✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्साला... रोच्ची कटकट

म
मन यांनी
Sun, 09/11/2016 - 19:52  ·  लेख
लेख
---स्पष्टीकरण --- " रोजची कटकट" ह्या लिखित शब्दांचा प्रत्यक्ष उच्चार "स्साला... रोच्ची कटकट" असा केलाय. ---स्पष्टीकरण समाप्त-- तर सांगायचं म्हणजे मी मनोबा. माझं टोपण नाव मनोबा. माझं त्या "तारे जमीनपर" पिच्चरमध्ये तो लहान मुलगा आहे ना "इशान अवस्थी"... त्याच्यासारखं होतं. बुटाची लेस झटकन् बांधता येत नाही. फार प्रयत्न केल्याशिवाय लेस बांधली जात नाही. पिशवीची बांधलेली गाठ सोडवता येत नाही. रस्त्यानं जाताना फक्त समोरच लक्ष असतं. आजूबाजूला फारसं नाही. (पेरिफेरल व्हिजन नसणे बहुतेक ह्यालाच म्हणत असावेत.)रस्ते लक्षात रहात नाहित. अगदि रडकुंडिला आलो. खुप प्रयत्न केले. पण नाहिच लक्षात रहात. तिखट खाणं सहन होत नाही. पंख्याखाली झोपता येत नै. खूपदा प्रयत्न केले. पण झेपतच नै. ग्रुपमध्ये लोक बोलत असतील तर ग्रुपच्या र्‍हिदममध्ये येता येत नै. ग्रुप डायनामिक्सशी जुळवून घेणं जड जातं. लोकं काहीतरी इनसायडर जोक्स मारतात. चटकन् क्लिक होत नै. टॉपलेस् स्ट्रिप क्लब मध्ये चार वर्षाचं बालक जावं ; तितपत गोंधळल्यासारखा चेहरा करुन असतो. आणि इंटारनेटवरच्या गप्पांतले दोस्त पुन्हा पुन्हा स्पर्धा, संघर्ष वगैरेंचं बोलतात. दबाव येतो. अर्थात मी गोंधळलो आहे की नै म्याटर करत नै; विशेषतः १९९२ नंतरच्या उदारीकरणानंतर गाडीनं अपरिहार्य वळण कुठं घेतलय; हेही समजत असतं.कळत असतं. पण वळत नसतं. "इशान अवस्थी " पाहिला आणि एकदम " अर्रे! हाच तरे मी" म्हणत चकित झालो. हाच तर होता लहानपणीचा मनोबा. "विल पावर , संघर्ष, प्रयत्न ,इन्स्पिरेशन" वगैरे थोरांची कामं आहेत. आम्ही संघर्ष करतोय, स्वतःची खूप आपटतोय. पण अजूनही झटझट बुटाची लेस बांधता येत नै . नोटांचं बंडल असेल; तर पटापट मोजता येत नै. एकसारखी स्वाक्षरी/सही पुन्हा पुन्हा करता येत नै. चेकवर सही करणं, चेक देणं टेन्शनचं काम वाटतं. पब्लिक चक्क इतरांच्या सहीची नक्कल करते! आम्हाला स्वतःचीच सही करता येत नै. :( गाडी चालवत असतानाच शिंक कशी येते ते समजत नै. सहज काम-बिम करत असताना शिंक आली तरी नेमक्या वेळी रुमाल सापडत नै. तोंडावर हात ठेवून शिंक द्यावी लागते. आणि मग उगाच 'एक्स्युज् मी' म्हणत नम्रतेचा सूर आणावा लागतो. कधी ग्रुपसोबत लंच/डिनरला गेलो तर सगळं लक्ष लहान मुलासारखं खाण्याकडच असतं. अगदि सहजतेने मन लावून खात बसतो. लोकांच्या गप्पा काय चालल्यात; काय टॉपिक आहे; कशाचच भान नै. पिच्चरात त्या इशान अवस्थीच्या लहानपणाचा काळ दाखवलाय. बहुतेक तो पुढं मोठा चित्रकार तरी झाला असेल. आम्हाला चित्रं, संगीत, खेळ्/स्पोर्ट, क्यारम-चेस कै येतच नै.त्याच्यासाठी त्या "लहानपणीच्या आठवणी" आहेत. "तारे जमीनपर " मधला तो माठ मनोबा कुठे प्रत्यक्षात असलाच तर मोठा झाल्यावर एखादा "स्टार" तरी झाला असेल. त्याला एखाद्या तरी क्षेत्रात (चित्रकलेत) गती आहे. ह्या मनोबाला... मला तोही स्कोप नै. आमची तर साला आख्खी लाइफच अशी आहे. आमच्या जिंदगीची स्क्रिप्ट नेमकी कोणी लिहिलिये हेच समजत नै. . मला भूक लागते. कधी कधी खुप भूक लागते. मग मी दोन तीन वाट्या घट्ट वरण नैतर भाज्या घेउन बसतो ; कधी खायला न मिळाल्यासारखं. भिजवलेले बदाम खायला घेतले तर एक दोन पुरत नैत. दहा पंधरा खातो. मग नंतर शेप्रेट, फुल्ल, पोटभर नाश्ता करतो. . 'मार्केट' इकॉनॉमिक्सला असेही काही लोक असतात हे समजत नाही. त्याला फक्त विजेते समजतात. तुम्ही 'विजेते' नाहित. तुम्ही तर अस्तित्वातच नसायला हवात. असं 'मार्केट मेक्यानिझम' म्हणतं. मग आपल्याला लै कळतं; हे मी दाखवू जातो. अशा स्पर्ढा, कठोर परिश्रम, क्यापिटालिझम वगैरे बोलणार्‍या दिग्गजांना सहज +१ ठोकून देतो. ह्या स्पर्धेत दुनियेनी मला ठेचून,वेचून,चेचून,मारुन टाकलं पाहिजे; ह्याला मी +१ दिलेलं असतं. . हे सगळे कै मोठ्ठे प्रॉब्लेम्स, क्यालामिटी नाहियेत. लहान सहान कटकटीच आहेत. पण तेवढ्यापुरतं दिमाग का दही करुन जातातच ना. ह्यातल्या काही गोष्टी जाता-येता इतरांनाही त्रास देत असल्या पाहिजेत. म्हणजे ... ऐन मोक्याला हापिसाची बस सुटणे, नि मग पुढच्या बसची वाट बघत बसणे ; महत्वाच्या कामाच्या वेळी बाइक पंक्चर होणे ; कधी लोड शेडिंगमुळें, लाइट जाण्यामुळं घात होणे; अंघोळ करताना साबण हातचा निसटून कुठं गेलाय तोच धड न सापडणे; एखाद्या पेमेण्टच्या शेवटच्या दिवशी एकदम भरवशाचं घरचं नेट बंद पडणे ; कधी आपल्या नुकत्याच केलेल्या खरेदीबद्दलचा फ्याशन सेन्स, रंग वगैरे बघून एखादी नम्र, प्रेमळ, साजूक,सात्विक,सज्जन पत्नीची प्रतिक्रिया असेल तश्शीच आपल्या पत्नीची प्रतिक्रिया असणे. नि मग तिनं अगदि प्रेमानं मग तुमच्या भाजीत हंडाभर मिरच्या , मसाला नि तिखट ओतत अहिंसक ,असहकार आंदोलन पुकारणे; इत्यादी इत्यादी. किंवा कधी निवांत वेळी टॉप फ्लोअरच्या टेरेसवर आरामात कॉफी पीत तुम्ही बसलेले असताना कधी भस्सकन् दचकवून गेलेलं कबूतर कॉफी सांडणार, कधी "गुड नाइट" म्याट्स संपल्याचं फार उशीरा ...दुकान बंद झाल्यावर लक्षात येणार; मग डास मंडळी तुमच्यावर मेजवानी झोडणार; हापिसाला उशीर होत असताना ऐन वेळी गाडीला किक मारणार इतक्यात सटासट शिंका येउन नाक वहायला लागणार, पुन्हा आठ दहा मजले वर पायी...तंगड्या तोडत जायला लागणार; किंवा तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असाला तर मस्त वेळेत तुमचा कोड / डेव्हलपमेण्ट पूर्ण होणार इतक्यात...तुम्हाला तुमचा कोड सेव्ह करण्याची संधीही न देता धाडकन् आख्खा सर्व्हर रिबूट होणार, तुम्ही तोवर कदाचित ब्याक अप घ्यायचाही राहून गेलेला असणार, सगळी मेहनत मातीत जाणार.... छोटी छोटी माणसं. छोटी छोटी जिंदगी. त्यांचे मोठ्ठे मोठ्ठे प्रॉब्लेम्स. ही लोकच इतकी छोटिशी असतात की त्यांचे मोठ्ठे प्रॉब्लेम्सही अदरवाइज छोटेच असतात! साधी, छोटी , निरागस, इवली, व्रात्य,भाबडी,बेरकी,खोडकर जिंदगी. त्या.... "मालगुडी डेज्" सिरियलमध्ये दाखवल्यासारखी. . . . " मी ए ना चाराण्याची खरेदी क्रेडिट कार्डानं केली. आता मला लाखभर रुपये क्याश बेक नि ऑफर म्हणून मिळ्णारेत!" "मी बाराणे खर्च केले म्हणून अमिताभ बच्चन माझी सही घ्यायला माझ्या घरी येणारे!!" अशा सगळ्या सुरस कथा सतत पब्लिक आसपास सांगत असते . याला यंव ऑफर मिळाली नि त्याला त्यंव ऑफर मिळाली वगैरे लोकं सांगत असतात. ते कायतरी वॉलेट अन् paytm,freecharge अन् न जाणो काय काय वापरतात. ब्यांकांची क्रेडिट कार्डं वापरतात. पण आम्हिच वापरायला गेलो की भांचुत ऑफर कशी काय नसते ? म्हंजे सिस्टिम नेहमी मला लुटायलाच का बसलेली असते ? माझ्याकडे लुटण्याइतपत बक्कळ सरप्लस आहे; किंवा माझ्याकडेच्च लुटण्याइतपत बक्कळ सरप्लस आहे असं सिस्टिमला का वाटत असावं ? की मग सिस्टिमला समजलं असावं की मी किती गाढव आहे ते? म्हंजे "ह्याला हवं तेवढं लुटलं तरी काही होणार नै. तुच्छ क्षुद्र आम आदमी.लुटा ह्याला. " असच वाटत असेल ना ? ह्या व्यवस्थेचा...ह्या सिस्टिमचा मुख्य उद्योग हा मला लुटणे असाच का असावा ? माझ्याच घराची लाइटची बिलं दहा दहा हजार रुपये का येत असावीत ? तीही फक्त दोन पंखे नि चार सी एफ एल असताना ? . . असो. . झालं. एकदाचं कडाक्याचं भांडण झालच. जिग्गी दोस्तासोबत.... त्याला लै हौस. इकडे चाराण्याचा डिस्काउण्ट आहे, तिकडे पाव पैशाचा डिस्काउण्ट आहे; वगैरे वगैरे बक्कर करत असतो. म्हटलं ह्यापेक्षा कामावर फोकस केलास तर चार-आठाण्यातून बाहेर तरी येशील. तर साहेब म्हणाले की " छे रे. आपल्या इंडस्ट्रीत ठराविक वर्षांनी ठराविक प्याकेज मिळतच की. उगा त्यासाठी धडपड करुन काही फायदा होत नै." मी म्हटलं ऑल्मोस्ट तुझ्याच प्रोफाइलची काही मंडळी ठाउक आहेत. (तुझ्यासारखेच क्वालिफिकेशन्स, ऑल्मोस्ट त्याच रँकिंगची कॉलेजे आणि तसलाच सुरुवातीच्या काळातला workex.) आता त्यांचं इनकम ब्रॅकेट तुझ्या निदान दुप्पट आहे.आणि तू काही त्याही गटातला नाहिस की ज्यांना इनकम शिवाय "काहीतरी करण्याची" इच्छा वगैरे असते. कारण " काहीतरी करण्याची इच्छा" असेल तर 'इन्कम' ह्या पॅरामीटरचं महत्व तितकं रहात नाही. (उदा-- माझे काही मित्र काही नवीन प्रॉडक्ट बनवू पाहतात, कला शिकू पाहतात, परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून नाव कमावू पाह्तात जॉब व्यतिरिक्त. तर इतर कुणी जमेल तसं संगीत, इतिहास वगैरे क्षेत्रात जमेल ते योगदान देत असतो. माझ्या एका मित्रानं संगीतात ट्यून्ससुद्धा तयार केल्यात. एका एफ एम रेडियोनं स्वतःच ऑफर देउन त्या विकत घेतल्या होत्या वर्ल्ड कपच्या काळात थीम म्हणून. म्हटलं तुझं तेही नै. दिवसभर दिवास्वप्न बघत बसायची हा मुख्य उद्योग. पैशांचा पाउस पडावा असं बटबटीत स्वप्न. पण त्यासाठी काही करण्याची, धडपडायची इच्छा आहे का ? प्रयत्न आहेत का ? तर कैच नैत! असणार कसे ? चोवीस तास चार आठ आण्यांच्या डिस्काउण्टमध्ये डोस्के अडकलेले.) . मग तोही भडकला. त्यानेही माझी लायकी काढली. . "शतरंज के खिलाडी " पिच्चरमध्ये क्लायमॅक्सला क्षुद्र, तुच्छ , आळशी दोघे दोस्त(संजीव कुमार आणि सईद जाफरी) जसे भांडतात; व नंतर पुन्हा गळ्यात पडतात; तोच सीन जशाला तसा रिपीट झाला. दोन दोस्त पुन्हा गळ्यात पडले. तिकडे कर्तबगार , खमक्या इंग्रजांचं राज्य अधिकाधिक दृढ होतय नि हे सुस्ताड आपल्यातच मग्न आहेत. भुक्कडपणाचा लाइव्ह , जिवंत (नि कदाचित ते दाहक वगैरे म्हणतात तसाही!) अनुभव. पिच्चर वगैरेची भांचुत कै गरजच नै. . . माझ्या एका खास दोस्ताच्या मते हे प्रॉब्लेम्स मुळात प्रॉब्लेम्सच नाहित. किंवा first world problems आहेत. खाउन पिउन व्यवस्थित असणार्‍या लोकांना "वाटत" असणारे प्रॉब्लेम्स. काय की. असेलही तसं.डोक्यात आलं लिहून काढलं.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9321 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

जल शृंखला योग , अंत:क्रमांक

इल्यूमिनाटस
Sun, 09/11/2016 - 20:12 नवीन
जल शृंखला योग , अंत:क्रमांक योग, बुट्टी अधिकारी योग हे सगळे पु लंचे नवे ग्रहयोग तुमच्या कुंडलीत आलेले दिसतात काळजी घ्या
  • Log in or register to post comments

खरं आहे....

भम्पक
Sun, 09/11/2016 - 20:12 नवीन
अरे वा !! आणि मनोबा लिहिते झाले .... मनोबाचा लडाख फेरीपासूनचा फ्यान ....
  • Log in or register to post comments

ओए , ते लदाखवाले मनराव, ते

अभ्या..
Sun, 09/11/2016 - 21:17 नवीन
ओए , ते लदाखवाले मनराव, ते वायले. हा आपला मनोबा. मन आणि मन१ ह्या आयडीचा मालक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भम्पक

ओए

भम्पक
Tue, 09/13/2016 - 18:06 नवीन
ओए ओए अरे अस्स आहे का......सॉरी ओए अभ्या.....!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

>छोटी छोटी माणसं. छोटी छोटी

कंजूस
Sun, 09/11/2016 - 20:19 नवीन
>छोटी छोटी माणसं. छोटी छोटी जिंदगी. त्यांचे मोठ्ठे मोठ्ठे प्रॉब्लेम्स. ही लोकच इतकी छोटिशी असतात की त्यांचे मोठ्ठे प्रॉब्लेम्सही अदरवाइज छोटेच असतात! साधी, छोटी , निरागस, इवली, व्रात्य,भाबडी,बेरकी,खोडकर जिंदगी.> :):):):):)
  • Log in or register to post comments

एवढी छोटीशी रेघ काढलीस आमच्या

कंजूस
Sun, 09/11/2016 - 20:24 नवीन
एवढी छोटीशी रेघ काढलीस आमच्या रेघेपाशी की आमची आता मोठ्ठी वाटायला लागलीय.
  • Log in or register to post comments

स्साला मजा आला

झेन
Sun, 09/11/2016 - 21:05 नवीन
स्साला मजा आला. सुरेख च.
  • Log in or register to post comments

मनोबा,

अभ्या..
Sun, 09/11/2016 - 21:27 नवीन
मनोबा, तुला म्हनून सांगतो, लै कै लोड घेऊ नकोस. असला इशान अवस्थी तर मी पण होतो. अजुन आहे म्हणायला हरकत नाही. मॅपिंग माझे प्रमाणापेक्षा जास्त गंडलेले आहे. मी अगदी पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे. बाकी स्कीमा, लॉटर्‍या, लक्की ड्रॉ वगैरे जिंदगीत कधी लागलेले नाहीत. ४ जणाच्या चिठ्या टाकल्या तर त्यात कधी माझी आली नाही एवढ्यावरुन माझे नशीब नावाची चीझ किती --डू आहे ते बघ. राहता राहिलं तुला आर्टिस्ट, त्यांचा परफॉर्मन्स असले ग्लॅमर भारी वाटते. काय नसते सांगतो तुला. फुकट तगमग ती. ती झेपण्यापेक्षा तुझी सरळसोट जिंदगी बरी. शिंका बिंका तर कधीही कुठेही येतात, त्यात काय विचार करायचा. कुठलेच पासवर्ड लक्षात राहात नाहीत, कुलुप चारचरदा चेक करुन परत उघडेच राहिले आहे काय असे डोक्यात कायम असते. बँका वगैरे ऑफिसात उगा भीती वाटते. ड्रायव्हिंग करताना गोंधळतो, वॅलेट चेक करत राहतो. मग काय झाले? काय नसते रे हे. नॉर्मल आहे म्हणे हि जिंदगी. मिपावाल्यानीच सांगितलेय मला. सो. आरामसे रह्यनेका. जो होयेंगा अच्छाच होयेंगा बोलनेका.
  • Log in or register to post comments

आपलापण तोच झोल हाय....

Rahul D
Sun, 09/11/2016 - 23:59 नवीन
आपलापण तोच झोल हाय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी अगदी पुण्यात नटराजवरुन

सतिश गावडे
Mon, 09/12/2016 - 00:42 नवीन
मी अगदी पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे.
मी शॉपर्स स्टॉपवरुन एल एंड टी इन्फोटेकला रिक्षा केली होती. नुसतं मागे वळून पाहीलं असतं तर शॉपर्स स्टॉपच्या बाजूलाच असलेला एल एंड टी इन्फोटेकचा बोर्ड दिसला असता. तो रिक्षावालाही महान होता. त्याने रिक्षा संचेती, शिवाजी नगर बस स्थानक, कृषि विद्यापीठ आणि पुढचा भुयारी रस्ता अशी फिरवून मी जिथे रिक्षात बसलो होतो त्याच्या जेमतेम पन्नास पावले मागे उभी केली आणि तीस रुपये घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तो रिक्शावाला सज्जन असणार

टवाळ कार्टा
Mon, 09/12/2016 - 01:32 नवीन
तो रिक्शावाला सज्जन असणार म्हणून फक्त ३० रुपये घेतले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अरे अय

पगला गजोधर
Mon, 09/12/2016 - 13:51 नवीन
पुण्यात नटराजवरुन स्वारगेटला रिक्षा केलेला माणूस आहे.
मग त्यात काय ? मी सुद्धा नटराज(सध्याचा जंगली महाराज रोड वर सध्या मॅकडोनाल्ड आहे त्या जवळचा पार्किंग लॉट) पासून स्वारगेट ला रिक्षांनेच जायचो, हा तुम्हाला लक्ष्मीनारायण ते स्वारगेट म्हणायचे होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

स्वारगेट चौकजवळ

सामान्य वाचक
Mon, 09/12/2016 - 14:19 नवीन
सारसबागेच्या रस्त्यावर 1 नटराज आहे त्याबद्धल असेल हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

ओहो, असा सगळा प्रकार झाला तर.

बॅटमॅन
Sun, 09/11/2016 - 22:28 नवीन
ओहो, असा सगळा प्रकार झाला तर..... १०० पैकी ९५ पडले तरी निकालाआधी नापास होईन म्हणून रडणारे टॉपर लोक्स आठवले. चालूदे.
  • Log in or register to post comments

बरं.....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 09/11/2016 - 23:35 नवीन
मग नक्की काय करायचं म्हणता ?
  • Log in or register to post comments

ए मनोबा च्यायला,

मोदक
Sun, 09/11/2016 - 23:52 नवीन
ए मनोबा च्यायला, कसले सुख टोचायला लागले बे तुला...? चल एकदा ट्रेकला सोबत. पुण्यापासून 50/60 किमीवर खेडेगावं आहेत. लोकं पिढ्यानपिढ्या राहतात. तेथे अजून रस्ता नाही, वीज पण पोहोचली नाहीये. ते कसे जगत असतील बघ, तुला जो काय त्रास आहे तो नक्की त्रास आहे का ते पण कळेल. या पूर्वीही एकदा सांगितले होते ते आणखी एकदा सांगतो,

तुलना करू नकोस

तु पण तितकाच ग्रेट आहेस जितके जगातले बाकीचे लोक आहेत. बस्स.!!!
  • Log in or register to post comments

ए मनोबा च्यायला,

मोदक
Sun, 09/11/2016 - 23:52 नवीन
ए मनोबा च्यायला, कसले सुख टोचायला लागले बे तुला...? चल एकदा ट्रेकला सोबत. पुण्यापासून 50/60 किमीवर खेडेगावं आहेत. लोकं पिढ्यानपिढ्या राहतात. तेथे अजून रस्ता नाही, वीज पण पोहोचली नाहीये. ते कसे जगत असतील बघ, तुला जो काय त्रास आहे तो नक्की त्रास आहे का ते पण कळेल. या पूर्वीही एकदा सांगितले होते ते आणखी एकदा सांगतो,

तुलना करू नकोस

तु पण तितकाच ग्रेट आहेस जितके जगातले बाकीचे लोक आहेत. बस्स.!!!
  • Log in or register to post comments

मला आपले त्या अंडयाच्या

सतिश गावडे
Mon, 09/12/2016 - 00:44 नवीन
मला आपले त्या अंडयाच्या कंपनीमधले दिवस आठवले. तू अजूनही तसाच आहेस तर. =))
  • Log in or register to post comments

मस्त.

चित्रगुप्त
Mon, 09/12/2016 - 02:24 नवीन
मनोबा एकदम मस्त लिहिलंय. लईच आवडलं.
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलय..

चिनार
Mon, 09/12/2016 - 10:31 नवीन
मस्त लिहीलय.. मनोबा !! लिहीत रहा..
  • Log in or register to post comments

मन राव, छान मन लावून लिहिलं

पक्षी
Mon, 09/12/2016 - 12:42 नवीन
मन राव, छान मन लावून लिहिलं आहेस.... पण उगा डोक्याला शॉट नको लावू.. जसा आहे तसा राहा. "just live with it" . असल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात सगळ्या बरोबर घडतात, जास्त लक्ष नको देऊ. न्यूनगंड ठेवू नको किंवा इतरांबरोंबर स्वतःची तुलना करू नका. "enjoy yourself". उगा उपदेश म्हणून नाही सांगत,पण मी सुद्धा थोड्या फार प्रमाणात विसरभोळा आहे, गोष्टी विसरतो, वस्तू हरवतो, कामात चुका करतो, घोळ करतो, पण जास्त लक्ष नाही देत. जेवढं मला शक्य आहे तेवढंच करतो आणि बाकी सोडून देतो, चलता है. एखादी गोष्ट जरी विसरोल तर स्वतःला सांगतो "its ok" पुढच्या वेळी लक्षात ठेवेल. छोट्या गोष्टीत मन नको गुंतवू, मी ह्या पावसाळ्यात चक्क चार वेळा छत्री हरवली आणि प्रत्येक वेळी सापडली सुद्धा. एकदा रिक्शा वाल्याने मला 500 रुपयाला गंडवलं, मी त्याला 50 रुपये समजून 500 ची नोट दिली, त्याने ती गुपचूप खिशात ठेवली आणि पसार झाला. मी मागे पळालो पण भाऊ टॉप स्पीड ने भन्नाट सुटले. पण मी मनाला नाही लावली गोष्ट, स्वतःला समजावलं कि जाऊ दे त्याच्या नशिबात होते ते. Don't bother your self. try to enjoy your own company and what you doing.
बुटाची लेस झटकन् बांधता येत नाही.
बुटाची लेस पटकन बांधणं "Is not a big deal". आणि तरी सुद्धा लवकर आणि व्यवस्थित बांधायची असेल तर सावकाश आणि लक्षपूर्वक बांधा, भले हि 10 मिनिटं लागले तरी चालतील. कुठलं हि काम मग ते किती हि छोटं/मोठं असू दे, सावकाश आणि मनापासून केल तर व्यवस्थित होतं (हा माझा स्वतःचा अनुभव आहे) .
एकसारखी स्वाक्षरी/सही पुन्हा पुन्हा करता येत नै.
हे सुद्धा नेहमी घडतं माझ्या बरोबर, पण चेक कधी परत आला नाही, उणीस बीस चालतं. आणि परत आला तरी पुढल्या वेळी अजून वेगळी स्वाक्षरी करून पाठवायचा चेक, अश्या वेळी स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, बँकेला त्रास द्यायचा. आणि हो जरा फिल्मी डायलॉग मारतो आता ... चेक च्या स्वाक्षरी पेक्षा बँक बॅलन्स महत्वाचा आहे.
ग्रुपसोबत लंच/डिनरला गेलो तर सगळं लक्ष लहान मुलासारखं खाण्याकडच असतं. अगदि सहजतेने मन लावून खात बसतो.
अर्रे वाह छान आहे कि मग, चांगलं हाणायच हाटलीत गेल्यावर, फुकट असेल तर अजून हाणायचं. आणि सगळे हेच करता.
लोकांच्या गप्पा काय चालल्यात; काय टॉपिक आहे; कशाचच भान नै.
काय करायचं असल्या भंपक आणि फालतू गप्पांचं, तरी सुद्धा अधून मधून एखादी काडी सारायची, आपल्या ला जमेल तेवढी आणि झेपेल तेवढी. खूप जास्त होतं आहे, अजून लिहायची इच्छा होती, पण आवरतो आता....
  • Log in or register to post comments

हाहाहा

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 09/12/2016 - 12:58 नवीन
कधी निवांत वेळी टॉप फ्लोअरच्या टेरेसवर आरामात कॉफी पीत तुम्ही बसलेले असताना कधी भस्सकन् दचकवून गेलेलं कबूतर कॉफी सांडणार,
हे इमॅजीन करुन बेक्कार हसतोय...
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

चाणक्य
Mon, 09/12/2016 - 13:29 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

माझ्या एका खास दोस्ताच्या मते

अप्पा जोगळेकर
Mon, 09/12/2016 - 13:07 नवीन
माझ्या एका खास दोस्ताच्या मते हे प्रॉब्लेम्स मुळात प्रॉब्लेम्सच नाहित. किंवा first world problems आहेत. अगदी अगदी. हेच म्हणतो. पण या नसणार्‍या प्रॉब्लेम मधून १०० + प्रतिसाद जनरेट होतील.
  • Log in or register to post comments

हा हा, सहमत,

संदीप डांगे
Mon, 09/12/2016 - 13:16 नवीन
हा हा, सहमत, बाकी मनोबाची शैली फार आवडते, एकदम फाईट क्लब सारखी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अरेरे

सामान्य वाचक
Mon, 09/12/2016 - 13:32 नवीन
माझे आयुष्य फारच बरे आहे कि मग म्हणजे तुम्ही लिहिले तसेच आहे सगळे पण मी डोक्याला त्रास करून घेत नाही
  • Log in or register to post comments

आमचे बाबा महाराज , डोंबोलीकर, म्हणतात....

मुक्त विहारि
Mon, 09/12/2016 - 13:41 नवीन
"नाही रे" असे म्हणण्यापेक्षा, "आहे रे" असे म्हणता जावे.
  • Log in or register to post comments

ग्रुपमध्ये लोक बोलत असतील तर

सानझरी
Mon, 09/12/2016 - 14:00 नवीन
ग्रुपमध्ये लोक बोलत असतील तर ग्रुपच्या र्‍हिदममध्ये येता येत नै. ग्रुप डायनामिक्सशी जुळवून घेणं जड जातं. लोकं काहीतरी इनसायडर जोक्स मारतात. चटकन् क्लिक होत नै.
हा सगळ्याच introvert लोकांचा प्रॉब्लेम आहे. चालायचंच.
आम्हाला स्वतःचीच सही करता येत नै
हा तर बर्‍याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. माझी पण सही दर वेळेला निराळी येते. त्यात वाईट नाही वाटून घ्यायचं. अगदी पुलंनी सुद्धा लिहीलंय की सही जमत नाही, असं कुठेसं वाचल्याचं आठवतंय.
आम्हाला चित्रं, संगीत, खेळ/स्पोर्ट, क्यारम-चेस कै येतच नै
येत नसलं तरी प्रयत्न तर करून बघा. मला खूप काही करावसं वाटतं पण येत काहीच नाही. नविन छंदावर पैसे खर्च केले की आणि ३-४ महिने त्या धुंदीत राहिलं की फार बरं वाटतं. मागे बासरी शिकायला घेतली. त्यात नविन बासरी घेणे, दोन तीन महीने क्लासला जाणे यात बरेच पैसे खर्च केले. पण २ महीने सराव करूनही 'प' काही वाजेना, मग बसरीचा नाद सोडुन दिला. त्या क्लासमधे खुप चांगले मित्र मिळाले आणि शास्त्रिय संगीताची आवड लागली ही जमेची बाजु. त्या नंतर स्केचिंगचं वेड लागलं. स्केच पॅड, चर्कोल पेन्सिल, कलर पेन्सिल, स्केचिंग पेन्स यावर बराच खर्च केला. नंतर स्केचिंगची पुस्तकं घेतली तिही दोनेक हजराच्यावर. ३-४ महीने प्रयत्न करून तेही सोडुन दिलं. आता ती पुस्तकं म्हणजे आयुष्यभराचा ठेवा आहेत. मग नंतर वॉटर कलरचं वेड. त्यातही काही जमलं नाही. आता नविन रंग जसेच्या तसे पडून आहेत. सध्या मी अ‍ॅक्रेलिक रंगांशी कुस्ती खेळत असते. dried flowers craft, ओरिगामी, सायकलींग असे अनेक छंद एकाच वेळेला सुरू असतात. कालच व्यंकटेश माडगुळकरांचं 'वाटा' हे पुस्तक वाचत होते. त्यातला हा एक उतारा-
या जिवनात कंटाळा अटळ आहे आणि तोही अपुर्‍या पांघरुणासारखा असतो. अपुरं पांघरुण तोंडावर घ्यावं म्हटलं तर पाय उघडे राहतात, पायाखाली घ्यावं म्हटलं तर तोंड उघडे. यातून थोडी सुटका होते ती आपल्या छंदामुळे. जमतील तसे छंद लावून घ्यावेत. एका छंदाचा कंटाळा आला की तो टाकावा, दुसरा लावून घ्यावा, किंवा एकाच वेळी अनेक छंद चालू ठेवावेत. मानवी आयुष्य तसं निरर्थकच. कला, राष्ट्रभक्ती, देवधर्म, असे काही काही निर्मून आपणच त्याला अर्थ प्राप्त करून देत नाही का?
आपण व्यवस्थापीडीत (हा शब्द फारच आवडलाय) आहोत हे मोअर ऑर लेस सगळ्यांनाच वाटतं. रिक्षेवाले सगळ्यांनाच फसवतात. मला तर पेट्रोल पंपावरती पण काहिनाकाही हातचालाखी करून फसवतात. आपण बिचारे आहोत हे बर्‍याच लोकांना वाटतं, पण जंगल रूल्स सगळ्यांनाच लागू होतात, आणि लढणं भाग आहे. आणि हो, Murphy's law देखील सगळ्यांनाच लागू होतो. 'Anything that can possibly go wrong, does' त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जास्त टेंशन घ्यायचं नाही. कधीकधी फारच सगळ्या गोष्टींचा उबग आला तर मी पुलंचं हे पत्र वाचते, वाचुन बघा, कदाचित तुम्हालाही आवडेल.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद अतिशय आवडला.

रातराणी
Tue, 09/13/2016 - 23:24 नवीन
प्रतिसाद अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

टॉपलेस् स्ट्रिप क्लब मध्ये

मृत्युन्जय
Mon, 09/12/2016 - 14:15 नवीन
टॉपलेस् स्ट्रिप क्लब मध्ये चार वर्षाचं बालक जावं ; तितपत गोंधळल्यासारखा चेहरा करुन असतो "असतो" या शब्दातुन जी वारंवारता जाणवते त्यामुळे ड्वाळे पाणावले. काय तो व्यासंग म्हणायचा.
  • Log in or register to post comments

सहमत, शिवाय इतका व्यासंग

बॅटमॅन
Tue, 09/13/2016 - 10:31 नवीन
सहमत, शिवाय इतका व्यासंग करण्याइतपत संधी मिळते तरी कशी, हेही कुतूहल आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सिध्दूचे आभार माना....

माम्लेदारचा पन्खा
Tue, 09/13/2016 - 16:06 नवीन
हे वाक्य त्यानं इतक्या वेळा वापरलंय की त्याचा प्रताधिकार सुध्दा आला असेल त्याच्याकडे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रॉब्लेम मोठाच आहे पण सोल्यूशन आहे...

मराठी कथालेखक
Tue, 09/13/2016 - 18:23 नवीन
हे घ्या Image removed.
  • Log in or register to post comments

लेस मध्ये ऑक्स्फोर्ड किंवा

अभ्या..
Tue, 09/13/2016 - 21:39 नवीन
लेस मध्ये ऑक्स्फोर्ड किंवा मोकॅसिनो दाखवा. टॅन ब्राउन असेल तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

सगळ्यांचं सेम असतंय हो, वेलकम टू द क्लब :)

नीलमोहर
Tue, 09/13/2016 - 18:32 नवीन
मस्त लिहिलेय, एक नंबर !! यावर खूप काही लिहिता येईल, पण त्यासाठी विचार करावा लागेल, आणि विचार सुरु झाले की चंद्रापासून माच्चू पिच्चूपर्यंत कुठेही फिरून येतात, हे जे तुम्ही लिहिलेय ते पर्फेक्टली नॉर्मल विचार आहेत, गाडी योग्य दिशेने जात असते, तिला तिच्या रस्त्याने जाऊ द्या, मला दिशा, directions लवकर सुधरत नाही, फार विचार करावा लागतो, टेक्नॉलॉजी पटकन समजत नाही, ३d max शिकायचा पुष्कळ प्रयत्न केला, इतकं कॉम्प्लेक्स, मैथेमॅटिकेल टेक्निकल डोक्यात शिरायलाच तयार नाही. पुण्यातील कोणता रस्ता कुठला, भिडे पूल, नदीपात्रातील पूल, झेड ब्रिज सगळे सारखे, त्यात नेहमी कन्फ्युजन, हिशेब पटकन करता येत नाही, आकडे मोडत बसावं लागतं, ऑनलाइन खरेदी आल्मोस्ट नाहीच, paytm amazon ह्यांव त्यांव काहीच नाही, ऑफिसात निम्म्याहून जास्त बायकांचे आठवड्याला कुरियर, ते बघून कसं जमतं ना लांबून म्हणायचं, बास, क्रेडिट कार्ड नाही, ते तरी लांब ड्रायविंग लायसेन्सही नाही ( हे मात्र मनावर घेणार नक्की ) चार माणसांत (बायकांत जास्त) काय बोलावं समजत नाही, मग उगाच इकडे तिकडे बघत, फोनमध्ये डोकं घालून बसायचं, अजून आठवेल तसे टाकेन बरेच काही, i love my own company, दॅट्स ऑल दॅट मॅटर्स, :)
  • Log in or register to post comments

मनोबा कायम रड्याच.

प्रचेतस
Tue, 09/13/2016 - 22:04 नवीन
मनोबा कायम रड्याच.
  • Log in or register to post comments

आभार....

मन१
Wed, 09/14/2016 - 11:15 नवीन
सर्व वाचक , प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. सल्ले दिलेत, पु लं च्या लिंका दिल्यात, माझा उत्साह वाढवायचा प्रयत्न केलात, हे सगळं कसं नॉर्मलच आहेत हे ही सांगितलत, म्हणजे माझी काळजी करता. माझे हितचिंतक आहात.माझे हितचिंतक असण्याबद्दल आभार. व्यक्तिशः स्वतःबद्दल अधिक काही सांगत - बोलत बसणं आत्ता , इथे , ह्या धाग्यावर उचित वाटत नाही. पुनश्च आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा