नमस्ते मित्रांनो
मी काही दिवसापुर्वी सर्व चांदोबा माझ्याकडे आहेत म्हणून एक पोस्ट टाकली होती . टाकताना असे वाटले की कोण वाचणार आणि कोण आजकाल वाचतो
पण मित्रांनो सुरेख प्रतिसाद मिळाला भरपूर जणानी तर मला वैयक्तिक मेसेजेस केले. कौतुक केले की तुम्ही हा ठेवा जपून ठेवलाय म्हणून
आनंद वाटला आणि जुने लहानपणीचे दिवस आठवले काय क्रेज होती त्यावेळेस असे साहित्य वाचनाची कॉमिक्स म्हणा चंपक चांदोबा आणि इतरही भरपूर भा रा भागवताचे फास्टर फेणे तर पर्वणीच असायची माझ्या मित्राकडे एक एरावत हत्ती आणि इंद्र हे पुस्तक होते त्याच्या मी किती मागे लागलो होतो की मला एकदा दे वाचायला मी तुला लगेच परत देइन पण त्याने ते दिले नाही मी आतापर्यंत त्याला कधी विषय निघाला तर म्हणतो साल्या मला तु पुस्तक दिले नाहीस बरका अजुन तो हसतो
पण मित्रांनो आजकालची मुले पाहीली तर त्याना एकतर इंग्रजी माध्यामातील असल्याने मराठी पुस्तकेच वाचता येत नाही मुळात पुस्तक वाचनाची गोडीच नसते त्यांच्यात
आइ वडीलच लावत नाहीत म्हणा ना
इथे पोस्ट केल्यानंतर काही जणानी असे म्हणले की तुम्ही काय तुमच्या कडील पुस्तकांची जाहिरात करताय काय मला त्याना असे सांगायचे आहे की मला फक्त एकच वाटायचे की आपल्याप्रमाणे कोणा कोणाला चांदोबा इ माहीत आहे
खरेतर मुळात चांगल्या वाचकाची सुरवात ही त्यांच्या लहानपणापासूनच सुरु होतेपण आज काल पूर्वीसारखे कसदार बालसाहित्यच निर्माण होत नाही असेल तर ते वाचकापर्यंत पोहचतच नाही यासाठी काहीतरी करायला हवे
असे वाटत नाहीका
वाचने
4795
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांदोबा बाबत परत एकदा
मी पण अनुवादित बाल कथा टाकीन
In reply to चांदोबा बाबत परत एकदा by जयन्त बा शिम्पि
यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न
हे एक मला माहीत आहे:
In reply to यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न by एस
लिंकवर गेलो आणी वरच्या
In reply to हे एक मला माहीत आहे: by आदूबाळ
बालसाहित्याबद्दल पटकन लक्षात
In reply to हे एक मला माहीत आहे: by आदूबाळ
मायबोली ह्या संस्थळावर लहान
In reply to यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न by एस
मुळात आंतरजालाने लहान मुलांसाठी काही करावं
In reply to यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न by एस
अशी परिस्थिती आहे का?
In reply to मुळात आंतरजालाने लहान मुलांसाठी काही करावं by बोका-ए-आझम
चांदोबा म्हणले की
आंतरजाल आणि बालसाहित्य या संदर्भात काही प्रश्न आहेत -
मुलांनी इंटरनेट पाहत बसायला
In reply to आंतरजाल आणि बालसाहित्य या संदर्भात काही प्रश्न आहेत - by बोका-ए-आझम
ही फार आदर्श परिस्थिती आहे यशोतै.
In reply to मुलांनी इंटरनेट पाहत बसायला by यशोधरा
नाही, नॉट रिअली. हे करु शकतो
In reply to ही फार आदर्श परिस्थिती आहे यशोतै. by बोका-ए-आझम