✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चांदोबा बाबत परत एकदा

ग
गिड्डे यांनी
Fri, 09/02/2016 - 15:25  ·  लेख
लेख
नमस्ते मित्रांनो मी काही दिवसापुर्वी सर्व चांदोबा माझ्याकडे आहेत म्हणून एक पोस्ट टाकली होती . टाकताना असे वाटले की कोण वाचणार आणि कोण आजकाल वाचतो पण मित्रांनो सुरेख प्रतिसाद मिळाला भरपूर जणानी तर मला वैयक्तिक मेसेजेस केले. कौतुक केले की तुम्ही हा ठेवा जपून ठेवलाय म्हणून आनंद वाटला आणि जुने लहानपणीचे दिवस आठवले काय क्रेज होती त्यावेळेस असे साहित्य वाचनाची कॉमिक्स म्हणा चंपक चांदोबा आणि इतरही भरपूर भा रा भागवताचे फास्टर फेणे तर पर्वणीच असायची माझ्या मित्राकडे एक एरावत हत्ती आणि इंद्र हे पुस्तक होते त्याच्या मी किती मागे लागलो होतो की मला एकदा दे वाचायला मी तुला लगेच परत देइन पण त्याने ते दिले नाही मी आतापर्यंत त्याला कधी विषय निघाला तर म्हणतो साल्या मला तु पुस्तक दिले नाहीस बरका अजुन तो हसतो पण मित्रांनो आजकालची मुले पाहीली तर त्याना एकतर इंग्रजी माध्यामातील असल्याने मराठी पुस्तकेच वाचता येत नाही मुळात पुस्तक वाचनाची गोडीच नसते त्यांच्यात आइ वडीलच लावत नाहीत म्हणा ना इथे पोस्ट केल्यानंतर काही जणानी असे म्हणले की तुम्ही काय तुमच्या कडील पुस्तकांची जाहिरात करताय काय मला त्याना असे सांगायचे आहे की मला फक्त एकच वाटायचे की आपल्याप्रमाणे कोणा कोणाला चांदोबा इ माहीत आहे खरेतर मुळात चांगल्या वाचकाची सुरवात ही त्यांच्या लहानपणापासूनच सुरु होतेपण आज काल पूर्वीसारखे कसदार बालसाहित्यच निर्माण होत नाही असेल तर ते वाचकापर्यंत पोहचतच नाही यासाठी काहीतरी करायला हवे असे वाटत नाहीका

Book traversal links for चांदोबा बाबत परत एकदा

  • ‹ जुने चान्दोबा मासिक परत
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4785 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

चांदोबा बाबत परत एकदा

जयन्त बा शिम्पि
गुरुवार, 09/08/2016 - 08:12 नवीन
मिपा वर " बाल विभाग " सुरु करुन त्यावर तुम्हीच कथांचे अनुवाद टाका, म्हणजे मी सुद्धा चांदोबातील अनुवादीत कथा टाकीन. माझ्याकडे सुद्धा काही मोजके अंक आहेत .
  • Log in or register to post comments

मी पण अनुवादित बाल कथा टाकीन

मितान
गुरुवार, 09/08/2016 - 09:45 नवीन
मी पण अनुवादित बाल कथा टाकीन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि

यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न

एस
गुरुवार, 09/08/2016 - 17:00 नवीन
यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न (लोकसभेप्रमाणे) विचारावा वाटतो की मराठी आंतरजालाचे बालसाहित्यात कितपत योगदान आहे? नसेल तर ते वाढविण्यासाठी संस्थळे काय उपक्रम राबवत आहेत?
  • Log in or register to post comments

हे एक मला माहीत आहे:

आदूबाळ
गुरुवार, 09/08/2016 - 18:30 नवीन
हे एक मला माहीत आहे: http://aisiakshare.com/brbind
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लिंकवर गेलो आणी वरच्या

अभ्या..
Sat, 09/10/2016 - 12:32 नवीन
लिंकवर गेलो आणी वरच्या बाजूलाच पॉर्न ओके प्लीज दिसले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बालसाहित्याबद्दल पटकन लक्षात

यशोधरा
Sat, 09/10/2016 - 14:58 नवीन
बालसाहित्याबद्दल पटकन लक्षात येईल असे काही दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मायबोली ह्या संस्थळावर लहान

यशोधरा
Sat, 09/10/2016 - 15:01 नवीन
मायबोली ह्या संस्थळावर लहान मुलांसाठी छोटे छोटे उपक्रम घेतले जातात, परंतु मुद्दाम बालसाहित्याविषयी काही उपक्रम सातत्याने राबवले आहेत असे कोठेही दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मुळात आंतरजालाने लहान मुलांसाठी काही करावं

बोका-ए-आझम
Sat, 09/10/2016 - 20:13 नवीन
अशी परिस्थिती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अशी परिस्थिती आहे का?

धर्मराजमुटके
Sat, 09/10/2016 - 22:08 नवीन
मुळात मराठी आंतरजालावर वावरणार्‍यांची तसेच फेस्बुकीय आणि व्हॉट्सपीय बोधामृत पाजणार्‍या आणि ते श्रद्धेने पिणार्‍यांची संख्या अजून प्रचंड मोठी आहे. ही जनता बुद्धीने बाल्यावस्थेतच आहेत त्यामुळे शारीरीक नव्हे पण मानसिक बालबुद्धीवाल्यांसाठी नक्कीच काही करावं अशी परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

चांदोबा म्हणले की

सिरुसेरि
Sat, 09/10/2016 - 11:53 नवीन
चांदोबा म्हणले की भल्लुककेतु , पद्मपाद हि पात्रे आणी काशांचा किल्ला अशा कथा आठवतात .
  • Log in or register to post comments

आंतरजाल आणि बालसाहित्य या संदर्भात काही प्रश्न आहेत -

बोका-ए-आझम
Sat, 09/10/2016 - 20:12 नवीन
१. बालसाहित्य म्हणजे कोणता वयोगट घ्यायचा? २. या वयोगटातील मुलांनी इंटरनेट पाहणं ही जोखीम आहे असं साधारणपणे मत आहे, कारण मुलं बालसाहित्य पाहता पाहता इतरही अनेक त्यांच्यासाठी नसलेल्या गोष्टी पाहू शकतील. त्याचं काय? ३. इंटरनेट म्हणजे प्रामुख्याने मोबाईल, टॅब आणि काँप्युटरवर. मुलांच्या डोळ्यांना त्रास होणारच. त्याचं काय? ४. मुलं खेळत नाहीत अशी तक्रार पालक करतात. इंटरनेटवर बालसाहित्य देऊन आपण त्यांच्या न खेळण्याला अजून खतपाणी घालतोय असं मला वाटतं. काय म्हणता?
  • Log in or register to post comments

मुलांनी इंटरनेट पाहत बसायला

यशोधरा
Sat, 09/10/2016 - 20:21 नवीन
मुलांनी इंटरनेट पाहत बसायला हवे असे नाही. समजा, लहान मुलांसाठी चांगल्या कथव, शात्रीय माहिती वगैरे काही साहित्यब्नेट्वरुन प्रसारीत होत असेल तर प्रिंट देऊ शकतो की वाचायला. हो, पुस्तके आहेत हे ठाऊकच आहे, पण हे पुरवणी समजूयात. चांगल्या माहितीपर डॉक्यूमेंटरीज वगैरे पहायला उपयोग करु घेऊ शकतो नेटचा. नेट म्हटले तर सुविधा आहे, म्हटले तर व्यसन. कसे वापरु त्यावर अवलंबून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ही फार आदर्श परिस्थिती आहे यशोतै.

बोका-ए-आझम
Sat, 09/10/2016 - 21:11 नवीन
प्रत्यक्षात असं होईल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नाही, नॉट रिअली. हे करु शकतो

यशोधरा
Sat, 09/10/2016 - 21:20 नवीन
नाही, नॉट रिअली. हे करु शकतो बर्‍यापैकी सहजपणे, निदान काहीजण तरी. मात्र ह्या अ‍ॅक्टीव्हीटीज लहान मुलां'सोबत' पालकांना कराव्या लागतात ,इतकंच :) म्हणजे दिली आहे डॉक्यु लावून आणि मी चाललेय माझं काम करायला, ऐसा नही जमेगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा