Skip to main content

वाट्टेल ते टाईमपास व्हॉटस अ‍ॅप समुह

लेखक निनाद
Published on गुरुवार, 15/09/2016
निव्वळ मौजमजा, राजकारण, टाइमपास, कथा, कविता गझल, विनोद, बातम्या, फॉरवर्ड्स ,गप्पा वगैरे करण्यासाठी एक वाट्टेल ते व्हॉटस अ‍ॅप समुह बनवला आहे. आपल्याला यात रस असेल तर या समुहात येण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यक्तिगत निरोपातून पाठवावेत. आणि 'वाट्टेल ते साठी' असे त्यात नमुद करावे! म्हणजे सामील करुन घेणे सोपे होईल. . . . .
(सूचना: ज्याना अशा ग्रुप्समधे सामील व्हायचे असेल त्यानी आपआपले किंवा नातेवाईकांचे नंबर्स कृपया इथे शेअर करू नयेत. अन्य मार्गांनी धागाकर्त्याशी संपर्क साधावा. मिपा हा सार्वजनिक ओपन फोरम आहे. तुमच्या नंबर्सचा कुणी गैरवापर केल्यास त्याला मिपा किंवा मिपा प्रशासन कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 8172
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

अर काय हितलं पब्लिक राजरोस तिकडं न्यायला काय? नवीन ग्रुप काढायला विषय सुचला नाही तर वरची मेनु लिस्ट हाय बघा, त्यानुसार ग्रुप करा. (अन हळद खेळा असे पण वाचा)

तसे नव्हे! सायकल आणि ज्योतिष दोन्ही समुहांवर शिस्त कसोशीने पाळली जाते. आणि काही वेळा इतर काहीतरी पाठवायचे तर असते पण पाठवता येत नाही. इअतर गप्पा मारता येत नाहीत. तर ती सोय असावी म्हणून हे केले आहे. मग सोय त्यांनाच का? सर्वानाच यात येता यावे म्हणून धागाच काढला. तेव्हा तसा गैरसमज नसावा!

सदस्यहो, प्रतिसादासाठी धन्यवाद! पण कोणत्या समूहासाठी मोबाईल देत आहात हे कळवावे. कारण आता 4 समूह झाले आहेत. ज्योतिष सायकल, प्राचीन भारतीय अध्यात्म आणि विज्ञान आणि वाट्टेल ते. समूहाचे नाव कळवले नाही तर कसे समजणार कुठे घ्यायचे ते? तेव्हा नाव कळवा! धन्यवाद!!

In reply to by निनाद

तुम्हाला एवढ्या सगळ्या ग्रुपना अ‍ॅडमिन करण्याइतका उत्साह आणि वेळ असेल तर एखादी नवीन साईटच का काढत नाहीत तुम्ही?

In reply to by अभ्या..

ज्योतिष आणि भारतीय विज्ञान हे समूह खूप वर्ष वाट पाहून अत्यंत नाईलाजाने तयार केले गेले आहेत. अन्यथा येथे जर तसे वातावरण असते तर ग्रुप बनवण्याची यातायात केलीच नसती.

In reply to by निनाद

तुमचा बिल्ला नंबर, मिपावय वगैरे काही पाहायची गरज वाटली नाही. इथे तसे वातावरण नाही पण इंटरेस्टेड पब्लिक आहे असे म्हणणे संस्थळावर टिका वाटते. शिवाय तसे वातावरण निर्माण व्हावे म्हनून तुम्ही काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत इतक्या वर्षात. शिवाय वर स्वतःच्या व्हाटसग्रुपची जाहीरात इथेच करताय हे खटकले. एखाद्या लग्नसमारंभात वधुवर सूचक संस्थेचे पॅम्प्लेट वाटणे मला गैर वाटत नाही कारण मी पेशानेही जाहीरातदारच आहे. फक्त मिपाचे धोरण कुठल्याही स्वरुपाची(आर्थिक आयाम असो की नसो) जाहिरात न करणे हे असावे असे वाटले म्हणून बोललो. तस्मात राग नसावा. ह्या उलट अशा जाहीराती सुरु झाल्या तर मला आनंदच आहे. मिपाचा रेडी वाचकांचा इंटरेस्टवाईज डेटाबेस मिळत असेल आवाहन करुन तर बरेच आहे. अशातून मिपाला काही स्वरुपात फायदा होत असेल तर सोन्याहून पिवळे. आपला काही उद्देश आहे का तसा?

In reply to by अभ्या..

ग्रुपवर झालेले विषय येथे यावेत अशी मनीषा आहेच. त्यावर डिस्कशन्स चालली आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ग्रुप माझा स्वतःचा वगैरे असे काही नाही. अगदी प्रामाणिक पणे सांगायचे तर बहुतेक सगळे लोक स्वनियमीत आहेत. माझ्या शिवाय अजूनही सदस्य अडमिन म्हणून कार्य पाहतात. या बाकी ज्योतिष किंवा अध्यात्म आणि प्राचीन विज्ञान हे विषय खरोखर पंचिंग बॅग होतात. त्यामुळे तो खरंच नाईलाज आहे.तुमचे आक्षेप समजताहेत. आणि याशिवायही जर हे योग्य वाटत नसेल तर संपादकांनी हा धागा किंवा या संदर्भातले धागे उडवून टाकले तरी मला प्रत्यवाय नाही.

तुम्ही मोबाईल क्रमांक दिल्याप्रमाणे येतील तसे सर्व सदस्य घेतले आहेत. कुणी नजरचुकीने राहिले असल्यास कृपया कळवा... तसेच योग्य त्या समुहात घेतले आहे पण काही गडबड झाली असल्यास ते ही कळवावे. बाकी तुम्ही लोक्स खरोखर वाट्टेल ते टाईमपास धमाल आहात!! :) धन्यवाद!

In reply to by प्रशांत हेबारे

ओ इथे असे नंबर टाकत जाउ नका, अरे काय चाललंय काय राव? जरा प्रायवसीची काळजी करा की...

संपादकांना विनंती,कृपया हे मोबाईल क्रमांक येथून काढून टाकावेत.

In reply to by निनाद

संपादकांना विनंती ते लईच बिझी हायेत बघा, व्यनी केला तरी उत्तर ध्यायचे कष्ट होत नाहीत त्यांच्याने. बाकी वरती गुंडोपंतांचा उल्लेख वाचुन अगदी भडभडुन आले ! फार कमी वयात त्यांनी जालिय समाधी घेतली ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)

ओपनली नंबर का लिहिताय? त्यांना संदेश करा वेगळा.

धन्यवाद लीमाउजेट! कृपया आपले मोबाईल क्रमांक व्यक्तिगत निरोपातूनच द्यावेत ही विनंती.

वाट्टेल ते टाईमपास व्हॉटस अ‍ॅप समुह चालू आहे पण मी तेथे टोळी मुकादम नाही याची नोंद करतो.

सद्य मुकादमांनी मिपा सदस्यांसाठी दयाळूपणे जॉईन होण्याची लिन्क उपलब्ध करून दिली आहे... वाट्टेल ते टाईमपास व्हॉटस अ‍ॅप समुह ़Join using link https://chat.whatsapp.com/3i9zJEEtUQt7O97mq2uYRu