रात्रवेड
लेखनविषय:
घे तुझ्या पाकळ्यांत मिटून रात्री मला
दे तुझ्या चांदण्यात मिसळून रात्री मला
गूढ तुझ्या प्रांती विहरतो बैरागी वारा
दे त्याच्या पंखावर बसवून रात्री मला
विराट तुझ्या मौनाचा अथांगला डोह
या अथांग डोहात दे बुडवून रात्री मला
तुझ्या काळ्या मातीतून उगवतो उद्याचा सूर्य
उद्या उगविण्यासाठी घे रुजवून रात्री मला
वाचने
1537
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मस्त!
मस्त!!!!
जबर!!!
In reply to जबर!!! by जव्हेरगंज
+१
वाह
.....झाडात पुन्हा उगवाया.....
सर्वांना धन्यवाद!
मस्त