Skip to main content

रात्रवेड

रात्रवेड

लेखक पथिक
Published on मंगळवार, 20/09/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
घे तुझ्या पाकळ्यांत मिटून रात्री मला दे तुझ्या चांदण्यात मिसळून रात्री मला गूढ तुझ्या प्रांती विहरतो बैरागी वारा दे त्याच्या पंखावर बसवून रात्री मला विराट तुझ्या मौनाचा अथांगला डोह या अथांग डोहात दे बुडवून रात्री मला तुझ्या काळ्या मातीतून उगवतो उद्याचा सूर्य उद्या उगविण्यासाठी घे रुजवून रात्री मला
लेखनविषय:

याद्या 1537
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by जव्हेरगंज

+१

वाह