Skip to main content

विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/09/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही. दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही. त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल. याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात. आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य. योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे, जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे. पुढ्या सहा महिन्यातच या फूड पार्कच्या काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे. दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर नागपूर येथील फूडपार्क जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल. साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34774
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

In reply to by कविता१९७८

असेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

योग्य बातमी पण टायमिंग चुकलाच तुमचा !! हे (बाबा) राम (देव) !!!!

In reply to by इरसाल

मी येथे रामदेव बाबांचे नाव दिले नाही आहे. शिवाय बाबा रामदेवांचा पतंजली मध्ये कुठलाही स्टेक नाही. ते फक्त ब्रांड अम्बेसिडर काय ते म्हणतात आहे.

In reply to by विवेकपटाईत

ओके पटाईत. तुम्ही म्हणता ते खरे समजू एकवेळ. मग हे कोण
हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.
कोण हा योगी? तुमचे नेहमीचे बळंच क्रिप्टीक सोडा अन आमचे अडाणीपण समजून क्लीअर सांगा. बरं हा योगी जर रामदेव बाबा समजले तर तुम्ही म्हणता तसे या ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडार ला कंपनीची एवढी सत्ता कोण दिली की एवढे मोठे डिसीजन तो घेऊ शकेल? स्टेक सोडा, ते म्हणतील तिकडे प्लांट उभारण्याची अन अब्जोवधीत गुंतवणूक करण्याची डेरिंग कंपनी कसे करते? ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरला एवढी ताकद असते का? बरं हा योगी जर रामदेव बाबा नाहीत तर मग कोण आहे? कुणाला आहे विदर्भाची कळकळ एवढी हरयाणात जन्मूनसुध्दा? कळू दे आम्हाला तरी.

In reply to by अभ्या..

बरं हा योगी जर रामदेव बाबा नाहीत तर मग कोण आहे? कुणाला आहे विदर्भाची कळकळ एवढी हरयाणात जन्मूनसुध्दा
? हॅहॅहॅ हवं ना एवढी काळजी आमच्या गडकरी सायेब, मेघे सायेब आन मुत्तेमवार अन्नाले बी वाटतं नाही, इदर्भाबद्दल जेवढी या शेवया वाल्या बाबाले वाटू लागली.

In reply to by अभ्या..

अभय साहेब, महाराष्ट्राच्या कुठल्या हि नेता पेक्षा जास्त महाराष्ट्रात बाबा जास्त फिरले असतील. गेल्या २० वर्षांत २० लाख किमी हून जास्त प्रवास त्यांनी केला आहे. त्यात अधिकांश प्रवास कार जीप इत्यादी. त्यांची दिनचर्या तपासून घ्या. गुंतवणूकि साठी बँक आहेतच. पतंजली एकमात्र फूड प्रोसेसिंग कंपनी आहे, जिने वेळेवर बँकांचे कर्ज चुकविले आहे. बाकी देशातील कोटीहून अधिक लोकांनी त्यांना पैसा दिलेला आहे. त्यात अधिकांश गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जे सकाळी ५ वाचता शिवीरात भाग घ्यायला आले होते. कधी आस्था बघितले आहे, रोज किमान ४००० लोक तरी हरिद्वार येथे शिविरात येतात. या शिवाय ५०हून जास्त शिवीर देशात इतर भागात हि लागतात. बाकी आसाम, उत्तर प्रदेश (बुंदेल खंड), मध्य प्रदेश या ठिकाणी हि फूड पार्क उभे राहणार आहे. रामदासांनी म्हंटलेले आहे, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो.

In reply to by विवेकपटाईत

महाराष्ट्राच्या कुठल्या हि नेता पेक्षा जास्त महाराष्ट्रात बाबा जास्त फिरले असतील.>>>> महाराष्ट्रात गावो गावी प्रवास करण्याच्या बाबतीत पवार साहेबांचा कोणीही हात धरू शकत नाही. कृपया मान्य नसेल तर "नाही" म्हणा पण उगाच पवारांबद्दल खोचक प्रतिक्रिया देऊ नका, कारण चर्चेचा रोख मला पवारांकडे वळवायचा नाही.

In reply to by विवेकपटाईत

तुम्ही फक्त एकांगीच लिहिण्यात पारंगत आहात का हो? धंद्याची चाचपणी करायला एकटे बाबाच फिरलेत का जगात, जमशेटजी टाटा झारखंडच्या रानावनात बैलगाडीतून फिरले होते तेव्हा कुठे जमशेदपूर उभे राहिले होते. उगाच कोणाच्या धंदेवाईक फिरण्याला फार काहीतरी भारी केल्यासारखे मांडू नका. नफा निघतोय/निघायची शक्यता आहे म्हणूच बाबा हिंडत असतात. बाबांनी योगाला सुद्धा एक कॉर्पोरेट लूक दिलाय इतके मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे, असली फंडु बिजनेस स्ट्रॅटेजी आधी नव्हती (माझ्या ऐकण्यात तरी नाही) .

In reply to by विवेकपटाईत

जसे लव्हासा मध्ये पवारांचा स्टेक नाही, सहारा मध्ये यादवांचा स्टेक नाही तसेच पतंजली मध्ये रामदेव बाबांचा स्टेक नाही हे देखील खरेच म्हणायचे.

खरंच टायमिंग चुकला।। धाग्यावर महाभारत होणार लिहून ठेवा।। काहीतरी 'आठवले' बाबांनी ओतले विदर्भात कोटी, म्हणून आम्हाला आठवली ही कोटी।।।

In reply to by संदीप डांगे

हॅट।।। मला वाटलं येथे 'संडां'स चालू होणार।।।

In reply to by संदीप डांगे

सहमत

आकडे एकदा क्रॉसचेक करून घ्याल काका, काही ठिकाणी शंका आहे, मी माझ्यापरीने आकडे वेरिफाय करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण एकदा क्रॉसचेक करा ही विनंती. एकंदरीत बातमी चांगली आहेच. तुमचे ते रामदेव प्रेम वगैरे आजकाल अंगळवणी पडते आहे त्यामुळे त्याने काही फरक पडत नाही आजकाल. चालायचेच!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

>>>> तुमचे ते रामदेव प्रेम वगैरे आजकाल अंगळवणी पडते आहे त्यामुळे त्याने काही फरक पडत नाही आजकाल. चालायचेच ! बापू, विदर्भाच्या विकासाची आकडेमोड व्हेरीफाय करायला हरकत नाही, पण असा पूर्वग्रह धरुन व्यक्तिगत आकडेमोड नको करायला असे वाटले. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा पूर्वग्रह आहे का?? तुम्हाला तसे वाटत असल्यास तुमच्या मताचा आदर, पण मी माझा स्पष्टीकरण द्यायचा हक्क राखून ठेऊ इच्छितो, त्यानुसार बोलतो माझ्यादृष्टीने ही वाक्ये पूर्वग्रह निदर्शक नाहीत तर फक्त लेखन शैलीतले एक कायम दिसून येणारे फिचर नोंदवायचा एक प्रयत्न होय सर, अर्थात त्यात मी कमी पडलो असेल ही शक्यता मी गृहीत धरेलच, तरीही ह्याला पूर्वग्रह म्हणून झटकू नये असे सुचवतो. रामदेव बाबाने काय माझे एखाद एक्कर वावर किंवा वावराचे धुरे हडपलेले नाहीत, त्यामुळे मला रामदेवांविषयी काही प्रतिकूल मते असायचे कारण नाही, किंवा पटाईत साहेबांना त्यांची भक्ती करायची असल्यास त्याला विरोध करणाराही मी कोणी टिकोजी लागून गेलेलो नाही, हे मी आधीच स्पष्ट करतो. मी हे का लिहिले ?? तर एकंदरीत ताकाला जाऊन भांडी लपवायचे धंदे आवडत नाहीत, "हरयाणात जन्मलेला योगी" वगैरे मखलाशी करून नंतर "मी रामदेवांचे नाव घेतलेले नाही" छाप खोडसाळ प्रतिसाद टाकणाऱ्या व्यक्तीलाच पूर्वग्रह किती आहेत ते तपासायला हवे, असे माझे वैयक्तिक मत आहे. पटले तर बघा, नाहीतर परत एकदा आमच्या क्षमता कमी पडल्या असे समजा अन आम्हाला माफ करा ही विनंती आमचा इथेच पूर्णविराम ओम शांती शांती शांती:

In reply to by संदीप डांगे

अरे वा! तुम्हाला कसं माहिती भक्तांना काय वाटणारे ते? तुम्हीही भक्तांप्रमाणे विचार करू लागलात वाट्टे? प्रगती आहे! ;-) आ.न., -गा.पै.

हॅहॅहॅ शिर्षक वाचून वारल्या गेलो आहे. बाकी पेड भकताकडून जास्त अपेक्षा कधीच नव्हत्या.

वरच्या बातमीत आक्षेपार्ह अस काय आहे ? विरोधी पक्षाप्रमाणे सर्व गोष्टींना विरोध करायचा म्हणुन विरोध करत आहात ? नागपुरला देशातील सर्वात मोठे कार्गो हब बनवण्याचे प्रोजेक्ट मिहान अंतर्गत चालु आहे. मिहान म्हणजे Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur (MIHAN) ह्या पार्श्वभुमीवर स्वामी रामदेव बाबांनी फुडपार्कची घोषणा केली, ती पुढे कार्यांन्वयीत केली तर त्यात काय चुकलय ? https://en.wikipedia.org/wiki/Multi-modal_International_Cargo_Hub_and_A… गेल्या दहा वर्षांत ३ लाखाच्यावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या , त्या वर काँग्रेस सरकारने ८००० कोटीच पॅकेज आणल होत. ती पॅकेज ची रक्कम कुठे गेली किती पर्यंत शेतकर्यां पर्यंत पोहोचली ? पण त्या नंतरही आत्महत्या काही थांबल्या नाहीत. आता रामदेव बाबांच्या प्लान प्रमाणे मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्क डेवलप करणार असतील, या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार असेल, पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार असेल. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केलेला असेल , तर त्यात वाईट काय आहे. ह्या फुडपार्क मध्ये तयार झालेल प्रोडक्ट लोकांनी विकत घेवो अथवा न घेवो फुडपार्क मध्ये काम करणार्यांना वेतन / मोबदला मिळेलच, ज्या पद्धतीने पतंजली प्रोडक्टस मार्केट मध्ये पसंतीस उतरत आहेत त्या प्रमाणे हा प्लान यशस्वी होण्याची शक्यताच जास्त आहे. मग लोकांच्या पोटात का दुखत आहे ? देशातील १/३ जनता राईच तेल रोजच्या जिवनात वापरते, ते तेल बनवताना राईच्या तेलाचा जास्तीत जास्त भाग काढण्यासाठी स्वस्त सॉल्वेंटचा वापर केला जातो. हे सर्वच तेल बियांच्या एकस्ट्रेकशन प्रोसेस मध्ये होत. अश्या तेलात ह्या खरतनाक सॉल्वेंटचा अंश रहातोच. हे सॉल्वेंट शरिरासाठी खतरनाक असतात. तेल काढण्याची प्रोसेस फिसिबल व्हावी म्हणुन स्वस्तातले सॉल्वेंटचाच वापर होत असतो. त्याच विरोधात राम देव बाबानी कच्चे घानीका राईका तेल बाजारात आणल. त्या तेलाच उत्पादन हे पारंपारीक घाण्यापासुन होत. फक्त ही घाणी बैल न चालवता इलेक्ट्रीक मोटर चालवते. मग लोकांची पसंती अश्याच पारंपारीक तेलालाच असणार !! आमच्या ईथे अजुनही गावावरुन शहरातल्या घराकडे येताना घरच (घाण्याच) नारळाच तेल आणण्याची प्रथा आहे. राम्देव बाबाच्या प्रोडक्ट मध्ये राईच घाण्यावरच तेल मिळत, हे तेल देशातील १/३ जनता वापरते

In reply to by क्षमस्व

राईच तेल आमी हिवाळ्यात वापरतो ..अंग मालीश साठी.. मोहरी तेल उष्ण असल्यामुळे त्यात 2 /3 खोबरेल तेल वापरावे. . अवांतर-एका कवितेतले शब्द आठवले.. "याल पुढे तर उडविन चिंधड्या राई राई एवढ्या.."

In reply to by डँबिस००७

अगदी योग्य ते बोललात . सॉलव्हन्ट एकस्ट्रक्शन प्लांट मध्ये तेल बियांतील तेल काढण्या साठी जे केमीकल वापरण्यात येतात ती प्राणिमात्रा साठी फारच घातक असतात . कार्बन टेट्रा क्लोराईड या सारखी ती केमिकल्स असतात . याचेच पुढचे व्हर्जीन क्लोरोफॉर्म जे माणसास ऑपरेशनच्या वेळी दिले जाते .या मालाच्या पोत्या समोर जरी उभारला तरी डोळ्यातून घळा घळा पाणी येते . या हि पुढे जाऊन तेल काढलेल्या बिया कि ज्यांच्यात तेल फक्त ०. ५ ते १ % शिल्लक राहते कि ज्या वाळू प्रमाणे असतात त्याचा उपयोग लोक पशुखाद्यात त्याची किंमत कमी करण्यासाठी म्हणून ( फिलर ) वापरतात . यामुळे दुधाचे फॅट पण कमी होते व जनावरांना निकृष्ट प्रतीचा व विषारी खुराक मिळतो

In reply to by Sanjay Uwach

जे केमीकल वापरण्यात येतात ती प्राणिमात्रा साठी फारच घातक असतात . कार्बन टेट्रा क्लोराईड या सारखी ती केमिकल्स असतात . याला कुठलाही आधार नाही. साधारण सर्वत्र सॉल्व्हंट एक्सट्रॅक्षन साठी n हेक्झेन आणि थोड्या प्रमाणात आयसो हेक्झेन यांचे मिश्रण वापरले जाते. हे द्रावक ६० अंश तापमानाला उडून जातात.(पेट्रोल सारखे) आणि त्यामुळे शरीराला अपाय होतो असे गेल्या ५० वर्षात सिद्ध झालेले नाही. हेक्झेन हे द्रवरूप असल्याने ते पोत्यातून अने शक्य नाही तेंव्हा कोणत्या पदार्थामुळे आपल्या डोळ्यातून घळा घळा पाणी आले ते आपण ठरवा. मुळात कार्बन टेट्रा क्लोराईड किंवा क्लोरोफॉर्म हेहि गोड वासाचे "द्रव" आहेत तेल काढलेल्या बिया कि ज्यांच्यात तेल फक्त ०. ५ ते १ % शिल्लक राहते कि ज्या वाळू प्रमाणे असतात त्याचा उपयोग लोक पशुखाद्यात त्याची किंमत कमी करण्यासाठी म्हणून ( फिलर ) वापरतात . यामुळे दुधाचे फॅट पण कमी होते व जनावरांना निकृष्ट प्रतीचा व विषारी खुराक मिळतो . उरलेल्या बियांत प्रथिने शिल्लकच राहतात आणि ती जनावरांना खुराक म्हणून वापरतात ती मुळीच निकृष्ट दर्जाची नाहीत. उदा. शेंगदाण्याची पेंड हि मानवी बालकांना पौष्टिक आहार म्हणून वापरली जाते मग जनावरांना का नाही? यात ४१% प्रथिने असतात शिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. http://www.medindia.net/calories-in-indian-food/common_foods/nuts_and_o… बाकी कोणतीही वस्तू ऑरगॅनिक म्हणजे चांगली असे समजणाऱ्या लोकांना आपले उत्पादन विकण्यासाठी बाबा रामदेव यांनी "कच्ची घानी का तेल" विकायला सुरुवात केलेली आहे. त्याला हा मुलामा आहे. कोणीही स्वस्त आणि खतरनाक सॉल्व्हंट वापरत नाही. असे सिद्ध करून दाखवा.कारण असा स्वस्त आणि खतरनाक सॉल्व्हंट वापरला तर तेल लवकर खराब होईल आणि त्याला वास लागेल. यांनतर कोणीही त्या कंपनीचे तेल कधीही विकत घेणार नाही. हे सर्व बाबा रामदेव यांनी केलेला अपप्रचार आहे. आपले प्रतिसाद हे द्वेषमूलक आणि अज्ञानजन्य आहेत असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

http://articles.economictimes.indiatimes.com/2016-06-02/news/73493160_1… दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले उत्पादन विकण्याची हि वृत्ती पतंजलीने सोडून द्यावी आणि स्वतःच्या उत्पादनांच्या दर्जावर बाजारपेठ मिळवावी. अन्यथा दूरगामी परिणाम चांगले होणार नाहीत.

In reply to by सुबोध खरे

डोळ्यातून घळा घळा पाणी आले हे पोत्यातील एक्स.प्लाट मधुन आलेल्या बिया संदर्भात लिहिलेले आहे . रसायन संदर्भात नाही,

Baba Ramdev’s Patanjali to set up food park at MIHAN http://indianexpress.com/article/india/india-news-india/baba-ramdevs-pa… Yoga guru Ramdev sets up mega food park in Nagpur http://gulfnews.com/news/asia/india/yoga-guru-ramdev-sets-up-mega-food-… विकासने दिलेले आकडे बरोबरच आहेत !!

३ लाख शेतकरी आत्महत्या करताना काँग्रेसच्या लोकांनी जे दहा वर्ष उग्र चिंतन केलेल होत त्या पुढे ह्या सरकारचे, रामदेव बाबाचे हे प्रयत्न म्हणजे पर्वतासमोर तिळ !! ३ लाख शेतकरी बंधु आत्महत्या करताना सुद्धा ज्यांच्या पापण्या ओलावत नाहीत त्यांच्याकडुन आणी काय अपेक्षा करणार !!

रामदेवबाबा बहुराष्ट्रीय कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहेत. टूथपेस्ट, बिस्किटे, नूडल्स, शांपू इ. रोजच्या ग्राहकोपयोगी वस्तू स्वतः तयार केल्यामुळे या कंपन्यांच्या स्वतःच्या उत्पादनाच्या विक्रीवर नक्कीच परीणाम होणार. काहीतरी खुसपटे काढून नेस्ले, युनिलिव्हर इ. बहुराष्ट्रीय कंपन्या रामदेवबाबा किंवा ते सुरू करीत असलेले किंवा सुरू असलेले उद्योगधंदे गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.

कुणाचा का असेना, नवीन रोजगार व शेतकरी यांच्या साठी एक स्तुत्य प्रकल्प, चायनीज मालाला देखिल असाच कांहीतरी पर्याय निघायला हवा.

In reply to by Sanjay Uwach

बहु राष्ट्रीय कंपन्याचे टमाटो प्युरी सोडून कुठल्या हि देशी कंपनीची घ्या. निदान चायनीज टमाटो प्युरी तरी बाजारातून दूर होईल.

कालची रात्र २०११ .... बाबा सलवार घालून पळाले होते. ( असं व्हाट्सपवर आलं)

In reply to by चंपाबाई

चंपा ताई शिवाजी सुद्धा वेश बदलून पळाले होते. देशात होणारी नवीन कृषी क्रांती व ग्रामीण जनतेचा विकास तुम्हाला दिसत नाही फक्त एवढेच. आपल्या बंजर भूमीत ओलेविरा लाऊन राजस्थानचा एक शेतकरी कोट्याधीश झाला हि बातमी कदाचित ऐकली असेल.

In reply to by विवेकपटाईत

देशात होणारी नवीन कृषी क्रांती व ग्रामीण जनतेचा विकास तुम्हाला दिसत नाही फक्त एवढेच. आपल्या बंजर भूमीत ओलेविरा लाऊन राजस्थानचा एक शेतकरी कोट्याधीश झाला हि बातमी कदाचित ऐकली असेल.
याचा आणि बाबा रामदेव यान्चा काय सम्बध ??

आत रामदेव बाबा ''परीधान'' या नावाने स्वदेशी जीन्स पॅन्ट बाजारात आणणार आहेत,भारतीय महिला सलवारी ऐवजी जीन्स वापरणार.

पण त्याला एखाद्या योग्याच्या दयाबुद्धीचा मुलामा देण्याची काहिच गरज नाहि. तसंही शेतकर्‍यांची समस्या दयाबुद्धीने सोडवण्याचा आटापिटा करण्यामुळेच जास्त चिघळली आहे.

ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते ७०% दुध हे युरीया व साबणापासुन बनवलेल असत त्या देशात तेल बियांपासुन तेल काढायला चांगले व महाग सॉल्व्हेंटस वापरले जातील ? बर तेल ईथे भारतात ईतक्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणीत पॅकेज मध्ये न विकता लुज मध्ये विकल जात त्यावर क्वॉलिटीचा कोणता मार्क असतो ? ईतक करुन जर रामदेव बाबा कच्चे घानी का तेल हे संपुर्ण तेल बियातुन काढलेल्या तेला पेक्षा स्व स्त विकत असेल तर ते जनतेच्या फायद्याच आहे. शिवाय जर पतंजली तेलात सॉल्व्हेंटसचा अंश ही नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे ना ? १९६० सालाच्या दरम्यान भारतात डालडा नावाच्या वनस्पती तुपाची सुरुवात झाली, गाईच्या साजुक तुपाला स्वस्त पर्याय म्हणुन ह्या हॅड्रोजनेटेड तुपाची योजना होती. वनस्पती तेलालाच प्रोसेस करुन तुप सदृष्य स्वरुप दिलेल होत. गरीब लोक जे तुप वापरु शकत नव्हते ते ह्या नविन तुपाचा आस्वाद घेऊ लागले. भारताची तिन चार पिढी ह्या तेलामुळे बिमार झाली.

In reply to by डँबिस००७

देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते ७०% दुध हे युरीया व साबणापासुन बनवलेल असत त्या देशात तेल बियांपासुन तेल काढायला चांगले व महाग सॉल्व्हेंटस वापरले जातील ^^^ वरील दोन्ही विधानास सिद्ध करणारे पुरावे आपल्याकडे आहेत का?

In reply to by विशुमित

पुरावे कशाला पाहिजेत, ;) Nddb च्या मते 2014-15 चे दूध उत्पादन सुमारे दीडशे करोड टन आहे, ह्यातले 60 टक्के दूध म्हणजे 90 करोड टन साबण व युरिया पासून बनवतात, इथल्या शंभर मिपाकरांपैकी 60 जणांच्या घरी साबण-युरिया चे दूध येते, किंवा 1 लिटर दुधात 600 एमेल साबण-युरिया असतो, पेढे-खवा, गुलाबजाम सगळे साबण युरियापासून बनते. ;)

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब हे जरा जास्त झाले. दुधात २-३ टक्के युरियाची मात्रा निर्धारित आहे. त्याहून जास्त असेल तरी अमूल, मदर डेरी इत्यादी विकत घेणार नाही. (बाजारात मिळणार्या खुल्या दुधा बाबत काही सांगता येत नाही) एवढे मात्र आहे, पशु खाद्यात १% युरिया खाद्य बनविणाऱ्या कंपन्या टाकू शकतात. शिवाय आपल्या देशात पशु चारा इत्यादीचे जास्त उत्पन्न घेण्यासाठी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या शिवाय आपल्या हि खाद्य पदार्थात युरिया हा जास्त असतोच. इथेही पतंजली युरिया रहित पशु चारा बाजारात आणते आहे. बहुतेक सुरुवात होऊन हि गेली असेल.

In reply to by विवेकपटाईत

पटाईतसाहेब, नक्की काय जास्त झाले ते सांगाल काय? १. डँबिसराव म्हणतायत ह्या देशात ६०-७० टक्के दूध युरिया-साबणापासून बनवतात. २. तुम्ही म्हणताय दुधात २-३ टक्के युरिया निर्धारित आहे. नक्की कोण खरं बोलतंय व त्याला आधार आहे का?

In reply to by संदीप डांगे

प्राण्यांच्या( आणि मानवी ) रक्तात युरिया हा उत्सर्जनाचा पदार्थ( waste product) असतो तो काही प्रमाणात दुधात नैसर्गिक उतरतो. हि मात्रा ७० ppm किंवा ७० मिग्रॅ/ १०० मिली पेक्षा जास्त नसावी. यापेक्षा जास्त मात्रा असेल तर ती दुधातील भेसळ समजावी. Urea is a natural constituent of milk and it forms a major part of the non-protein nitrogen of milk. Urea concentration in milk is variable within herd. Urea content in natural milk varies from 20 mg/100 ml to 70 mg/100 ml. However, urea content above 70 mg/100 ml in milk indicates milk containing ‘added urea’. http://www.fssai.gov.in/Portals/0/Pdf/Draft_Manuals/MILK_AND_MILK_PRODU…

In reply to by संदीप डांगे

अहो पटाईत काकांचा तांत्रिक अभ्यास नसावा . खाली डॉक्टर साहेबांचा प्रतिसाद वाचा . पटाईत म्हणत आहेत ते 2 -3 टक्के युरिया म्हणजे 20000 ते 30000 ppm. याच्या एक दशांश जरी युरिया दुधात असेल तरी कुठली डेरी उभी करणार नाही. Animal फीड मधला युरिया व दुधातला युरिया या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फार तांत्रिक होईल म्हणून इथे जास्त लिहित नाही.

In reply to by A.N.Bapat

वर दोन विधाने आहेत, एक डँबिस यांचे दुसरे पटाईत यांचे, दोन पैकी कोणतेही एक खरे असणार की नाही? डॉक्टरांनी दिलेल्या लिन्कनुसार काही वेगळेच सत्य पुढे येत आहे. अशात डँबिस यांचे "६५-७० टक्के युरिया-साबण पासून बनवलेले दूध" ह्यावर मी आक्षेप घेतोय तर पटाईतसाहेब हे जरा जास्त झाले असे मलाच म्हणत आहेत. इ का हो रहा है भैय्या?

In reply to by संदीप डांगे

ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते ७०% दुध हे युरीया व साबणापासुन बनवलेल असत
मला वाटतंय ह्या विधानाचा अर्थ दुधात ७०% युरिया असा नसून, ६५ ते ७०% दुधामध्ये काहीना काही भेसळ असते असा होतो. खालील बातमी पहा सरकार ने संसदेमध्ये हे कबुल केलाय कि ६८% दुध हे सरकार ने ठरवून दिलेली standard पाळत नाहीत. बातमी

In reply to by अमितदादा

मग खालील वाक्याचा अर्थ कसा लावावा? दुधात २-३ टक्के युरियाची मात्रा निर्धारित आहे. त्याहून जास्त असेल तरी अमूल, मदर डेरी इत्यादी विकत घेणार नाही हा विषय नाजूक आणि महत्त्वाचा आहे. असे असेल तर मुलांना दूध देणे बंद करायला लागेल.