Skip to main content

स्वादिष्ट आटा नूडल्स

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 04/09/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते. मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण मैदा वाले नूडल्सच्या जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा बाहेर पडला. घरात कांदे होते, टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले. फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील. एक हिरवी मिरची हि घेतली. सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले. आमचे चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला. गॅस वर पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली. गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले. आटा नूडल्स गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता.

वाचने 35418
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

मी खरं तर फक्त विसंगती दाखवून गप्प बसलो होतो. पण तुम्ही मला आव्हान देत गेलात. मी दुर्लक्ष केलं तर माझ्या खरडवहीत पोचलात. तेही दोन वेळा. जरा मागे जाउन भाषा बघा आपली- "आपण नीट वाचत नाही, यात माझा दोष नाही, वेड पांघरून पेडगावला जाणे, बालिश प्रतिसाद"! ही सभ्य माणसांची भाषा आहे का? "बादवे", "रोख कळला", वगैरे बोलून विषय संपला असं दाखवायचा प्रयत्न करू नका. एक तर आरोप सिद्ध करा/माफी मागा किंवा तुम्ही जे बोलता तसं वागत नाही- स्वतःला दुहेरी मापदंड लावता हे मान्य करा. जर वाद तडीला लावता येत नसतील तर इतर लोकांना वादाला भरीला घालू नका.

In reply to by असंका

ते सर्वज्ञ आहेत असा त्यांचा दावा आहेच. आपण दुसऱयांना वापरलेली भाषा ते विसरतात आणि दुसऱयांकडून मात्र माफीची अपेक्षा करतात.

In reply to by असंका

शिव शिव शिव, डांगेसाहेब असतांना मेगाबाईटी प्रतिसाद देण्याचे पाप केलेत, तेही त्यांच्याच प्रतिसादाला प्रत्युत्तर म्हणून? घोर अपराध!!!!प्रायश्चित्त घ्यावे लागेल!!! टाइम टू लिव्ह धिस प्लॅनेट!!!! ;)

In reply to by क्षमस्व

बस का? अहो ते क्रेडीट माझं नै हो... त्या प्रतिसादात माझी स्वतःची अशी वाक्य किती कमी आहेत बघा की ! मी तर फक्त त्यांना त्यांच्याच एक एक वाक्याची आठवण करून देत होतो. राहु दे ना मी इथे????

नूडलमुळे पाककृती आली। पाककृतीमुळे रामदेव बाबा आले।। बाबामुळे मार्केटिंग आली। मार्केटिंगमुळे डांगेसाहेब आले।। त्यामुळे जेपीभाऊ आले। जेपीमुळे माफी आली।। आणि मेगाबाईटी प्रतिसाद बनले।।। इतके अनर्थ एका नूडलने केले।।।।

नूडलमुळे पाककृती आली। पाककृतीमुळे रामदेव बाबा आले।। बाबामुळे मार्केटिंग आली। मार्केटिंगमुळे डांगेसाहेब आले।। त्यामुळे जेपीभाऊ आले। जेपीमुळे माफी आली।। आणि मेगाबाईटी प्रतिसाद बनले।।। इतके अनर्थ एका नूडलने केले।।।।

In reply to by क्षमस्व

जगी हीं भूमी, लोकसंख्या प्रचंड, नेस्टले ते हेरी,म्हणे करू व्यापार । आणिले त्यांचे प्रॉडक्त, साधेसुटसुटीत चविष्ठ, स्वस्त ते उपलब्ध आपुळ्याची दारी ।। जनांमध्ये याचाच बोलबाला, वाढतावाढे भेदिले नभाला, जवळपास कोणी नसे बा।। बंद डॉळा बाबाचा, आपोआप उघडे, पाहुनिया राशी धनाचिया ।। म्हणे तो स्वतःशी, गुंडाळू स्वदेशी,विसरून बोलबच्चन आपुलाची ।। उघडले दुकान, विके विदेशी जंजाळ, झाकीं स्वार्थ सारा, भगव्या आवरणी ।

नूडल्स दिसतायेत छान, पण पतंजलीच्या असल्याने पास!! हीच पाकृ हातवळणीच्या शेवया, गव्हले, शिरवाळ्या वापरुन करणेत येईल

आज सकाळी जेव्हा मी माझ्या कर्लऑनच्या गादीवर अंथरलेल्या रेमंडच्या सुती बेडशीट वरुन उठलो. थोडे आळोखेपिळोखे देत आजु बाजुला पाहिले तर रिलायन्सची उशी, उषाचे शिलाईमशीन, क्रॉम्पटन्चा पंखा, ऑलाऔट्चे मच्छर पळवायचे मशीन फिलीप्स ची इस्त्री नजरेस पडली. खाली पाय करुन जमिनीला टेकवावे म्हटले तर तिथे अ‍ॅक्शन्च्या रबरी सपाता, त्या पायात चढवुन सेराच्या वॉशबेसीन जवळ गेलो, कोलगेटच्या ब्रशवर पतंजलीची दंतकांती पेस्ट घेवुन, माझे अधिक पटेल डॉ. कडुन रुटकॅनल करुन घेतलेले २, असे सगळे दात खसा खसा घासले. नंतर डीमार्टमधुन आणलेल्या तांब्याच्या (ब्रांड माहित नाही माफी असावी) टंग क्लीनरने जीभ साफ केली. मग कोलगेट कंपनीच्या माउथवॉशने चुळ भरुन बाथरुमचा रस्ता धरला. जाताना टर्किश प्रकारचा टॉवेल ( ब्रांड माहित नाही माफी असावी) घेवुन गेलो. तिथे ठेवलेल्या मेडिमिक्स या साबणाने आंघोळ केली. मग बाहेर येवुन जॉकीचे अंतर्वस्त्र परिशान केले. पुन्हा टॉवेल गुंडाळुन मग चिनीमातीच्या कपात (ब्रांड माहित नाही माफी असावी) ताजमहाल या चहापावडर ने बनवलेला आणी अमुलचे शक्ती दुध टाकलेला चहा अमुलच्याच टोस्ट बरोबर घेतला.(साखर टाकली नाही आणी साखरेचा ब्रांडही माहित नाही माफी असावी). युनिफॉर्म घालुन (ब्रांड माहित नाही माफी असावी) त्यावर हायटेक कंपनीचे सेफ्टी शुज चढवुन ह्युंदाई च्या गाडीत बसुन स्वतः चालवत कंपनीत आलो. आणी हा प्रतिसाद लेनोव्हो नामक कंपनीच्या थिंकपॅड नामक लॅपटॉप वरुन देत आहे. बाजुलाच सोनीचा मोबाईल, कॅशिओचे घड्याळ, भिंतीवर कॅरियरचा एसी चालु आहे.

In reply to by इरसाल

एक नंबर!!! ह्याला म्हणतात प्रतिसाद!!! मनापासून आवडले __/\___

In reply to by इरसाल

इरसाल यांचा इरसाल प्रतिसाद प्रचंड आवडला.

ata यांनी मॅगी आटा नूडल्स खाल्ले असे लिहिले असते तरी त्यांच्यावर टीका झाली असती !

In reply to by कपिलमुनी

नाही वाटत असं.. मॅगी वर मागे बंदी असताना डांगेंचा धागा आलेला मॅगीच्या पुनरागमनाच्या जाहिरातीसाठी. तेव्हा कुणी असा आक्षेप नव्हता घेतला. तो इनडायरेक्ट जाहिरातीचा प्रकार नव्हता का?

विवेक पटाईत यांचे सर्व लेखन हे एक प्रकारच्या निरागस सहजपणातून केले गेलेले असते, त्यातून ते जाहिरातबाजी वगैरे करत असल्याचा आरोप अजिबात पटला नाही. अर्थात जाहिरात-क्षेत्रात कार्यरत असणारांना तसे वाटणे स्वाभाविक असले, तरी तसे इथे लिहीणे अनाठायी वाटले. डोक्यात एकाद्या विचाराची सणक आली की हाण प्रतिसाद .. यापासून स्वतःला वाचवणे श्रेयस्कर. इरसाल यांच्या इरसाल प्रतिसादाला पुन्हा एकदा नमन.

In reply to by चित्रगुप्त

मै सिर्फ और सिर्फ पतंजली के स्वादिष्ट आटा नूडल्सही खाती हूं, और वो भी पटाईतजीने बनाये हुए. .

In reply to by चित्रगुप्त

प्रत्येक शब्दाशी सहमत आहे, कुठेतरी माझ्याकडूनच गडबड झाली आणि विषयाला भलतेच वळण लागले, जे व्हायला नको होते, बिवेक पटाईत यांना दुखावण्याचा हेतू नव्हता, ते नेहमीच पतंजलीची पटणार नाही अशी भलामण करतात, पण ठीक आहे, तो त्यांचा चॉईस... माझ्याकडून पटाईत काकांची जाहीर क्षमा मागतो, पटाईत काका, लिहीत राहा! पुलेशु!!

In reply to by संदीप डांगे

प्रतिसाद आवडला... आपली चुक मान्य करण्यात काहीही कमीपणा नाही. आमच्याकडून आपल्याला एखादा वावगा शब्द गेला असल्यास आम्हीही क्षमस्व...!

विवेकजींनी केली ती जाहिरात हा आरोप आहे . ( कसे?) तूर्तास असे समजू की त्यांनी पातंजली कडून पैसे घेतले आता आम्ही असे म्हणू की आपण नेस्ले कडून पैसे घेऊन मुद्दाम पतंजली नूडल्स भंगार लागतात वगैरे reverse advertisement चालवली आहे. माझे मत : एक साधी पाककृती आहे त्यात केवळ पातंजली नूडल वापरल्या असे लिहिले म्हणून लगेच जाहिरात केली वगैरे आरोप करणे चुकीचे आहे. पाककृतीतील त्यांचा मूळ मुद्दा मैदा ऐवजी आटा नूडल वापराव्या हा आहे .

100

In reply to by चंपाबाई

तुम्ही बिस्कीटातला किडा दाखवताय,

इथे मिपातही किडे केले जातात आम्ही करतो ना दुर्लक्ष्य तुम्हीबी करा तक्रार किंवा दुर्लक्ष्य.


चित्र विचित्र प्रतिसाद वाचून आज पहिल्यांदा प्रतिसाद देण्याचे ठरविले. १. माझ्या पाककृतीचे नाव स्वादिष्ट आता नूडल्स आहे , यात कुठल्याही ब्रांडचे नाव नाही. २. वापरलेल्या पदार्थांचे नाव लोक देतात. त्यात काही गैर नाही. मैद्याचे नूडल्स म्हणजे मेगी नूडल्स सर्वश्रुत आहे. कणकीचे नूडल्स नवीन प्रकार आहे. म्हणून पतंजलीचे नाव दिले. (प्रत्येक व्यक्ती पाककृती मध्ये वापरलेल्या पदार्थांचे नाव किंवा त्यांचे चित्र देते, यात वागवे काय आहे उदा: स्वीट न स्पायसी एग्http://www.misalpav.com/node/37047. यावर जेपी साहेबांनी आक्षेप का नाही घेतला. कि कुणाच्या नावाची एलर्जी आहे म्हणून. ३. बाकी पदार्थ स्वादिष्ट बनविण्यासाठी त्यात कांदे, टमाटर, फ्रेंच बिन्स इत्यादी घातले होते. ४. मी आधी पदार्थ करून बघतो, खाऊन बघतो आणि मग रेसिपी टाकतो. जेपी साहेब तूर्त तरी पतंजलीचे आटा नूडल्स खाण्यासाठी तैयार बाजारात विकल्या जात नाही. आणि तुम्हाला रामदेव बाबांची एलर्जी असल्यामुळे तुम्ही घरात करणे हि शक्य नाही. अर्थात बिना खाता तुम्ही स्वादावर टिप्पणी केली आहे. ५. बाकी मैद्याच्या नूडल्स पेक्षा चांगल्या तेलात बनलेले कणकीचे नूडल्स जास्त पोष्टिक. माझ्या अधिकांश रेसिपी मध्ये मी पोष्टिकते वर जोर दिला आहे. मुलांना न आवडणाऱ्या भाज्या अधिकांश रेसिपी मध्ये वापरल्या आहेत. ६. बाकी काही वाचकांनी मूर्खता सारखे आरोप केले आहे, त्यांचे उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही.

In reply to by विवेकपटाईत

काका, खाया पिया कुछ नही, ग्लासा तोडा बारा आणा.. असो पण तुमच्या एका प्रतिसादाने दिन बना दिला. अवांतर - या धाग्यात जेवढ वेळेस माझ नाव आलय,तेवढ पंतजली आणी बाबा च आला नाय.जल्ला काय कलना.

In reply to by विवेकपटाईत

कणकेचे नूडल्स नवीन आहेत हे नवीन कळले, तसेच पतंजली आटा नूडल्स बाजारात नाहीत हे हि नवीन कळले, बाकी, रामदेव बाबाची ऍलर्जी असल्याने कोणाच्या घरात नूडल्स खाल्लेच गेले नाहीत हा कॉन्फिडन्स भारी!! तुम्ही नवीन नवीन धागे टाकत राहा, कोण मूर्ख ते वाचक बघून घेतील, तुम्हाला काही समस्या नाही! तुम्ही बेदाग आहात!!

In reply to by संदीप डांगे

बेदाग असण्यासाठी विशेष पावडर वापरावी. बाकी देशाच्या नुकसानीला फक्त राजकारणीच नाही,तर नोकरशहा पण तितकेच जबाबदार आहेत ..यावर माझा पुर्ण विश्वास बसला.!

In reply to by विवेकपटाईत

ह्याला म्हणतो बुआ मी लिखाणातला पॅटर्न!! पटतोय का बघा, अन हो ताकाला जाऊन भांडी लपवणे सुद्धा सापडेल ह्यातच :) बघा सापडले तर :)

माझा खायचा अनुभव सांगतो: पतंजली आटा नूडल्स अतिशय भंगार लागतात. आटा नुडल्स अतिशय भंगार लागतात ? कोणाशी कंपेर केल्यावर ? मॅगीच्या मैदा नुडल्स बरोबर ? बाजारात मिळणारे नुडल्स हे ईथुन तिथुन सारखेच असणार मग पतंजली नुडल्सच भंगार कसे काय ? जर तुम्ही मैदा नुडल्स व आटा नुडल्स अशी कंपॅर करत असाल तर ते चुकीच आहे. मैदा मु़ळातच चोकर (फाय्बर नसल्याने) आटाच्या मानाने स्वादात चांगला असतो, पण मैदा शरीराला अपायकारक आहे हे आता सिद्ध झालेल आहे. त्यामुळे जरी आटा नुडल्स भंगार लागत असतील तरी ते वापरायचे की मैदा नुडल्स वापरायचे हा तुमचा चॉईस आहे. जर नुडल्स ईथुन तिथुन सारखेच मग मॅगी मध्ये अस काय आहे जे पतंजली मध्ये नाही ? अर्थात एम एस जी म्हणजे चायनिज सॉल्ट किंवा अजिनोमोटो. ह्या पदार्थाला स्वताची काही चव नसते. अजिनोमोटोने जिभेवरचे टेस्ट बड्स अ‍ॅक्टीव्हेट होतात व त्यामुळे मुळातला सपक पदार्थ सुद्धा स्वादिस्ट लागतो.

In reply to by डँबिस००७

पतंजालिशिवाय कुणाचेच आटा नूडल्स नाहीत या भ्रमातून बाहेर या, तसेच हे कंपरीजन मैदा नूडल्स सोबत आहे हा तर्क कुठून?? बाजारात मिळणारे नूडल्स इथून तीतून सारखे हे कशावरून? बाकी, मला खायला काय व का आवडतं याचं स्पष्टीकरण द्यावे लागेल का? ;))

In reply to by संदीप डांगे

नूडला कणकेच्या असोत वा मैद्याच्या, प्रकृतीस चांगल्या नाहीतच. एकादेवेळी बदल म्हणून काहीही खावे, पण रोजच्या आहाराच्या बाबतीत जागरूक रहाणे आवश्यक. तसे बघितले तर सरसकट गव्हाच्या कोणत्याही पदाथांऐवजी ज्वारी, बाजरी आणि विविध धान्या-डाळींची भाजणी वापरणे जास्त चांगले. पोळी आठवड्यातून एक-दोनदा. बाकी दिवस भाकरी, थालिपीठ. आम्ही गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून हे करत आहोत, त्याचा अतिशय चांगला परिणाम होतो आहे. अमेरिकेत वगैरे 'फॅट फ्री' 'शुगर फ्री' नंतर हल्ली 'ग्लूटेन फ्री' आणि 'व्हीट फ्री' ची हवा चालली आहे. म्हणजे उच्चभू दुकानात ताजे गरमागरम टॉमॅटो सूप ठेवलेले असले तर तेही टॉमॅटोचे आहे हे खाली बारीक अक्षरात लिहिलेले आणि 'व्हीट फ्री' हे ठळक. अर्थात हे खरोखर अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असते हे खरे.

आम्हाला काय फरक पडत नसतोय!! भुकेच्या टायमाला एखादी घरधनीण जवा नूडल्स फेकते तवा आपुन लै मनभरून आशीर्वाद देतो तिला, पतंजली असो वा म्यागी वा आयटीसी, आम्ही कुत्री बेलाशक तोंड मारतो :)