॉर्ट बॉटल विथ ग्लासवूल .... ग्लासवूल ज्याला फिटर 'जाळी'म्हणतात . नक्की वापरा ग्लासवूलमुळे High Frequency Sound होतात.. Noise कमी होतो विशेषतः आवाजातला Treble कमी होतो व Base sound मिळतो लॉन्ग बॉटल हा अजुन एक प्रकार आहे.. वरील सर्व तसेच .. थोड्या जास्त प्रमाणात फक्त एकच तोटा. लाम्बी जास्त असल्याने गाडीच्या बाहेर येतो गेली दोन वर्षे बाहेर असल्यामुळे सध्या कुठल्या कंपन्या आहेत ते शोधावे लागेल चौकशी करुन कळवतो

In reply to by अमर विश्वास

"ग्लासवूल ज्याला फिटर 'जाळी'म्हणतात"
फिटर लोक ज्याला जाळी म्हणतात ते baffles . सायलेन्सरच्या लांबीच्या काटकोनात आतमध्ये धातूच्या चकत्या बसवलेल्या असतात त्या. मुख्य काम heat dissipation .

ग्लासवूलमुळे High Frequency Sound होतात.. Noise कमी होतो विशेषतः आवाजातला Treble कमी होतो व Base sound मिळतो >> सर्वांनीच हे लक्षात ठेवावं, 'ट्रेबल' ने इरिटेट होतं, 'बेस' ऐकायला 'गोड ते ठिक' ह्या रेंजमधे येतं.

In reply to by संदीप डांगे

बेस' ऐकायला 'गोड ते ठिक हे बुलेट मालकांसाठी, सामान्य माणसांसाठी नव्हे ढोल ताशे इ वाद्ये असाच "हाय बेस" (कि बास्स) मुळे डोकेदुखी आणि आवाज प्रदूषणा ला कारणीभूत होतात

In reply to by सुबोध खरे

सरजी, ते सामान्य माणसास उद्देशून आहे, 'गोड ते ठीक' ही एक रेंज आहे, त्यापुढे इरिटेट होतं, यामाहा rx100 चे फायरिंग किंवा माझ्या लांसर कारचे फायरिंग 'गोड व आकर्षक' ह्या कौतुकात बसतं, काही बुलेट मालक मोठेपणासाठि, उगाच लक्ष वेधून घेण्यासाठी म्होट्टा आवाज काढून बुलेटची शान घालवतात ते इरिटेटिंग आहेच,

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा मूळ बुलेटचा सायलेन्सर कढून त्याच्या जागी दुसरा लावण्याची काय गरज आहे? कारण कंपनीने कायद्यात बसेल इतकाच आवाज करणारा सायलेन्सर आणि विषारी वायू नष्ट करणारा कॅटॅलीटिक कन्व्हर्टर बसवलेला आहे. तो काढून दुसरा बसवण्याची गरज का भासते स्पष्ट शब्दात "शो ऑफ" साठी. "जमाने को दिखाना है". मग त्यात "हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण" झाले तर बेहत्तर. हा एक संप्रदाय(कल्ट) आहे आणि एकदा तुम्ही त्यात प्रवेश केलात कि सारासार विवेक बुद्धी बाजूला ठेवावी लागते. आणि हे "असंच असतं" किंवा "असं नसेल" तर चालणार नाही. हि स्थिती येते. रात्रीच्या प्रशांत वेळेस ठणाणा करणाऱ्या बुलेटचा आवाज किती त्रासदायी असतो हे सर्वानी पाहिलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्या गाडीला स्वतंत्र कॅरेक्टर देणे हा उद्देश असतो, पण तो मालकाच्या विचाराच्या लेव्हल नुसार बदलतो, कायदा व पर्यावरण ह्याची काळजी घेऊन केलेले बदल माझ्या मते चुकीचे नसावेत, अन्यथा बुलेट चालवणे हेच अयोग्य आहे असं म्हणावं लागेल

'सायलेन्सर' चं काम नक्की असतं तरी काय, हा प्रश्न पडला आहे. एक तर ते (किंवा कुठलेही मॉडिफिकेशन) बेकायदेशीर आहे. दुसरे म्हणजे ते पर्यावरणाला घातकही आहे, कारण इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारे विषारी वायू व इतर घटक तसेच हवेत सोडले जातात. मग लोक तरीही सायलेन्सर का बदलतात? कुठे जातो लोकांचा विवेक आणि का वाटत नाही कायद्याबद्दल आदर!

In reply to by एस

सायलेंसर 'विषारी वायुंना अटकाव करते' हे समजले नाही. जेव्हा येवढ्या कंपन्या राजरोसपणे मॅन्युफॅक्चर करत आहेत तर तिथं बंदी घातली सरकारने तर ह्या विषयी जागरुकता होइल. किंवा नियम तरी स्पेसिफाय करावे. प्रश्न फक्त प्रचंड आवाजाचा वाटतो. ८० डेसीबलची लिमीट असेल तर काय हरकत असावी?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

https://en.wikipedia.org/wiki/Catalytic_converter कॅटॅलीटिक कन्व्हर्टर मुळे विषारी वायूंचे कमी किंवा बिनविषारी पदार्थात रूपांतर होते. यासाठी कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रणे असतात. सध्या फॉक्सवॅगन वर जगभर चालू असलेले खटले याच कारणास्तव आहेत. पण "बिगर" कंपनीचे कॅटॅलीटिक कन्व्हर्टर (असले तर) अशा कोणत्याही नियंत्रणात नसल्याने त्यातून किती विषारी वायू बाहेर पडतात ते माहित नाही आणि त्यांचा "आवाज" चांगला( बुलेट मालकांसाठी, सामान्य माणसांसाठी नव्हे) यावा यासाठी त्यातील मफलर( आवाज कमी करणारे नळकांडे) पण असते किंवा नसते.

माझ्य माहिती प्रमाणे बुलेट्मध्ये कॅटॅलीटिक कन्व्हर्टर नसतो. नविन बुलेटमधे EGR (Exhaust Gas Recirculation) ही सिस्टिम वापरली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॅटॅलीटिक कन्व्हर्टर इन्जिन व सायलेंसर यांना जोडणार्‍या पाईपमध्ये बसवता येतो. त्यमुळे नुसता सायलेन्सर बदलल्यमुळे वायु प्रदुषण वाढते हे चुकिचे आहे. आवाजाचे प्रदूषण : (माझी स्वतःची आवड) : सायलेंसर बदलुन आवजची पातळी (volume) कमी करता येतो व आवजाची प्रत बदलता येते काही़जण अवाजाची पातळी खुप वाढवतात. ते शक्यतो टाळावे.

आर डी हॅण्डल्बार लावण्याबाबत विचार करतोय. कोणी बसवला आहे का? कितीपर्यंत होइल ५०० पासुन २००० इतक्या रेंजमध्ये ओप्शन्स कळले!!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

थंडरबर्डचे हॅंडल आधीचे वर जाऊन पुन्हा रायडरच्या दिशेने थोडे खालच्या दिशेने झुकलेले असल्याने हॅंडलिंगला थोडा त्रास (विशेष असा नाही, पण थोडा) होतो. त्यात तो थोडा अरुंदही आहे. त्यामुळे लॉंग राईड्सना (गेल्या वर्षी डिसेंबरात केलेली १५००किमी आणि ४००-५०० किमीच्या दोनचार) थोडा खांद्यांवर मला थोडा त्रास जाणवला. तसेच त्या हॅंडलचे खालच्या दिशेने झुकलेले बार एंड्स असल्याने सस्पेंडेड वेट वाढले आहे जे की काही ठराविक आरपीएमला व्हायब्रेट होते. म्हणून मी आरडी हॅंडलबार बसवण्याचा निर्णय घेतला. अधिक रुंद असल्याने कदाचित सुरुवातीला थोडे वेगळे वाटेल पण लवकरच सवय होते. व्हायब्रेशन्सचा त्रास गेलाय. शिवाय याला मध्ये आडवा लहानसा बार असल्याने मोबाईल-जीपीएस माऊंटची आणि कॅराबिनर कीचेन अडकवण्याची सोय झालीच. किंमत: क्रोम प्लेटेडवाला अंदाजे ४००-५००/-. फिटिंग-१५०/- (घासाघीस किती करता त्यावर, मला सुरुवातीला ३००/- सांगितले होते) उपलब्धता: नाना पेठ (पेट्रोल पंपाच्या चौकाजवळ बॉंबे मोटर हाऊससमोर एक मोठे दुकान आहे, बहुतेक नाव गुरुनानक असावे). टिप: बुलेट घेऊन मेकॅनिकसमोर जाऊ नये. जंगली कुत्र्यासारखे तुटून पडतात गिर्‍हाईक आल्यावर. गाडी त्यांच्या नजरेपासून लांब पार्क करावी, दुकानातून हॅंडलबार घ्यावा, मग समोर मेकॅनिक बसलेले असतात त्यांच्याशी फिटिंगसाठी बार्गेन करावे. डील ठरले की गाडी त्यांच्यासमोर आणावी. रस्त्यावरच फिटिंगकामे केली जातात. जाताना लहान दोरी आणि एक मोठे कापड घेऊन जाणे, ओरिजिनल हॅंडलबार गुंडाळून, बांधून घरी आणायला.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

हॅंडलबार घेताना त्याला एंड्सना वेट्स लावायला बोल्टची सोय आहे हे पाहून घेणे. ओरिजिनल केबल्सची लांबी पुरेशी होते. मेक शुअर की केबल्स नीट राऊट केल्यात आणि शेवटी बारएंड वेट्स लावलेत.

हॅंडलबार विषयीच्या आधीच्या कॉमेंट्स जरूर वाचा.. त्याशिवाय मला जाणवलेल्या / खटकलेल्या काही गोष्टी व काही टिप्स (इतरांची मते / अनुभव जाणून घ्यायला आवडेल) - आर डी प्रकारचा हॅंडल बार लावल्यावर जास्त वाइब्रेशन्स जाणवतात. विशेषत: ५०० सीसीच्या गाड्यांसाठी. त्यामुळे हॅंडलच्या शेवटी (ग्रीपच्या बाहेरच्या बाजूस) वजन जरूर बसवावे. - हॅंडल बार बसवताना त्याची स्थिती (रिलेटिव पोज़िशन विथ ते सीट) महत्वाची आहे. ज्यामुळे गाडी चालवताना चालकाला योग्य स्थितीत (पोस्चर) बसता येईल. योग्य स्थिती म्हणजे : - हॅंडल पकडल्यावर पाठीचा कणा ताठ राहील .. पुढे वाकावे लागणार नाही - ग्रीप खांद्याच्या रेषेच्या खाली असेल व खांद्यावर अतिरिक्त भार येणार नाही. (लांबच्या प्रवासासाठी अत्यंत महत्वाचे.. - हॅंडल पकडल्यावर हात पुर्ण सरळ रहाणार नाहेत. कोपरात थोडे वाकलेले असतील. त्यामुळे मनगटे व हाताच्या स्नायुंवर कमी भार पडेल. - केबल्सच्या लाम्बीबद्दल याआधीही चर्चा झाली आहे. तरी.. केबल्स स्ट्रेच होणार नाहीत, पुरेशी ढील (स्लॅक) असावा - हॅंडल बारचे क्रोम प्लेटिंग नीट तपासून घ्यावे.. अन्यथा गंजण्याचा धोका असतो. आथवा काळ्या रंगाचा हॅंडल बार घ्यावा... अर्थात गाडीच्या रंगाला योग्य असेल तरच

In reply to by अमर विश्वास

योग्य माहितीसाठी आभार. ह्या अँगलने विचार केला नव्हता. सध्याच्या नॉर्मलमध्ये काही प्रॉब्लेम नाहिये, पण व्हाय्ब्रेशन्स जरा जास्त जाणवतात, म्हणुन आरडीचा घ्यायचा विचार करत होतो. स्टॉक हँण्डलबारमध्येच जरा पाठ वाकल्या जाते कधी कधी. त्यामुळे दोन्ही बसवुन ट्रायल घ्यावी लागेल.

गेले ते दिवस .... राहिल्या त्या आठवणी.... बुलेट वापरून सुद्धा ... प्रो-बुलेट न झालेला ... गोळाबेरीज मत : बुलेट ची स्प्लेंडर झालीये ... फक्त १५०००० ला मिळते इतकाच काय तो फरक !!

In reply to by ज्याक ऑफ ऑल

बुलेटची एक्स्क्लुझिव्हिटी संपलीय ह्यात दुमत नाही. सगळेच बुलेट घेत सुटलेत!

लोंग राईड्स साठी उपयुक्त . विंडशिल्ड , फोटोत नीट दिसत नाहीये ... पण फुल लेंग्थ - साधारण ९०० ला rezone इथून ऑनलाईन मागवलं ...

JOA आणि अनिरुद्धभाउ.. बुलेटही स्वत: साठी वापरावी.. दुसर्‍यनी बघावे म्हणून नाही.. म्हणजे एक्स्क्लुझिव्हिटी हा मुद्दाच राहणार नाही शिवाय तुम्ही बुलेट कधी व कुठे वापरता हे महत्वाचे.. रोज ऑफीसला 5-10 किमी चालवत अससला तर जाउदे पण कधी लॉंग ड्राइव - हाइ वे - हिमालयात घेऊन जा ... बुलेट.. बुलेट होती है.. स्प्लेन्डर .. स्प्लेन्डर होती है.. एक प्रश्न.. आपण विन्डशिल्ड लावल्यानंतर बुलेट घेऊन हे वे गेला आहात का? मला विन्डशिल्ड कॅमफर्टबल वाटले नाही.. हॅंड्लिंगच्या दृष्टीने.. आपला काय अनुभव ?

In reply to by अमर विश्वास

100% मान्य .... पण आजकाल बुलेट या पर सायकल 3000-4000 बनवल्या .... इतक्या विकल्या .... यावर दुर्दैवाने कंपनी भर देतेय. मी बुलेट ची स्वप्न पाहायचो तेव्हा "यु गॉट टू अर्न ईट !!" हा स्टेटस होता त्याचा. पण आता कित्त्येक होतकरू किंवा होतंय तितकं करू टाईप "प्रीन्स्भाऊ" रस्तोरस्ती मोकार झालेत . येथेच क्वालिटीवाईज आणि मास वाईज बुलेट स्प्लेंडर झालीये. माझे जितके मित्र (बुलेटवाले) आहेत , त्यांच्याशी बोलताना ९९% वेळेस ही नाराजी बाहेर येते. ती क्वालिटी बद्दल असते ... सर्विस बद्दल असते , पार्टस बद्दल असते ... ई ई . मग एका महिन्यात चेन स्प्रोकेट खराब होणं असो .. वा लगेच रस्टीन्ग होणं ... असो वा खूप पैसे देऊन पण ट्यून मशीन नसणं. मी २००७ पासून बुलेट वापरतोय. तेवापासून आतापर्यंत बुलेट ची क्वालिटी सेमच आहे असं म्हणण आहे का तुमचं ? उत्तर "नाही" अस असेल तर मग तुम्ही पण माझ्याच मार्गावरून प्रवास चालू केलायत हे खरं ... आणि "हो" असेल तर मग दोघांपैकी कोणीतरी अती आग्रही आहे . जे आहे ते आहे .... बुलेट ईज बिकमिंग A Toy ऑफ Dudes and Duddettes .... फक्त "While talking abt Bullet to Non-Bulleteers" अल्वेज एन ओनली प्रेज बुलेट ... हा "शिष्टाचार" पाळला जातो हे पटो वा ना पटो ... खरं आहे (परत - वैयक्तिक मत) बादवे ... विंडशिल्ड - १००% खरं ... तो नोवेल्टी आयटम आहे. सिटी राईड पुरताच बरा.

In reply to by ज्याक ऑफ ऑल

चेन स्प्रॉकेट , ट्युनींग अन स्पेअर्सची क्वालीटीसुद्धा फार्फार वाईट आहेत. क्लच केबल अ‍ॅड करा ह्या लिस्टीत! सर्व्हिसबाबत तर बोबच. त्यात तो लीकेजचा प्रॉब्लेम. इफ इट डजण्ट लीक देन इटस नॉट एन्फील्डपर्यंत म्हणुन झालंय कैक दशकांपासुन असलेला हा प्रॉब्लेम सुधरत नाहिये. क्वालिटी संपलीय, क्वांटीटी वाढलीयं अन सगळे फाटके सायलेंसर वापरुन सगळीकड ध्वनीप्रदुषण वाढवत बसतात.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

क्वालिटी संपलीय, क्वांटीटी वाढलीयं अन सगळे फाटके सायलेंसर वापरुन सगळीकड ध्वनीप्रदुषण वाढवत बसतात.
क्वालिटी होतीच कधी? आणि तो गडगडाट करणार्या आवाजासाठीच घेतात ना बुलेट?

In reply to by टवाळ कार्टा

क्वालिटी नसती तर इंडियन आर्मी (स्वातंत्र्यानंतर) किंवा ब्रिटिश फ्रेंच आर्मीज (द्वितीय विश्वयुद्धात) बुलेट वर भरोसा ठेवते झाले नसते, मास प्रॉडक्शन तेव्हाही झाले होतेच की, बाकी हल्ली थोडी घसरली आहे क्वालिटी ह्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, ती एक बुलेट प्रेमी म्हणून करायला मी तयार आहे, फक्त जर तू रेडिओवाणी फकस्त बोलणार ऐकणार नाय मोड ऑन करणार असलास तर त्या चर्चेत मजा काय उरणार? उलट मी निर्जीव रेडिओम्होरं बडबड करीत बसलोय म्हणून लोकं मलाच खुळ्यात काढतील, तेव्हा काय ते ठरव अन सांग. बाकी तू सातत्याने जर स्वतःचं वेगळेपण सिद्ध करायलाच जर बुलेट किंवा बुलेट धागा धरत असलास तर तुझा मी शतशः आभारी आहे टक्या, कारण एट द एंड ऑफ द डे यु प्रुव्हड माय पॉईंट मेटीक्युलसली :) ;)

In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही नव्याच बुलेटा पाहिल्या अस्तील भंगार स्पेअर्स क्वालिटीच्या तर इलाज नाही. आपल्या वयाच्या बुलेट गाड्या जेव्हा धडाल उडवत नेतात आजोबा अन काका लोक्स तेव्हा तोंडात बोट जातात भौ! क्वालीटी चिल्लर पार्टचीच खराब होतेय आसं म्हणतुय आम्ही. कंफर्ट अन एफिशियेन्सी घ्याल तर सेगमेंटच्या सगळ्या गाड्यांना तोंडात मारेन अशी गुणी आहे बुलेट. धक्का नाय लागत अन वाटेल तेवढे खेचुन घेते बर्का गाडी अन भारतीय असल्याने भारतीयांचा कितना देती है प्रश्न पण सोल्व्ह करते. सदोदीत ४० - ४५ चा माय्लेज भेटतोय देवा. और क्या चैये?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

आमच्या इकडे लोक त्याला "ष्ट्रोक घेत चालणं" म्हणतात ...विशेषत: गवळी .. धनाढ्य शेतकरी ... पैलवान असे लोक. (प्रिन्स क्याटेगीरी नाय) १९८० वगैरे सालच्या बुलेट म्हणूनच आजपण २-२ ३-३ लाखाला घेतात न लोक ... त्या "बुलेटी" अन त्या पर्स्नालीटी ... दोन्ही गेल्या ... आता गेला बाजार .... पार्श्वभागा ऐवजी मानेवर शेपट्या वाढवणारे योयो अन बादशा गाड्या चालवतात ... त्यांच्या साठी बुलेट ही बुलेट नसून "फक्त स्टाईल" आहे ...आणि म्हणून बुलेट नावाची स्प्लेंडर ... बाकी कम्फर्ट म्हणाल तर थंडरबर्ड त्यातल्या त्यात प्रुवन मॉडेल ठरतंय आरई चं .... बाकी (सध्याचे) सगळे आनंद आहे ... घारा असला की रणधीर .. बारका असला की शशी अन नाचरा असला की शम्मी ... मुळात सगळे कपूर कुलोत्पन्नच ... या सारखं .... निळी - लायटनिंग ब्लू मातकट - डेझर्ट स्टार्म चकचकीत - क्लासिक क्रोम ... हे करकरून गाड्या "खपवायची" वेळ आलीये आता कंपनी वर ... आधी कसं ... लीन बर्न ... माशिस्मो ... एलेक्त्रा ... सिटी बाईक .. टोरस ... एक झाका एक काढा ... सगळी लीजंड्स .. कास्ट आयरन इंजिन ... भल्या भल्याची बोबडी वळेल असलं वजन ... !! असो ... माझा विरोध बुलेटच्या ग्रेटनेस ला नाहीच ... फक्त आता ती लेजंड वगैरे नक्कीच नाही राहिली असं म्हणणं मात्र नक्की आहे . बुलेट वाला पण टीकाकार - ज्याक !!

In reply to by ज्याक ऑफ ऑल

बऱ्याच अंशी सहमत आहे!. माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, आजकाल बुलेटचे स्पेयर पारच कंडम अन आधी कास्ट आयर्न लैच भारी असे असेलही, पण कास्ट आयर्नचे सुद्धा असंख्य प्रॉब्लेम असत, ते एक असो. मूळ मुद्दा माझा वेगळा आहे, तो म्हणजे आळस!!!. आजकाल पोरे होय पोरेच तुम्ही म्हणता तशी स्टाईल करता बुलेट घेतात पण बुलेटला जीव लावावा लागतो हे विसरतात, तिला निगुतीने पुसावे, आठवड्यात एकदा इंजिन बफिंग करावे, किमान सकाळी पहिली कीक मारताना नीट(च) गाडी पुसून मग कीक मारावी इतकेही होत नाही, परिणामी भाग खराब होणारच, इतर प्लॅस्टिक वापरणाऱ्या गाड्यांमध्ये रस्टिंगचा प्रश्नच नसतो! बुलेटचे फक्त घी पाहिले, निगुतीचा बडगा नाही असे केले की ऑल मेटल गाडी गंजणारच. असो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

निगुतीन कराव लागतयच बापु :) त्याशिवाय मजा नाय. ३ महिन्यात वाजायल लागंल गाडी :) :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

कास्ट आयर्न इंजिन सीझ होणे हा भयानक अनुभव असतो . मेंटनन्स जस्त असतो. व्हायब्रेशन जास्त होत्या. बुलेटने इंजिनमधे चांगले बदल केले अहेत . क्वालीटी कंट्रोल वर भर दिला तर अजून चांगले वाटेल. बाकी बटण स्टार्ट आल्यापासून कोणीही पोरटा , कार्टा बुलेटबद्दल बोलायला लागला आहे .

क्वालिटी बाबत आपल्या विधनांशी पूर्णपणे सहमत... बुलेटची क्वालिटी ... हे पुरतं काळापासून आपणासर्वांना न सुटलेले एक कोडे आहे.. मी स्वत: काही काळ एका ऑटोमोबाइल कंपनीत टूलरूम इंजिनेयर म्हणून काम केले आहे.. त्यमुळे या गोष्टीचे आश्चर्य वाटते की एवडी मोठी कंपनी हे साधे प्रॉब्लम्स का सोडवू शकत नाही ? इतक्या वर्षात एक ऑल अल्यूमिनियम ट्विन स्पार्क एंजिन सोडले तर कुठलिही मोठी सुधारणा नाही... दोन वर्षापूर्वी माझ्या भावाने बजाज अवेंजर घेतली.. माझ्या बुलेटच्या आग्रहाला नाजुमनता.. त्या गाडीवर लॉंगड्राइव (अंदाजे 1500 KM) केल्यावर सोफिस्टिकेशन म्हणजे काय याची जणीव झाली.. तेंव्हा सहज विचार अल्ला होता.. या गाडीला बुलेट चे एंजिन बसवता येईल का? अर्थात असे करणे अवघड आहे.. पण आजही बुललेटचे गोडवे गाताना कुठेतरी मनात हे क्वालिटी इश्यूस खटकातात हे नक्की... बुलेटशी एकनिष्ठ.... अ वि