Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कैलासवासी सोन्याबापु on गुरुवार, 10/02/2014 - 18:26
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात. तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन) १. मी क्लासिक ३५० का घेतली ?? अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते) ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च २. क्लासिक ३५० चे फ़ायदे ?? अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो) क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते. ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते) ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही ३. क्लासिक ३५० चे तोटे ?? १. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे. २. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते ३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे) ४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स ५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही ६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत. मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
  • Log in or register to post comments
  • 148738 views

प्रतिक्रिया

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 07/30/2016 - 00:51

In reply to आपण घेतली की पहिले वर्दे by संदीप डांगे

Permalink

मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड

मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड करेल डांगे साहेब! अर्थाचे हा फक्त एक सल्ला आहे देवा, तुम्ही अभ्या वगैरे आर्टिस्ट मंडळी आहात, तुम्हाला आस्थेटिक सेन्स,कलर डेप्थ वगैरे जास्त कळते, पण एक रॉयल एन्फिल्ड लवर म्हणून सांगतो, वर्दे गाडीचे "एस्सेन्स" बदलून टाकतात बुआ, म्हणजे रस्टीक ओल्ड स्कुल लुक अन फील जातो, उरतो तो एकदम लास वेगास टाईप भगभगाट, एकदम ग्लॉस असलेला ग्लास फिनिश पण साला त्यात मजा नाय वाटत, एन्फिल्ड म्हणजे कशी? कमीत कमी आस्थेटिक कामे, त्यातही पेंटजॉब रगेड हवा, मॅट ब्लॅक, वर्ल्ड वॉर 2 जर्मन लुक, किंवा मॅट ग्रीन (बॉटल ग्रीन मॅट फिनिश) हे आमच्या हृदयाचा ठोका चुकवतात, त्यात समोरचे लेग गार्ड मस्त मशीन रोल्ड दोर गुंडाळले (एपॉक्सी अधेसीव्ह मध्ये बुडवून लेगगार्ड वर मशीन ने दोर लपेटलेला असतो, इंडिकेटर कप्स ब्लॅक (गाडी ब्लॅक असल्यास) हेड लाईट अन टेल लॅम्प अन इंडिकेटर वर ब्लॅक मॅट फिनिश व्हर्टिकल जाळ्या! बास्सस, अन हो उर्वरित क्रोम बफिंग करकरून चककणारे, न सायलेन्सर बदलायचे लफडे (असलीच तर हौस, बॉटल नेक ग्लासवूल उत्तम वाटतो) न और कूछ! राजपुताना वाले हे एस्सेन्स जपतात, अर्थात कस्टमरला हवं तसं ते पण मोडीफाय करून देतातच म्हणा
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 07/30/2016 - 03:11

In reply to मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

वा राव स्वप्नातील बुलेट उभी

वा राव स्वप्नातील बुलेट उभी केलीत...
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 07/30/2016 - 11:16

In reply to मी राजपुताना कस्टम्स रेकमेंड by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापू परफेक्त.

बापू परफेक्त. वरदेची ला डेझर्ट लुकची मज्जा नाही. नेकेड बुलेट, मॅट कलर आणि क्रोम अथवा मॅट फिनिश. बस्स. इतना काफी है. त्यातल्या त्यात सिंगल सीट डिएस असली की बस्स.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 07/30/2016 - 14:32

In reply to बापू परफेक्त. by अभ्या..

Permalink

आमच्या मागच्या सीट वर

आमच्या मागच्या सीट वर दावेदारीण आहे तुमची वहिनी, सिंगल सीट जमणार नाय देवा आम्ही गुपचिप 2 सीटाT ठेवतो
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Sat, 07/30/2016 - 09:56

In reply to आपण घेतली की पहिले वर्दे by संदीप डांगे

Permalink

वर्दे पेक्षा पुण्यात माझा एक

वर्दे पेक्षा पुण्यात माझा एक मित्र आहे, कॉनन फर्नांडिस म्हणून भारी बाईक्स मॉडिफाइड करतो हा माणूस आहे. त्याच 'गॅब्रिएल मोटरसायकल्स' म्हणून वर्कशॉप आहे नांदेड सिटी जवळ. वर्दे पेक्षा निश्चितच स्वस्तात मॉडिफाइड करतो तो आणि स्वतः बाईक चा चाहता असल्याने जीव ओततो कामात.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 07/30/2016 - 10:36

In reply to वर्दे पेक्षा पुण्यात माझा एक by महासंग्राम

Permalink

गॅब्रिएल मोटरसायकल्स'

गॅब्रिएल मोटरसायकल्स एक तर अफाट महाग आहे. दुसरा असा त्याचे बरेच पार्टस् कस्टम मेड असल्याने जर लॉंग टूरवर काही प्रॉब्लेम आला तर ते दुरुस्त होणार किंवा रिप्लेस होत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Sat, 07/30/2016 - 12:31

In reply to गॅब्रिएल मोटरसायकल्स' by कपिलमुनी

Permalink

पण,वर्दे पेक्षा नक्कीच कमी

पण,वर्दे पेक्षा नक्कीच कमी महाग मुनिवर्य.
पार्टस् कस्टम मेड असल्याने जर लॉंग टूरवर काही प्रॉब्लेम आला तर ते दुरुस्त होणार किंवा रिप्लेस होत नाहीत.
तुमचे म्हणणे खरे असले तरी माझ्या ऐकण्यात आता पर्यंत कोणालाही असा प्रॉब्लेम आला नाही
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Sat, 07/30/2016 - 12:33

In reply to गॅब्रिएल मोटरसायकल्स' by कपिलमुनी

Permalink

आणि शेवटी बुलेट आहे चांगलं

आणि शेवटी बुलेट आहे चांगलं काम पाहिजे असले तेवढे दाम पण मोजावे लागतील हाकानाका
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 07/30/2016 - 06:03

Permalink

४५०

४५०
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 07/30/2016 - 10:33

Permalink

विषयच कट

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदराव on Sat, 07/30/2016 - 11:13

In reply to विषयच कट by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

आयो बाब्बौ!

आयो बाब्बौ!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 07/30/2016 - 14:28

In reply to विषयच कट by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

परफेक्ट कॅफे रेसर.

परफेक्ट कॅफे रेसर. अ‍ॅसॉल्ट आहे ही. ३५० सीसी.कॉमवरच पाह्यली. एक ३५० घेऊन आपण करु शकू अशी. बेस्ट ड्रीम प्रोजेक्ट. नायतर शेवटी काँटीनेंटल जीटी आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 07/30/2016 - 15:05

In reply to परफेक्ट कॅफे रेसर. by अभ्या..

Permalink

कॅफे रेसरच हवी असेल तर ओरिजनल

कॅफे रेसरच हवी असेल तर ओरिजनल कॅफे रेसरच घे...जास्त पॉवर आहे इंजिनात
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 07/30/2016 - 15:26

In reply to कॅफे रेसरच हवी असेल तर ओरिजनल by टवाळ कार्टा

Permalink

असा लुक याया पाह्यजे बघ

असा लुक याया पाह्यजे बघ Image removed. निदान असा तरी Image removed. गेला बाजार हे बग. Image removed. कसंय? हाय का भारी काम? करायचीच बघ. जरा पैशे आले की देख तमाशा ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 07/30/2016 - 15:29

In reply to असा लुक याया पाह्यजे बघ by अभ्या..

Permalink

अर्र रेसर गंडल्या. थांब.

अर्र रेसर गंडल्या. थांब. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 07/30/2016 - 20:41

In reply to अर्र रेसर गंडल्या. थांब. by अभ्या..

Permalink

सगळं चांगलंय पण पाण्यातून

सगळं चांगलंय पण पाण्यातून गेल्यावर मागे अंगावर पाणी/चिखल उडेल....
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 07/30/2016 - 15:49

In reply to परफेक्ट कॅफे रेसर. by अभ्या..

Permalink

अभ्या

ही वरची म्हणजे कॅफे रेसर अन बॉबरची क्रॉस ओव्हर आहे रे! बेस्ट ऑफ बोथ
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 08/14/2016 - 15:29

Permalink

आरई जुना चेस्टनट कलर परत

आरई जुना चेस्टनट कलर परत आणतेय. युट्युबवर सुरु आहेत डॉक्यु टाईप झैराती. शिवाय जुन्या हँड पेंटेड गोल्डन लाईन्सच्या आर्टिस्टची पण कलाकारी शो करतेय. नवीन सिल्व्हर क्लासिक वर कॉपर लाइनिंग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Mon, 08/29/2016 - 12:07

In reply to आरई जुना चेस्टनट कलर परत by अभ्या..

Permalink

कालस हिमालयन

चि झैरात पाहिली. मस्त दिसतेय. पण हाईट खुप जास्त आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 08/30/2016 - 06:10

In reply to कालस हिमालयन by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

जवळपास पल्सर इतकीच आहे की

जवळपास पल्सर इतकीच आहे की
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 08/30/2016 - 08:12

In reply to जवळपास पल्सर इतकीच आहे की by टवाळ कार्टा

Permalink

सुरुवातीचे मॉडेल

सुरुवातीचे मॉडेल बघितले होते, तेव्हा जास्त वाटली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Mon, 08/29/2016 - 11:17

Permalink

रॉयल एन्फिल्ड रायडर मॅनिया

रॉयल एन्फिल्ड रायडर मॅनिया 2016 च्या तारखा आलेल्या आहेत. 18 ते 20 नोव्हेंबर. कुणी मिपाकर इच्छुक आहेत काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 08/29/2016 - 13:14

Permalink

एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट

एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट दुसर्‍या इंडिकेटरपेक्षा बराच वाढला आहे. घरी काही करण्यासारखे आहे की मेकॅनिककडे जावे लागेल..?
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 08/29/2016 - 14:08

In reply to एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट by मोदक

Permalink

वायरिंग चेक करा, रिपीटर रिले

वायरिंग चेक करा, रिपीटर रिले का कायसे असते एक डबी त्यात पाणी गेले असावे, ब्लोवर मारा ठीक होईल न झाल्यास mechanic!
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 08/29/2016 - 14:09

In reply to वायरिंग चेक करा, रिपीटर रिले by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

ओके.. धन्यवाद बापू..!!

ओके.. धन्यवाद बापू..!!
  • Log in or register to post comments

Submitted by भटकंती अनलिमिटेड on Wed, 08/31/2016 - 16:38

In reply to एका इंडीकेटरचा ब्लिंक रेट by मोदक

Permalink

एका दिशेच्या दोन इंडिकेटरपैकी

एका दिशेच्या दोन इंडिकेटरपैकी (पुढला किंवा मागला) एक (किंवा त्याचा फ्युज) गेला असावा, म्हणून जो शिल्लक आहे तो डबल स्पीडने ब्लिंक करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 09/12/2016 - 15:28

In reply to एका दिशेच्या दोन इंडिकेटरपैकी by भटकंती अनलिमिटेड

Permalink

हाच्च प्रॉब्लेम आहे. मागचा

हाच्च प्रॉब्लेम आहे. मागचा इंडिकेटर बंद पडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पी. के. on Mon, 09/12/2016 - 14:55

Permalink

जाहिरात

#brotherhood day#avenger FLG टॅग लाइन विडिओ मध्ये बजाज अव्हेंजरला रॉयल एन्फ़िल्डचा भाऊ दाखवायचा प्रयत्न केलाय ज्याची चेहरा पुस्तक वर जॅम खिल्ली उडवली जातेय. या दोन गाड्यात काय साम्य आहे का? बजाज अशी जाहिरात करू शकतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 09/12/2016 - 15:28

In reply to जाहिरात by पी. के.

Permalink

या दोन गाड्यात काय साम्य आहे

या दोन गाड्यात काय साम्य आहे का?
both are highway tourers
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 09/12/2016 - 15:38

In reply to या दोन गाड्यात काय साम्य आहे by टवाळ कार्टा

Permalink

अच्च कचं टक्कू

दोन्ही गाड्या कित्ती वाईट्ट आहेत ते सांग ना
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 09/12/2016 - 15:51

In reply to अच्च कचं टक्कू by कपिलमुनी

Permalink

जे काही म्हणायचे आहे ते

जे काही म्हणायचे आहे ते सग्गळे वरच्या वाक्यात लिहिलेले आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Mon, 09/12/2016 - 17:26

In reply to जाहिरात by पी. के.

Permalink

मस्तय ती अ‍ॅड!

मी पण खुप हसुन घेतलं. किमानपक्षी थंडरबर्ड तरी घ्यायची होती. क्लासिकसे कंपॅरिझन म्हणजे हाईट्ट्ट्ट!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Mon, 09/12/2016 - 16:42

Permalink

या दोन गाड्यात काय साम्य आहे

बजाज अव्हेंजर आणि रॉयल एन्फ़िल्ड या दोन्ही गाड्या क्रुझर बाईक आहेत.. एवढेच साम्य.. फरक खुप आहे... पण जर यातिल कुठलीच गाडी वापरली नसेल तर अव्हेंजर चान्गली आहे... एकदा रॉयल एन्फ़िल्ड वापरली तर मग कुठली गाडी हा प्रश्नच उरत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by सत्याचे प्रयोग on Mon, 09/12/2016 - 22:15

Permalink

घेतली ब्वा अखेर

Image removed.घेतली ब्वा अखेर हौस फिटली खिसा फाटला
  • Log in or register to post comments

Submitted by जिन्क्स on Tue, 09/13/2016 - 00:37

In reply to घेतली ब्वा अखेर by सत्याचे प्रयोग

Permalink

थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म

सध्या थंडर्बर्ड ५०० आणि डेसर्ट-स्टॉर्म मधे जाम कन्फ्युस आहे. वापर आणि ergonomics पाहता थंडर्बर्ड ५०० सगळ्यात उत्तम आहे. पण डेसर्ट-स्टॉर्मच्या लुक्स वर जाम फिदा झालोय.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 09/13/2016 - 00:51

In reply to थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म by जिन्क्स

Permalink

पण डेसर्ट-स्टॉर्मच्या लुक्स

पण डेसर्ट-स्टॉर्मच्या लुक्स वर जाम फिदा झालोय
जबरी आहे घ्याच.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 09/13/2016 - 01:22

In reply to थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म by जिन्क्स

Permalink

Desert Storm

डेझर्ट स्टॉर्म घ्या!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 09/13/2016 - 10:33

In reply to थंडर्बर्ड ५०० की डेसर्ट-स्टॉर्म by जिन्क्स

Permalink

दोन्ही गाङ्या उत्तम!

भाड्यानं घ्या चांगलं १०० १०० पळवुन बघा. अन ठरवा कोणती सुट होते ते? मला स्वतःला डेझर्टस्टॉर्म प्रचंड आवडायची. पण शेवटी थंडरबर्ड घेतली. ५०० सीसी विषेश आकर्षण? की निव्वळ दामटायची आहे? कारण ३५० इज मोअर दॅन इनफ.
  • Log in or register to post comments

Submitted by जिन्क्स on Tue, 09/13/2016 - 10:58

In reply to दोन्ही गाङ्या उत्तम! by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

पुर्वी थंडर्बर्ड ३५० वापरुन

पुर्वी थंडर्बर्ड ३५० वापरुन पाहिली आहे २००९ च मॉडेल. एकदा ५०० सी सी चालवली की रानटी टॉर्कचं व्यसन लागत.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 09/13/2016 - 10:30

In reply to घेतली ब्वा अखेर by सत्याचे प्रयोग

Permalink

अभिनंदन!

अहो हौस करायची तर खिशाकडं बघायचं नाय मालकं! हॅप्पी रायडींग!
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 09/13/2016 - 08:27

Permalink

सायलेन्सर कुठला बेस्ट असेल हो

सायलेन्सर कुठला बेस्ट असेल हो मंडळी???? माझ्या गरजा १. अर्थातच दणदणीत आवाज २. कमी किंमत (अध्याहृतच आहे ते) ३. शक्यतो ऑफ रोडिंगला त्रास देणार नाही असे डिझाईन माझ्या माहिती असलेले काही सायलेन्सर १. पंजाब (गुरप्रीत एग्जोस्ट) २. इंदौर ३. मेगाफोन ४. ग्लासवूल ह्यांच्यातील कुठला बेस्ट आहे ते सांगा. ह्या शिवाय काही ऑप्शन असली तर ती ही सांगा. आगाऊ आभार अवांतर:- गाडीची वॉरंटी संपली आहे तस्मात आता राणी मनाला येईल तशी सजवणार, वर्ल्ड वॉर २ थिम मॅट ब्लॅक रंग द्यायचं चालू आहे डोक्यात, त्यासोबत बार हँडल (स्लान्टेड बॉबर इअर्स टाईप) अन सायलेन्सर
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 09/13/2016 - 09:10

In reply to सायलेन्सर कुठला बेस्ट असेल हो by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

राणीच्या मेकअपचे स्टेजवाईज

राणीच्या मेकअपचे स्टेजवाईज फोटो काढून ठेवा आणि नंतर आठवणीने एक धागा काढा.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 09/13/2016 - 09:28

In reply to राणीच्या मेकअपचे स्टेजवाईज by मोदक

Permalink

Glasswool

Sorry for English! Considering Performance and long ride noise , glass wool is very good ! I have tried dholki, indori but glass wool is perfect
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 09/13/2016 - 17:16

In reply to Glasswool by कपिलमुनी

Permalink

कमु, मोदक शेठ

कमु, मोदक शेठ ग्लासवूल ने मायलेज वर काय फरक पडतो ??? किती उतरते, किती स्टेबल राहते, काही ठिकाणी वाचले होते की ग्लासवूल (का इंदोरी, नीट आठवत नाही) मुळे इंजिन ब्लॉकला चरे पडतात (scratches) , ते खरे आहे का? नाहीतर आवाजाचा शौक हजारोत पडायचा !! =)) =)) माझं मन बसलंय पंजाब वर, ८००₹ ला मिळतोय, घ्यावा काय? ग्लासवूल ची रेंज काय आहे, मला गाडीचा आवाज उगा हर्ले टाईप करायचा नाहीये, तर जितका ओल्ड स्कुल बुलेट टाईप खणखणीत असेल तितका करायचा आहे, त्या हिशोबाने सल्ला द्या ही विनंती, भटकंती अनलिमिटेड वाले भाऊ असतील तर त्यांनीही सल्ला द्यावा आपल्याच ब्रदरहूडचा आभारी बापु
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 09/14/2016 - 14:42

In reply to कमु, मोदक शेठ by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

ग्लासवुलबद्दल मनरावचा एक

ग्लासवुलबद्दल मनरावचा एक प्रतिसाद आहे, शोधून देतो. ..बाकी सायलेन्सर बदलण्याचा मानस नसल्याने याबाबत माहिती काढलेली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भटकंती अनलिमिटेड on Wed, 09/21/2016 - 14:37

In reply to कमु, मोदक शेठ by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

गोल्डस्टार ग्लासवूल

जरा उशीर झाला त्यामुळे क्षमस्व. चीता घेऊन हंपीत शिकारी करत होतो. आलो काल. सुंदर baasy आवाज आणि कमीत कमी परफॉर्मन्सवर परिणाम यासाठी गोल्डस्टार ग्लासवूल मी सुचवीन. साधारण २२००-२५०० किंमत आहे. कुठल्या तरी मेकॅनिककडे जिथे सगळे ऑप्शन उपलब्ध असतील तिथे जाऊन लावून बघा. युट्यूबवर आवाजाजेही व्हिडिओ आहेतच.
  • Log in or register to post comments

Submitted by पी. के. on Wed, 09/21/2016 - 15:01

In reply to गोल्डस्टार ग्लासवूल by भटकंती अनलिमिटेड

Permalink

वा,

वा, हंपी भटकंती धागा येऊदे लवकर. वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by भटकंती अनलिमिटेड on गुरुवार, 09/22/2016 - 09:21

In reply to वा, by पी. के.

Permalink

हंपी

हे अवांतर आहे खरं तर. हंपीचा धागा मी लिहू शकेन की नाही माहित नाही, कारण एकसंध लिहिण्याची आमची हातोटी नाही. पण जसे जमेल तसे फोटो पेजवर टाकतोय, सोबत जसे मला जोडता येतील तसे शब्दही जोडतोय. फोटोदेखील जसे पाहिले त्या क्रमाने जमत नाहीत प्रोसेस करायला. जेव्हा जी फ्रेम आवडेल ती घ्यायची, संस्करण करायचे आणि अपलोड करायचा असा अजागळ कारभार आहे माझा.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 09/23/2016 - 16:36

In reply to हंपी by भटकंती अनलिमिटेड

Permalink

एक काम करा मग... एक साधा धागा

एक काम करा मग... एक साधा धागा टाका. कुठून कुठे गेलात आणि किती वेळ लागला वगैरे वगैरे... नंतर प्रतिसादात सवडीने एक एक फोटो अपलोड करा...
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 09/30/2016 - 17:07

In reply to हंपी by भटकंती अनलिमिटेड

Permalink

कारण एकसंध लिहिण्याची आमची

कारण एकसंध लिहिण्याची आमची हातोटी नाही.
इ ना चोलबे... चेपू वर पाहिलंय लिखाण तुमचं देवा
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • पान 10
  • पान 11
  • पान 12
  • पान 13
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com