मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गरमा-गरम कुर्मा (फोटोसह)

नीरजा · · पाककृती
साहित्य १. फ्लॉवर- १ वाटी २. बटाटा - १ ३. गा़जर - १ ४. टोमॉटो - २ ५. कांदा - २ ६. अलं-लसूण पेस्ट - एक चमचा ७.गरम मसला तेल, मीठ, तिखट, कोथिंबीर इ. गरम मसाला - एक चमचा धने, अर्ध चमचा जिरे, २/३ मिरी, २ लवंगा, दालचीनी तुकडा, सुक खोबरं छोटा तुकडा आणि एक चमचा तीळ+खसखस इ. तेल न घालता हलके परतुन घ्या. कृती : १. कांदा, टोमॉटो आणि गरम मसाला याची एकत्र पेस्ट करुन घ्या. २. तेल गरम झाल्यावर तिखट आणि वरील पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता. ३. बारीक चिरलेले फ्लॉवर, बटाटा आणि गाजर वरील मिश्रणात घालून शिजवा. ४. चवीनूसार मीठ घालून तयार कुर्म्यावर कोथींबीर घालून गरमा-गरम सर्व करा. हा कुर्मा, पुरी/पोळी किंवा भाता बरोबर छान लागतो.

वाचने 14979 वाचनखूण प्रतिक्रिया 21

समिधा Fri, 01/30/2009 - 02:40
छायाचित्र असते तर जास्ती आवडले असते. रेसिपी आवडली

समिधा Fri, 01/30/2009 - 02:42
छायाचित्र असते तर जास्ती आवडले असते. रेसिपी आवडली चुकुन २ दा प्रकाशित करा वर क्लिक झाले.

ज्योति Fri, 01/30/2009 - 16:40
कुरमा मस्तच आहे. यात घरचा काळा मसाला घातला तर चालेल का? की चवीत फरक पडेल?

In reply to by ज्योति

चकली Fri, 01/30/2009 - 19:47
काळा मसाला कुरमा भाजी साठी मला फारसा आवडत नाही. पण काळा मसाला + ओले खोबरे मुळे बदलेली चव कुरमा भाजी साठी नाही. चकली http://chakali.blogspot.com

अनंत छंदी Fri, 01/30/2009 - 16:45
चित्र का नाही पाककृतीचं? पुरीची पाकृ द्या की तेवढच इन्स्टंट कुर्मापुरी खाल्याचं समाधान.

रेवती Fri, 01/30/2009 - 19:37
कुर्म्याच्या कृतीबद्दल धन्यवाद! चित्र दिसले असते तर पाकृची चव आणखी वाढली असती, असो. वाटणाच्या मसाल्यात थोडी बडीशेप घातली तर चव छान येते असे ऐकले आहे. रेवती

दशानन Sat, 01/31/2009 - 13:46
>चित्र का नाही पाककृतीचं? पुरीची पाकृ द्या की तेवढच इन्स्टंट कुर्मापुरी खाल्याचं समाधान +१ हेच म्हणतो ! कोणी शिर्रकुर्मा कसा करावा ह्या बद्द्ल माहीती देऊ शकेल का :? *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

In reply to by दशानन

कोणी शिर्रकुर्मा कसा करावा ह्या बद्द्ल माहीती देऊ शकेल का =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम. मंडळ आपले आभारी आहे.......

In reply to by दशानन

शंकरराव Mon, 02/02/2009 - 20:26
कोणी शिर्रकुर्मा कसा करावा ह्या बद्द्ल माहीती देऊ शकेल का जनाबे अली हम भी शौकीन है शिर्रकुर्मा के शंकरकुर्मावाले (घराची स्वीट्स)

लिखाळ Sat, 01/31/2009 - 23:26
वा ! पाकृ आणि चित्र दोन्ही मस्त. लवकरंच करुन पाहिले पाहिजे.. -- लिखाळ.