मनाचा एकांत - cursor च्या सुईने
काव्यरस
cursor च्या सुईने
inbox मधील पत्रे
क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी
हव्या त्या पत्राशी आल्यावर,
अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत,
blank page वर नजर खिळवून
काय काय लिहून पाठवायचे परत
याचे तासनतास जाळे विणतेच कि मन!
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?
शिवकन्या
वाचने
6592
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
मस्तं!
छान!
मस्त. एकदम फ्रेश.
कडक!
लव्हली!
डिजीटल एकांत!!
वा ! वेगळी आणि मस्त ! पण शेवट नीट कळाला नाही...
आवडले
आवडलं!!
माफ करा... पण तुमच्या ज्या अत्युत्तम रचना मी वाचल्या आहेत... त्यापासून थोडी फारकत झालेली वाटतेय अलिकडे... असो... पण अर्थगर्भ तर आहेच... पण तुम्ही अत्यंत सुंदर कविता यापूर्वी दिलेल्या आहेत एवढेच सांगू वाटते... :)
In reply to माफ करा... पण तुमच्या ज्या by प्रभास
ही तुमची कविता आज परत दोन तीन वेळा वाचली. काल मला थोडी आवडलेली नव्हती व त्याबाबत तसा अभिप्राय देखील व्यक्त केलेला होता. पण आज मात्र या काव्यातील काही गोष्टी अचानक भावल्या. असो. उत्तमोत्तम रचना देत आहात त्याबद्दल धन्यवाद!
जुना मांत्रिक / विजय पुरोहित
खरडफलकावरचा आपला संदेश मुद्दाम इथे चिकटवत आहे. कारण तुमच्या सारख्या गुणी वाचकाची दोन्ही मते तितक्याच खुशीने मान्य. :-)
In reply to .... by शिव कन्या
हो खरंचय... आज परतपरत वाचल्यावर "अत्तराच्या डोळ्यांनी" खूप आवडलं मला... या अमूर्त रचनेचा अर्थ काय असे कुणी विचारले तर मला सांगता येणार नाही... पण कुठेतरी मनाला खरंच ते आवडलं जातं... का ते सांगता येत नाही... :)
In reply to हो खरंचय... आज परतपरत by प्रभास
+१
मस्तं!