Skip to main content

वर्ण अन आज

वर्ण अन आज

Published on 14/01/2016 - 15:28 प्रकाशित मुखपृष्ठ
(सूचना : हलके फुलके लेख वाचण्याराना कदाचित डोक्याला 'शॉट' लागण्याची शक्यता आहे - किवा हा सगळा 'विनाकारण अविचारी गोंधळ' आहे असाही वाटण्याची शक्यता आहे ) प्राचीन काळी हिंदू समाज ४ वर्णात विभागला होता . आज २१ व्या शतकात ते काहीसे खालीलप्रमाणे होतील : १. ब्राम्हण : कार्य : i ) प्राचीन काळी राज्याच्या योजना ठरवणे ii) राज्यासाठी नियम ठरवणे iii) अध्यात्मिक + सामाजिक संतुलन साधने .(पुजारी ) iv )शिक्षक (आज शंका आहे ????) आज : i )लोकसभा / राज्यसभेत निवडून आलेले मंत्री ii ) UPSC / MPSC पास होऊन क्लास १,२,३ प्रशासकीय अधिकारी ( Police सेवा - क्षत्रिय गटात मोडेल ) iii )अध्यात्मिक गुरु ( श्री श्री , बाबा रामदेव etc ) राज्याच्या (देश्याच्या ) योजना ह्या लोकसभेत /विधानसभेत होतात समाजव्यवस्थेतील पहिला महत्वाचा स्तर 'ब्राम्हण ' जो आपल्या जीवनात महत्वाचा प्रभाव पडतो . income नुसार/ कार्यानुसार ह्या वर्गात पोटजाती पडता येतील . २. क्षत्रिय : i )आर्मी , नेव्ही , ऐर फोर्से मधील सगळे ऑफिसर्स ,soldiers, कॅडेट्स etc . ii ) State Civil / Cetral civil परीक्षा पास केलेले IPS , DySP , PSI ,constable etc iii ) Railway Police etc जे लोक समाज व्यवस्था सुरुळीत चालण्यासाठी बाहेरील ओर अंतर्गत शत्रूपासून लोकांचे संरक्षण करतात ते सारे क्षत्रिय गटात मोडतील . त्यातही पगारानुसार पोटजाती पडता येतील ३. वैश्य : i )व्यापारी वर्ग - import / export business , ii )शेतकरी वर्ग - शेती व्यवसाय + दुग्ध व्यवसाय किंवा शेतीसंबंधी कोणताही व्यवसाय iii )factory owners - टाटा , बिर्ला पासून ते लहान हॉटेल व्यावसायिक . iv )डॉक्टर्स : स्वतंत्र हॉस्पिटल असणारे v )movie directors / producers vi )खेळाडू - क्रिकेटर्स etc - हे नक्की कोणत्या वर्गात मोडतील ह्याबाबत शंका आहे . स्वतः चा स्वतंत्र व्यवसाय करणारे ह्या गटात मोडतील कंपनी turnover नुसार ह्या गटात पोटजाती पडता येतील . ४. शुद्र : कामगार वर्ग i ) MBA / IIT / IIM मधून पास होऊन white कॉलर नोकरी करणारे engineers / managers इत्यादी ii ) डिप्लोमा / degree घेऊन कोणत्याही कंपनीत काम करणारे blue / pink कॉलर कामगार इत्यादी iii ) post graduation पासून ते प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक / प्रोफेसर्स इत्यादी iv ) movie actors / actoress - कारण हे पण कामगार वर्गात मोडतात - पण ह्याबद्दल हि शंका आहे . पगारानुसार , पदानुसार अन जॉब profile नुसार शुद्र वर्गामध्ये पोटजाती पडता येतील . शास्त्रज्ञ कोणत्या वर्गात मोडतात हे मला माहीत नाही (ब्राम्हण वा शुद्र ) कारण ते कोणत्यातरी कंपनीत काम करत असतात अन त्याच्या संसोधनाचा सगळ्या समाजावर परिणाम होतो keyboard बडवण्याचे कारण : १. कोणी जन्माने ब्राम्हण , क्षत्रिये , वैश्य , शुद्र म्हणून जन्माला येत नाही . ज्याचे त्याचे कर्म त्याचा वर्ग ठरवते . २. जीवनामध्ये एक माणूस कोणत्याही वर्गातून दुसर्या वर्गामध्ये त्याच्या कर्माने / मेहनेतीने जाऊ शकतो . ३. हिंदू धर्मातील ह्या ४ मुलभूत वर्गावरून आरक्षणा ची निर्मिती झाली . आजही जुण्या वर्गानुसार आरक्षण देणे दिशाभूल करणारे आहे . आरक्षणाचा मूळ उद्देश ' मानसीक गुलामगिरीतून ' मुक्तता करणे + सर्वाना समान अधिकार देणे हा होता . ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल तर पुन्हा एकदा वर्गांचे revision करावे लागेल - not an easy job . ४. उगीचच आपल्या जातीसाठी भांडण मारामारी /करणे ,(जी जात जन्माने मिळाली आहे ), ह्यात काही पुरुषार्थ नाही . ५. मानवी शरीरानुसार ब्राम्हण / शीर (ज्ञान - मेंदू ) , क्षत्रिय / हृद्य (शरीराचे रक्षण ), वैश्य / पोट (उपजीविका ) , शुद्र / जानैन्द्रीये (मल ) असे असेल तर अध्यात्मिक्तेत शिव (महेश )/ मेंदू मध्ये (चांगल्या वा वाईट गोष्टींचा नाश करणारे विचार मेंदूत तयार होतात ) , विष्णू (हृदया मध्ये - हृद्य सर्व शरीराचे नियंत्रण करते ) ब्रह्मा (जननइंद्रिया मध्ये - नवीन जीवाला जन्म देणे ) - हा विरोधाभास नाही का ? - इथं मात्र मला मिपा वरील तत्वज्ञ माझी माहिती पूर्ण करू शकतील (sorry for my typing mistake)
लेखनप्रकार

याद्या 4908
प्रतिक्रिया 20

उत्कृष्ट लेख. ज्या खुबीने तुम्ही ही तुलना करून दाखवलीय त्याला तर तुलनाच नाही. आपण तर फ्यान झालो तुमचे. मला तुमच्या लेखनाच्या चाहत्यांमध्ये एक स्थाण द्या ना प्लीज.

मिपाने आजकाल स्टोरेज कॅपॅसिटि वाढवली आहे काय? अमेझॉन क्लाउड किंवा तत्सम? की ड्रुपालनेच बॅक एंड अपग्रेड केलेय? कै च्या कै जिलब्या पडतायत.

काय असेल अश्या धाकधुकीत वाचायला घेतला आणि आवडला की चक्क! सगळ्या आय्टीवाल्यांना शूद्र गटात पाहून मिपावर नेहेमी घडते तसे झाले. म्हणजे ड्वाले पानावले.

इथं मात्र मला मिपा वरील तत्वज्ञ माझी माहिती पूर्ण करू शकतील...
ऐकताय ना तत्वज्ञ मंडळी? लवकर याहो! ( हलके फुलके वाचणारा पण डोक्याला 'शॉट' न लावून घेणारा) खेडूत

हायला लोंढे साहेबांनी आमचा हाय ब्रीड करून टाकला कि. म्हणजे १) जन्माने ब्राम्हण २) नौदलात गेलो म्हणून क्षत्रीय ३)डॉक्टर म्हणून वैश्य ४) वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शुद्र म्हणजे मी आहे तरी कोण ? को~ हम ( लहान मूल जन्माला आल्यावर रडतं तसं मला पण रडावसं वाटतंय को~ हम )

In reply to by सुबोध खरे

म्हणजे १) जन्माने ब्राम्हण २) नौदलात गेलो म्हणून क्षत्रीय ३)डॉक्टर म्हणून वैश्य ४) वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शुद्र म्हणजे मी आहे तरी कोण ? को~ हम ( लहान मूल जन्माला आल्यावर रडतं तसं मला पण रडावसं वाटतंय को~ हम )
http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-059.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही कोण आहात हे खरे तर तुम्हाला कळलेच नाही ??? दै सध्या आनंद मिपा छोटेखानी आव्रुत्ती मधून "लोंढे" ग्रंथ संपदेतून साभार

In reply to by सुबोध खरे

२. जीवनामध्ये एक माणूस कोणत्याही वर्गातून दुसर्या वर्गामध्ये त्याच्या कर्माने / मेहनेतीने जाऊ शकतो .

.....जन्माला येत नाही. ज्याचे त्याचे कर्म त्याचा वर्ग ठरवते. प्रचंड सहमत.... वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होवू शकतो. असो, (कर्माने चतुर्थ श्रेणी-कामगार वर्गातला... आणि ह्यात अजिबात लाज न बाळगलेला) मुवि

धन्यवाद , तुम्हा सर्वांच्या प्रतीक्रीयाबद्दल (comment लिहून पोस्ट वर ठेवण्याचा हा प्रयत्न नाही !!!)

भगवतगीतेमधे मधे देखील असेच सांगितले आहे, वर्ण गुणप्रमाणे विभागलेले आहेत जन्म कर्माने नाही. अन सगळे च वर्ण महत्वाचे आहेत. वर्ण ला कोणत्याही प्रकारचे रैंकिंग नाहीये. कालाप्रमाणे अध्: पतन झालेले आहे

ती 'तसली' कामं तुमच्यासाठी 'ठेवली' आहेत ...