पुस्तकांचं एक वेगळं, स्वतःच असं जग आहे हे सगळ्यांना ठाउक आहे. पण या पुस्तकांत सुद्धा एक त्याचाच भाग असलेलं पण तेवढचं स्वतंत्र अस एक जग असतं ते म्हणजे 'अर्पणपत्रिका'...
मनात वाटलं या अर्पणपत्रिका, हे जग एकत्र आणलं तर...
बस या एका विचाराने हा धागा काढला आहे...
मला भावलेल्या आवडलेल्या काही अर्पणपत्रिका मी इथे देत आहे...
आपणही या संग्राहात हातभार लावावा अशी विनंती...
अर्पणपत्रिका म्हटलं कि सगळ्यात पहिल्यांदा मला जी.ए. आठवतात..
म्हणुन सुरुवात त्यांच्याचकडुन..
‘हिरवे रावे’ हा कथासंग्रह आपल्या आईला अर्पण करताना जी.ए. म्हणतातः
कै. तीर्थरूप ताईस,
रात्री उशीरा घरकाम करताना
तुला सोबत व्हावी म्हणून
लहनपणी मला समोर बसवून
तू पुष्कळ कथा सांगितल्यास
आता तू गेल्यावर
मला त्या कथांची सोबत आहे
याच जी.ए.ची मला अत्यंत आवडलेली अर्पणपत्रिका...
त्यांच्या ‘रक्तचंदन’ या कथासंग्रहातुन...
स्पर्धेच्या धुंदीत आपल्या हातानी आभाळात सोडलेली, पण जिचा मृत्यू असहायपणे खालून पहावा लागला ती गुलाब पाकळ्यांच्या चोचीची चंद्रावळ, मघापर्यंत उत्साहाने पाऊल स्थिर न ठेवणारा पण आकस्मिक वेदनेने तडफडत ओंजळीत निपचिप झालेला, माणके बसवलेल्या कवडशाप्रमाणे दिसणारा लाल डोळ्यांचा पिवळा पक्षी, अजाण संतापाने पाठीवर सपासप वेत मारल्यावरही ते वळ अंगावर घेऊन आपुलकीने अंगाला अंग घासू लागणारी क्षमाशील कृष्णी गाय, आपल्या वासाने पहाट ओली करणारा, पण घरबांधणीच्या वेळी तो काढून टाकायचे ठरताच त्याआधीच दोनचार दिवस आपण होऊन मूकपणे आडवा झालेली पारिजातक, जत्रेमधील फिरते चक्र मला पहायला मिळावे म्हणून मला खांद्यावरून सात मैल घेऊन जाणारा लंगडा हाडकातडी म्हातारा बसलिंग, ‘कसा पोट जाळतो बघा’ असे आईने म्हणताच ताडकन पानवरून उठून तीन मजली बारा खणी घरातून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडून शेवटपर्यंत एकवस्त्री रहाणारा, लाकडे फोडून पोट भरत असता अर्ध्या गावाला जातिवंत मोत्यांची पारख सांगणारा आणि शेवटी एका धर्मशाळेत शेजारे कुऱ्हाड ठेवून संपून जाण्यापूर्वी मला साबणाचे फुगे कसे करायचे हे शिकवून जाणारा दत्तू इनामदार, आतड्याच्या चोवीस माणसांचे मृत्यू डोळ्यांनी पाहिलेली, आता उरलेल्या दोनचार जिव्हाळ्याच्या माणसांना तरी आपल्या प्रेमापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्याप्रमाणे मलाही हिडीसफिडीस करण्याची केविलवाणी धडपड करणारी काकाची आई, ‘अरेबियन नाईटस’ मला प्रथम वाचायला देणारा, फुटबॉल खेळण्यासाठी जीव टाकणारा, पण एका अपघातात नेमके दोन्ही पाय गमवून घेतलेला भागिरथ देशपांडे, माझ्या आयुष्यातील पहिली पूर्ण लांबीची शिसपेन मला देणारा रुद्राप्पा बेलीफ, स्वतः निरक्षर असूनदेखील मी खूप शिकावे असे दत्ताजवळ सतत मागणे करणारी, मे पहिलीची परीक्षा पास होताच पै पै जमा केलेले पुष्कळसे पैसे खर्च करून पेढे वाटणारी. ठीकठीकाणी वार लावून जेवणारी, आणि एक दिवस अचानक नाहीशी झालेली, कापऱ्या अंगाची, तोतरी, अनाथ, वेडसर रखमाकाकू यांस….
तुम्ही सगळेच जण पुढे निघून गेलात. मी तुमच्याकडे येईन, पण आता तुम्ही मात्र माझ्याकडे कधी येणार नाही. आपण पुढे पुन्हा कधीतरी भेटू.
आता सुशींचा नंबर..
जी.ए. नंतर कुणी उत्तम अर्पणपत्रिका लिहिल्या तर फक्त सुशींनी..
कोवळीक २ री आवृत्ती -
चार वर्षांच्या अल्पावधीत ज्यांनी सहस्र करांनी अनुभवाचं विश्व उधळलं-त्या, बी.एम्.सी.सी. मधल्या समृद्ध क्षणांना!- रोल नं, वन-फोर-सेव्हन, टी.वाय्. 'बी'
मधुचंद्र'-
विश्वामित्र पाहत असताना 'मेनके' च्या ज्या प्रथम दर्शनाने मला ही कल्पना सुचली, त्या दर्शनाला-अर्थात, 'भानुप्रिया' ला ही, नित्या क्षणी माझ्यासकट सर्वांचाच 'विश्वामित्र' करणाऱ्या सर्व यशस्वी कला-तंत्रज्ञांनाही !
आणि काही दिवसांपुर्वीच मिळालेली गुलझारंच्या 'पुखराज'मधली ही अर्पणपत्रिका..
गुलझार हा संग्रह आपल्या लाडक्या बोस्की अर्थात मेघना गुलझारला अर्पण करताना लिहितात...
नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए...
बस...माझ्याकडच्या या...एवढ्याच!!
वाट पाहतोय तुमच्या अर्पणपत्रिकांची...
- अनिरुद्ध
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5592
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
शंभरातील नव्व्याण्णंवास..
वाह!
अतिशय वेगळ्या विषयावरचा धागा.
छान धागा
या ठिकाणी नाव नसल्यास
हे भारीये!
In reply to या ठिकाणी नाव नसल्यास by इना
तसाच प्रसंग पडला तर मराठी
वेगळ्या विषयावरती सुंदर लेख
सदानंद रेगे: "वेड्या कविता" काव्यसंग्रहातून
भारी.. हे असं पण संकलन होऊ
मला आवडलेली आणि लगेच आठवलेली
गोलपिठा
अर्पणपत्रिका...
छान.
मस्त धागा
वाचते आहे..
अप्रतिम धागा. जी ए ची दुसरी
याच विषयावरचे
हटके धागा.
पुन्हा सुशि.
In reply to हटके धागा. by इनिगोय
_/\_ सुंदर धागा. डोळे वहायला
व.पु.काळे...
अप्रतिम धागा. मन आणि डोळे
माझ्या वडीलांच्या पुस्तकातील